वडीलोपार्जीत संपत्ती?
मानवतेचा ठेवा?
स्त्रीधनच.
बहुतेक
वापरु की नको?
जग कुठे चालल्लेय?
----------
उधळ्या इसाप
भरपूर वाटून, झाला सुप्रसिद्ध!
आता, मी वाटून काय उपयोग?
आणि हो, घाबरतोय कोण कुप्रसिद्धीला?
-----------------------
ती ना? नसतेच राजकारण्यांकडे,
सरकारी बाबूंकडे आणि
भांडवलशहांकडे.
म्ह्णूनच मीही वापरत नाही.
कशाला त्यांची वक्रदृष्टी?
--------------------------
म्हणाली, मला स्वातंत्र्य द्या.
तुमच्या आयुष्यात स्थान द्या.
नाही जाणार पळून,
नाही होत मी भ्रष्ट.
ज्यांनी दिले, ते अजरामर झाले.
स्साली, जरा बोलू दिले,
तर पोहोचली थेट माझ्या मरणापाशी..
वाचने
2918
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्लास
क्लासच!!सुंदर!!!
:)
अंह!
अंह!
मस्त !
हे एकदम आवडेश.
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
जबहर्या
माताय हे अंगही आहे का तुमच्याकडे?
पुर्वी कधी दिसलं नाही. :)
+१
In reply to जबहर्या by गणपा
आवडलं, काव्यांग आवडलं!
:)
पुर्वी कधी दिसलं नाही.
अहो, आधी ते सुप्त होतं!
आता रिटायरमेंट जवळ आल्याने उमलतंय, अंग!!!
मेल्-मेनोपॉजचा तुमच्या तिथल्या उष्ण हवेत मात्र भारीच त्रास हो सहजराव!!!!
:)
सहजांचे सुंदर काव्य ...
सहजांचे सुंदर काव्य ... :-)
सहजच केलेलं दिसतंय. मुक्तक
सहजच केलेलं दिसतंय.
मुक्तक झालंय मात्र भारी !
खरडवह्या बंद करायच्या. मग
खरडवह्या बंद करायच्या.
मग असल्या कविता होणार नैत तर काय? ;-) भाग्ग्ग्गो
अवांतर: लै जब्राट ! ;-)
हे तर सहजकाव्य आहे! खूप
हे तर सहजकाव्य आहे! :)
खूप सुंदर.
राघव
असेच
In reply to हे तर सहजकाव्य आहे! खूप by राघव
हे तर सहजकाव्य आहे!
खूप सुंदर.
अजून येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
म्हण्जे?
म्हण्जे?
मस्त!
कविता मस्त! पण नीतिमत्ता म्हण्जे काय हो भौ?
बॉं बाँ बाँ... कोन लिवतय बगा
बॉं बाँ बाँ... कोन लिवतय बगा की राव !
डायरेक्ट व्यनी मोड मधुनशान नितिमत्तेवर !
हॅहॅहॅ... चुकुन हिंदुस्थानी बातम्या देणारी वाहिनी अथवा वर्तमानपत्र सहजच नजरेत आले काय राव ? ;)
छान
देर से आये, दुरुस्त आये!
खव, खफ वर ऊंडारणं बंद केलं की काही लिहून होतं!
Waht you keep is not yours, what you give away is yours असं कुणीसं म्हटलयं (गुगलून पहा आणि नाहीच सापडलं तर मीच म्हटलय असं समजा!)
कवितेचा फॉर्म आवडला.
ही सुरुवात ठरू दे आणि सहजरावांकडून असेच लेखन येउ दे!!
_/\_
_/\_
मुक्तक
छान. आवडले.
आवडेशच.
आवडेशच.
छान
छान लिहिले आहे.
हं
हं... काही लिहायचे आहे, पण लिहिणार नाही अशा अवस्थेतील काव्य! :)
छानच
ती ना? नसतेच राजकारण्यांकडे,
सरकारी बाबूंकडे आणि
भांडवलशहांकडे.
म्ह्णूनच मीही वापरत नाही.
कशाला त्यांची वक्रदृष्टी?
अजून येऊ द्यात!