कृष्ण आणि कर्ण
मराठी साहित्यातल्या असामान्य कलाकृतींची जर यादी करायची म्हटले तर ती शिवाजी सावंत यांच्या “मृत्युंजय” शिवाय सुरुही होणार नाही आणि संपणार देखील नाही. याच कादंबरीने लोकांना महाभारत ये एका महान ग्रंथाकडे एका वेगळ्या दृष्टीकोनाने पहाण्यास प्रवृत्त केले. कर्ण किती महान होता हे याच पुस्तकामुळे लोकांना कळू शकले. आयुष्यभर अवहेलना सोसणाऱ्या कर्णासाठी, वाचताना नकळतच एक आदराची जागा आपल्या मनात बनते. एवढा दानशूर असूनदेखील भगवंत कृष्ण त्याचाशी एवढे निर्दयीपणे का वागले? नको नको म्हणत असताना देखील त्यांनी अर्जुनाला नि:शस्त्र कर्णावर बाण चालवण्यावस का भाग पाडले असेल? पु. ल. देशपांडेंचा ही लेखनात एका ठिकाणी पु. ल. म्हणतात की “कृष्ण देखील कधीतरी कर्णाबरोबर चीडीचा डाव खेळला असे मला वाटते”.
मला स्वतंत्रपणे विचार करताना असे वाटते की ज्या प्रकारचा मृत्यू श्री कृष्णांनी कर्णासाठी ठरवला तो कदाचित बरोबरच होता. अनेक वेळेला त्यांनी अर्जुनाला पाठीशी घातले हा देखील एक कृष्णानितीचाच भाग होता. असे मला वाटते. या सर्व गोष्टीत अर्जुनाला वाचवण्यापेक्षा त्यांचा कर्णाला इतिहासात कायमचे महानपणाचे स्थान देण्याचा त्यांचा हेतू असावा असे मला वाटते.
एक विचार सर्वांनी करून पहा की जर अर्जुनाने कर्णाला सरळ युद्धात हरवले असते तर कर्णाला आज कोणी महान म्हटले असते का? किंवा युद्धात रथाचे चाक जमिनीत रूताल्यावर ते जमिनीतून बाहेर काढणे हे त्या वेळी महत्वाचे होते का? कर्ण रथाचा वापर न करता लढू शकत नव्हता का? जेंव्हा अर्जुन बाण चालवत होता तेंव्हा कर्णाने रथाचे चाक मोकळे करायचे सोडून धनुष्य का नाही उचलले? या प्रश्नांचे उत्तर मिळवायचा कोणी कधी प्रयत्न केला आहे का? मला वाटतं की कर्णाला देखील कृष्णांचा हा डाव कळला असावा म्हणूनच त्याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न नाही केला.
अर्जुन आणि कर्ण यांमध्ये नि:संशय रित्या कर्ण जास्त महान धनुर्धर होता. परंतु त्याच्या आयुष्यात त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या. चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला कपटाने मारण्यात कर्ण देखील होता. अभिमन्यू चे कवच मागून भेदण्याचे कामही त्याचेच. परशुरामाशी खोटे बोलून दिव्या अस्त्र मिळवणारा कर्ण देखील हाच होता. ध्युतामध्ये पांडवांवर मोहिनी टाकून त्यांना कपटाने हरवनाऱ्या कौरवांच्या बाजूने कर्ण लढला कारण काय तर त्याच्या पडत्या काळात दुर्योधनाने त्याला मदत केली. पण याच कर्णाने कधी दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी हा कर्ण शांत राहिला कारण काय तर द्रौपदीने त्याला साकडे घातले नाही? हा युक्तिवाद तर कधीही न पाटण्याच्या पलीकडचा वाटतो.
तरीही श्री कृष्णांनी त्याला नि:शस्त्र असताना अर्जुनाकडून मृत्यू आणविला. याचमुळे आज कर्णाला सहानुभूती तरी मिळते. लोक आजही सर्वकालीन महान धनुर्धर म्हणूनच उल्लेख करतात. जर श्री कृष्णांनी सरळ युद्धात कर्णाला मृत्यू दिला असता तर आज “मृत्युंजय” चा शेवट आणि एकंदर संपूर्ण विषयाच पूर्ण पणे वेगळा असता असे मला वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मूळ महाभारतात कर्ण ही
हम्म...
"मृत्युन्जय" वाचल्या नंतर च्या भावना
मृत्यूंजयाचा प्रतिसाद उत्तम
मृत्यूंजयांचा प्रतिसाद खरोखर रोचक...
यासाठी तुम्ही युयुत्सुंना
हॅ हॅ हॅ
स्त्रीशक्तीचा एकच दणका...
हे माहीत नव्हतं. डेंजरस
काय हे ?
राजनीती ह्या सिनेमात अजय देवगण वर अन्याय झाला आहे का ?
मसं वरच्या भारी भारी चर्चा ऐकून मला हे गाणे आठवते
बराच उशीर झाला प्रतिसाद
>>>कौरवांवर झालेले अन्याय - -
:)
च्यायला सचिननं एक शतक काय
दादा कोंडके चा आणि माझा अनुभव सारखाच
दादा कोंडके चा आणि माझा अनुभव सारखाच
आक्षेपान्च्या सन्दर्भात महाभारत वाचावे
ऊहापोह नको
कुणीच कुणाचं काही ** मतपरिवर्तन करु शकत नाहीत (झालं तरी काय दिवे लागणार आहेतहे पटते. निनाद, मृत्युन्जय - यांचा प्रतिसाद खूप छानमृत्युन्जय:- तुम्हला व्य. ने. केला आहे.
कर्ण जसा वागला तसा तो का