किरकिर किरकिर गजर वाजतो भल्या पहाटे 'पिडतो'
'स्नूझ' करुन मी परत झोपतो रोजच उशीर होतो..!
खडबडून मग उठतो आणिक किती धावपळ करतो
नाश्ता सोडुन देतो कारण रोजच उशीर होतो..
कापुन घेतो हनुवटीस मी पटपट दाढी करतो
पाणी ओतुन बदाबदा मी 'बुडबुड गंगे' म्हणतो!
इस्त्री करतो शर्टाला अन तशीच पँट चढवतो
सॉक्स घालतो पुन्हा कालचे, रोजच उशीर होतो !
खिश्यात केवळ चिल्लर असून रिक्शाला थांबवतो
पुन्हा पुन्हा मी घड्याळ बघतो अन सुस्कारे देतो
कसाबसा तो चुकवून ट्रॅफिक स्टेशनला पोचतो
रुपया-रुपया मोजुन देता रोजच उशीर होतो
तोबा गर्दी भरलेली, मी पुन्हा पुन्हा चेंगरतो
गाडी माझी निघून जाते हताश मीही बघतो
लगडुन येते पुढची गाडी मीही तिला लगडतो
मुठीत घेतो जीव तरीही रोजच उशीर होतो
सरतच नाही काम जराही फुरसत मला न मिळते
कँटिनमधल्या अड्ड्यांनाही मला न जाता येते
उगा जरासे गिळून तुकडे माझा लंच उरकतो
अड्डे जाती उठुन मला तर रोजच उशीर होतो
रात सावळी उरते माझा दिवस सुना मावळतो
पुन्हा लगडण्या गाडीला मी उलटपावली येतो
किती रिकामी गाडी असते चौथी जागा घेतो !
तिसऱ्या प्रहरी घरी पोचतो, रोजच उशीर होतो
असाच माझा रहाटगाडा थोडा कुरकुर करतो
पोटासाठी सगळी मरमर, मरत मरत मी जगतो
पेरुन स्वप्ने मिटतो डोळे, ग्लानी येउन निजतो
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......!
....रसप....
https://www.ranjeetparadkar.com/2011/11/blog-post_12.html
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
:)
रसप साहेब , उत्तम कविता.
रसप साहेब , उत्तम कविता.
हो ना राव.. अकरा वाजलेत..
हो ना राव.. अकरा वाजलेत.. नाही म्हणलं तरी उशीर झालाच.
साडेदहा म्हणजे तुम्ही तरी लवकरच पोचले म्हणायचे ;-)
(No subject)
:)
चाकर
ही तर मुंबईतल्या सगळ्याच चाकरांची कविता आहे. ( त्यात आम्हीही आलोच ;)).
कविता आवडली आहे. :)
(No subject)
:-)
उशीर झालाच!
कामाच्या गर्दीत ही कविता वाचायला उशीर झालाच!
मस्त कविता!
पेरुन स्वप्ने मिटतो डोळे, ग्लानी येउन निजतो
किरकिर किरकिर गजर वाजतो, रोजच उशीर होतो......
क्या बात है!
आवडली.
तरीही लेका तू आनंदी असतोस !
एवढे सगळे झाले तरी चवथी सीट नाही मिळाली तरी तू आनंदित असतोस. गाणी ऐकत असतोस . गाडीत उभाउभ्याच व्यंकटेश स्तोस्त्र वाचत
असतोस. पुण्याहून आलेल्याला आनंदाने फलाट कोणत्या बाजूला येणार हे सांगत असतोस ! जाउदे ! या सर्वात उशीर झाला तर पगार कापला
जात असेल या दु: खात मात्र मी सहभागी आहे.
रसप, कविता चांगल्या लिहिता.
चांगली आहे कविता
चांगली आहे कविता
छान.
फक्त मिपासाठी आणि मिपाकरांसाठी म्हणून काही नवीन पद्यरचना केलीत तर वाचायला अधिक आवडेल.
धन्यवाद! प्रयत्न करीन.
In reply to छान. by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद!
प्रयत्न करीन.