Skip to main content

व्योमकेश बक्शी आणि त्याच्या रहस्यकथा

लेखक प्राध्यापक यांनी शनिवार, 07/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा चा सभासद झाल्यानंतर प्रथमच लेखन करतोय काल व्योमकेश बक्शी आणि त्याच्या रहस्यकथा हे अशोक जैन यानी अनुवादीत केलेले पुस्तक वाचण्यात आले,आणी जुना काळ आढवला,लहान असताना दुरदर्शन वर या पुस्तकावर अतिशय सुरेख मालिका लागायची ,जे मि.पा. कर आता ३६ च्या पुढे आहेत त्याना नक्कीच आटवत असेल . या निमीत्तने एक जाणवले कि आपल्याकडे अश्या रहस्यकथा बाबुराव अर्नाळ्कर व सुहास शीरवळकर यांचा सन्माननीय अपवाद वगळ्ता फारश्या नाहिआहे,वरील दोघांशीवाय आणखी कोणी लेखक मिपा करांना माहिति असल्यास क्रुपया कळवावे.

वाचने 8314
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

व्योमकेश बक्षी लहानपणी टिव्हीवर 'पाहिला' होता. पण शेरलॉक होम्स जेव्हा 'वाचला' तेव्हा व्योमकेश त्याचे भारतीय रुप असल्यासारखे वाटले. अर्नाळकरांच्या रहस्यकथा वाचलेल्या नाहीत. व्यंकटेश माडगूळकरांनी एका कथेत कालवड शेतात कुणी चारली असेल त्याचा अचूक 'माग काढणारा' गावठी माणूस रंगवला आहे. तो गावठी भणंग डिटेक्टीव्हच वाटला होता.

In reply to by ५० फक्त

तो रिपिट रन होता रे! तसं तर ३६ वर्षांपूर्वी फार कमी लोकांकडे टीव्ही होता. (यकु दाखवतो त्याहून बराच मोठा आहे असं म्हणायचंय का तुला? तर ठीक! :D)

तू नळी झिंदाबाद येथे व्योमकेश बक्षी चे सर्व एपिसोड उपलब्ध आहेत. http://www.youtube.com/watch?v=WyEyoRXUPGU सध्या घरी आल्यावर एकदिवसाआड होम्स आणि व्योमकेश पहात आहे.

प्राध्यापक, मिपावर स्वागत! व्योमकेश बक्षीचे काही भाग पाहिलेत. मजा यायची. @यशवंता, बाबुराव अर्नाळकरांची पुस्तकं मिळवून जरूर वाच. आपण तर बुवा सॉलिड फॅन आहे!

अल स्टॅन्ले गार्डनरचा हा वकिल मानसपुत्र शरलॉक एव्हडा नाही पण बराच कल्पक व हुशार (व मराठीत अनुवादीतही) आहे. रोमँटीसीझम आवडत असेल तर अगाथा ख्रिस्तीच्या कथा विशेषतः हर्क्युल पायरो ही छान , पण अर्थात हा एट्रीं लेवल म्हणुनच ठीक फार गंभीर अथवा प्रचंड किचकट वगैरे रहस्य कधी नसतं याचं. आणी हो जेम्स बाँडच्या काही छोट्या कथा भा.रा. भागवतांनी अनुवादीत केल्या होत्या त्या (सध्या मेहता पब्लिशींगने बाजारत आणलेल्या मोठ्या कादंबर्‍या न्हवे) तसेच अलिस्टर मॅक्लिनच्या कादंबर्‍याही मस्त.

बाबुराव अर्नाळकरांच्याही पूर्वी कुमुदिनी रांगणेकर आणि शशी भागवत हे लेखक मराठीत "हेरो अय्यारों " की दुनिया आबाद करत असत. त्याही पूर्वी नाथ माधवांच्या कादंबर्‍या होत्या. शशी भागवत यांची "रत्नप्रतिमा" मला अजूनही आठवते आहे.

रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी अथवा गुप्तहेरकथा ह्या दृष्टीने पाहिल्यास मराठी साहित्यात ह्या प्रकारात मग खूपच मर्यादा येतात. व.कृ. जोशींनी इ. प्रधान हा मानसपुत्र निर्माण करून उत्तम पोलिसी रहस्यकथा लिहिल्या आहेत. द. पां खांबेटे यांच्या काही रहस्यकथाही उत्तम. अनिल गुजरांनी स्वतंत्र रहस्यकथा लिहिण्याचा प्रयत्न करून पाहिला पण ते नीट न जमल्याने ते अनुवादाकडेच वळलेले दिसतात. श्रीकांत सिनकरांच्या प्रत्यक्ष घटनांवर आधारीत पोलिसी चातुर्यकथाही उत्तम. अर्नाळकरांचे साहित्य आताच्या काळात खूपच बाळबोध वाटते. नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी हे गूढकथालेखक पण गूढामध्ये रहस्य हे असतेच. त्या दृष्टीने या दोघा लेखकांकडे पाहिल्यास मराठीतील सर्वात उच्च कोटीचे रहस्यकथाकार हे दोघे असतील.

In reply to by प्रचेतस

रहस्यकथा म्हणजे निव्वळ पोलिसी अथवा गुप्तहेरकथा ही मर्यादा काधली तर काही उत्तमोत्त्म,तुम्हाला आवडलेल्या क्था,कादंबर्‍या, मालिका,चित्रपट,अनुभव ह्यांची ओळख करून द्याल काय? तेवढेच नवीन माहिती तरी होइल.

In reply to by मन१

नारायण धारपांच्या पळती झाडे, साठे फायकस ह्या उत्तम भयकथा आहेत. चंद्राची सावली ही तर सर्वोत्तम. रत्नाकर मतकरींच्या हेडस्टडी, लपाछपी, मला विक्रम दिसतो, ड्रॅक्युला, मंदा पाटणकरची गोष्ट ह्या अत्यंत दर्जेदार रहस्यकथा-गूढकथा आहेत.

In reply to by प्रचेतस

""नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी हे गूढकथालेखक पण गूढामध्ये रहस्य हे असतेच. त्या दृष्टीने या दोघा लेखकांकडे पाहिल्यास मराठीतील सर्वात उच्च कोटीचे रहस्यकथाकार हे दोघे असतील."" अगदी बरोबर :)

In reply to by प्रचेतस

>>>>>नारायण धारप किंवा रत्नाकर मतकरी हे गूढकथालेखक पण गूढामध्ये रहस्य हे असतेच. त्या दृष्टीने या दोघा लेखकांकडे पाहिल्यास मराठीतील सर्वात उच्च कोटीचे रहस्यकथाकार हे दोघे असतील. सहमत. जेम्स हॅडली चेस च्या रहस्यकथा सुद्धा उत्तम आहेत. अलीकडेच त्याच्या काही कथांचा अनुवाद विजय देवधर यांनी केला आहे.

या पात्राच्या गोष्टी वाचल्यात का कोणी?

जे मि.पा. कर आता ३६ च्या पुढे आहेत त्याना नक्कीच आटवत असेल नाही हो नाही एवढी जुनी मालिका नाही ती. मलाही आठवते मालिका उत्तम (आणि मी अजुन ३६ चा झालेलो नाही ;) ) ब्योमकेश बक्षीच्या कथा उत्तम आहेत यात वाद नाही परंतु लेखनशैली अगदी तंतोतंत शेरलॉक होम्सशी मिळतीजुळती वाटते (मराठी भाषांतरावरुन). कथांचा बाजही थोडासा तसाच आहे. होम्सकथांशी नाळ बांधण्यासाठी असेल कदाचित पण बहितेक सगळ्या कथा उच्चभ्रु अथवा उच्च मध्यमवर्गीय पात्रांना समोर ठेवुन लिहिल्या आहेत. तिकडे डॉ वॉट्सन आहे इथे अजित आहे. तो डॉक्टर असतो तर हा लेखक असतो. फरक इतकाच की ब्योमकेश बक्षी स्वतः विवाहीत आहे (सत्यवती) तर शेरलॉक होम्स बायाकांपासुन चार हात दूर राहणारा. तरीही कथा ब्योमकेशी बक्षीच्या पण चांगल्याच आहेत. अवांतर: १. प्राध्याप़कांबद्दल राग अथवा चिडचिड नाही किंवा हा टोमणा मारण्याचा किंवा आगाउपणा करण्याचा प्रयत्नही नाही. तरीही असे नम्रपणे नमूद करु इच्छितो की हे असले चारोळी धागे टाकण्यापेक्षा सुरुवातीला वाचनमात्र राहवे मग प्रतिसाद द्यावेत मग किमान २-३ परिच्छेदाचा तरी एखाद लेख अथवा काथ्याकूट टाकावा. अन्यथा हे असले धागे (आणि सध्या मिपावर सुरु असलेला अजुन एक अति बकवास (ओळखा पाहू कुठला) धागा) डोक्याला शॉट लावतात. २. मी प्रतिसाद दिला कारण हा धागा मला अयोग्य वाटला पण तरीही प्रामाणिक वाटला. उगाच टीआरपी कमावण्याचा एक हीणकस प्रयत्न आहे असे नाही वाटले. धागाकर्त्याचा उद्देश प्रामाणिक पण थोडा गोंधळून गेल्यासारखा वाटला. कश्यानेतरी सुरुवात करावी असे वाटत असावे पण नीटसे जुळवता येत नाही आहे तर जेवढे जमेल तेवढे लिहुन टाकुयात असा थोडासा अप्रोच वाटला. म्हणुन या काही टीपा: १. हाच लेख अजुन शरदिंदु बंदोपाध्यायांची थोडी माहिती टाकुन फुलवता आला असता. २. लेखात सध्या मेहताने प्रकाशित केलेल्या ३ पुस्तकांची आणि त्यातल्या १० कथांची थोडक्यात माहिती देता आली असती. ३. ब्योमकेश बक्षी स्वत:ला सत्यान्वेषी म्हणवुन घेतो होम्ससारखा डिटेक्टिव नाही. हे नमूद करता आले असते. ४. ब्योमकेश बक्षीच्या कथा प्रभावी का वाटतात हे नमूद करता आले असते. असो प्रतिसादाचा उद्देश टाका करण्याचा नसून एक वाचक म्हणुन स्वतःचे मत मांडणे आणि प्रामाणिकपणे माझ्यातर्फे काही सूचना करण्याचा आहे हे प्राध्यापल समजून घेतील अशी आशा करतो.

आपण तर बॉ फक्त पोलीस टाईम्स आणी दफा ३०२ वाचतो.

झी टीवीवर पूर्वी (९६-९७ मध्ये) दर शनिवारी रात्री Saturday Suspense नावाची मालिका लागायची. यातली कथा एका तासात संपायची पण suspense खतरनाक असायचा. या मालिकेत नायक सुद्धा भारी भारी होते. आशिष विद्यार्थी, दीपक तिजोरी, रजत कपूर इ.इ. आपण या मालिकेचे fan होतो.

रामानंद सागर यांची निर्मिती असलेली "आंखे" ही तुफान विनोदी मालिका ७-८ वर्षांपुर्वी दूरदर्शनवर दाखवली जायची. कर्नल ध्यानचंद, हरदयाल, वगैरेंच्या साहसकथा दाखवण्याच्या उद्देशाने बनवलेली ही मालिका इतकी लो बजेट होती, की ज्याचं नाव ते. अन-इंटेंशनल (मराठी?) विनोदाचं याहून उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात नाही. कितीही शोधाशोध केली तरी या महान मालिकेचे भाग इंटरनेटवर कुठेही मिळत नाहियेत. कोणाला सापडल्यास जरूर कळवावे. नमुन्यादाखल, सापडलेले २ व्हीडीयो खाली देत आहे. शीर्षक गीत आंखे

In reply to by श्रीरंग

आँखे म्हणजे कहर होती बॉ ! मात्र सध्या CID ही मालिका आँखेला देखील मागे टाकणारी आहे. तो दया आहे ना दया, तो एखाद्या गुन्हेगाराच्या उजव्या गालावरती थोतरीत मारतो, पण वळ मात्र चार बोटांचे डाव्या गालावरती उमटतात. आहे का आवाज ? हे CID वाले ज्या कोणत्या घरात शोधाशोधीला जाता तिथे कधीच लाईट नसतात. काय वाटेल ते दाखवतात च्यायला ! त्यापेक्षा मग ती सध्या लागणारी 'दस्तक' बरीच चांगली आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

१. एका खतरनाक अतिरेक्याचा शोध घेताना त्याच्या हॉटेल मधे त्यानी वापरलेला साबण फक्त "आँखे" च्या लोकांना सापडतो. कर्नल ध्यानचंद लगेच त्या साबणाचा छाप एका सीडीवर घेतात. ती सीडी काँप्युटरमध्ये टाकताच स्क्रीनवर अतिरेक्याचा बायोडेटा व प्रोफाईल फोटो हजर. आहे का अशी टेक्नोलोजी कोणाकडे? २. कर्नलच्या शहरात प्रलय घडवून आणण्यासाठी कार्लोस आणी कंगारू (कुख्यात अंतरराष्ट्रीय माफिया) क्रुत्रीम पाऊस पाडणार्या शास्त्रज्ञाला पकडून आणतात. त्याला हेलीकॉप्टरमधून ढगांच्या वर घेऊन जातात. हे साहेब, मग एका बाटलीतून रसायन ढगांवर शिंपडतात. जोरदार पाऊस. असल्या थरारक प्रसंगांनी नटलेली ही मालिका आज कुठेच उपलब्ध नाही, हे आपलं दुर्दैव. :( "हेलीकॉप्टरके लाईट बंद कर दो. वरना उन्हे पता चल जायेगा..." वगैरे संवाद इतर कोठेही ऐकायला मिळणार नाहीत.

In reply to by श्रीरंग

>>>"हेलीकॉप्टरके लाईट बंद कर दो. वरना उन्हे पता चल जायेगा..." ठ्या !!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

In reply to by श्रीरंग

श्रीरंग शेठ ह्यांनी जमेल तेवढे आठवून आठवून आँखेचे रसग्रहण एकेक करत धाग उघडून टाकावे. बरेच दिवस झाले मनमुराद हसलो नाहीये राव. येवढी मागणी मान्य कराच.

In reply to by श्रीरंग

अरारारा. ठार मेलो हो श्रीरंग राव. ही अफाट मालिका पाहण्यात नाही हे मी माझे दुर्दैव मानतो. पराशेटच्या विनंतीला मान देउन ते तेवढे रसग्रहण टाकाच.

In reply to by मृत्युन्जय

हाहा! चूक तुमची नाही, मृत्युन्जय. सर्वात मोठा कहर म्हणजे, आँखें ची जाहिरात फक्त आँखें च्या एपिसोड मधील ब्रेक मधेच दाखवली जायची. :) असो. डोंट वरी. यातील निवडक प्रसंग आणी इतर वाखाणण्याजोग्या इतर गोष्टींबद्दल लिहितोच.

In reply to by श्रीरंग

>>>आँखें ची जाहिरात फक्त आँखें च्या एपिसोड मधील ब्रेक मधेच दाखवली जायची. श्रीरंगराव, बरोब्बर तीच सीरियल बरी बघायचात तुम्ही? आणखी कुठल्या कुठल्या गोष्टी आपली दिव्य 'आँखे' बघत असतात का हो? अगदीच सूक्ष्म दृष्टी लाभली आहे की तुम्हाला! :)

In reply to by प्यारे१

योगायोगाने चॅनेल बदलता बदलता एकदा पाहिली गेली. त्यानंतर पुढचे भाग न पाहणे अशक्यच होते. >>आँखें ची जाहिरात फक्त आँखें च्या एपिसोड मधील ब्रेक मधेच दाखवली जायची. ही खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली ऐकीव माहिती आहे. खातरजमा करण्यासाठी दूरदर्शनवरील इतर मालिका पाहण्याएवढी शक्ती माझ्याजवळ नव्हती, नाहिए! :)

हा लेख प्रकशित झाल्या पासून मी फेलुदा हे नाव आठवायच्या प्रयत्न करत होतो. एका वृत्तपत्रात मागच्या वर्षी फेलुदा च्या कथांचे मराठी भाषांतर करण्यात आले त्यावर आधारित नितांत सुंदर लेख वाचला होता. त्यात फेलुदा च्या साहसी कारनामे व गोष्टींची थोडक्यात महिती देण्यात आली होती. तो लेख पाहून मला फास्टर फेणे ची आठवण झाली. http://www.youtube.com/watch?v=ltbg1_s-J8A तहकीकात चा पूर्ण एपिसोड एका दमात येथे पाहू शकतात. गेला बाजार भाव मराठी मधील एक शून्य शून्य ., आणि अधिकारी बंधूंच्या परमवीर , हेलो इन्स्पेक्टर सुद्धा बालपणी खूप आवडीने पाहायचो. त्या आधी दूरदर्शन वर बरीस्तर विनोद हि मालिका मस्त होती. शफी इनामदार ने साकारलेला धनंजय पण झकास होता.