Skip to main content

गार्लिक प्रॉन्स

लेखक Mrunalini यांनी शुक्रवार, 30/03/2012 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः कोलंबी - १/२ किलो लसुण - ३-४ पाकळ्या हिरवी मिरची - १-२ ऑलिव्ह ऑईल - ३ चमचे लिंबाचा रस - १ चमचा हळद - १/२ चमचा लाल तिखट - १ चमचा तंदुरी मसाला - १/२ चमचा हिंग - १/४ चमचा बटर - १ चमचा मिठ चवीनुसार wooden skewers कृती: १. कोलंबी स्वच्छ करुन घ्यावी. २. लसुण व हिरवी मिरची एकदम बारीक चिरुन घ्यावी. ३. एका भांड्यामधे कोलंबी काढुन घ्यावी. त्यात २ चमचे ऑलिव्ह ऑईल, लसुण, हिरवी मिरची, हळद, लाल ति़खट, तंदुरी मसाला, हिंग, लिंबाचा रस व चवीनुसार मिठ टाकुन मिक्स करावे. हि कोलंबी १/२ तास फ्रिजमधे ठेवुन marintae करावी. ४. तो पर्यंत wooden skewers पाण्यामधे भिजवुन ठेवाव्यात. ५. १/२ तासानी कोलंबी फ्रिज मधुन बाहेर काढावी. ६. एका पॅन मधे थोडे बटर व ऑलिव्ह ऑईल गरम करण्यासाठी ठेवावे. ७. प्रत्येक skewer ला ३-४ कोलंबी लावुन घ्याव्या. ८. हे skewers पॅन मधे दोन्ही बाजुनी shallow fry करुन घ्यावेत. हे fry करताना त्याला वरतुन marination चा मसाला लावत रहावा. ९. २-३ मिनिटामधे कोलंबी शिजेल. १०. गार्लिक प्रॉन्स तयार आहेत. हे skewers गरम असतानाच serve करावे. pr1 pr2 pr3 ४.

वाचने 7979
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

मला बटर गार्लिक प्रॉन्स आवडतात. मस्त स्टार्टर डिश. कृती आवडली.

अरे असल्या पाकृ टाकताना आमची दया येत नाही का??? अजून ब्रेकफास्टसुध्दा झाला नाही. पोटात कावळे ओरडत आहेत आणि तोंपासु.

कातील फोटो... वल्ली / ५० / मृत्युंजया - सरूटॉबाने ठरवा राव लवकर आता.. माझ्या एका पार्टीला तिथे प्रॉन्सचा फन्ना उडवला होता.. ;-)

आजही हि डिश करतो. आमच्याकडे फ्रोझन टायगर प्रोंझ मिळतात. चांगले मुठभर मोठे. साक्षात बंगालच्या उपसागरातून अवतरलेले

गवताळ असल्याने फक्त फटूंसाठी धागा उघडला आणि सार्थक झाले.

आंम्हा गवताळ जनास भगवंता प्रमाणे यांच्याही फक्त दर्शनावरच समाधान मानावे लागते... :-) पण तेही आज प्रत्यक्षभेटी इतके सार्थ झाले... ओले काजुगीर मिळाले(अता पुढच्या महिन्यात) तर या डिशचे स्मरण करुन खाणेत येतील... :-)

चमचमीत दिसते आहे पाककृती. अभिनंदन. छायाचित्रात, किंचित कमी शिजलेले वाटताहेत.