खरेतर एवढया टोकाचं बोलायचे नव्हते. पण एवढी टोकाची परिस्थिती नसली तरी परिस्थिती विशेष बदलली पण नाहिये.
मधे मिपावर एक लेख वाचला होता - " पूरुषांची गरज काय" असा काहिसा विषय होता. पण सध्या ज्या बातम्या येत आहेत, त्यावरून मूलींची ग र ज नाहिये कि काय असा प्रश्न मनात येतो. बँगलोर सारख्या शहरात काल एका केवळ ३ महिने वयाच्या मूलीचा -' आफ्रिन'चा तिच्या वडिलांनी केलेल्या मारहाणीमूळे म्रुत्यू झाला. कारण का तर बापाला मूलगा अपेक्षित असताना मूलगी जन्माला आली. त्या एवढ्याशा जीवाचा काय अपराध असेल बर ? मागील वर्षी सांगली मधे एका डॉ. ला गर्भनिदान करून जर गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करण्यास मदत केल्याबद्दल अटक झाली होती. कित्येक न जन्मलेल्या मुलींची त्यांच्या पालकानी ह्या डॉ. च्या मदतीने हत्या केली. वर त्या भ्रूणांची नदीपात्रात विल्हेवाट लावली. हे लिहितानाही मनाला खूप त्रास होत आहे. साधारण दोन महिन्या पूर्वी घडलेली बेबी फलक ची घटनाही अजुन विसरता आलेली नाही. दिवसा आड येण्यार्या हुंडबळीच्या बातम्या अजूनही येतच आहेत. खरेच मूलींची गरज नाहीये का?
खरेतर याबाबतीत खूप बोलण्यासारखे आहे. पण मन सून्न झाले आहे.
( पहिल्यांदाच मिपावर भावना व्यक्त केल्या आहेत, चू.भू.दे.घे.)
वाचने
1982
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला न नेहमीच या गर्भपात करून
कळलं नाही
In reply to मला न नेहमीच या गर्भपात करून by किचेन
आफरीनची बातमी आत्ताच इ सकाळवर
+१ शीर्षकाच्यापुढे बातमी
In reply to आफरीनची बातमी आत्ताच इ सकाळवर by शिल्पा ब
लिन्क मिळेल का बातमिची ?
In reply to आफरीनची बातमी आत्ताच इ सकाळवर by शिल्पा ब
http://www.esakal.com/esakal/
In reply to लिन्क मिळेल का बातमिची ? by जेनी...
क्रुरता...
In reply to आफरीनची बातमी आत्ताच इ सकाळवर by शिल्पा ब
"नकुशा"