✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वाळ्याचे पडदे

अ
अन्तु बर्वा यांनी
Tue, 03/27/2012 - 19:09  ·  लेख
लेख
लहानपणीचा उन्हाळा लै भारी असायचा. शाळेला सुट्टी. सकाळी ७ वाजता शेतातल्या आंब्यांचा 'ब्रेकफास्ट' करायचा आणि क्रिकेट खेळायला पळायच! ११.३०-१२ ला घरी येऊन मस्त थंड पाण्यानी आंघोळ करायची. नंतर आमरस-पोळी वर यथेच्छ ताव मारायचा! दुपारी परत बैठे खेळ. गोट्या, चिंचोके, पत्ते. ४ वाजता परत घरी येऊन काहीतरी (बहुदा थंड दही-भात आणी शेन्ग्दाण्याची चटनी ) खायच आणि परत पळायच क्रिकेटखेळायलाअगदी संध्याकाळी ७ पर्यंत. काय दिवस होते ते! त्यावेळी आमच्याकडे आजोबा त्यांच्या खोलीत खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून घेत असत उन्हाळ्यात. दुपारच्या झोपेआधी त्यापडद्यांवरपाणी मारले जाई. अहाहा! काय मस्त सुगंध सगळ्या घरभर दरवळायला लागायचा! कधी कधी आजोबांच्या त्या खोलीतझोपायला मिळे.अशी गाढ आणी मस्त झोप लागायचे म्हणून सांगू. पूर्ण खोलीत अंधार झालेला. वाळ्याचा तो सुगंध आणी वर पंखा. खरच, हरवले हो ते दिवस. असो. हा सगळा लेखन प्रपंच एवढ्या साठी की उन्हाळा सुरू झाला आहे आणि मी विचार करतोय की ह्या उन्हाळ्यात वाळ्याचे पडदेआणायचे. पुण्यात खूप शोधले पण कुठेच मिळाले नाही. तुमच्यापैकी कुणाला माहीत आहे का पुण्यात वाळ्याचे पडदे कुठे मिळतील?असल्यास कृपया सांगावे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9442 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

कलियुग हो, घोर

यकु
Tue, 03/27/2012 - 19:17 नवीन
कलियुग हो, घोर कलियुग! वाळ्याच्या पडद्यांचा पत्ता कोण विचारतंय तर अन्तू बर्वा ! अन्तूशेठ, दुपारच्या पारीस थंडगार हवा देणारी तुमची बाग काय सदभटाला विकली काय? :p
  • Log in or register to post comments

पोफळीची बाग म्हणजे एयर कंडीशन

अन्तु बर्वा
Tue, 03/27/2012 - 19:25 नवीन
पोफळीची बाग म्हणजे एयर कंडीशन हो! काय! आमचा कंट्री विनोद हो क्रूरसिंगबापु! दिवसभर तर आम्ही एयर कंडीशन मधेच बसलेले असतो हापीसात. तेंव्हा आम्हाला वाळाच हवा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

पुण्यात बऱ्याच ठिकाणी

किचेन
Tue, 03/27/2012 - 19:33 नवीन
पुण्यात बऱ्याच ठिकाणी वाळ्याचे पडदे मिळतात.गणपती चोव्कातून समाधानच्या चोवकाकडे चालत गेलात तर उजव्या हाताला एक दुकान आहे.वाल्याचे पडदे बाहेरपण लावलेले असतात तुम्हाला ते लगेच सापडेल.आणखीन एक आहे मंडई कडून जिलब्या गणपतीकडे चालत येताना रस्त्याच्या डाव्या बाजूला काही दुकाने आहेत.पुना शुगर डेपोच्या समोर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! या वीकेन्ड्ला नक्की

अन्तु बर्वा
Tue, 03/27/2012 - 19:50 नवीन
धन्यवाद! या वीकेन्ड्ला नक्की जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

वाळ्याचे पडदे

प्राध्यापक
Tue, 03/27/2012 - 19:33 नवीन
अन्तूशेठ, पुण्याच्या तुळशिबागेत जरा जाउन या,तिथे काय मिळत नाहि ?
  • Log in or register to post comments

हो. तिथे मिळतील पण फसवणूक होऊ

रेवती
Tue, 03/27/2012 - 19:48 नवीन
हो. तिथे मिळतील पण फसवणूक होऊ नये म्हणून सावध असावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राध्यापक

तुळशी बागेत चौकशी केली होती

अन्तु बर्वा
Tue, 03/27/2012 - 19:51 नवीन
तुळशी बागेत चौकशी केली होती मी पण मिळाले नाहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आम्ही दुसर्‍याच वर्षी फेकून दिले ते पडदे..

योगप्रभू
Wed, 03/28/2012 - 00:24 नवीन
नवे नवे आणले तेव्हाचा उन्हाळा वाळ्याच्या मंद सुगंधात मस्त गेला. नंतर पावसाळ्यात ते पडदे काढून नीट बांधून लॉफ्टवर ठेऊन दिले. पावसाळ्यात आपोआप त्यात कसलेसे कीडे झाले. पुन्हा हिवाळ्यात ते काढून ऑक्टोबर हीटमध्ये उन दिले. मग उन्हाळा आल्यावर परत लावायला गेलो तर गवत आणि भुसा पडायला लागला. वासपण अजिबात येत नव्हता. ती कटकट झाली आणि सरळ टाकून दिले. सध्या कूलर वापरतो आहे. कूलर टँकच्या पाण्यात खसच्या अत्तराचे थेंब टाकले, की वाळ्याच्या पडद्याचा फील. पण त्या कूलरचा रात्रभर आवाज येतो. ती एक वेगळी कटकट. एसी बसवावा म्हणेपर्यंत त्याच्या किंमती पाच हजारांनी वाढल्यात. मायबाप वीजखात्याने वाढीव भारनियमनाची घोषणा केलीय. एकूण काय जिंदगी आणि आम्ही, दोघंबी भिकार** :)
  • Log in or register to post comments

दरवर्षी नविन घेतेलेले बरे.

पक्या
Wed, 03/28/2012 - 01:49 नवीन
दरवर्षी नविन घेतेलेले बरे. पडदे साठवून ठेवले हे पहिल्यांदाच ऐकले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

+१

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/28/2012 - 11:46 नवीन
पक्याशी सहमत. (काय दिवस आलेत च्यायला !) वाळ्याचे पडदे हे उन्हाळा संपला की त्यांचे देखील आयुष्य संपले असे समजून फेकुन द्यावेत. नको तिथे काटकसर करायचे किडे करु नयेत* अन्यथा पडद्यात किडे पडतात. *हे भटुकडे कधी सुधारायचे काय माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या

निषेध

आदिजोशी
Wed, 03/28/2012 - 14:32 नवीन
वाळ्याच्या पडद्या आडून जातीवाचक टिका करणार्‍या पर्‍याचा निषेध निषेध निषेध !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

तुम्ही काय बाब्बा राजकुमार...

योगप्रभू
Wed, 03/28/2012 - 15:50 नवीन
राजाच्या घरी रोजच दिवाळी. राजकुमारांना काय होतंय सांगायला, म्हणे फेकून द्या. आडनावातही पाच अक्षरांची उधळण. मग असंच होणार. देशस्थांच्या वाईट सवयी लागल्यात पोट्ट्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक शन्का आहे. इथे कुणीतरी

अन्तु बर्वा
Wed, 03/28/2012 - 14:41 नवीन
एक शन्का आहे. इथे कुणीतरी म्हटल्यासारखे कूलर च्या पाण्यात वाळ्याच्या अत्तराचे थेम्ब टाकणे बेटर की वाळ्याचे पडदे आणावेत?
  • Log in or register to post comments

अन्तु शेठ

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/28/2012 - 15:20 नवीन
अहो कुलर वैग्रे सगळे हुच्चभ्रुचे नखरे आहेत बघा. तुम्ही फक्कडसे वाळ्याचे पडदे आणून टाका पाहू. येता येता सदाशिवपेठेतून या, म्हणजे मी पण येतो सोबतीला आणि २ पडदे खरेदी करून टाकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्तु बर्वा

परा

अन्तु बर्वा
Wed, 03/28/2012 - 16:11 नवीन
उत्तम! ह्या आठ्वडी अन्ताला करुन टाकु खरेदि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

येन्नी टैम !

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/28/2012 - 16:18 नवीन
यायच्या आधी व्यनी करा, म्हणजे आम्ही तयारी करून ठेवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्तु बर्वा

हम्म्म

मी-सौरभ
Wed, 03/28/2012 - 16:34 नवीन
यायच्या आधी व्यनी करा, म्हणजे आम्ही तयारी करून ठेवू.
USSP वाल्यांनी तयारी करुन ठेवतो म्हटलं आहे म्हंजे धोका होऊ शकतो. सावधान!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

=)) =)) =)) =))

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/28/2012 - 18:01 नवीन
मिळाला मौका मारा चौका. का उगाच माझ्या विषयी गैरसमज पसरवतो आहेस बाबा ? दुपारची एखाद बिअर सूटली असती फुकटात, ती पण सूटायची नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

बीअरच काय एवढं?

मी-सौरभ
Wed, 03/28/2012 - 18:40 नवीन
भेटा तुमच्या लाडक्या पूनम मधे. बसूया :) ढिसक्लेमर : आमी आमचं मत आमच्या एका दोस्ताला आलेल्या स्वाणूभवावरुन बनवलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरेरे!

अन्तु बर्वा
Wed, 03/28/2012 - 19:10 नवीन
अरेरे! पराला सव्वाशेर बघायचा चानस गावला अस्ता की हो.... पार बोळा फिरवला तुम्ही त्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

कूलर घेताय?

सर्वसाक्षी
Wed, 03/28/2012 - 15:07 नवीन
मग हे धोके लक्षात घ्या १) साचलेल्या पाण्यात डास वाढतात = डेंग्यु, मलेरिया २) कूलरच्या पाण्यात रात्री गुंगीचे औषध टाकुन घरातील सर्वांना बेशुद्ध करुन घरफोडी होऊ शकते ३) घरचे बाहेरगावी गेले असता कूलर काढुन त्या भगदाडातून चोर आत शिरु शकतात
  • Log in or register to post comments

उगा भ्या दावू नगसा...

योगप्रभू
Wed, 03/28/2012 - 15:35 नवीन
<<१) साचलेल्या पाण्यात डास वाढतात = डेंग्यु, मलेरिया>> ....डास वाढायला पाणी साचायला तर पाहिजेना. इथे रोज कूलरमध्ये पाणी टाकावे लागते. पहाटेपर्यंत टँक ड्राय होतो. <<२) कूलरच्या पाण्यात रात्री गुंगीचे औषध टाकुन घरातील सर्वांना बेशुद्ध करुन घरफोडी होऊ शकते>> ....शक्य आहे. मात्र कूलर वापरणार्‍यांची आर्थिक लायकी चोर ओळखून असतात त्यामुळे ते अशा घरांकडे टाईमपास करायला फिरकत नाहीत. अरे! चोरांनाही काही स्टेटस आहे की नाही? <<३) घरचे बाहेरगावी गेले असता कूलर काढुन त्या भगदाडातून चोर आत शिरु शकतात >> .... आता फिक्स्ड कूलर बसवण्याची गरज नाही. खोलीपुरता थंडावा देणारे आणि चाके असलेले पोर्टेबल कूलर बाजारात आहेत. मुलांना गाडीगाडी खेळायला त्यांचा उपयोग होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

पहिला प्रतिसाद मान्य. दुसरा

विजुभाऊ
Wed, 03/28/2012 - 15:31 नवीन
पहिला प्रतिसाद मान्य. दुसरा प्रतिसाद अवघड आहे तिसरा अमान्य.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ

अन्तु बर्वा
Wed, 03/28/2012 - 15:55 नवीन
वस्ताद हो विजुभाऊ वस्ताद! कोर्टात साक्शिदार म्हणुन नाव काढाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

वाळ्याचे पडदे बदलता बदलता

इरसाल
Wed, 03/28/2012 - 23:59 नवीन
लोक आय्डी पण बदलायला लागलेत. म्हण्जे फ्याड हो....
  • Log in or register to post comments

च्यामारी मला आधी वाटलं माझा

अंतु बर्वा
गुरुवार, 03/29/2012 - 11:45 नवीन
च्यामारी मला आधी वाटलं माझा आय्डी ह्याक झाला की काय? पण नंतर पाह्यलं ह्यो तर येगळाच "अन्तु" बर्वा दिसतोय...
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा