लहानपणीचा उन्हाळा लै भारी असायचा. शाळेला सुट्टी. सकाळी ७ वाजता शेतातल्या आंब्यांचा 'ब्रेकफास्ट' करायचा आणि क्रिकेट खेळायला पळायच! ११.३०-१२ ला घरी येऊन मस्त थंड पाण्यानी आंघोळ करायची. नंतर आमरस-पोळी वर यथेच्छ ताव मारायचा! दुपारी परत बैठे खेळ. गोट्या, चिंचोके, पत्ते. ४ वाजता परत घरी येऊन काहीतरी (बहुदा थंड दही-भात आणी शेन्ग्दाण्याची चटनी ) खायच आणि परत पळायच क्रिकेटखेळायलाअगदी संध्याकाळी ७ पर्यंत. काय दिवस होते ते!
त्यावेळी आमच्याकडे आजोबा त्यांच्या खोलीत खिडक्यांना वाळ्याचे पडदे लावून घेत असत उन्हाळ्यात. दुपारच्या झोपेआधी त्यापडद्यांवरपाणी मारले जाई. अहाहा! काय मस्त सुगंध सगळ्या घरभर दरवळायला लागायचा! कधी कधी आजोबांच्या त्या खोलीतझोपायला मिळे.अशी गाढ आणी मस्त झोप लागायचे म्हणून सांगू. पूर्ण खोलीत अंधार झालेला. वाळ्याचा तो सुगंध आणी वर पंखा.
खरच, हरवले हो ते दिवस.
असो. हा सगळा लेखन प्रपंच एवढ्या साठी की उन्हाळा सुरू झाला आहे आणि मी विचार करतोय की ह्या उन्हाळ्यात वाळ्याचे पडदेआणायचे. पुण्यात खूप शोधले पण कुठेच मिळाले नाही. तुमच्यापैकी कुणाला माहीत आहे का पुण्यात वाळ्याचे पडदे कुठे मिळतील?असल्यास कृपया सांगावे.
वाचने
9489
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलियुग हो, घोर
पोफळीची बाग म्हणजे एयर कंडीशन
In reply to कलियुग हो, घोर by यकु
पुण्यात बऱ्याच ठिकाणी
धन्यवाद! या वीकेन्ड्ला नक्की
In reply to पुण्यात बऱ्याच ठिकाणी by किचेन
वाळ्याचे पडदे
हो. तिथे मिळतील पण फसवणूक होऊ
In reply to वाळ्याचे पडदे by प्राध्यापक
तुळशी बागेत चौकशी केली होती
In reply to हो. तिथे मिळतील पण फसवणूक होऊ by रेवती
आम्ही दुसर्याच वर्षी फेकून दिले ते पडदे..
दरवर्षी नविन घेतेलेले बरे.
In reply to आम्ही दुसर्याच वर्षी फेकून दिले ते पडदे.. by योगप्रभू
+१
In reply to दरवर्षी नविन घेतेलेले बरे. by पक्या
निषेध
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
तुम्ही काय बाब्बा राजकुमार...
In reply to +१ by परिकथेतील राजकुमार
एक शन्का आहे. इथे कुणीतरी
अन्तु शेठ
In reply to एक शन्का आहे. इथे कुणीतरी by अन्तु बर्वा
परा
In reply to अन्तु शेठ by परिकथेतील राजकुमार
येन्नी टैम !
In reply to परा by अन्तु बर्वा
हम्म्म
In reply to येन्नी टैम ! by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =))
In reply to हम्म्म by मी-सौरभ
बीअरच काय एवढं?
In reply to =)) =)) =)) =)) by परिकथेतील राजकुमार
अरेरे!
In reply to बीअरच काय एवढं? by मी-सौरभ
कूलर घेताय?
उगा भ्या दावू नगसा...
In reply to कूलर घेताय? by सर्वसाक्षी
पहिला प्रतिसाद मान्य. दुसरा
विजुभाऊ
In reply to पहिला प्रतिसाद मान्य. दुसरा by विजुभाऊ
वाळ्याचे पडदे बदलता बदलता
च्यामारी मला आधी वाटलं माझा