अनेक रंग माझ्या ओंजळीत दिलेस... अगदी हळूवारपणे...
हरखून गेले ते रंग पाहताना... माझ्या ओल्या डोळ्यात त्या इंद्रधनूचं प्रतिबिंब तरळलं.... नजर हलेना माझ्याच भरलेल्या ओंजळीवरून...
तू : पाहतेस काय?
मी : हे...... हे रंग.. कित्ती आहेत!! सुंदर एक- एक...
तू : हम्म, तुझेच आहेत
मी :सारे?
तू : हो
मी :काय म्हणू?
तू : डोळ्यांनी सांगितलं सारं.. हे रंग वापर, उधळ तुला हवे तसे
मी : मनसोक्त?
तू :हो, म न सो क्त
मी :हा हिरवा, हा लाल, हा केशरी, हा पारवा, करडा- गव्हाळ! हा का देतो आहेस?
तू :तुझी कांती, गव्हाळ म्हणून
मी :पण ह्या रंगामूळेच तुला खूप काही ऐकावं लागलंय आजवर
तू : तुला, कटूच आठवण येणार असेल, तर आण तो इकडे
मी : काय करशील त्याचं?
तू : ठेवेन जपून, तुझ्या इतकाच
मी : वेड लावलंस आज मला
तू : ....
मी :आयुष्याचा कॅनव्हास पुन्हा रंगवायला घेईन
तू :शुभ्र कागदावर?
मी :हम्म, मला मदत करशील?
तू : बोल ना, काय ते
मी :खूप दिवसांनी इतके रंग एकत्र पाहते आहे रे, कुठला- कुठे- कसा उतरवू, सांगशील?
तू :सुरुवात कर हिरव्याने..!!
मी : सुखाचा रंग तो, तू सर्वाथाने देऊ केलेल्या
तू :त्याच्या भोवती गुलाबी पेर
मी : आपल्या इवल्या विश्वातल्या प्रेमाचा?
तू : मग घे, केशरी-उधळ मुक्तपणे
मी :माझ्यातली बंडखोरी हेरतोस?
तू : आता ओत अवकाशाचा आकाशी अथांगपणा
मी :तुझ्या मनाचा ठाव घेणारा?
तू : मग पारवा
मी : माझ्यातला अवखळपणा?
तू :मग बुंद लाल
मी :तुझ्यातल्या जगण्याच्या जिद्दीसारखा, गडद पण मोहक, असा?
तू : आता पिवळट हलक्या- फिकट छटा
मी :वृद्धपकाळापर्यंत टिकणारी सोबत म्हणून?
तू : .....
मी : अरे, पण चित्र पूर्ण करायला, काळा नको?
तू :.... मी असेपर्यंत, 'दु:ख' असे थेट ओंजळीत येणार नाही तुझ्या!
-बागेश्री
ब्लॉगवर पूर्वप्रकाशित : http://venusahitya.blogspot.com/2012/01/blog-post.html
याद्या
4204
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान लिहीलय
लय भारी...
१००% सहमत
In reply to लय भारी... by मुक्त विहारि
मस्त...
छान ! मस्तच रंगवलय
जरा
सुंदर.....लिहिलेयस
छान लिहिलंय,
मस्त मस्त शेवटचे वाक्य खुपच
वॉव .. काय बोलु खरच कळत
सुंदर !
सुंदर लिहलंय.
चान चान चान चान
खूप आभारी आहे!
सो
सुंदर !
मस्त्च...छान लिहिलयं ....