Skip to main content

" स्वप्नामधली जमाडीजंमत "

लेखक विदेश यांनी रविवार, 25/03/2012 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
कावळा करतो कुहू कुहू कोकिळा करते काव काव फोडते मांजर डरकाळी वाघोबा करतो म्याव म्याव पळे सर सर सर हत्ती निवांत चाले हळू खार ती कोल्होबा चिडीचूप बसतो ससोबा गुरगुरगुर करतो आरोळी उंदीरमामाची ती वनराजाला वाटे भीती माकड चाले जमिनीवर कासवाची उडी झाडावर आई छान सांगते गंमत बंडू ऐके पेंगत पेंगत रंगुनी जाई बघत बघत स्वप्नामधली जमाडीजंमत
लेखनविषय:

वाचने 1206
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

स्वप्नात येतो डोळ्यास गंध स्वप्नात येतो श्वासास रंग स्वप्नात आकाशी रंग हिरवा स्वप्नी पंचमासह " मारवा" तीन स्वरानी बनतो स्वप्नात राग स्वप्नात तिर्‍हाईत घेतो भाग स्वप्नात वारा घाल्तो पैंजण स्वप्नात जावई देतो आंदण स्वप्नात हिवाळ्यात नाचतो मोर स्वप्नात ठाण्यावर जातो चोर स्व्प्नात कुणाचेही येणे जाणे सत्याचे नस्ते कुणा देणे घेणे आम्ची ही किंचित कविता हीच आपल्या कवितेला दाद !