Skip to main content

मूलींची गरज नाहीये का?

लेखक स्वप्नाळू यांनी गुरुवार, 12/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
खरेतर एवढया टोकाचं बोलायचे नव्हते. पण एवढी टोकाची परिस्थिती नसली तरी परिस्थिती विशेष बदलली पण नाहिये. मधे मिपावर एक लेख वाचला होता - " पूरुषांची गरज काय" असा काहिसा विषय होता. पण सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून मूलींची ग र ज नाहिये कि काय असा प्रश्न मनात येतो. बँगलोर सारख्या शहरात काल एका केवळ ३ महिने वयाच्या मूलीचा -' आफ्रिन'चा तिच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीमूळे म्रुत्यू झाला. कारण का तर बापाला मूलगा अपेक्षित असताना मूलगी जन्माला आली. त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध असेल बर ? मागील वर्षी सांगली मधे एका डॉ. ला गर्भनिदान करून जर गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करण्यास मदत केल्याबद्दल अटक झाली होती. कित्येक न जन्मलेल्या मुलींची त्यांच्या पालकानी ह्या डॉ. च्या मदतीने हत्या केली. वर त्या भ्रूणांची नदीपात्रात विल्हेवाट लावली. हे लिहितानाही मनाला खूप त्रास होत आहे. साधारण दोन महिन्या पूर्वी घडलेली बेबी फलक ची घटनाही अजुन विसरता आलेली नाही. दिवसा आड येण्यार्‍या हुंडबळीच्या बातम्या अजूनही येतच आहेत. खरेच मूलींची गरज नाहीये का? खरेतर याबाबतीत खूप बोलण्यासारखे आहे. पण मन सून्न झाले आहे. ( पहिल्यांदाच मिपावर भावना व्यक्त केल्या आहेत, चू.भू.दे.घे.)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1982
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मला न नेहमीच या गर्भपात करून घेणाऱ्या महिला आणि ते करणारे वैद्य याच्याबद्दल एक विचित्र कुतूहल आहे.साले कोणत्या मातीची बनलेली असतात देव जाणे.सरळ सरळ खून.जर एखाद्या जीवाला गर्भातच काही मोठा प्राब्लेम आहे असे कळले आणि मग गर्भपात केला तर ठीक आहे, पण मुलगी आहे म्हणून गर्भपात, किवा मला इतक्यात मुल नको म्हणू गर्भपात,वजन वाढेल म्हणून गर्भपात....सगळ्यांचेच हात खुनाने बरबटलेले.

In reply to by किचेन

जर एखाद्या जीवाला गर्भातच काही मोठा प्राब्लेम आहे असे कळले आणि मग गर्भपात केला तर ठीक आहे,
का ठीक? हा खून नव्हे का? कितीतरी जोडप्यांना येणार्‍या अपत्या मध्ये शारिरीक दोष असणार आहे हे माहीत असूनही त्याला वाढवण्याचा निर्णय घेतात.
पण मुलगी आहे म्हणून गर्भपात, किवा मला इतक्यात मुल नको म्हणू गर्भपात,वजन वाढेल म्हणून गर्भपात....सगळ्यांचेच हात खुनाने बरबटलेले
म्हणजे कारणं काहिही असू देत, गर्भपात करणंच हा गुन्हा आहे का? हा बर्थ कंट्रोल आहे की खून आहे ती रेषा कोण ठरवणार? किती महिन्या नंतर. ७२ तासांच्या गोळ्या खाल्यावर खून होत नाही का?

आफरीनची बातमी आत्ताच इ सकाळवर वाचली. असल्या सैतानाला जिवंत का ठेवायचे? पण कायदा विकत घेउ शकत असल्याने हा नालायक माणुस सुटेलही. स्वत:च्याच दोन महीन्याच्या बाळाचे हाल करताना काहीच कसं वाटलं नसेल!! जनावरंसुद्धा यापेक्षा चांगली.

In reply to by शिल्पा ब

जनावरंसुद्धा यापेक्षा चांगली. तहानेने व्याकुळ झालेल्या एका माकडाच्या पिल्लाने पाणी पिण्यासाठी एका तांब्यात डोके घातले आणि बिचार्‍याचे डोके त्यात अडकुन पडले. ९ दिवस त्या पिल्लाला घेऊन त्याची आई, माकडिण, वणवण फिरत होती. तो तांब्या निघत नव्हता आणि अन्न-पाण्या वाचून ते पिल्लू तडफडून मेले. हे ९ दिवस त्याच्या आईने त्याला अंतर दिले नाही. पण बघ्यांना त्याची दया आली नाही. उलट, 'हेल्मेटवाले माकड' असे संबोधून त्यांनी त्या घटनेतून आनंद शोधला.

मागे सकाळ ला एक लेख आला होता. विदर्भात कित्येक मूलींची नावे "नकुशा" आहेत कारण त्या नकोश्या असताना जन्माला आल्या.