बांगडे
लागणारा वेळ: ३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
- ४ बांगडे
- अर्धे लिंबू किंवा छोट्या लिंबाएवढी चिंच
- ३ टेस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १ टेस्पून धणे पावडर
- २ टेस्पून कांदा-लसूण मसाला (किंवा गरम मसाला, फिश मसाला, रोजच्या वापरातला कुठलाही मसाला)
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १ टेस्पून मिठ
- केळीच्या पानाचे ४ तुकडे (साधारण १ फूट)
- १ टीस्पून तेल
- बांगडे स्वच्छ करून, हळद, मिठ, मसाला, तिखट,धणे पावडर, आलं-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मुरत ठेवावे.
- केळीची पाने स्वच्छ करून त्यांच्या उलट बाजूला ३-४ थेंब तेल लावून ठेवावे.
- तव्यावर थोडेसे तेल टाकून गरम करायला ठेवावा.
- आता एक बांगडा एका पानाच्या तुकड्यावर ठेवावा आणि पान दुमडून घ्यावे.
- तापलेल्या तव्यावर ही गुंडाळी टाकून प्रत्येक बाजूने १०-१२ मिनिटे शिजवावे.
- सर्व्ह करावे..
वाचने
8691
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त्...मॅकरेल म्हणजे बांगडा
आज सोमवार आहे गं ,असे
मस्त आहे एक्दम
खुप दिवसांनी आलात
बांगडा एकदम टेम्पटींग दिसत आहेच,
In reply to खुप दिवसांनी आलात by jaypal
वेल्कम बॅक दिपाली. बांगडा =
ओह्ह
In reply to वेल्कम बॅक दिपाली. बांगडा = by गणपा
ही घे बांगडी, तारली
In reply to ओह्ह by परिकथेतील राजकुमार
झकास
चमचमीत..
झक्कास
+1
In reply to झक्कास by सानिकास्वप्निल
छान
लपलप झाली जीभ !!
दोनदा झाला!
एक नंबर पाकृ
धन्यवाद