मित्रच आता मित्रांचा खून करतात
आणि वर खंडणी पण घेतात...
आपले मित्र अजून पण टिकून आहेत..
मैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
बायकोने प्रियकराला हाताशी धरले
आणि नवऱ्याला ठार मारले
आपली बायको मात्र अजून पण
रात्री २ पर्यंत जेवायला थांबते..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
मुलाने केला आईचा खून
कारण आला दारू पिवून..
माझी मुले काही असे करत नाहीत
कारण ती अद्याप लहान आहेत..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
भाजीचे हे भाव वाढले,
सरकारने पण हात टेकले...
आपण काही भारतात नोकरी करत नाही
शेजारी उपाशी राहिला तरी आपल्याला फरक पडत नाही..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
असते खूपच रांग तिकिटाला
आणि तशीच A.T.M.ला..
आपल्याला काही फरक पडत नाही
कारण कार शिवाय आपण
भाजी आणायला पण जात नाही..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
ज्वारी पासून दारू बनवणार
आणि मग त्यातून कर मिळणार
शेतकऱ्यांचे भले होवो न होवो...
ज्वारीचे भाव मात्र नक्की वाढणार..
आपले मुळात शेतच नाही...
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
कुस्तीगिराला आहे रोजची भ्रांत
तरीपण आहे सरकार शांत..
भुक्कड खेळाडू आहेत क्रिकेटची शान...
त्याला मात्र सगळ्यात मान...
आपण काही कुस्ती बघत नाही...
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
I.P.L. बघण्यात वेळ कसा
जातो ते कळत नाही
कोण जिंकतो कोण हरतो
त्याने काय फरक पडतो....
अर्ध्या कपड्यातील आपलीच मुलगी
I.P.L.मध्ये नाचतांना बघून
तिच्या पालकांना पण काहीच
विशेष वाटत नाही...
कारण मेंदूतच काही शिरत नाही...
माझेच डोळे आता सरावले आहेत
आत्मा कधिच विकल्या गेला आहे..
त्यामुळे आपले बुवा बरे आहे...
माझ्या जाड्या चामडीत, आज-काल
सामाजिक जाणीवेची सुई काही शिरत नाही..
"समाज गेला तेल लावत" असेच रोज
म्हणाल्याशिवाय आपला दिवस सरत नाही....
उद्याचा रोगट समाज बघायला
मी काही असणार नाही
अमरत्वाचा शाप नसल्याने आपले बुवा खरोखरच बरे आहे...
वाचने
3726
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
...
...
In reply to ... by मी-सौरभ
वारा पाहून पाठ फिरवण्याच्या
In reply to ... by पैसा
मुक्त विहारि , अचुक भाष्य केल आहेत.....
व्वा! आवडले. गविंच्या 'आपली
विडंबन आवडलं.
आपले लेखन आवडल्या गेले आहे !!
मस्त जमून गेलंय
आपले बुवा आजारी आहेत थोडासा
छान हो बालिके छान
In reply to आपले बुवा आजारी आहेत थोडासा by जेनी...
उत्तम....
In reply to आपले बुवा आजारी आहेत थोडासा by जेनी...
लिही , अजुन लिही !! कधी नव्हे
बुवा
धाग्याच्या शीर्षकावरुन गाणे आठवले
रोखठोक अन तीक्ष्ण शब्दांत