✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कृष्ण आणि कर्ण

स
स्वानंद वागळे यांनी
Wed, 03/28/2012 - 17:44  ·  लेख
लेख
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”. मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते. एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला. अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो. तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
30702 वाचन

💬 प्रतिसाद (121)

प्रतिक्रिया

तुमची विद्वत्ता माहीत आहे

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 15:31 नवीन
तुमची विद्वत्ता माहीत आहे म्हनुन मी काळजी करत नाही हो. मी चुक ही लिहिले तर तुम्हाला माहिती आहेच, म्हनुन प्रोब्लेम नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

माननीय प्यारे'जींचा अतिशय

मृगनयनी
गुरुवार, 03/29/2012 - 15:23 नवीन
माननीय प्यारे'जींचा अतिशय विचारी , अभ्यासू आणि सडेतोड प्रतिसाद!!!.... प्यारे'जी... तुमच्याबद्दल वाटणारा आदर दुणावल्या गेल्या आहे!!!!!! कीप इट अप!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

>> जमले नाही म्हणुन मारले

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 11:18 नवीन
>> जमले नाही म्हणुन मारले नाही जे लोक शास्त्राना भौतिक पुस्तक समजुन वाचतात त्याना त्यावर टिका करण्याचा हक्कच नसतो. तुमची मूर्खता नवीन नाही. तर्क लावण्याच्या अभिमानाने पिसाळलेली मनुष्ये अशीच असतात. मला तुमच्या निरागसतेवर हासावे कि रडावे हे हि कळत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

जे लोक पुराणांना शास्त्र

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 11:43 नवीन
जे लोक पुराणांना शास्त्र म्हणून पुजतात त्यांना तर तोंड उघडण्याचाच हक्क नसावा. बुद्धी गहाण ठेवुन इतिहासाच्या आंधळ्या अभिमानाने पिसाळलेले प्राणी असेच वागतात. मला तुमच्या निर्बुद्धपणावर हसूही येत नाही आणि रडूही येत नाही. स्वत: अतिशहाणे आणि इतर निर्बुद्ध या गैरसमजातुन बाहेर आल्यास पुढचा प्रतिसाद देणे अन्यथा आपणा दोघांचा वेळ फुकट वाया घालवु नये. तुम्ही रिकामटेकडे असाल मला इतर बरीच कामे आहेत. यापुढे आंतरजालावर किमान सभ्यता पाळुन पर्सनल कमेंट्स केल्यात तर बरे होइल. ते जमत नसल्यात संगणक बंद करुन चिखलात लोळायला जाणे उत्तम. असो. तुम्ही नसत्या कमेंट्स करणे थांबवणार नाही. तुम्ही तर मुर्ख आहातच. मी कशाला माझा वेळ दवडु. काही चर्चा करायची असल्यास सांगणे अथवा आमचा रामराम. तुम्हाला मनसोक्त काय शिव्या द्यायच्या त्या द्या. मी या मुर्खपणाला प्रतिसाद देणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

तुम्ही स्वतला नास्तिक/अधर्मी

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 12:49 नवीन
तुम्ही स्वतला नास्तिक/अधर्मी घोषीत करा, मला तुमचे सगळे प्रतिसाद मान्य आहेत. कारण तुम्हाला हे सगळे फक्त इतिहास वाटत आहे. तुम्ही घोषणा नाही केली तरी ते अभिप्रेत आहेच. शास्त्र कशाला म्हणावे ते ही सान्गून द्या थोड !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

अगदीच रहावलं नाही

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/29/2012 - 16:34 नवीन
अगदीच रहावलं नाही म्हणुन... तुम्ही असे का प्रतिसाद देताय? अकारण वाद घातल्या सारखे.... जर तुम्हाला म्रुत्यंजय ह्यांचे मत मान्य नसेल तर तुम्ही मुद्द्यावर मत द्या.. तुम्ही कशावरुन तुमचे मत बनवलेय ते लिहा..आवडेल आम्हाला दुसरी बाजु वाचायला... पण जिथे म्रुत्यंजय एवढे सविस्तर प्रतिसाद देत आहेत तिथे तुम्ही बाकी काहीही न बोलता .... "मुर्खपणा" असे शब्द का वापरताय तेच कळत नाहिये...
हा जळपट प्रतिसाद आहे..मुद्दाला धरुन नाही. तुमची चिड दिसतेय.......... जीवनात असेच काम करत राहलात तर रवरव नर्कात कदाचित नम्बर लागेल
अरे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

कारण त्यानी धर्माबद्दलच्या

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 17:19 नवीन
कारण त्यानी धर्माबद्दलच्या गोष्टीत असे लिहु नये असे आमचे मत आहे. "बलात्कारी" असे शब्द या सन्दर्भात शोभत नाहीत. ज्या बद्दल कोणालाच पुर्णपने माहीत नाही, तेव्हा निर्णय देने चुकिचे ठरते. "मुर्खपणा" वाला सोडून प्रत्येक प्रतिसाद मुद्दाला धरुणच होता. मिपावर सहा महिन्यापासुन येत राहुनही आम्ही कधी कोनाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत. पण या बाबतीत बोलणे आम्हाला कर्तव्याचाच भाग वाटला मी म्रुत्यंजय याना कधीच मुर्ख म्हटल नाही. फक्त प्रतिसादाला मुर्खपणा म्हटले. त्यानी मात्र मला खुप वेळा मतिमन्द, बुध्दिहिन म्हटले. त्याच आम्हाला वाइट हि वाटत नाही. कदाचित या बाबतीत ते बरोबरही असतील. फक्त इतके जाणुन घ्या, वैष्णवाना असे बोललेले आवडत नाही. "जे आपल्यासाथि भगवन्त नाहीत ते दुसर्यासाठि असु शकतात याचि सामाजिक जाणिव ठेवावी, हीच अपेक्षा राहिल" पाकिस्तानात अशी ब्लास्फेमि केलि तर थेट म्रुत्यदन्ड मिळतो. अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही. पण स्वात्नत्र्याचा गैरवापर होउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

तुमची काही मते आहेत... आणि

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/29/2012 - 17:31 नवीन
तुमची काही मते आहेत... आणि त्यांची पण...
फक्त इतके जाणुन घ्या, वैष्णवाना असे बोललेले आवडत नाही. "जे आपल्यासाथि भगवन्त नाहीत ते दुसर्यासाठि असु शकतात याचि सामाजिक जाणिव ठेवावी, हीच अपेक्षा राहिल"
हे बघा... तुम्हाला जे मानायचं आहे ते तत्वज्ञान तुम्ही माना.. पण दुसर्‍या कुणी त्यावर बोलुच नये असं कसं होइल? बर ते काही उथळ बोलत नाहीयेत.. बरच वाचन आहे त्यांच.. तुम्ही त्यांचे मुद्दे खोडुन काढा.नसेल जमत तर सोडुन द्या.. श्रद्धा मध्ये न आणुन चर्चेला वाव ठेवा...
मी म्रुत्यंजय याना कधीच मुर्ख म्हटल नाही. फक्त प्रतिसादाला मुर्खपणा म्हटले. त्यानी मात्र मला खुप वेळा मतिमन्द, बुध्दिहिन म्हटले. त्याच आम्हाला वाइट हि वाटत नाही
प्रतिसादला मुर्ख म्हणण म्हणजे त्या व्यक्तीला म्हणण असं नाही का?? प्रतिसाद त्या मणसाचे विचार दाखवतात आणि एखाद्याच्या विचाराला मुर्खात काढण म्हणजेच तर त्या व्यक्तीला मुर्खात काढणं...तुम्ही सुरुवात केली आणि त्यांनी कंटाळुन शेवट असं वाचणार्‍याला वाटतय..
पण स्वात्नत्र्याचा गैरवापर होउ नये.
महाभारत, क्रुष्ण, कर्ण इ वर चर्चा करणे हा मला तरी "स्वात्नत्र्याचा गैरवापर" वाटत नाही.. मग मुळात जे कोणी तुमच्या श्रद्धेच्या विरोधात बोलतील ते सगळ्च तुम्हाला चुक वाटेल... इथे बरेच जण त्यांच्या विरोधात पण लिहित आहेत.. पण कुणिही तुमच्या सारख्या भाषेत लिहिलेल नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

"बलात्कारी" असे शब्द या

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 17:31 नवीन
"बलात्कारी" असे शब्द या सन्दर्भात शोभत नाहीत. ज्या बद्दल कोणालाच पुर्णपने माहीत नाही, तेव्हा निर्णय देने चुकिचे ठरते. मी कृष्णाला बलात्कारी म्हटलेले नाही हे तर त्याहुन जास्त लक्षात घ्या. स्वातंत्र्याचा गैरवापर होउ नये अशी अपेक्षा. आपण नीट वाचले तर केवळ पोरगी पळवुन नेली किंवा पळवुन नेल्यासा साह्य केले म्हणुन कृष्णाला बलात्कारी म्हणता येणार नाही असा अर्थ माझ्या वाक्यातुन निघति हे आपल्याल दिसुन येइन. मी निर्णय दिला असेलच तर कॄष्ण अर्जुन दोषी नव्हते असा दिलेला आहे ज्यासाठी मला दोष देता येणार नाही. आपण माझ्यावार खुपच चुकीचा आरोप करत आहात आणि यास्तव जगातल्या सगळ्याच देशात मानहानीचा दावा दाखल होउ शकतो आणि आम्ही त्याचे समर्थनच करतो. कारण त्यानी धर्माबद्दलच्या गोष्टीत असे लिहु नये असे आमचे मत आहे. तुमची मते तुम्ही मांडलीत धन्यवाद. मला मान्य नाहित. मी लिहिणार. विषय संपला. आंतरजालावर आपल्या सल्ल्याने लोकांनी लेखन / विवेचन करावे असा आपला आग्रह का आहे हे कळत नाही? "मुर्खपणा" वाला सोडून प्रत्येक प्रतिसाद मुद्दाला धरुणच होता. मिपावर सहा महिन्यापासुन येत राहुनही आम्ही कधी कोनाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत. मी तर गेल्या ३ वर्षात कोणाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत मिपावर. मी म्रुत्यंजय याना कधीच मुर्ख म्हटल नाही. फक्त प्रतिसादाला मुर्खपणा म्हटले. त्यानी मात्र मला खुप वेळा मतिमन्द, बुध्दिहिन म्हटले. त्याच आम्हाला वाइट हि वाटत नाही. कदाचित या बाबतीत ते बरोबरही असतील. तुमची मूर्खता नवीन नाही. आपल्या या प्रतिसादानंतर मी आपणास मुर्ख म्हटले आहे हे कृपया लक्षात घ्या. फक्त इतके जाणुन घ्या, वैष्णवाना असे बोललेले आवडत नाही. "जे आपल्यासाथि भगवन्त नाहीत ते दुसर्यासाठि असु शकतात याचि सामाजिक जाणिव ठेवावी, हीच अपेक्षा राहिल" कमाल आहे ब्वॉ मला तर वाटले की वैष्णव कृष्णाला मानतात मग तो बलात्कारी नाही असे म्हटल्यास तुम्हाला आवडु का नये? पाकिस्तानात अशी ब्लास्फेमि केलि तर थेट म्रुत्यदन्ड मिळतो. अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही. पण स्वात्नत्र्याचा गैरवापर होउ नये. आपणही कडवे आणि माथेफिरु मूलतत्ववादी आहात काय? मूळात मी धर्मावर टीका केलीच कुठे आहे? मी कॄष्णाचे चारित्र्याहनन तरी कुठे केले आहे? आपण माझा प्रतिसाद नीट वाचला काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

>>यास्तव जगातल्या सगळ्याच

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 18:03 नवीन
>>यास्तव जगातल्या सगळ्याच देशात मानहानीचा दावा दाखल होउ शकतो चर्चत टिका झाली तर मानहानी. तुम्ही काय आमचि आरती ओवाळली नाही >> मी लिहिणार. विषय संपला मग प्रतिसादाना घाबरता का?? मी तुमच्या मला इतकेबोलण्याचि कधीच तक्रार केली नाही. चालु द्या चर्चा >>मी तर गेल्या ३ वर्षात कोणाशी व्यर्थ वाद घातलेले नाहीत मिपावर अभिनन्दनच आहे तुमचे यासाठी >>तुमची मूर्खता नवीन नाही. हे तुम्हाला उद्देशुन नव्हते. तुमच्या भुमिकेस होते >> आपणही कडवे आणि माथेफिरु मूलतत्ववादी आहात काय? "अर्थातच आम्ही त्याचे समर्थन करित नाही", हे तुम्ही वाचले नाही कदाचीत. >> मी कॄष्णाचे चारित्र्याहनन तरी कुठे केले आहे? हे तुम्ही नक्कीच केले आहे. असे आमचे मत आहे. तुम्हाला याचि तक्रार नसावी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

त्या काळचे मापदंड आजच्या

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/29/2012 - 18:37 नवीन
त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ), पांडव खूनी होते (वारणावरतात जाळलेले ५ अभागी आदिवासी आणि त्यांची आई), युधिष्ठिर आणी त्याचे भाऊ वासनांध होते (द्रौपदीबद्दल ती भावाची बायको होणार आहे हे माहिती असताना तिच्याबद्दल मनात निर्माण झालेली अभिलाषा)
म्हणजे.. त्या काळाचे आणि आजचे मापदंड वेग वेगळे आहेत.. आजच्या रिती नुसार महाभारताकडे बघता येणार नाही असा त्याचा अर्थ अभिप्रेत आहे... त्यामुळे "कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी" नाहित तर ते त्या वेळेच्या रीती नुसार वागले... हेच कदाचित त्यांनापण म्हणायचे आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

ते कळाले होते हो आणि मी तो

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 18:53 नवीन
ते कळाले होते हो आणि मी तो मुद्दा उचलला ही नव्हता. तुमच्या प्रतिसादाच्या पहिले मी कुठेही त्याचा उल्लेख केला नव्हता. खालील चर्चा तर मुद्देशीरच होती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मी तुमच्या प्रतिसादांना

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 19:37 नवीन
मी तुमच्या प्रतिसादांना घाबरतो आणि तुम्ही मुद्द्याचे प्रतिसाद देउ नये असे कुठेही म्हणलेले नाही. तुमचे मत काहीही असले तरी जे मी म्हणालोच नाही (आनि जे तुम्ही सुद्धा मान्य केले आहे) ते मी म्हणालो असे तुम्ही जे म्हणत आहात ते अत्यंत चुकीचे आहे. अर्थात तुमच्या मतांवर मी पामर काय भाष्य करणार. असो. आता पळतो कारण काही लोक माझ्या शोधार्थ फिरत आहेत असे आमच्या एका सद्मित्रांनी सांगितले आहे आणि उर्जा योग्य ठिकाणी वापरायचा सल्लासुदीक दिला आहे. तरी जयहिंद, जय महाराष्ट्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

लोचा है

गणपा
गुरुवार, 03/29/2012 - 20:05 नवीन
बा मृत्युंजया कितीही प्रयत्न केला तरी पाणी वहातं होण कठीण दिसतय. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

>> मी तुमच्या प्रतिसादांना

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 20:06 नवीन
>> मी तुमच्या प्रतिसादांना घाबरतो आणि तुम्ही मुद्द्याचे प्रतिसाद देउ नये असे कुठेही म्हणलेले नाही. बरोबर आहे. हेच अपेक्षित आहे >> तुमचे मत काहीही असले तरी जे मी म्हणालोच नाही (आनि जे तुम्ही सुद्धा मान्य केले आहे) ते मी म्हणालो असे तुम्ही जे म्हणत आहात ते अत्यंत चुकीचे आहे मी अर्थाचा अनर्थ केला नव्हता. तुम्ही नाही म्हणालात >>असो. आता पळतो जय महाराष्ट्र. शुभ रात्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

तुम्ही वैष्णव का? छान!! बाकी

शिल्पा ब
गुरुवार, 03/29/2012 - 21:49 नवीन
तुम्ही वैष्णव का? छान!! बाकी " तुमचा" देव अगदीच "हा" दिसतोय...नै तुमच्यासारख्या मर्त्य माणसाला त्याचं वकीलपत्र घ्यावं लागतंय म्हणुन म्हंटलं!! असो, आता गंभीरपणे, एक तर तुम्ही पाकीस्तानात नाहीत. तुमचा जर काही मुद्दा असेलच तर तो व्यवस्थीत मांडा. नुसत्या शिव्या देउन तुम्ही स्वत:चंच "ज्ञान" का झाकताय? तुम्ही जर धर्मांध विचारसरणीचे असाल तर हे व्यासपीठच नाही तर देशच चुकीचा आहे तुमच्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

इच्चा नाही तरी आता शेवटचा

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 22:44 नवीन
इच्चा नाही तरी आता शेवटचा प्रतिसाद करित आहे. कारण माझ्यासारख्या मुर्खामुळे वैष्णवाच नाव खराब होत आहे. >>तुम्ही वैष्णव का? छान!! बाकी " तुमचा" देव अगदीच "हा" दिसतोय...नै तुमच्यासारख्या मर्त्य माणसाला त्याचं वकीलपत्र घ्यावं लागतंय म्हणुन म्हंटलं!! देवाला तर कोणि कितिही शिव्या दिल्या तरि काही फरक पडणार नाही. >> एक तर तुम्ही पाकीस्तानात नाहीत. तुम्ही सगळे प्रतिसाद वाचले नाहीत. >> नुसत्या शिव्या देउन तुम्ही स्वत:चंच.... शिव्या नाही हो दिल्या...एकही शिवी नाही वरील प्रतिसादात !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

काहि मुद्दे..जाला वरिल चार्चा

आरोह
Tue, 11/26/2013 - 17:46 नवीन
खालील उतारा काहि प्रकाश टाकू शकेल काय??जाला वरिल चार्चा ""Jarasandh Some how wanted to Take up Mathura as a Vengeance for widowing his daughters. So He attacked the city of Mathura again and again. Krishna could have killed Jarasandh Easily. But the problem was Jarasandh, could be killed only by a physical Duel with him like wrestling, and Jarasandh never gave a chance for this. And if at that instance Jarasandh was to be Killed, His Prajas, and his supporters in Mathura (Which he did have as he was the Father in law of their Old King Kansa - Thoe who enjoyed in Kansas Rule.) would start continuing the war. Krishna Knew this. Though Krishnas Narayani Sena had the Power to defeat Jarasandh How much ever times as necessary it was not advisable. If a country is going to be constantly at war, how do you expect its people to Live in Peace And Harmony? It will Worsen the living condition of People and The Happiness of the Prajas would be Lost. Krishna Understood this well. His main aim was the happiness of his Praja rather than Killing Jarasandh. So he decided to shift His dwelling from Mathura to Dwaraka. In most instances it is mistook that Krishna did some thing like Mohamed Bin Tuglaq, In making his entire people shift from Mathura to Dwarka. But the Fact is, Mathura was a smaller place and Krishna had planned well before taking such shifting steps as to not affect any of his Prajas Livelihood. Dwaraka is a well Planned city. These can be refereed to in Bagavatham, Dasama skandham. People can ask Why, Krishna, at that time itself call Jarasandh to a Wrestling. One main reason behind is, If Krishna had done such a thing, People would have said that, Krishna was going behind people to fight and finds pleasure in Killing People. The next thing is, He wanted to show the strength of Bheem. Moreover, he liked to give Jarasandh a chance for a Living, As Krishna Thought, Jarasandh was born to Good Parents, so After all, he might be good, except for his vengeance over Krishna, Which any Father in law might Have. ""
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सुंदर प्रतिक्रिया...

मोदक
गुरुवार, 03/29/2012 - 00:57 नवीन
सुंदर प्रतिक्रिया... :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

प्रतिसाद अगदी १००%

शिल्पा ब
गुरुवार, 03/29/2012 - 01:04 नवीन
प्रतिसाद अगदी १००% आवडला. बाकी खर्रखुर्र महाभारत कुठे वाचायला मिळेल, गेला बाजार इंटरनेटावर त्याची एखादी प्रत मिळेल का हे विमेंनी सांगावं जेणेकरुन आम्हाला आमचं ज्ञान थोडंसं वाढवता येईल. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ज्याला आज मूळ महाभारत म्हणतात

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 10:45 नवीन
ज्याला आज मूळ महाभारत म्हणतात त्याचे इंग्रजी भाषांतर किसारी मोहन गांगुली यांनी केले आहे. त्याची पीडीफ प्रत जालावर उपलब्ध आहे. हवी असल्यास मला सांगावे विरोपपत्रातुन धाढुन देइन. तळटीपः चांगले ३००० पानी पुस्तक आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

महाभारताची प्रमाण प्रत

प्रचेतस
गुरुवार, 03/29/2012 - 10:48 नवीन
महाभारताची प्रमाण प्रत भांडारकर प्राच्य विद्या संशोधक मंडळाने केली आहे ना? बहुतेक ठिकाणी संदर्भ म्हणून तीच वापरली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाही बोरी प्रत वेगळी.

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 17:11 नवीन
नाही बोरी प्रत वेगळी. भांडारकर मधील तज्ञांनी अभ्यास करुन असे निष्कर्ष काढले की महाभारतात बर्‍याच गोष्टी नंतर घुसडण्यात आल्या आहेत. त्यांची काटछाट करुन त्यांनी एक सुधारित संक्षिप्त आवृत्ती प्रसिद्ध केली जी त्यांच्या मते मूळ लेखनाशी प्रामाणिक आहे. त्यांची मतेही बर्‍यापैकी ग्राह्य मानली जातात. महाभारताच्या कथेतील तपशील देशाप्रमाणे बदलत गेले आहेत. इंडोनेशियन महाभारत वाचुन तर चक्रावुन जाशील. त्यात शल्याला अनन्य महत्व आहे. कारण त्यानुसार तो अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन असा तिन्हींचा सासरा आहे. तसेच त्या कथेनुसार कर्ण आणि अर्जुन युद्धाआधी एकदा भेटले आणि कृष्णाने अर्जुनाला कर्णाबद्दल सत्य सांगितले. त्यावेळेस कर्णाने अर्जुनाला विजयी होण्याचा आशिर्वाद दिला. :) इंडोनेशियन महाभारतात स्थूनकर्ण नावाच्या बाणाचा देखील उल्लेख आहे जो केवळ युधिष्ठीराकडे होता. त्यामु़ळेच तो शल्याला मारु शकला. आपल्याकडे हाच बाण कर्णाच्या भात्यात असल्याचा उल्लेख आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बा मृत्युंजया

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/29/2012 - 18:44 नवीन
हे घे :- Image removed. आणि आपले डोके आपट ह्याच्यावरती. तुला आता उर्जा पार्कात (जुनी पेशवे पार्क) नेऊन उर्जा कुठे आणि कशी सन्मार्गी लावावी ह्यावरती एक लेक्चर द्यायला हवे. च्यायला जो वाद घालायला निघतानाच "माझेच बरोबर आणि मी म्हणेन तेच खरे" असे ठरवुनच आला आहे, त्याच्यासमोर तू कितीही ज्ञानप्रदर्शन केलेस तरी उपयोग शून्य. बाकी तू आमच्या श्रद्धास्थानांना 'बलात्कारी' म्हणाला असल्याने, आमचे काही कार्यकर्ते काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ घेउन तुला शोधत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

काळा रंग, एक गाढव, रिकामे

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 19:40 नवीन
काळा रंग, एक गाढव, रिकामे डबडे आणि फटाक्यांची माळ काळा रंग: माझ्या गाडीची नंबर प्लेट अशीही खराब झाली आहे. उपयोगी पडेल. एक गाढवः समदु:खी , समविचारी मित्र मिळेल रिकामे डबडे: सकाळची सोय झाली फटाक्यांची माळ: दिवाळीचा थोडा खर्च वाचला सज्जन अहिंसक गांधी मोड समाप्त
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

वा .... वा .... वा....! <<<फू

प्यारे१
Fri, 03/30/2012 - 09:05 नवीन
वा .... वा .... वा....! <<<फू बै फू फेम टाळ्या वाजवू स्वप्निल जोशी मोड>>> ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ब ह्यांनी अत्यंत मोलाचा

निनाद मुक्काम …
गुरुवार, 03/29/2012 - 13:31 नवीन
ब ह्यांनी अत्यंत मोलाचा प्रश्न विचारला कि खरे खुरे महाभारत कुठे मिळेल? मुळात. खरे खुरे महाभारत नक्की कोणते ? हे ज्यावेळी घडले तो काळ काही हजार वर्षापूर्वीचा त्या काळी जे घडले ते व्यासांनी सर्वप्रथम लेखणीतून साकारले. आता मूळ महाभारताची प्रत कोणती? ह्यावर सुद्धा एक लेख पडू शकतो मात्र हजारो वर्षात त्यात अनेक लेखकांनी आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेनुसार त्यांचा नजरेतून हे महाभारत लिहिले. अलीकडच्या शतकातील उदाहरण द्यायचे तर दाजी पणशीकर ( नाट्य सम्राट पणशीकर ह्यांचे जेष्ठ बंधू व ह्या शतकातील संस्कुत भाषेचे प्रकांड पंडित .त्यांचे सामना मधील सदर खूपच वाचनीय असते ) किंवा इरावती कर्वे व शिवाजी सावंत ह्यांनी आपल्या आवडत्या व्यक्ती रेखाच्या अनुषंगाने महाभारत व त्यातील अनेक कथानके लिहिली व ते वाचून आज आभासी आणि वास्तविक जीवनात अनेक जण तात्विक वाद घालत असतात. मात्र एक गोष्ट साफ विसरतात कि भारताचा पुराव्याने शाबित होईल असा इतिहास माझ्या मते अशोकाने जे स्तंभ उभारले कि लेणी बनवली तेव्हापासून सुरु होतो. ( जाणकार ह्या बाबत अधिक भाष्य करतील ) ह्या आधीच्या गोष्टी म्हणजे निव्वळ दंतकथा ह्याचा अर्थ महाभारत व रामायण घडलेच नाही असे नाही मात्र आज आपल्याला जे माहित आहे तेच महाभारत ओरीजनल आहे हे आपण पुराव्याने शाबित करू शकत नाही. तो श्रद्धेचा भाग आहे. एक उदाहरण देतो. टिपू सुलतान ह्या विषयो समस्त भारतीयांना म्हणजे कर्नाटक सोडल्यास काय माहित होते ह्यावर प्रवाद निर्माण होऊ शकतात. मात्र संजय खान ह्याने टीवी वर ह्या सुलतानाला ज्या रीतीने सादर केला की माझ्या बालवयात असतांना हा सुलतान म्हणजे इंग्रजांचा कर्दनकाळ ,हिंदू मुस्लीम ऐक्याचा कट्टर पुरस्कर्ता अशी एक भंपक इमेज निर्माण झाली होती. आज पानिपतच्या लढाया किंवा पहिले, दुसरे महायुध्द, भारताची स्वातंत्र्य चळवळ ह्या विषयावर जर वाद विवाद झाले तर त्यामागील दावे हे पुराव्याने शाबित होऊ शकतील कारण ह्या घटना पाहिलेल्या व्यक्तींनी बखर किंवा लेखन करून ते कालखंड जतन केले आहे. आज पानिपत ह्या पुस्तकातील निर्मितीमागील संधर्भ ग्रंथ पहिले तर दोन्ही बाजूने केलेले लिखाण वाचून पानिपतची निर्मिती झाल्याचे कळते. पुरंदरे ह्यांनी शिवचरित्र लिहितांना हेच केले आहे.उदा शाहिस्तेखान आणि तुटकी बोटे हि घटना कोणीही नाकारू शकत नाही कारण शाहिस्तेखानाची रोजनिशी हा सबळ पुरावा किंवा महाराजांचा राज्याभिशेष हि वस्तुस्थिती आहे कारण पुरंदरे ह्यांनी त्याचे बहुतेक वर्णन हे महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित असणाऱ्या इंग्रज वकिलांचे त्याच्या कंपनीला केलेले रिपोर्टिंग खुद पुरंदरे ह्यांनी लंडन मध्ये जाऊन वाचले आहे. त्यावर आधारित आहे.( आजही हॉलंड मध्ये लाखो अशी कागदपत्रे तत्कालीन भारतीय राजनैतिक घटनांवर आधारित आहेत. त्यावर जर संशोधन झाले तर नव इतिहास समोर येईन असे खुद पुरंदरे म्हणतात. नुकतेच एका विदुषीने इंग्लंड मधील वृत्तपत्रात सुरत लुटीचे वर्णन वाचून त्यावर लेख लिहिला तर अफजाखन खान व कोथळा हि भाकडकथा नसून ती वाघनखं आजही इंग्रजानाकडे संग्रही आहेत. त्यांचे काही वर्षापूर्वी मुंबईत प्रदर्शन मांडले होते. आज पाकिस्तानात जिना ह्यांची काही हस्त लिखिते व भाषणे ह्यांचा आधार घेत असा दावा तेथील प्रसारमाध्यमे करत आहेत कि पाकिस्तानची निर्मिती हि मुस्लामांच्या अस्तित्वासाठी नव्हती. मुळात हिंदुस्थानात मुसलमानावर म्हणजे सामान्य जनतेवर अजिबात अन्यान्य नव्हता. मात्र राजकीय व आर्थिक सूत्रे हि हिंदू लोकांकडे होती. व पंजाब व बंगाल मधील मुस्लीम बहुल प्रांतात तेथील जमीनदार व मोठ्या धेंडांनी स्वताचा प्रांत तेथे स्वतःची मोनोपोली किंवा स्वतःचे अस्तित्व निर्माण होण्यासाठी कवी इकबाल ह्यांना पाठिंबा दिला.व इक्बाल ह्यांनी ह्या चळवळीचे नेतृत्व त्यांच्या समाजातील सुशिक्षित व विजनवासात गेलेल्या जिना ह्यांना दिले. ह्याला इंग्रजांनी फुस दिली कारण साम्यवादाच्या विरुद्ध छोटी धर्मावर आधारित राष्ट्रे हा तोडगा त्यांच्या मनात होता म्हणुनच ज्यू राष्ट्र व मुस्लीम राष्ट् ह्यांना गांधी ह्यांचा विरोध होता. ह्यांचा अर्थ गांधी साम्यवाद मानत होते असे नव्हे. ह्यावर सविस्तर परत कधीतरी तेव्हा मतितार्थ एवढाच उदारणार्थ राज कि उद्धव ह्यावर सरस कोण ह्यावर मत मांडण्यासाठी अत्यंत योग्य व्यक्ती म्हणजे त्यांना बालपणापासून पाहणारे शिवसैनिक. आता वृत्तपत्रातून आलेले लिखाण वाचन जर मी ह्यावर मत व्यक्त केले तर तो मूर्खपणा ठरेल. सरत शेवटी मी वी स खांडेकर ह्यांचे उदाहरण देईन. त्यांनी ययाती ह्या कांदबरीचा शेवट मूळ पुराणातील कथेहून निराळा केला. ह्यावर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिले कि माझ्या मते ययाती ह्यांच्या व्यक्तिरेखेचे तर्क शुद्ध विवेचन केले तर जो ज्या रीतीने आपल्या जीवनात वागला असेल त्याबद्दल मी अनुमान मांडले आहे. म्हणून हि कादंबरी वास्तविकतेच्या दिशेने झुकते. व तिला जनाश्रय मिळाला. तेव्हा माझ्यामते आज उपलब्ध असलेले महाभारत हे त्या लेखकांचे महाभारतातील व्यक्तिरेखेवर त्याकाळातील सामाजिक नितीमुल्ये ह्यांच्याकडे त्यांचा पाहण्याचा स्वतंत्र असा दृष्टीकोन आहे.किंबुना ह्यात त्या लेखकांची स्वतःची मते व विचार व त्यावर आधारित महाभारतातील पात्रांचे वर्तन अवलंबून आहे. म्हणूनच आपण सर्वांनी आजच्या काळातील नीती अनीती ./ न्याय ,अन्याय ह्यावरील मापदंड निकष मानून त्याकाळातील घटनांवर चर्विचरण करू नये ( ते करण्यासाठी अनिवासी ,निवासी .मुंबई पुणे किंवा गांधी गोडसे असे अनेक हुकमी विषय आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

सुंदर प्रतिसाद रे निनाद

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/29/2012 - 13:40 नवीन
आवडेश.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

खरेच सुंदर प्रतिसाद

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 13:58 नवीन
खरेच सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

+११११११११११११११११

स्पा
गुरुवार, 03/29/2012 - 13:59 नवीन
निनाद फारच सुंदर रे... चायला.. आता हा प्रतिसाद वाचूनही कोणाला वादविवाद करावासा वाटला.... तर तो गाढवपणाच ठरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

सुंदर

स्मिता.
गुरुवार, 03/29/2012 - 14:40 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद दिलाय निनाद! आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मस्त प्रतिसाद

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/29/2012 - 15:03 नवीन
प्रतिक्रिया खूप आवडल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

मस्त प्रतिसाद

प्रीत-मोहर
गुरुवार, 03/29/2012 - 15:03 नवीन
प्रतिक्रिया खूप आवडल्या गेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अतिशय सुंदर प्रतिसाद निनाद,

५० फक्त
गुरुवार, 03/29/2012 - 17:01 नवीन
अतिशय सुंदर प्रतिसाद निनाद, खुप आवडला. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

महाभारत प्रत - इंग्रजी रुपांतर

महानगरी
Fri, 03/30/2012 - 16:48 नवीन
महाभारताचे इंग्रजी रुपांतर ह्या दुव्यावर मिळेल http://www.holybooks.com/mahabharata-all-volumes-in-12-pdf-files/ उतरवुन घेता येतील अशा पिडिफ वह्या आहेत. हे भाषांतर /रुपांतर प्रताप चंद्र रॉय यांनी केलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

तीव्र आक्षेप

अमृत
गुरुवार, 03/29/2012 - 10:05 नवीन
|कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते हे कसे काय माझ्या माहितीप्रमाणे कृष्ण आणि अर्जुन यांनी प्रियंवदा व सुभद्रा यांना मर्जी विरूद्ध पळवून नेले नाही. लिखाणाच्या ओघात काही च्या काही लिहावे काय???? इतरांनीपण असल्या फालतू विधानांवर डोळेझाक कारावी याचे आश्चर्य वाटले. या विधानावर तीव्र आक्षेप. प्रतिक्रीया देताना संयम बाळगावा व कुणच्या धार्मिक भावना 'आधुनीक विचरांच्या' नावाखाली दुखावल्या जाणार नाही याचा कटाक्ष ठेवावा एव्हडेच सुचवू इच्छितो. अमृत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

+१

पैसा
गुरुवार, 03/29/2012 - 10:13 नवीन
फक्त ते प्रियंवदा ऐवजी मित्रविंदा असे वाचावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

या विधानावर तीव्र आक्षेप मी

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 10:40 नवीन
या विधानावर तीव्र आक्षेप मी स्पष्ट लिहिले आहे की मित्रविंदेला पळवुन नेण्याबद्दल दुमत आहे. मित्रविंदा कृष्णाची आत्येबहिण होती आणि विंद आणि अनुविंद त्याचे मामेभाऊ. हे नंतर कृष्णाच्या हातुनच शहीद झाले. काही स्त्रोतांप्रमाणे रुक्मिणीसारखेच मित्रविंदानेही त्याला पळवुन नेण्याचे साकडे घातले तर काही स्त्रोतांप्रमाणे कृष्णाने तिला स्वयंवरातुन तिच्या आणि तिच्या भावांच्या मर्जीविरुद्ध उचलुन नेले. सुभद्रा हरण तर बळानेच झाले होते. त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती. तिचे लग्न दुर्योधनाशी ठरते आहे हे देखील अर्जुनाला माहिती होते. अंबा, अंबिका आणी अंबालिका यांना देखील भीष्माने पळवुन नेले होते. महाभारतात लग्नाचे जे ८ प्रकार सांगितले आहेत त्यातील पिशाच्च विवाह सोडुन बाकी सर्व विवाहांना समाजमान्य मानाचे स्थान होते. राक्षस विवाहा (वरील उदाहरणे) क्षत्रियांत मानाची मानली जात मुलीच्या बापाला पैसे देउन भार्या विकत घेण्याची पद्धत मद्र देशात होती जी काही ठिकाणी रुढ होती मात्र उत्तरेकडील हस्तिनापुर, पांचाल आदि देशात त्यांना कमी मानाचे स्थान होते. या गोष्टीवरुनच कर्णाने शल्याचा अपमान केला (शल्याने कर्णाचा तेजोभंग करायचा प्रयत्न केल्यानंतर) बाकी माझे खालील वाक्य नीट वाचा. मी अर्जुन आणि कृष्ण बलात्कारी होते असे म्हटलेले नाही आहे. त्या काळचे मापदंड आजच्या काळाला लावुन आपण महाभारतातील व्यक्तिरेखांचे मुल्यमापन करु लागलो तर कृष्ण आणि अर्जुन दोघेही बलात्कारी होते (कृष्णाने मित्रविंदेशी तर अर्जुनाने सुभद्रेशी पळवुन नेउन लग्न केले. त्यातील मित्रविंदेच्या हरणाबद्दल दुमत आहे. सुभद्रा हरणाबद्दल माझ्यामते नाही. चु. भू. द्या. घ्या. ), अजुन काही चर्चा करायची असल्यास खव मध्ये जरुर करुयात कारण तो या धाग्याचा विषय नाही. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

+११११११११

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 12:54 नवीन
+११११११११ >> त्याला कृष्णाची संमती होती पण बलरामाची आणि सुभद्रेची नव्हती. तुम्ही काय बोलताय साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत

When I heard that Subhadra of

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 13:11 नवीन
When I heard that Subhadra of the race of Madhu had, after forcible seizure been married by Arjuna in the city of Dwaraka या वाक्याचे भाषांतर बहुधा बळजबरीने पळवुन नेले आणि लग्न केले असाच होतो. किसारी मोहन गांगुली भाषांतरित महाभारतातुन उचलले आहे हे. खालील परिच्छेद वाचा, कृष्ण स्वतः म्हणतो आहे की एखाद्या बाईला बळजबरीने पळवुन नेणे आणि तिच्याशी लग्न करणे हे क्षात्रधर्माला अनुसरुन आहे. हे ज्ञान तो अर्जुनाला स्वत:च्या बहिणीच्या बाबतीत देतो आहे: 'O bull amongst men, self-choice hath been ordained for the marriage of Kshatriyas. But that is doubtful (in its consequences), O Partha, as we do not know this girl's temper and disposition. In the case of Kshatriyas that are brave, a forcible abduction for purposes of marriage is applauded, as the learned have said. Therefore O Arjuna, carry away this my beautiful sister by force, for who knows what she may do at a self-choice. हे पण वाचा: The son of Kunti, afflicted with the shafts of the god of desire, suddenly rushed towards that Yadava girl of faultless features and forcibly took her into his car. Having seized that girl of sweet smiles, that tiger among men proceeded in his car of gold towards his own city (Indraprastha). इथे पण कुठे सुभद्रेची संमती दिसत नाही. उलट बळजबरी दिसते. पुढे वाचा, सुभद्राहरण झाले आहे हे कळल्यावर देखील कृष्ण शांत आहे हे बघुन बलरामाने त्याला काय विचारले: Then Rama, that oppressor of foes, spoke unto Vasudeva, saying, 'Why, O Janardana, sittest thou, gazing silently? O Achyuta, it was for thy sake that the son of Pritha had been welcomed and honoured by us. It seemeth, however, that that vile wretch deserved not our homage. What man is there born of a respectable family that would break the plate after having dined from it! Even if one desireth to make such an alliance, yet remembering all the services he hath received, who is there, desirous of happiness, that acts so rashly? That Pandava disregarding us and thee too hath today outraged Subhadra, desiring (to compass) his own death. He hath placed his foot on the crown of my head. How shall I, O Govinda, tamely bear it? Shall I not resent it, even like a snake that is trodden upon? Alone shall I today make the earth destitute of Kauravas! Never shall I put up with this transgression by Arjuna.' Then all the Bhojas, Vrishnis, and Andhakas, present there, approved of everything that Valadeva had said, deeply roaring like unto a kettle-drum or the clouds.'" वरील परिच्छेदातुन स्पष्ट होते की बलरामाला सुद्धा सुभद्राहरणकांडा बद्दल काहीही माहिती नव्हती. तोही प्रचंड चिडला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

जर तुम्ही महाभारताच्या या

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 13:57 नवीन
(फक्त बलरामाना माहित नसल्याचे मला माहित होते ..असो..) जर तुम्ही महाभारताच्या या प्रतिला खरे मानत असाल तर भागवताबद्दल का शन्का आहे. त्यातल्या प्रत्येक भागाचि विषयवस्तु एकच आहे (जर तुम्हाला काही भाग नन्तर टाकलेली वाटत असेल तर...). जरासन्धाला मारणे जमले नाहि ....असे म्हणणे म्हणजे स्वताच्या आवडीणे काही भाग सत्य मानुन घेणे आणी काही भाग असत्य.. नास्तिकता सिध्द करणारे हे वाक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

भागवतात आणी महाभारतात जेव्हा

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 14:39 नवीन
भागवतात आणी महाभारतात जेव्हा अंतर पडते तेव्हा महाभारत प्रमाण मानावे लागते. कारण भागवत बरेच नंतर लिहिले गेले आहे. भागवत किती एकांगी आहे याची अनेक उदाहरणे देता येतील. त्यापैकी एक द्यायचे झाल्यास शिव - कृष्णाची लढाई. शिव पुराणात अगदी उलटी गोष्टदेखील वाचायला मिळते. असो. मी नास्तिक नाही हे मिपावरचा पक्का नास्तिक पण सांगेल. :) असो बर्‍याच गोष्टी वाचुन त्याची गोळाबेरीज केली आहे त्यामुळे काही भाग खरा वाटतो काही वाटत नाही. हे सगळे म्हणून मग मी स्वत:च्या तर्कावर तासले आणि जो काही प्रॉडक्ट आला तो मांडला. असो. कशाला उगाच भांडायचे. झाली ४००० वर्षे त्याला आता (हा सुविचारीपंणा थोड्याच वेळात गायब होइल आणी परत थोड्याच वेळात मी परत भांडायला (अर्र्र्र, चुकलं चुकलं. चर्चा करायला) सुरुवात करेन बहुधा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 14:54 नवीन
म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार " जरासन्धाला मारणे जमले नाही" हेच का?? (काही प्रोब्लेम नाही, फक्त होय किवा नाही सान्गा.. आपल्या वाचणाचा आदर आहेच :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

होय. कृष्णाचे मल्लनैपुण्य

मृत्युन्जय
गुरुवार, 03/29/2012 - 15:17 नवीन
होय. कृष्णाचे मल्लनैपुण्य लक्षात घेता कदाचित जमलेही असते. पण जरासंधाने त्याला रणछोडदास पदवी घ्यायला लावली हे खरे. आता ती कालयवनाची कृपा असेही तुम्ही म्हणु शकता. पण कृष्णाला जमले नाही हे खरे. जमलेच नसते असे काही म्हणत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक मुलगा

कळाल्या तुमच्या भावना, आता

एक मुलगा
गुरुवार, 03/29/2012 - 15:27 नवीन
कळाल्या तुमच्या भावना, आता तुम्ही आणी मी दोघेही शान्तपणे कामाला लागुया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युन्जय साहेब अप्रतिम विवेचन केल आहेत तुम्हि.

निश
गुरुवार, 03/29/2012 - 10:50 नवीन
मुळात पाडंवांचच्या वडिल जे पांडु राजा , त्याने वनवासात जाताना राज्य हे दान केल होत त्याच्या भावाला . म्हंजे कौरवानाच ते दान केल होत म्हंजे राज्याचा त्याग केला होता. अस असताना जे राज्य दान म्हणुन दिल ते च राज्य पांडव परत मागत होते. ते मुळातच चुक होत. कर्ण ह्याच्या बद्दल तुम्हि जे विवेचन केल आहेत ते योग्यच आहे. अपमानित झालेला माणुस रागाच्या भरात जे करेल तेच कर्ण ह्याने केले ते म्हंजे पांडवांचा द्वेष. मुळात महाभारत हे वेदव्यास ह्या नी लिहिल आहे आणि ते पांडवांवर जास्त माया करणारे होते. म्हणुन महाभारत हे जेत्यानी लिहिलेल आहे. त्यामुळे ते जेत्यांच्या बा़जुच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

क्या बात है!

संदीप चित्रे
गुरुवार, 12/12/2013 - 01:47 नवीन
हा प्रतिसाद अत्यंत आवडला त्यामुळे न राहवून दाद देतोय! असेच उत्तम प्रतिसाद दिसले की खर्‍या अर्थाने एखादी चर्चा जीवंत होते. बाकी चालू द्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

च्यायला! प्रतिसाद भलत्याच जागी पडलाय....

संदीप चित्रे
गुरुवार, 12/12/2013 - 01:49 नवीन
कृपया माझा प्रतिसाद उडवून टाकावा ही संपादकांना विनंती !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप चित्रे

छान

विजय_आंग्रे
Wed, 03/28/2012 - 20:06 नवीन
छान प्रतिक्रिया!
  • Log in or register to post comments

मस्त प्रतिक्रिया

स्वछन्दि
Wed, 03/28/2012 - 21:23 नवीन
उत्तम प्रतिसाद..... मृत्युन्जय यान्चि प्रतिक्रिया खुप अभ्यासपुर्वक..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा