बाठोणी (सासव)
एप्रिल अर्धा संपत आलाय. काही दिवसातच घरा घरांतुन आंब्यांचा सुगंध दरवळु लागेल. तस बाजारात आंब्यांच्या राजाच आगमन झालेल आहेच. पण सध्या त्यांचे नगा-गणीक भाव पहाता महागाईने आधीच फाटलेल्या खिशाला ठिगळं लावायची पाळी यायची. त्यामुळे तुर्तास अजुन काही दिवस वाट पहाण्या शिवाय गत्यंतर नाही.
माझं घर आणि आजोळ कोकणात (दोन्ही एकाच गावात समोरा समोर) असल्याने 'एप्रिल-मे'मध्ये घरी कधी आंब्यांचा दुष्काळ जाणवला नाही. एप्रिल महिन्याच्या मध्यावर मामा आंब्याची करंडी घेउन मुंबईतल्या घरी हजर असायचाच. मे महिन्यात शाळेला सुट्टी लागली की मग गावी आंब्यांचा फडशा पाडण्याच्या कामगीरीवर जातीने रुजु व्हायचो. आम्हा भावंडांमध्ये आंबे, ताडगोळे, शहाळी रिचवायच्या शर्यती लागायच्या. एप्रिलमध्ये लोणची, पन्हं, मुरांबे आदींच्या तावडीतुन वाचलेल्या कैर्या, आजी- मामाने माळ्यावर पेंड्यांमध्ये पिकायला ठेवलेल्या असायच्या. आम्ही गेलो की त्याचा फन्ना तर उडायचाच पण स्वतःच्या हाताने (दगड मारुन वा बेचकीने) वाडीतल्या झाडांवरचे आंबे पाडुन खाण्यात जी मजा असायची ती वेगळीच. असो तर सांगायचा मुद्दा काय तर बालपणी आम के आम आणि गुठलीयोंके दाम पण नाही.
मे महिन्यात हटकुन घरी होणारा पदार्थ म्हणजे बाठोणी (बाठ्यांच सासव.) इथे आफ्रिकेत तस पाहिल तर बारा महिने झाडांवर कैर्या लागलेल्याच असतात, पण आंब्यांचा खरा मौसम हाच, एप्रिल-मे. सध्या बाजारात सर्वत्र रायवळ आंबे दिसु लागलेत. काल आईच्या हातच्या बाठोणीची आठवण झाली. म्हटल मौका हे दस्तुर भी है. होउन जाउदे.
तसा हा पदार्थ बनवण्याच्या दृष्टीने काही फार पेश्शल नाही. मुळात रायवळ आंब्यांची आंबट गोड चव आणि त्यात थोडी मॉडिफिकेशन केलं की झालं. :)
साहित्य :
माणशी किमान दोन ते तीन बाठे येतील या हिशोबाने रायवळ (चोखायचे) आंबे घ्यावे. एक कुणाच्या दाढेलाहील लागणार नाही. ;)
मी सहा घेतले. :)
फोडणीसाठी :
१ मोठा चमचा जीरं.
१ लहान चमचा लाल तिखट.
१ लहान चमचा काळीमिरी पुड (भरड)
मीठ चवी नुसार.
२ मोठे चमचे साजुक तुप.
कृती :
आंबे, सालं सुटी होतील इतपत हलक्या हाताने दाबुन घ्यावे. सालं काढुन बाठे गरा सकट बाजुला काढावे. सालीत उरलेला गर चमच्याने काढुन घ्यावा. वाटल्यास दोन आंब्यांचा पुर्ण रस काढावा.
कढईत तुपावर जीर, काळीमिरी, लाल तिखट आणि मीठाची फोडणी करावी.
बाठे आणि रस अलगद फोडणीत सोडावे. चमच्याने हलकेच एकत्र करावे.
लहान आचेवर ५ मिनिटं शिजवावे.
शक्यतो गरमा-गरमच वाढावे. (वाटल्यास सोबतीला चपाती-पुरी-भाकरी. नाहीतर नुसतेच.)
आंब्याच्या आंबट गोड चवीला किंचित तिखट आणि मीठाची अफलातुन जोड.
बघता काय सामिल व्हा. :)
वाचने
55923
वाचनखूण
प्रतिक्रिया
70
भन्नाट लागत असणार!
मस्त
शाकाहार्यांवर कृपा केलीस
In reply to शाकाहार्यांवर कृपा केलीस by रेवती
रेवती आंबे जर जास्त गोड नसतील
मस्त हो गणपा भौ. असाच एक साउथ
गंपा पाककृती टाके
In reply to गंपा पाककृती टाके by अत्रुप्त आत्मा
खतरा !! जीवघेणे !!
व्वा, मस्त दिसतंय. काल एका
झकासच !! घरी गेल्यानंतर करुन
नवीनच प्रकार आहे. मस्त आहे जे
छळवादी माणूस
हायला !!!! पहिल्यांदाच पाहीला
बाठ म्हणजे कोय का? आणि कोयीचं
In reply to बाठ म्हणजे कोय का? आणि कोयीचं by स्वानन्द
कोय
In reply to कोय by साती
तर जेवताना चपातीला लावून
In reply to तर जेवताना चपातीला लावून by गणपा
+ २
In reply to + २ by मेघवेडा
+३
In reply to कोय by साती
कोकणस्थाने
मस्तं....
दिसतोय छान ... !!!
पाकृ वाचता वाचता आंब्याचा वास
-
रायवळ आंब्यांच(घोंटां) सांसंव
ग्रेट...
वा!!!
बाठ म्हणजे कोयच ना रे गणपा?
खल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लाआआस !
वेगळ्या प्रकारची पा़कृ
In reply to वेगळ्या प्रकारची पा़कृ by गवि
कोयांड ?
नवीन
गण्या गण्या अरे कशे कशे
माझ्या माहेरी हा पदार्थ
बाठोणी (बाठ्यांच साकव.) > इथे
अफ्टर रिअल लाँग गणपा शेफ हॅज
छान दिसत आहे हा प्रकार....
अरेच्चा!
.
In reply to . by गणपा
बाठ/कोय
मस्त..
देवा रे..
आंब्यापासून असल काही बनेल
In reply to आंब्यापासून असल काही बनेल by प्राध्यापक
आंब्यांचे दोन मुख्य प्रकार एक
In reply to आंब्यांचे दोन मुख्य प्रकार एक by गणपा
शेपू आंबाही चांगला ठरावा..
यम्मी मस्त हो गणपा सेठ
हं
In reply to हं by नगरीनिरंजन
हा हा हा नानि, मागे माझा
ह्यावेळेस आंबे खरेदी केल्यावर
ते गोंड्स आंबे आणि सासवचा
लैच भारी रे भाऊ...... तोंडाला
(No subject)
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
बिका, भरीत पाहून ठीक आहे पण
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
काय झालंय?
In reply to काय झालंय? by स्मिता.
आजकाल कुठल्याही पाकृवर फक्त
गणपा, यामधे थोडे मेथिचे दाणे
च्यायला...
चालू दे रे बाबा.
येकदम भन्नाट.
बाठोणी / बाठवणी
निषेध!
In reply to निषेध! by पैसा
+१
In reply to निषेध! by पैसा
बरोबर सासवच ..
पाडाला पिकलाय आंबा
वा छान प्रकार आहे.
<<(गोव्यात मोहरीला सासवा
करून बघितला जाईल नक्कीच
धन्य..
धागा वर आला आहेच तर पुन्हा
वा !
भारी आहे हे :)
खल्लास आहे, आंब्याच्या दिवसात