Skip to main content

मसाला बांगडा

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 10/04/2012 06:25 या दिवशी प्रकाशित केले.
बांगडे लागणारा वेळ: ३० मिनिटे लागणारे जिन्नस:
  1. ४ बांगडे
  2. अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
  3. ३ टेस्पून लाल तिखट
  4. १/२ टीस्पून हळद
  5. १ टेस्पून धणे पावडर
  6. २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
  7. १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  8. १ टेस्पून मिठ
  9. केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
  10. १ टीस्पून तेल
क्रमवार पाककृती:
  1. बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरत ठेवावे.
  2. केळीची पाने स्वच्छ करून त्यांच्या उलट बाजूला ३-४ थेंब तेल लावून ठेवावे.
  3. तव्यावर थोडेसे तेल टाकून गरम करायला ठेवावा.
  4. आता एक बांगडा एका पानाच्या तुकड्यावर ठेवावा आणि पान दुमडून घ्यावे.
  5. तापलेल्या तव्यावर ही गुंडाळी टाकून प्रत्येक बाजूने १०-१२ मिनिटे शिजवावे.
  6. सर्व्ह करावे..
कांदा-लसूण मसाला एक्दम झणझणीत लागतो. कमी तिखटपण बनवू शकता पण तेव्हढे छान लागणार नाहीत स्मित मसाला पेस्ट अगदी छान लागली पाहीजे बांगड्यांवर... लिंबाऐवजी चिंच जास्त छान लागते.

वाचने 8691
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

बांगडा एकदम टेम्पटींग दिसतो आहे. (मला बांगड्याची अ‍ॅलर्जी असल्याने मी कधी त्याचा तोंडाला लागत नाही)

दिसतय छान ! लागेलही छानच !!!

बांगडा चमचमीत दिसतो आहे. मसाला बांगडा म्हणजे अंगचेच कालवण (मसाला) असेलसे वाटले होते. असो. पारशी लोकांच्या 'पात्रानी मच्छी' प्रमाणे कृती दिसते आहे. अर्थात, त्यांचा मसाला वेगळा असतो.

झक्कास दिसत आहे :) फोटो पण मस्त :) बांगडा आवडत नसल्याने माझा पास....

In reply to by सानिकास्वप्निल

+1

दिसतय छान ! लागेलही छानच !!

धन्यवाद...मलापण हा बांगडा ठिकच वाटला, भारतातला जास्त चांगला लागतो.