Skip to main content

बात निकलेगी तो फिर... (भावानुवाद)

लेखक रसप यांनी शनिवार, 07/04/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ गीताच्या चालीवर लिहिण्याचा प्रयत्न केला आहे - नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही लोक "अकारण अबोला कशास?" पुसतील "कसली चिंता तुला वाटे" असे विचारतील दावतील अंगुली पाहून त्या केसांस खुल्या आणि उलटून बघतील काळास सरल्या कांकणांना बघुन होतील आरोप किती कापरे हातही ठरतील गुन्हेगार किती लोक निष्ठूर हे सुनवतील खड्या बोलांनी माझ्या विषयास छेडतील विषय फिरवूनी लावुनी घेऊ नको मनाला जरासेही तू प्रिये तुझ्या चेहऱ्याची चलबिचल टिपून घेतील ते साहुनी घे परि, पलटून प्रश्न मांडू नको माझ्या नावाला त्यांच्यासमोरी घेऊ नको नको इतकी अशी रंगेल उगा चर्चा ही मूळ कविता - "बात निकलेगी तो फिर.." मूळ कवी - कफील आजेर भावानुवाद - ....रसप.... २५ डिसेंबर २०११ मूळ कविता- बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे ये भी पूछेंगे के तुम इतनी परेशां क्यूँ हो उंगलियां उठेंगी सूखे हुए बालों की तरफ़ एक नज़र देखेंगे गुज़रे हुए सालों की तरफ़ चूड़ियों पर भी कई तंज़ किये जायेंगे काँपते हाथों पे भी फ़िकरे कसे जायेंगे लोग ज़ालिम हैं हर एक बात का ताना देंगे बातों बातों में मेरा ज़िक्र भी ले आयेंगे उनकी बातों का ज़रा सा भी असर मत लेना वरना चेहरे की तासुर से समझ जायेंगे चाहे कुछ भी हो सवालात ना करना उनसे मेरे बारे में कोई बात न करना उनसे बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी - कफील आजेर http://www.ranjeetparadkar.com/2011/12/blog-post_26.html
लेखनविषय:

वाचने 1529
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

बात निकलेगी तो फिर हे वाचून मी गोष्ट निघेल तर मग वगैरे वाचण्याच्या अपेक्षेने आलो तर हे भलतंच ;-) अवांतरः मराठी भट्टी जमली नाही :(

In reply to by यकु

अवांतराशी सहमत. अजिबात जमलं नाही. शब्द ओढून ताणून बसवलेत आणि भावार्थं तर फसलायच. या स्वैर भावानुवादवाल्यानी रेफरन्स म्हणून हे एकदा वाचावं.

In reply to by दादा कोंडके

उगाच ओढून ताणून शब्दांची कसरत केल्यासारखं वाटतं. आम्हीही कधी काळी नाना पाटेकर अभिनीत यशवंत चित्रपटातील एका नितांत सुंदर गाण्याची काशी घातली होती. अशीच समोर बसून राहा तू माझ्या अन सखे तुझ्यावर प्रेम करु दे मला थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला ऋतू आहे हा दिल्या घेतल्या शपथांचा तू शोधू नको सखे उगी आता बहाणा लिहू दे गं मला तू या हृदयावर आता या हॄदयाचा हा नवा खेळ मला पुन्हा माझ्या मनाच्या या पुस्तकामधल्या आठवणींच्या त्या मोरपीशी पानांवर पाहत असतो सखे नेहमी मी तुला उंच जाणार्‍या स्वप्नांच्या ‍हिंदोळ्यावर तुझ्याबद्दलच्या या ओढीची जिवलगा आता मनमोकळी कबुली देऊ दे मला थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला ढळे ना नजर माझी तुझ्या नजरेतून आता तुझ्या मिठीसाठी झाले दंड अनावर आता पापण्यांच्या गल्लीत मी घर बांधेन आता नयनांच्या सागरात बुडून जाईन मी आता क्षण, दोन क्षण इथे असेच सखे आता तुझ्याकडे एकटक पाहू दे मला थोडी हुरहूर आहे या मनात माझ्या भावनांचे हे बंध आज सैलावू दे मला आणि हे मुळ गीत. तूम सामने बैठो, मुझे प्यार करने दो बेचैन हैं धडकन इजहार करने दो मौसम हें वादोंका यूं ना करो बहाना लिखने दो इस दिलपें दिलका नया फसाना यादोंकी पन्नोंपें मनकी किताबोंमें मैने तुम्हे देखा मेहबूब ख्वाबोंमें चाहत का अब दिलबर ईकरार करने दो बेचैन हैं धडकन इजहार करने दो अब तो निगाहोंसें,हटती नही निगाहें पेहलूमें आनेको, बेताबसी हैं बाहें पलकोंकी गलीयोंमें मैं घर बसाऊंगा नयनोंकी सागरमें मैं डुब जाऊंगा दो चार पल यूंही दिदार करने दो बेचैन हैं धडकन इजहार करने दो कुमार सानूने गायलेलं हे गाणं खुपच सुंदर आहे. आपण जेव्हा असं भावानुवाद वगैरे गोंडस शब्दांच्या नावाखाली एखादं रुपांतर करत असतो ते फक्त भाषांतरच असतं. मूळ गीताची सर त्या भाषांतराला नसते. आणि दुर्दैवाने अशी भाषांतरे हल्ली दिवसाआड मिपावर पडतात.

येवढी प्रतिभावान लोकं आहात, मग मला का रे मदत करत नाही ? मी कधीपासून मिपावरती दोन गाण्यांचे भावानुवाद मागतोय. द्या की मला. १) हू द फ# इज अ‍ॅलीस. २) हिप्स डोंट लाय.

In reply to by परिकथेतील राजकुमार

२) हिप्स डोंट लाय. 'मी खीर खाल्ली असेल तर बूड बुड घागरी' या छोट्यांच्या गोष्टीतून काही प्रेरणा मिळते का पहा. त्यात बूड आहे आणि गोष्ट पण खोटं बोलण्याशी संबंधित. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अनुवाद नाय जम्या .तरीबी आमास्नी या कवितेचा पुनःप्रत्यय दिल्याबद्दल आभार. -------------------------------------------------------------------------------------------------------