Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमितसांगली on गुरुवार, 03/29/2012 - 18:05
कत्तल करुनी वृक्षांची, अनाथ केले भू-मातेला, जंगले बांधूनी सिमेंटची, वाकुल्या दाखविल्या निसर्गाला, चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? डोस पाजूनी रासायनिक खतांचे, शोषण केले मातीच्या गुणधर्मांचे हव्यास धरुनी अति -उत्पनांचे, दिवस दाखविले वान्झत्वाचे चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, सुपीकता म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विवस्त्र करुनी निसर्गाला, हिंस्रपणे ओरबाडले वरून धूर काढला तर खालून पाणी उपसले उत्सर्जन करुनी विषारी वायूंचे , ओझोनचे काळीज फाडले चटके देऊनी मातेला, उपकारांचे पांग फेडले चक्र असेच दौडले तर, भविष्यातील पिढी विचारेल, निसर्ग संपत्ती म्हणजे काय.....?? नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विचार सर्वांनी हवा करायला, आळा घालूया वाढती लोकसंख्या व प्रदूषणाला, सुरुवात करू स्वतापासून ,मग लागेल समाजही बदलायला चक्र हे थांबविण्यासाठी कामाला लागू झटकून हात अन पाय नुसताच म्हणतो धरणी माय, पण तिच्यासाठी करतो काय...?? विडंबन वाचायला आवडेल .........

Submitted by निश on गुरुवार, 03/29/2012 - 18:14

Permalink

अमितसांगली साहेब, एक विचार करायला लावणारी कविता लिहिली आहेत.

अमितसांगली साहेब, एक विचार करायला लावणारी कविता लिहिली आहेत. भविष्यातील पिढी विचारेल, हिरवळ म्हणजे काय.....?? अस म्हणुन प्रत्येक कडव्या मध्ये तुम्हि अस विचारल आहे कधी सुपिकता तर कधि निसर्ग संपत्ती म्हणुन . निव्वळ अप्रतिम लाजवाब कविता आहे ही.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/29/2012 - 19:37

Permalink

कल्पना चांगली

लेखाच्या ऐवजी कविता लिहायची कल्पना आवडली. पण तुम्हाला विडंबन वाचायला आवडेल तर अत्रुप्त आत्मा याना लिंक द्यायचीत ना, ते काण्ट्र्याक त्यांच्याकडे आहे! :D
  • Log in or register to post comments

Submitted by गणामास्तर on गुरुवार, 03/29/2012 - 22:58

Permalink

अप्रतिम कविता. निसर्गा बद्दल

अप्रतिम कविता. निसर्गा बद्दल वाटणारी कळकळ, पर्यावरणाच्या र्‍हासा बद्दल समाजाची कमालीची अनास्था, भविष्यातील पिढी समोरील प्रश्न आणि वाढती लोकसंख्या ई. भावना कवितेच्या माध्यमातून अत्यंत सुरेख पद्धतीने मांडल्या आहेत आपण. येथील काही दुष्ट लोक तुमच्या कवितेचे बीभत्स विडंबन करायची शक्यता नाकारता येत नाही, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

Submitted by मूकवाचक on Fri, 03/30/2012 - 10:20

Permalink

कल्पना चांगली आहे

पुलेशु (विडंबकांनी 'दे माय धरणी ठाय' करून सोडू नये यासाठी टाकलेली तळटीपही आवडली )
  • Log in or register to post comments

Submitted by अग्यावेताळ on Fri, 03/30/2012 - 10:25

Permalink

मिपाचे टोप्या उडवू ज्येष्ठ

मिपाचे टोप्या उडवू ज्येष्ठ विडम्बनकार अत्रुप्त यांच्या विडम्बानाच्या प्रति़क्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by चौकटराजा on Fri, 03/30/2012 - 11:10

Permalink

काळजीत टाकणारे लेखन

अमित साहेब , \/ || O / \ साष्टांग नमकाराची ही खूण जमली आहे का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 03/31/2012 - 12:06

Permalink

सुंदर !

हा व्हिडीयो आठवला...
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3918 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com