Skip to main content

शेवग्याच्या शेंगांची भाजी ---

लेखक निवेदिता-ताई यांनी बुधवार, 11/04/2012 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - चार-पाच कोवळ्या शेवगा शेंगा, एक चमचा तेल, फोडणी साहित्य, एक चमचा शेंगदाणे कूट, मिठ चवीनुसार, गोडामसाला एक छोटा चमचा, अर्धा चमचा साखर. कॄती -- शेंगाचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या, पाच ते सात मिनिटे उकडत ठेवा,त्यावेळी त्यात मिठ घाला. चवदार होतात. शक्यतो लोखंडी कढई किंवा तव्यात फ़ोडणी करा त्यातच गोडा मसाला घाला, आता शेंगातील पाणी काढून टाका, त्या शेंगा फ़ोडणीत टाका, त्यावर मिठ व साखर घालून चांगल्य़ा परतून घ्या, व आता त्यात शेंगदाणे कूट घालून परत चांगले परतून घ्याजास्त कोरडे वाटल्यास आपण शेंगा उकडत ठेवल्या होत्या त्यातील थोडे पाणी घाला.ते पटकन आटून जाईल. ( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.) ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा....;) ही घ्या भाजी ---- करा फ़स्त ....

वाचने 16369
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

फोटो क्र. १ फोटो क्र. २ फोटो क्र. ३ फोटो क्र. ४ सकाळ पेपरपेक्षा तुमचा टेबलक्लॉथ जास्त चांगला दिसला असता ;)

छानच गं. दहा पंधरा वर्षांपूर्वी अशी भाजी खाल्ली होती. त्या शेंगा कोवळ्या नसाव्यात असा अंदाज आहे. मला इथे कधीतरी नक्की मिळतील आणि अशी भाजी करू शकेन. आधी भाकरी केल्या भाकर्‍या न म्हटल्याबद्दल भारी वाटले.:)

In reply to by रेवती

भाजी व फोटु पण छानच, आम्ही पण रस्सा भाजी करतो. या विकेंडलाच आता भाकरी भाजी करते. रेवती इंडियन ग्रोसरमध्ये फ्रोजन शेंगा चांगल्या मिळतात (माझ्या सा.बां.नी सांबार केले त्याचा व शेंगांचा मस्त वास सुटला होता). म्हणजे कोवळ्या शेंगांची सर त्याला येणार नाही (मी एकेकाळी १००-१५० शेंगा झाडावरुन काढलेल्या आहेत :( ) पण अगदीच न मिळण्यापेक्षा आणि इथल्या ताज्या भाज्या असतात त्यातल्या शेंगापेक्षा चांगल्या - कारण त्या तर इतक्या वाळलेल्या असतात की ते लाकुडच वाटते कधी कधी.

व्हेज नळ्या. :) नुसत्या शेंगा कधी खाल्या नाहित. शक्यतो इतर भाजींत, वरण-सांबरमध्ये वा कोलंबी-सुक्या मध्ये घालुनच खाल्यात आजवर.
( मी काय केले आधी भाकरी केल्या व त्याच लोखंडी तव्यात भाजी केली, खमंग होते.)
ही टीप भारी. :)

In reply to by गणपा

>>>ह आता गॅसवरचा पसारा पाहू नका ह ...फक्त भाजी पहा.... त्याच बरोबर ही सुचना सुद्धा भारी आहे. घरी शेवग्याचे झाड आहे का????

किती भारी लागते म्हणुन सांगु. माझ्या लेकीची आवडती भाजी आहे. अवांतर : रश्याची आणी मसाल्याची कधी बनवलीय काय? ती पण जाम भारी.

करुन पाहायला पाहिजे .. :) कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले ....

In reply to by अरुणा

>>>कोवळ्या शेवगा शेंगा म्हणले कि लगेच तोन्डाला पाणी सुटले .... अरुणा हा स्त्री आयडी आहे का? असल्यास हा प्रतिसाद फाऊल म्हणून धरावा का? नसल्यास हा प्रतिसाद अम्मळ अश्लील म्हणून आयडीच्या ख व मध्ये मोर्चा काढावा का? ;) - चवळीच्या नि शेवग्याच्या शेंगा आवडणारा प्यारे :)

शेवग्याच्या शेंगा म्हणजे चव कसली सॉल्लिड असते.. मला तरी नेहमी शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला मिळते. कारण मावशी नेहमीच गावावरुन पाठवते. - पिंगू

आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे. भेंडीप्रेमी परा

In reply to by परिकथेतील राजकुमार

ही शेवग्याची नविन श्टाइल कळ्ळी... :-) @आजकाल मंडईत कोवळ्या भेंड्या, गवारी आणि कोवळ्या शेवग्याच्या शेंगा असे सगळेच मिळणे दुर्मीळ होत चालले आहे.>>> या मंग कदीतरी आमच्या मार्केटयार्डाच्या किरकोळ बाजारात, थित कवळं/जून सगळच भेट्टं...! ;-)

धन्यवाद. माझी आवडती भाजी. कोवळ्या शेंगांचे अन आपले काय जमत नाय. गर खायला मिळत नाही त्यात. पण बाजारात शेवग्याची नवी जात मिळते. जाडसर गरयुक्त आणि साल एकदम मऊ. ही भाजी खाणे म्हणजे सुख. :)

छान दिसत आहे भाजी :)

आमटी भाताबरोबर पण चांगली लागेल. मी नेहमी रसभाजी करते किंवा शेंगा आमटी, सांबार कशाततरी घालते. आता अशी करून बघेन.

या शेंगा सगळ्या खायच्या की आतला गर फक्त खायचा. आतला गर खायचा तर या भाजीसाठी केलेली मेहनत फुकट जायची.

शेंगांची भाजी छानच दिसतेय हो ताई. पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना! उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

>>>पण ते फोटोंमधी "युवतीच्या...झोपेत असतांना...." काय घटना घडली ते सांगा ना! उगाच भुंगा घुसून राहिलाय मघापासून डोचक्यात!!!! ----- शमत आहे! माझ्यापण. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

ह्या शेन्गाचे वरनही छान होते.

शेवग्याच्या शेंगा उकडवून ताकात भिजत घाला अन ते ताकाचे पाणीही फोडणीला वापरा. एक वेगळीच चव येते शेंगांना. गावाकडे आमच्या घराजवळ एक शेवग्याचे झाड होते. तेथले काका न सांगता वानोळा द्यायचे.