Skip to main content

ह्रषिकेश मुखर्जी आणी त्यांचे अप्रतिम विनोदि चित्रपट

लेखक प्राध्यापक यांनी सोमवार, 09/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय चित्रपट आणि ह्रषिकेश मुखर्जी यांचे एक अतुट नाते आहे. कोणत्याहि वयोगटातिल तसेच कोणत्याहि घटकातील रसिकाला हसवण्याची ताकद त्यांच्या चित्रपटात आहे. ह्रषिदांचा विनोद हा भरभरुन हसवतो,चुपके चुपके सारखा त्यांचा चित्रपट १९७५ ला दीवार च्या बरोबरिने रिलिज होउनहि ५० आठवडे चालला,तर गोलमाल मधे अमोल पालेकर च्या भोळ्या चेहर्‍याचा व अभिनयाचा पुरेपुर उपयोग त्यांनि करुन घेतला. ह्रषिदांनि आंनंद ,अभीमान्,गुड्डी,नमक हराम,बावर्ची,अनुपमा यासारखे अप्रतिम चित्रपट केले,त्यांचे चित्रपट संपुर्ण कुटुंबासमवेत पहावेत असे होते,नकळ्त आजच्या चित्रपटांबरोबर त्याचि तुलना केली तरि जाणवते त्यांच्या विनोदाचि जातकुळीच वेगळी होति ,जी आपल्याला पु.लं.च्या विनोदि लेखना मधे आढळते. मध्यमवर्गीय लोकांतिल विषय चित्रपटांमधे त्याणि मांडले,आनंद मधील शेवट हा अमिताभ च्या अभिनयाने व ह्रषिदांच्या दिग्द्र्शनाने अप्रतीम झालाय्,एकदा हा चित्रपट पाहिल्यानंतर विसरुच शकत नाहि, आजच्या विनोदि चित्रपटातिल विनोद निर्माण करताना करत असलेलि केविलवाणि धड्पड पाहता ह्रषिदांचे चित्रपट आठवले तर काहि नवल नाहि. आणि म्हणुनच १९९९ ला त्यांना भारतीय चित्रपट स्रुष्टीतील सर्वोच्य पुरस्कार मिळाला तेह्वा असे वाट्ले कि त्या पुरस्काराचाच खर्‍या अर्थाने बहुमान झाला. ह्रषिदांना सलाम.

वाचने 3338
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडला. त्यांचा रेखा आणि राकेश रोशन याना घेऊन केलेला 'खूबसूरत' ही असाच सुंदर होता. अवांतर: तेवढं शुद्ध लेखनाचं बघा हो ! (तुम्ही प्राध्यापक असल्याने अपेक्षा अजूनच जास्त आहे )

In reply to by खेडूत

सूचने बद्दल धन्यवाद्,मात्र प्रश्न शुद्ध लेखनाचा नाही,तर मला अजून मराठी टंकलेखन फारसं जमत नाही,परंतु पुढील वेळी नक्की काळ्जी घेउ.

खरे तर विषय हृषीदांनी दिग्दर्शीत केलेले अप्रतीम चित्रपट असे असायला हवे होते. असो. प्राध्यापक महाशांनी फारच थोडक्यात आढावा घेतला आहे हृषीदांच्या कारकिर्दीचा. त्यातुन अनेक उत्तम चित्रपट निसटले आहेत. हृषीदांनी दिग्दर्शीत केलेले सर्व सिनेमे हे अत्यंत साधेसुधे आणि मनाला भावणारे होते. बहुतेक सिनेमातुन सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी असायचा. त्यांचे अजून एक वैशीष्ठ म्हणजे त्यानी अनेक नायक/नायीकांडुन उत्तम अभीनय करून घेतला. आनंद , अभीमान,गुड्डी,नमक हराम,बावर्ची,अनुपमा ह्या चित्रपटांबद्दल बोलायलाच नको. पण या यादीत सत्यकाम, अनुराधा, आलाप, अनाडी, अर्जुन पंडीत, असली नकली, बेमीसाल, मझली दिदी, मिली, जुर्माना, किसी से ना कहेना, मेमदीदी, मुसाफीर, नरम गरम, नौकरी, फिर कब मिलोगी, आशीर्वाद, सांज और सवेरा, बुढ्ढा मील गया इत्यादे चित्रपट दिगदर्शीत केले. अनुराधा (बलराज साहनी आणि लिला नायडु), अनाडी (राज कपूर आणि नूतन), आशिर्वाद (अशोक कुमार), मिली (जया भादुरी आणि अमीताभ बच्चन), असली नकली (देव आनंद आणि साधना) , सांज और सवेरा (मीना कुमारी व गुरुदत्त), सत्यकाम (धर्मेंद्र आणि शर्मीला टागोर), आलाप (अमीताभ आणि रेखा. सोबत ओम प्रकाश) हे अतीशय उच्च दर्जाचे चित्रपट आहेत . नरम गरम आणि बुढ्ढा मील गया या सारखे हलके फुलके चित्रपट आहेत. अनुराधा, आशीर्वाद , अभीमान हे चित्रपट आंजावर संपुर्ण उपलब्ध आहेत. याचा जरूर आस्वाद घ्यावा.

एकोणीसशे सत्तर ते १९८० या काळात हे हृषीदांचे चित्रपट मोठया पडद्यावर पाहिले. डोळे झाकून तिकिट काढा व डोळे उघडे ठेवून सिनेमा पहा.स्वत" उत्तम संकलक असल्याने त्यांची एकूणच जाण फार वरच्या दर्जाची होती. राजेश खन्ना, धर्मेंद्र, अशोककुमार व ओमप्रकाश याना त्यानी लाईफ टाईम चे रोल दिले. सलाम हृषीदांच्या आठवणीला.

हलके फुलके मनोरंजक संगीतमय चित्रपट ह्र्षीदांनी बनवले. अत्यंत आवडता दिग्दर्शक. त्यांचे आनंद, गुड्डी, अभिमान, नरम गरम, बावर्ची, चुपके चुपके, गोलमाल, खुबसुरत, रंगबीरंगी, हे प्रचंड आवडले. अजुन कितीवेळाही पाहू शकतो. त्यांचे बाकीचे चित्रपटही मिळवले आहेत. रवीवारच्या दुपारी पोटभर जेवण हादडल्यावर हृषीदा , बासुदांचे चित्रपट बघण्यासारखी मजा नाही. संजोपरावांनी त्यांच्या ब्लॉगवर गुड्डी, बावर्ची आणी अन्य चित्रपटांचे सुंदर परिक्षण लिहिले आहे. मायबोलीवरील हा लेखही वाचण्यासारखा आहे.

प. ल. देशपांड्यांसारखी ओजस्वी प्रतिभा नाही याची खंत वाटते. त्यांनी गुण गाईन आवडी मधे एखाद्या आवडलेल्या व्यक्तीबद्दल भरभरून लिहिले आहे तसे काही लिहिता यावे असे वाटते आणि तशी प्रतिभा नाही अशी खंतही. हृषिकेश मुखर्जींनी अनेक कलाकारांना ज्यातले अनेक सुपरस्टार होते अशांना अजरामर केले. आपण अमुक एका सिनेमात काम केले याचा आपल्याला अभिमान आहे असे म्हणण्याइतके उत्तम सिनेमे ह्या माणसाने बनवले. उदा. धर्मेंद्रचा सगळ्यात आवडता सिनेमा सत्यकाम आहे असे त्यानेच अनेकदा म्हटले आहे. अमिताभ, धर्मेंद्र, अमोल पालेकर, रेखा असे कितीतरी कलावंत आहेत. त्याच बरोबर गोलमाल सारखे सिनेमे डझन वेळा पाहिले आहेत आणि अजून तितक्याच वेळा बघितले तरी पुन्हा बघावेसे वाटतील असे सांगणारे प्रेक्षकही भेटले आहेत. चित्रपट ह्या माध्यमाचा इतका उत्कृष्ट वापर करुन, आपल्या प्रतिभेचा आविष्कार करणारा कलावंत आजकाल फार दुर्मिळ होऊ लागला आहे. कमालीची अश्लिलता, असभ्य भाषा, हिंसा, ओंगळ, आचरट विनोद, अचकट विचकट हावभाव, आयटम साँग, अवाच्या सवा प्रसिद्धी असले सवंग प्रकार वापरुन हिट सिनेमे बनवण्याचा आजकालचा फॉर्म्युला बनला आहे. ह्या गदारोळात हृषिकेश मुखर्जींसारखे सभ्यतेच्या कक्षेत राहूनही इतक्या उच्च कलाकृती बनवणारे प्रतिभावंत आज आपल्यात नाहीत ह्याची फारच खंत वाटते. माझा ह्या गुणी कलावंताला सलाम!

In reply to by हुप्प्या

सगळ्या प्रतिसादासाठीच +१. वरच्या लिस्ट मध्ये 'छोटीसी बात' पण अ‍ॅडवा. अवांतरः बर्‍याच वर्षांनी आलेला 'झूठ बोले कौआ काटे' राहून राहून अनिल कपूर- अमोल पालेकर आणि अमरिश पुरी- उत्पल दत्त / ओम प्रकाश अशा स्टारकास्ट मध्ये'च' जास्त वठला असता.

In reply to by प्यारे१

वरच्या लिस्ट मध्ये 'छोटीसी बात' पण अ‍ॅडवा.
ओ काका, कशाला बासु चतर्जी यांच्या आत्म्याला वेदना देत आहात ? ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

घोळ झाला काय? :P चित्रपटातली नर्मविनोदीशैली/ स्टार कास्ट साधारण सारखीच असल्यामुळं झालं हो...! :)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

माझ्या माहितीप्रमाणे ते अजून जिवंत आहेत. बादवे ब्योमकेश बक्षीचे दिग्दर्शकसुध्दा बासुदाच होते.

ह्रषिकेश मुखर्जी यांचे चित्रपट सदाबहार आहेत. आजही तितकेच refreshing वाटतात.अंदाज अपना अपना सारखे काही अपवाद सोडले तर सध्या असे चित्रपट बनत नाहीत..