आँखें
लेखनप्रकार (Writing Type)
जवळपास ६-७ वर्षांपुर्वी सागर आर्ट्स (रामायण बनवणार्या रामानंद सागर यांची कंपनी) नी दूरचित्रवाणी इतिहासात मैलाचा दगड ठरावी अशी मालिका दूरदर्शनवर आणली.
"उस देश की सरहद को कोई छू नही सकता... जिस देश के सरहद कि निघेबान है आँखें" हे शीर्षकगीत कानावर पडलं, की पुढचा अर्धा तास काहितरी भन्नाट बघायला मिळणार'च', या खात्रीने आम्ही टीव्हीसमोर डोळ्यात प्राण आणून सरसावून बसत असू. अत्यंत कमी बजेटमध्ये चित्तथरारक साहसकथा पेश करण्याचं निर्माता-दिग्दर्शकांचं कसब तर वाखाणण्याजोगं. दुर्दैवाने, निखळ आनंद देणार्या या कलाक्रुतीला म्हणावा तसा लोकाश्रय मिळाला नाहे, तरी किमान या माध्यमातून तरी गुणग्राहक मिपाकरांना त्याची ओळख व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न.
मालिकेचा प्लॉट अगदी साधासरळ - आपल्या देशावर वारंवार होणारे अतिरेकी हल्ले, घडवून आणलेल्या दंगली, परकीय देशांची षड्यंत्र, इत्यादीचा बीमोड करण्या साठी निवडक हुशार व साहसी कमांडोजची बनवलेली आँखें नावाची टीम, व त्यांचा देश के दुश्मन च्या विरुध्द संघर्ष.
टीम आँखें : कर्नल ध्यानचंद नावाच्या, जेम्स बाँडला धडे देऊ शकेल अशा जॉबाज अधिकार्याच्या अधिपत्याखाली बनवलेली टीम. या कर्नल कडे मागाल ते कसब आहे. उदा: पिकासाटा(!) देशात कर्नलनी फ्रीस्टाईल कुस्तीची स्पर्धा जिंकून, जिंकलेलं २०० टन सोनं (होय! २०० टन. टायपो एरर नाहिये) समाजसेवेसाठी (कोणती ते विचारायचं नाही) दान केल्याचा ओझरता उल्लेख एका भागात आला आहे. या टीम मधे हरदयाल नावाचा अती साहसी, शक्तिमान सरदार देखील आहे. हा सरदार असल्यामुळे अर्थातच देशभक्तीने ओतप्रोत भरलेला, प्रचंड शक्तीमान, वफादार, इत्यादी अहेच. इतर पात्रांना जागा भरण्यासाठी घेतले आहे. या टीमचे वैशिष्ट्य म्हणजे, हे सर्व सतत टाय आणी ओव्हरकोटमधे वावरतात, आणी कोणत्याही मिशनवर कितीही गोळीबार झाला, तरी यांच्यापैकी कोणीच कधीच मरत नाहीत.
टीम "देश के दुश्मन": यांच्यात ३ महत्वाच्या व्यक्तिरेखा आहेत. कंगारू नावाचा शातिर दिमाग वाला यांचा जनरल. दिसायला हा जरी एखाद्या ७० च्या दशकातल्या चित्रपटातील हिप्प्याचा रोल करणार्या दुय्यम कलाकाराचा डमी वाटत असला, तरी याच्या सुपीक डोक्यातून कल्पनांच्या सुनामी येत असतात. कार्लोस - हा कंगारूचा बॉस. हा सदैव मिलिटरी गणवेशात वावरतो, कर्नल ध्यानचंदला फोनवरून धमक्या देतो, आणी प्रत्येक संभषणाच्या शेवटी "कर्नल्!!!" असं जोरात ओरडतो.
(उदा : कर्नल (फोनवरून): "जो मिसायल तुमने मेरे देशपे छोडा था, उसे एक कंप्यूटर प्रोग्राम के जरिये मैने तुमपरही मोड दिया है कार्लोस!"
कर्लोस (टेबलावर मूठ आदळून) : "कर्न.....ल्ल!!!!!!")
तिसरी बोस्की. अंतरराष्ट्रीय माफिया टोळी म्हणजे त्यांच्यात स्वत्।ला मादक समजणारी, भडक मेक-अप करून चित्रविचित्र सोनेरी विग वापरणारी, सदैव ईव्हीनिंग गाऊनमध्ये वावरणारी हॉट बेब हवीच. ही तीच!
तर कंगारू आणी साथी, पिकासाटा, जाफर, रोमेशिया, प्रिंसलँड, इत्यादी देशांसाठी अमली पदार्थ/ शस्त्रास्त्र तस्करी पासून, दरोडे, नोटा छापणे, वगैरे कामे यथाशक्ती करत असतात. (असली कल्पक नावं ही अजून एक खासियत. एका भागात तर "माका-नका-मारू" नावाचा जपानी सुमो पैलवान दाखवला होता.) आणी महत्वाचं म्हणजे, या सर्व देशांना भारतावरच हल्ला करायचा असतो. आणी दर वेळी त्यांच्या मधे अडसर बनून त्यांचे नापाक इरादे उधळवून लावण्याचं काम आँखें कसं करतात, याचं चित्तथरारक चित्रण म्हणजे "आँखें".
या रोमहर्षक कलाक्रुतीतील अजून काही लक्षवेधक गोष्टी :
* हेलोकॉप्टर : आँखें टीमच्या या अति अद्ययावत हेलिकॉप्टरमध्ये चाकं असलेल्या खुर्च्या असतात, अगदी आपल्या ऑफिसमधे असतात तशा. एवढेच काय, 'खिडक्यां'ना पडदे पण असतात, आणी पायलटला (हे पायलट लोकं साधी दुचाकीची हेल्मेट्स घालून हेलिकॉप्टरमध्ये शिरतात, आणी आत जाताच काढून ठेवतात) "और तेज" वगैरे आज्ञा दिल्यावर हे पडदे जोरात फडफडतात देखील. एकाच वेळी खूप लोकांना जायचं असेल, तर लोकल मधे असतात तश्या कड्यांना, व खांबाला धरून उभे राहून जाण्याची सोय हेलिकॉप्टरमधे असतेच.
*अद्ययावत शस्त्रास्त्र : आँखे टीमच्या प्रत्येकाकडे असलेली पिस्तुलं / बंदुका, दिसायला जरी पिचकार्यांसारख्या असल्या, तरी एका गोळीत विमान पाडण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं. याच जोडीला कर्नलचे स्टेट ऑफ द आर्ट गाडी! नुसतं पार्किंग लाईटचं बटण दाबलं, की एक पुठ्ठ्याचं रॉकेट (कधीतरी याला लावलेली सेलोटेप, ज्याला हे टांगलंय त्या दोर्या, वगैरे पण दिसायचं) डिकीमधून बाहेर येऊन कोणत्याही दिशेला असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेणार! कार्लोसची पाणबुडी (यात एकदा ते डिस्को लाईट्स लावून, "रम्बा हो हो हो!" करत नाचताना पण दाखवलेत) ही बरीचशी कर्नलच्या हेलिकॉप्टरसारखीच.
*शास्त्रज्ञ : कंगारूच्या डोक्यात आलेली प्रत्येक कल्पना प्रत्यक्षात उतरवून दाखवणारा शास्त्रज्ञ यांना प्रत्येक एपिसोड मधे सापडतोच. तो वेडा तरी असतो, नाहितर त्याला एखादी किडनॅप करण्यायोग्य मुलगी ही असतेच. अॅसिडचा पाऊस पाडण्यापासून, लोकांना संमोहित करून त्यांना कार्लोसचा गुलाम बनवणारं रसायन शहराच्या पाणीपुरवठ्यात मिसळण्यापर्यंत कुठलीही स्वप्नवत कल्पना हे लीलया तडीस नेतात. आँखें वाल्यांकडे मात्र कोणी शस्त्रज्ञ नाहीत. त्यांचा एकटा ध्यानचंद पुरेसा आहे.
आँखें मधील साहसद्रुष्ये, अर्थात अॅक्शन सीक्वेन्सेस केवळ अतुलनीय आहेत. चहुबाजूंनी जोरदार गोळिबार चालू असताना, आँखें च्या लोकांनी कुंड्यांमधील इवलीशी रोपे, पडदे, वाट्टेल त्यामागे लपून स्वत:चा बचाव केलेला मी पाहिलाय.
एकदा एका आदिवाशाने मारलेला बाण हाताने काठी फेकावी तसा समोर पळणार्याच्या पाठीत सरळ जाऊन उभा आपटतो. पुढच्याच फ्रेममधे पोटात घुसलेल्या बाणामुळे सावज ठार!!
असल्या अनेक सौंदर्यस्थळांनी नखशिखांत मढलेल्या या मालिकेचे काही भाग पहायला मिळाले हे आमचे भाग्य.
दुर्दैवाने, आज जालावर याचा एकही भाग कुठे सापडत नाहीये. या धाग्याच्या निमित्ताने मी सर्व मिपाकरांना कळकळीचे आवाहन करतो की आपापल्या नेटवर्कमध्ये कुठेही, कोणाकडेही, आँखें सापडल्यास, जरूर कळवावे, आणी इथे सर्वांबरोबर शेयरही करावे. नाहितर एवढी सुंदर मालिका विस्म्रुतीत जाण्यासारखे दु:ख ते कोणते?
प्रतिक्रिया
+१००००००००
या टीम मधे हरदयाल नावाचा अती
:) :)
+१
हाहाहा
मी रोहित शी पूर्णतः सहमत
प्रश्नच नाही. ही मालिका
विडबंन छानच, पण इथे जरा माझा
+१
बरोबर आहे, सुहास आणी प्यारे१.
भन्नाट. आँखेचे काही फोटू इथे
ह्हा ह्हा ह्हा...! मस्त ताशा
विशेष म्हणजे...
साष्टांग नमस्कार
वाचवा,,,,,,,,,,,, बचाव.....................
अहो इरसाल काका, वरती मी एका
नैइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ!!!!!!!!!!!!!!!!!!
धम्माल
सॉरी.....
धन्यवाद.
हा हा हा मस्त लिहीलय
एक विसरलात
हाहाहाहा
कुठाय व्हिडीओ ?
हाहाहाहा
मित्रा, एक गोष्ट विसरलास की
:-)
ठ्ञाँ ... आउर भी आने दो.
धन्यवाद!!! तो काळ पुन्हा
बाजारा उठवला आहे आंखेचा. ठार
ध मा ल धागा
श्रीरंग साहेब, मस्त चुरचुरीत लेख झाला आहे.
माझ्या लहानपणातलं काही तरी
२००२-०४ हा काळ होता...
अर्रर्रर्रर्रर्रर्र
सापडला!!
मस्त मजा!
https://www.youtube.com/watch
ही ही ही....मस्तं लिहिलय.