Skip to main content

टॅटिंग - रनर

टॅटिंग - रनर

Published on 05/04/2012 - 20:19 प्रकाशित मुखपृष्ठ
झालेलं इन्फेक्शन अजून वाढलंय एवढंच म्हणेन :) "बराकत" जिंदाबाद !! श्रीखंडी रंगाचा दोरा..... पुस्तकातलं आवडलेलं डिझाइन एवढ्या शिदोरीवर केलेली सुरवात. पुस्तकातलं डिझाइन तसं छोटं वाटलं पण जसं जसं बनत गेलं....... बर्‍यापैकी मोठं तयार झालं. मला वाटलं टेबल मॅट बनेल पण तयार झालं टेबल रनर. पुस्तकात एकाच रंगात होतं. श्रीखंडी दोरा संपला म्हणून मग मधला भाग जवळ असलेल्या काळ्या दोर्‍याचा बनवला. शिवाय वेगळं वाटायला नको म्हणून बॉर्डर सुद्धा काळीच केली. DSC00561 DSC00560 DSC00555 DSC00556
लेखनविषय:

याद्या 6164
प्रतिक्रिया 18
वाह! काय ती कलाकुसर. मस्त! फारच छान. अशी रंगसंगती असलेल्या रनरमुळे टेबलावरच्या पदार्थांपेक्षा त्याकडेच लक्ष जायचे. लगेच हात लावावासा वाटतोय.

In reply to by रेवती

वाह! काय ती कलाकुसर आणि एवढं बारीक काम करायला किती तो पेशंस! आमचा सलाम स्विकारा :)
अशी रंगसंगती असलेल्या रनरमुळे टेबलावरच्या पदार्थांपेक्षा त्याकडेच लक्ष जायचे. लगेच हात लावावासा वाटतोय.
अगदी अगदी.

काम फार नाजूक आहे. करायला पेशन्स हवा हे खरे.

अगदी मस्त झालंय. पण जेवणातले पदार्थ याच्यावर सांडले तर?

वॉव !!!! मला कुणी टीचर भेटेणा एकडे क्रोशे शिकवायला तिकडे येउ का जयवी तै ,तु शिकवशील का मला ;) असो , हे प्रकरण शिकौन साधा ५" x ५" चा रुमाल बनवता आला तरी नशीब माझे ;)

In reply to by पियुशा

असो , हे प्रकरण शिकौन साधा ५" x ५" चा रुमाल बनवता आला तरी नशीब माझे
येवढ्या मेहनतीने तो क्रोशेचा रुमाल बनवायचा आणि त्याला नाक पुसायचे म्हणजे काहीतरीच वाटते.

वल्ला क्या जबरदस्त दिखती ! ;) काय हो... कसा काय इतक मस्त मस्त विणकाम करता तुम्ही ? ;) तुमच्या मधे प्रचंड पेशंन्स आहे याची खात्री पटली मात्र ! ;) मनातल्या गप्पा :--- बाण्या तू उगाच मेंढ्यांची चिंता करु नकोस बरं ! ;)

शुक्रिया शुक्रिया :) आमच्या श्रीखंडाचा रंग असाच असतो.... आम्रखंड म्हणा हवं तर ;) ज्योती..... पदार्थ वाढून घेणारे नक्कीच घेतील गं काळजी :) पियुशा......नक्की शिकवेन......ये लग्गेच इकडे :) खरं सांगू का.........आजकाल नेटवर इतके मस्त व्हिडियो असतात ना.... त्यावरुन शिकता येतं. क्रोशे वगैरे तर नक्कीच. पण हे शटलवर्क थोडं ट्रिकी आहे. एकदा गाठ जमली की झालं !! पिंगू..... बघ उचलता येतंय का ;)

जयवी , वेळेचा फारच छान उपयोग करता. आणखीही नमुने येऊ द्यात.

जयू, सृजनाचा आनंद एकसारखाच, टॅटिंग असो की कविता! कलाकारी आवडली. अगदी "रुजवू मराठी, फुलवू मराठी" तल्या कवियित्रीसारखीच.