साहित्यः
कोलंबी - १/२ किलो
लसुण - ३-४ पाकळ्या
हिरवी मिरची - १-२
ऑलिव्ह ऑईल - ३ चमचे
लिंबाचा रस - १ चमचा
हळद - १/२ चमचा
लाल तिखट - १ चमचा
तंदुरी मसाला - १/२ चमचा
हिंग - १/४ चमचा
बटर - १ चमचा
मिठ चवीनुसार
wooden skewers
कृती:
१. कोलंबी स्वच्छ करुन घ्यावी.
२. लसुण व हिरवी मिरची एकदम बारीक चिरुन घ्यावी.
३. एका भांड्यामधे कोलंबी काढुन घ्यावी. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल, लसुण, हिरवी मिरची, हळद, लाल ति़खट, तंदुरी मसाला, हिंग, लिंबाचा रस व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. हि कोलंबी १/२ तास फ्रिजमधे ठेवुन marintae करावी.
४. तो पर्यंत wooden skewers पाण्यामधे भिजवुन ठेवाव्यात.
५. १/२ तासानी कोलंबी फ्रिज मधुन बाहेर काढावी.
६. एका पॅन मधे थोडे बटर व ऑलिव्ह ऑईल गरम करण्यासाठी ठेवावे.
७. प्रत्येक skewer ला ३-४ कोलंबी लावुन घ्याव्या.
८. हे skewers पॅन मधे दोन्ही बाजुनी shallow fry करुन घ्यावेत. हे fry करताना त्याला वरतुन marination चा मसाला लावत रहावा.
९. २-३ मिनिटामधे कोलंबी शिजेल.
१०. गार्लिक प्रॉन्स तयार आहेत. हे skewers गरम असतानाच serve करावे.
४.
४.
वाचने
7979
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
लाजवाब...
शॅ. सकाळी सकाळी असली डिश.
कातील फोटो...
कुरियर कराल काय ?
अप्रतिम स्टार्टर
तोँपासू
अगदी तो.पा.सु.
आजही हि डिश करतो. आमच्याकडे
मस्त !
रुचिकलीका जागृत जाहल्या.
जबरद्स्त चवदार फोटु !!
गार्लिक प्रॉन्समधून गार्लिक
लसुण त्याच्या marination मधे
In reply to गार्लिक प्रॉन्समधून गार्लिक by पिंगू
काय आहे ना आजकाल पाककृती
In reply to लसुण त्याच्या marination मधे by Mrunalini
आंम्हा गवताळ जनास भगवंता
चमचमीत..
छान पाकृ आणि जीवघेणे फोटो!
अतिशय सुंदर आणि चवदार (१००% असणार)
प्रॉन्स खात नाही.. त्यामुळे
प्रॉन्स खात नाही.. त्यामुळे