प्रकाशाची सावली
काही गाणी असतातच अशी एकदा ऐकली की कधी जिभेवर चढतात आणि ह्रदयात उतरतात कळतच नाही. एक सुंदर गाणं जमवून यायला जसे शब्द आणि संगीत मदत करतात तितकीच किंबहूना त्याहून जास्त मदत गाण्याचं चित्रिकरण आणि कलाकार ज्याच्यावर चित्रिकरण झालेलं आहे ते सुद्धा करतात. बर्याच चित्रपटात काही गाणी अतिशय सुमधूर असून देखील त्याच चित्रपटातील इतर काही अतिप्रसिद्ध झालेल्या गाण्यांच्या सावलीत झाकोळून जातात. आज काल युट्यूब आणि इतर संस्थळांमूळे ही सर्व परिचीत - अपरिचीत गाणी सहज उपलब्ध झाली आहेत.
'स्विकार किया मैने' या चित्रपटातील 'शबाना आझमीं'वर चित्रीत केलेलं हे गाणं असच एक अप्रतिम मास्टरपीस.
'अजनबी कौन हो तुम, जबसे तुम्हे देखा है
सारी दुनिया, मेरी आखोमे सिमट आयी है'
हे गाणं मी ३-४ वर्षांपूर्वी प्रथम ऐकलं किंवा नोटिस केलं म्हटलं तरी चालेल. एकदा ऐकून मन भरलं नाही म्हणून परत ऐकलं, परत परत ऐकलं पण मन भरलच नाही. इतकी वर्ष कस काय हे ऐकायच राहून गेलं म्हणून थोडी हूरहूर झाली. या गाण्यात स्वप्नात रमलेली शबाना तिचे बोलके डोळे सगळच मस्त. उषा खन्ना यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं निदा फाझली यांची शायरी आणि लताचा स्वर सगळ कस मस्त जमून आलयं. त्याच दरम्यान पेपरात शबानाची मुलाखत वाचण्यात आली ज्यात त्यांनी जावेद अख्तर साहेबां बरोबरच्या ओळखीचे सुरवातीचे दिवस सांगीतले होते. उमेदवारीच्या दिवसात जावेद हे कैफी आझमींना भेटण्यासाठी बरेचदा यायचे त्यांना आपली शायरी ऐकवण्यासाठी .मग शबाना ती शायरी गुणगुणत कितीतरी वेळ जावेद साहेबांविषयी विचार करीत बसत. हे गाणं बघताना कुणास ठाऊक पण मला तशीच स्वप्नात रममाण झालेली शबाना दिसते.
तीच गोष्ट 'मंझील' या चित्रपटातील अमिताभवर चित्रीत या गाण्याची. माझ्या बरोबर कंपनीत रूजू झालेला माझा सहकर्मी बरेचदा एक धुन गुणगुणायचा ए़कदा त्याला छेडल्यावर त्यानी हे गाण सांगितलं. याच चित्रपटातील 'रीमझीम गिरे सावन' हे किशोरच्या आवाजातील गाणं बरच गाजलं पण लताच्या आवाजातील 'रीमझीम गिरे सावन' आणि मी इथे बोलत असलेलं
'तुम हो मेरे दिल की धडकन, तुमबीन लगे ना मन
तुमकोही ढुंडा करते है, हरपल मेरे दो नयन'
मात्र जास्त गाजली नाहीत. पण मला मात्र 'तुम हो मेरे...' हे गाणं त्याच्या सरळ सोप्या बोलांमूळे आणि लताचं 'रिमझीम गिरे..' हे त्याच्या चित्रिकरणामूळे अगदी अफाट आवडलेत. पावसात भिजलेली त्या वेळची मुंबई आणि अनवाणी चलणारी साडीतील मौसमी खरच क्लास.
'स्वामी' चित्रपटातील 'का करू सजनी... आए ना बालम' हे येसूदासनी गायलेलं गाणं जेव्हडं गाजलं तितकं लतानी गायलेलं
'पलभर मे ये क्या हो गया
वो मै गयी वो मन गया
चुनरी कहे सुनरी पवन
सावन लाया अब के सजन'
हे गाणंसुद्धा तितकसं गाजलं नाही. या गाण्यात पण शबानाचे बोलके डोळे, राजेश रोशन यांच संगीत, लताचा गळा आणि साधं पाऊस पडतानाचं व पडून गेल्या नंतरच चित्रिकरण खरच उत्तम.
'रजनिगंधा' मधील 'रजनिगंधा फुल तुम्हारे, मेहेके मेरे जिवन मे'हे गाणं जितकं मनभावन तितकच विद्या सिन्हा आणि दिनेश ठाकुर यांवर चित्रीत टॅक्सीतील हे गीत
'कईबार यू ही देखां है, येजो मन की सीमा रेखा है, मन तोडने लगता है
अनजानी प्यास के पीछे, अनजानी प्यास के पीछे, मन दौडने लगता है'
मुकेश चा आवाज आणि परत एकदा त्या वेळची मुंबई आहाहा.
ही आणि अशीच आणखी कितीतरी दर्जेदार गाणी आहेत जी मिळावी तितकी प्रसिद्धी नाही मिळवू शकलीत पण आजही एकांतात डोळे मिटून शांत पडून ऐकलीत तर मनात खोलवर उतरतात. परत कधितरी लिहिलंच त्याविषयी.
साभार - वरील सर्व लिंक्स युट्यूब वरून साभार.
वर्गीकरण
आवडले
In reply to आवडले by रणजित चितळे
मलातरी
In reply to मलातरी by तिमा
नाही हो
In reply to नाही हो by अमृत
भौ
असहमत
In reply to असहमत by चौकटराजा
चौराकाका
तीच गोष्ट 'मंझील' या
In reply to तीच गोष्ट 'मंझील' या by Madhavi_Bhave
१००% सहमत
वाचनीय
मस्त!
In reply to मस्त! by पैसा
असेच
छोटीसी बात मधले "ये दिन क्या
लहानपणीचे दिवस