Skip to main content

पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

लेखक रसप
गुरुवार, 05/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
जगाच्या पटी हा तुझा खेळ सारा हरेकासमोरी तुझा मोहरा तुझा ना भरोसा जरी वाटला रे तरी वाटतो का तुझा आसरा ? 'लढावे' असे वाटले ना मनाला जसे ठेवले तू तसा नांदलो तुला खोड होती मला छेडण्याची तरीही कधीही न मी भांडलो मला ठाव होता तुझा धूर्त कावा 'धरूनी दबा एकटे गाठणे' चहूबाजुनी घेरुनी एकट्याला विजेत्यापरी आवही आणणे ! तुझी चाल दैवा कधी वाकडी वा कधी चाल होती तुझी थेटही मला जिंकणेही न मंजूर होते दिली जिंकण्याची तुला भेट ही अखेरीस केलीस कोंडी इथे तू मनापासुनी हार मी मानतो जरी खेळ आयुष्य झाले तरीही ....रसप.... ४ एप्रिल २०१२ http://www.ranjeetparadkar.com/2012/04/blog-post_05.html
लेखनविषय:

वाचने 1394
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

शेवटचे कडवे असे वाचावे - अखेरीस केलीस कोंडी इथे तू मनापासुनी हार मी मानतो जरी खेळ आयुष्य झाले तरीही पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

तुझी चाल दैवा कधी वाकडी वा कधी चाल होती तुझी थेटही मला जिंकणेही न मंजूर होते दिली जिंकण्याची तुला भेट ही रसप निर्विकारपणे जो तुमच्याशी असा डाव खेळतो ना त्याला भेटीचे काय हो ? एकाचवेळी अठरा खेळाडूंशी खेळणारा बुद्दीबळ पटू आहे तो . कविता मस्त पंखा