जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
बसू कसा पंक्तीत तुमच्या, बदनाम अस्तित्व माझे
निसर्गाच्या चक्रात अडकले सूर्य,चंद्र,तारे
भावनांच्या बाजारात, बंदिवान अस्तित्व माझे
घायाळ नजर शोधती, ओळखीच्या खानाखुना
आसवांच्या गावात, गुमनाम अस्तित्व माझे
माणसांच्या कल्लोळात हरविले मनाचे स्वैर बंध
भासांच्या ताटव्यात, सुनसान अस्तित्व माझे
सुगंधाच्या मायाजाळात अडकली फ़ुलपाखरे
झुगारले नभाला असे, बेगुमान अस्तित्व माझे
रात्रीस, सांजवेळी साद घालतो जख्मी सूर्य
झाकोळले अंधारात, दीपमान अस्तित्व माझे
छप्परविरहीत घरट्यात उभ्या असंख्य भिंती
नभांकणात विखुरले, बेभान अस्तित्व माझे
स्वरविरहीत शब्दांचे उठते निशब्द काहूर
विचारांच्या भोवर्यात अंतर्धान अस्तित्व माझे
-------- शब्दमेघ
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर कविता रे. जीवणाच्या
+१
In reply to सुंदर कविता रे. जीवणाच्या by प्रचेतस
शुद्धलेखना बद्दल दिलगिरी
In reply to सुंदर कविता रे. जीवणाच्या by प्रचेतस
याचे रश्य
In reply to शुद्धलेखना बद्दल दिलगिरी by गणेशा
असा हवा मथळा
In reply to शुद्धलेखना बद्दल दिलगिरी by गणेशा
वल्ली मित्रा काव्य-विभागाच्या
In reply to शुद्धलेखना बद्दल दिलगिरी by गणेशा
आपला वल्ली
In reply to सुंदर कविता रे. जीवणाच्या by प्रचेतस
बुल्स आय चौराकाका. जेवणाच्या
In reply to आपला वल्ली by चौकटराजा
कवितेला आपला सलामच आहे... पण
गणेशा
किंवा मग घायाळ नजरा शीधती असे
In reply to गणेशा by चौकटराजा
तेव्डी टंकी
In reply to किंवा मग घायाळ नजरा शीधती असे by प्रचेतस
तेव्डी टंकी गणेशा खिशात घ्या
In reply to तेव्डी टंकी by चौकटराजा
राजाजी , निसर्गाच्या चक्रात
In reply to गणेशा by चौकटराजा
नभांकणात बरोबर आहे, नभांगणात
In reply to राजाजी , निसर्गाच्या चक्रात by गणेशा
गणेशा तू वकील हायस का काय ?
भापो..पुलेशु
जे न देखे रवि, ते देखे