उगाच काहीतरी...
प्रश्नांची जेव्हा उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नच जवळचे वाटले
गर्दीमध्ये वावरताना एकटेपण आपुलकीने भेटले
नात्यांना जपता जपता अपेक्षांच्या जाळ्यात गुंतत गेलो
मग स्वप्नांच्या बाजारात मात्र स्वतःला विकून बसलो
भिजण्याच्या भीतीने आडोश्याला लपून बसलो
मग पाउस पाहताना मात्र आतून कोरडा पडलो
कधीतरी वाटत कि आपल्यासाठीही कधी मोगरा फुलवा
आपल्या आठवणींनी कोणाच्या डोळ्याचा काठ ओलावा
सगळ्यांसमोर हसून मी स्वतःला रोज फसवतो
घरी आल्यावर मात्र आठवणींच्या कुशीत विसावतो
तुझ्या आठवणी अजूनही डोळ्यात दाटून येतात...
पावसासारख्या पडून मग रोम रोम भिजूवून जातात...
गर्दीत कसाबसा लपतो मी स्वतःपासून
पण रात्री मात्र आरसा सुद्धा चेष्टा उडवतो माझही हसून...
दारात तो प्राजक्त आता उगाच उभा आहे वाळलेल्या फांद्यांना आधार देत
जळत्या उन्हात वाव्गात बसलाय आठवणींचं प्रेत ...
विचारांच्या जत्रेत नेहमी शब्द हरून बसतात
मग फिरता फिरता कधी आपुलकीने भेटतात तर कधी पाठमोरे निघून जातात
वाहत्या पाण्यात पडलेल्या पानालाही एक समाधान
उगाच फांदीवर लटकण्यापेक्षा प्रवाहात आपलही एक स्थान
आयुष्याच्या सारीपाटाची गम्मत असते न्यारी
न खेळलेल्या दानांची फळे असतात भलतीच भारी
...पारिजात
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1386
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली
कविता आवडली
काही द्विपदी स्वतंत्र
आले रे आले झम्प्या दादा
आयडी हॅ़क झाला की काय?
In reply to आले रे आले झम्प्या दादा by विजुभाऊ