✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर

न
नंदन यांनी
गुरुवार, 07/31/2008 - 17:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9632 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/31/2008 - 17:50 नवीन

आनंदाची बातमी !!!

रॅमन मॅगसेसे पुरस्कार जनसेवेत समर्पित असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना जाहीर झाला ही आनंदाची बातमी. मटाची बातमी इथे वाचायला मिळेल !!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
स्नेहश्री गुरुवार, 07/31/2008 - 18:15 नवीन

छानच.....

थोर कामाला जगतमान्यता...!!!!! अभिमानास्पद गोष्ट आहे ही...... हार्दिक अभिनंदन......! --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 07/31/2008 - 18:16 नवीन

अभिनंदन...

अभिनंदन... आणि विशेष करून एकाच घरातील २ व्यक्तिंनी इतके उत्तुंग कार्य करावे आणि त्याची पावती मिळावी हा पण एक सुवर्ण योग. यानिमित्ताने आनंदवन आणि तिथल्या कामाबद्दल श्री. मिलिंद भांडारकर (सर्किट) यांनी अधिक लिहिले, तर मिपाकरांना वाचायला नक्कीच आवडेल. सहमत आणि आग्रह. सर्किट मनावर घ्या. बिपिन.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 07/31/2008 - 18:31 नवीन

हार्दिक अभिन॑दन

आमटे कुटु॑बिया॑चे योगदान एव्हढे मोठे आहे की त्या॑ना नोबेल पारितोषिकच मिळाले पाहिजे! अर्थात मॅगसेसे पुरस्कारही अतिशय मोलाचाच आहे, त्याबद्दल डॉ.प्रकाश व म॑दाता॑ई॑चे अभिन॑दन!
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 07/31/2008 - 18:47 नवीन

आनंदाची

आनंदाची बातमी. आमटे दांपत्याचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 18:50 नवीन

अतिशय आनंदची बातमी..

आमटे कुटु॑बिया॑चे योगदान एव्हढे मोठे आहे की त्या॑ना नोबेल पारितोषिकच मिळाले पाहिजे! अर्थात मॅगसेसे पुरस्कारही अतिशय मोलाचाच आहे, त्याबद्दल डॉ.प्रकाश व म॑दाता॑ई॑चे अभिन॑दन! असेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
द
देवदत्त गुरुवार, 07/31/2008 - 19:09 नवीन

अभिनंदन

अरे व्वा... छान आहे. त्यांचे अभिनंदन :) आमटे परिवार चालवत असलेल्या प्रकल्पाची माहिती मिपावर येथे पहावी. सर्किटराव, आणखी माहिती वाचायला आवडेल. :) (अवांतर: काय योगायोग आहे. कालच राजू परूळेकरांच्या पुस्तकात प्रकाश आमटेंबद्दल वाचले होते. आणि आज त्यांना पुरस्कार जाहीर झाला.)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 08/01/2008 - 09:14 नवीन

तुम्ही

तुम्ही "माणसं भेटलेली, न भेटलेली" बद्दल बोलताय का? मी पण एवढ्यातच वाचलं ते पुस्तक.. फार छान आहे. प्रकाश आमटेंचा यथार्थ गौरव झाला..... http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
च
चतुरंग गुरुवार, 07/31/2008 - 19:35 नवीन

कै. बाबा आमटेंचे कार्य

त्याच निष्ठेने, तळमळीने, आधुनिक विचारांची जोड देऊन पुढे चालू ठेवणार्‍या आणि वाढवणार्‍या प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन त्या पुरस्काराची उंची अजून वाढली आहे! चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 08/01/2008 - 11:57 नवीन

चतुरंगराव

चतुरंगराव ह्यांच्याशी पुर्ण सहमत! आमटे दांपत्याचे मनापासुन अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसुनाना गुरुवार, 07/31/2008 - 19:51 नवीन

आमटे दंपतीचे अभिनंदन

वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणार्‍या आमटे दंपतीचे सहर्ष अभिनंदन! हे संकेतस्थळ - लोक बिरादरी प्रकल्प सर्किटसाहेबांना आनंदवनाचे प्रायोजितीकरण फारसे आवडले नसल्याचे लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 07/31/2008 - 19:55 नवीन

आमटे

आमटे दांपत्याचे अभिनंदन. आपल्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/31/2008 - 20:02 नवीन

आनंदाची बातमी

आमटे कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा. बाबा आमटेंच्या कार्यपद्धतीपेक्षा प्रकाश-मंदाकिनींची कार्यपद्धती वेगळी आहे, याबद्दल वैषम्य वाटते, असे सांगणारा एक चित्रलेख सर्किट यांनी मागे प्रसिद्ध केला होता. आनंदवनाबद्दल आतडे तुटत असल्यामुळे, आतून-बाहेरून माहिती असल्यामुळे, ते असे साधकबाधक मुद्दे सडेतोडपणे मांडू शकतात. त्यांचे विचार वाचायला जरूर आवडतील.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/31/2008 - 22:52 नवीन

प्रकाश आणि मंदा

सर्वप्रथम, डॉ. प्रकाश आणि मंदाताईंचे हार्दिक अभिनंदन. मॅगसेसे आणि देमियन डटन पुरस्कार मिळाल्यावर बाबांच्या कार्याचा परिचय पूर्ण जगाला झाला होता. आता थोडे धनंजयांनी लिहिलेल्या मुद्द्यावर. बाबा नर्मदेवर गेल्यानंतर आनंदवनाची जबाबदारी त्यांच्या मोठ्या मुलावर, म्हणजे डॉ. विकासवर सोपवण्यात आली. प्रकाश जिथे होते तिथेच लोकबिरादरीत, म्हणजे सोमनाथ, भामरागड, हेमलकसा ह्या आदिवासी भागातच सेवा व्रत राहिले. बाबांनी सुरू केलेली तरुणांसाठीची श्रमशिबिरे हेमलकशाला होतात, अजूनही. त्यात माझा थोडासा सहभाग होता. झोकून देऊन काम करणे, तडफ, अतिरेकी बाजारूकरणाला विरोध, प्रसिद्धीला दुय्यम महत्व ही वैशिष्ट्ये असलेली बाबांची कार्यपद्धती, आणि प्रकाश-मंदांची कार्यपद्धती फारशी वेगळी आहे असे वाटत नाही. जालावर कुणीतरी हेमलकसा/भामरागडची चित्रे टाकलेली आहेत, ती इथे बघता येतील. Image removed. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
च
चित्रा Fri, 08/01/2008 - 00:04 नवीन

अभिनंदन

नवराबायकोंनी एकत्र तेही सामाजिक काम करणे सोपे नसावे. डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी ते यशस्वी करून दाखवले, आणि बाबा आमटे यांचा वारसा पुढे चालवला याबद्दल दोघांचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/01/2008 - 00:13 नवीन

दंडवत...!

परितोषक विजेत्या आमटे दांपत्याला माझे लाख प्रणाम! खरंच, आभाळाइतकी मोठी माणसं ही! तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/01/2008 - 09:24 नवीन

सन्मान!

डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वीकारल्यामुळे उलट त्या मॅगॅसेसे पारितोषिकाचाच सन्मान झाला असे आम्हाला वाटते!!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 08/01/2008 - 09:25 नवीन

खूप अभिमान

खूप अभिमान वाटला... खूप आनंद झाला... :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
न
नीता Fri, 08/01/2008 - 10:51 नवीन

आनंद वाटला......

जगात अजुनहि अशी माणसे आहेत ही जाणीव सुखद आहे... अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Fri, 08/01/2008 - 12:06 नवीन

सलाम

वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणार्‍या आमटे दंपतीचे सहर्ष अभिनंदन! खरंच, आभाळाइतकी मोठी माणसं ही!
हेच म्हणते. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Fri, 08/01/2008 - 13:24 नवीन

वारसा

बाबा आमटेचा वारसा प्रका श आणि मन्दाकिनिने चालवला त्याबद्द ल त्याचे अभिनन्दन तर आहेच पण तो वारसा त्यानि आपल्या मुला परयन्त पोचवला त्याचे जास्त कौतुक आहे कारण त्यन्चि दोन्हि मुले ह्याच कार्यात आहेत अगदि परदेशात शिकक्शण घेवुन सु ध्दा. थोर माणसे आहेत.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 08/01/2008 - 16:11 नवीन

वा..अभिनंदन

एकाच घरातील दोन पिढ्या इतके मोठे काम करतात हे कौतूकास्पदच ! आमटे दंपतीचे हार्दीक अभिनंदन ! -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 08/01/2008 - 16:13 नवीन

असेच..

एकाच घरातील दोन पिढ्या इतके मोठे काम करतात हे कौतूकास्पदच ! आमटे दंपतीचे हार्दीक अभिनंदन ! असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
झ
झकासराव Fri, 08/01/2008 - 19:14 नवीन

खरच

खरच अभिमानास्पद अस कार्य घडवलेली मोठी माणस आहेत ती. खुपच छान वाटले ही बातमी वाचुन. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा