नुकताच एक लेख वाचनात आला...अर्थात "मिसळ-पाव" वर...
जमिन, घर आणि मनस्ताप....
तो लेख आणि त्याच्यावर आलेल्या प्रितिक्रिया वाचुन,
मी पण जमिन घेण्यापुर्वी खालिल गोष्टीन्ची तयारी आधी करावी असे म्हणतो...
१. शस्त्र आणि परवाना घेणे .....(आधी शस्त्र आणि मग परवाना घ्यावा म्हण्तो...सध्या तरी वारे असेच वाहत आहे)
२. आधी घर बान्धावे आणि मग परवानगी काढावी असा "आदर्श" पहिल्यापासुनच आहे....
३. रोज दारु पिवुन गावात धुमाकुळ घालावा...
४. नेपाळ मधुन २/३ गुरखे आणावेत....(नुसतेच की सहकुटुम्ब हा प्रश्न बायकोच्या हाती / तोन्डी आहे.....मी सहकुटुम्ब म्हणत आहे..हा मुद्दा काढला तर तिने पाठित गुद्दा घातला आणि माहेरी पळाली)
५. १ भैय्या ,१ बिहारी आणि २/४ तामिळ पैलवान आणुन आणि त्यान्च्या ताब्यात एखादी मारुती किन्वा एखादी रिक्षा देवुन रात्रभर लाउड स्पीकर लावुन १ महिना गावभर फिरवावी....शक्यतो निवडणुकीच्या काळात आणि त्यावेळी गावात जो पक्ष असेल त्याच्या नावाने....
६. घरात ५/६ डॉबरमन, २/३ अल्सेशीयन, २/३ बॉक्सर आणि २ हत्ती ,२ घोडे,२ उन्ट ठेवावेत...(सध्या ते बिचारे बुध्धिबळच्या मर्यादित जागेतच फिरुन कन्टाळले आहेत्..असे परवा विजीर म्हणत होता..)
७. जमले तर तोफा घरी आणाव्यात असे वाटत आहे...तर बायको "हम" सिनेमा बघितल्या पासुन रणगाडे आणा म्हणुन हट्ट धरुन बसली आहे....तो सिनेमा बघितल्या पासुन तिला रणगाडे हे बाजारात किरकोळ आणि घावुक भावात मिळतात असा समज झाला आहे...मी आपला इन्ग्रजी सिनेमा बघितल्या पासुन एखादे विमानच घ्यावे म्हणतो....सध्या हा वाद युनो कडे गेला आहे....काश्मिर प्रश्न सोडवला की लगेच ते हा प्रश्न सोडवणार आहेत्...त्यामुळे हा प्रश्न(म्हण्जे "रणगाडे" की "विमान" हा प्रश्न्...काश्मीर नाही..) नक्की कधी सुटेल ह्यावर बरेच ज्योतिशी आपले पोट भरत आहेत...बायकोचा हात बराच सढळ असल्याने आणि वाद्-विवादात स्त्रियाच जिन्कतात ह्याला "रामायण" कालापासुन ऐतिहासिक परम्पपरा असल्याने तिच जिन्केल असे वाटते...
८. एखादा "तीर्-कमठा" (तोच तो "रॅम्बो" सिनेमा सारखा) जवळ असावा म्हण्तो...
९. जेम्स बॉन्ड कडुन सोनेरी पिस्तुल, अद्रुश्य कार, स्फोटक पेन आणि क्ष्-किरण वाला चश्मा मागवुन ठेवला आहे...(पैकी क्ष्-किरण वाला चश्मा बायकोने मी "मिसळ्-पावचा" सभासद झाल्यामुळे लपवुन ठेवला आहे...उगिच बाल-मनावर विपरित परिणाम नको असे तिचे प्रामाणिक मत आहे...)
१०. मनाला खम्बिर बनवण्यासाठी "जयन्त काकान्चे" दुसर्या महायुध्धावरील लेख वाचत आहे....
हा लेख म्हण्जे असाच एक टाइम-पास आहे..हे सगळे माझे मनाचे खेळ असुन काही साम्य जर ह्या देशाबाबत आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा....अजुन काही गोष्टी सुचत असल्या तर जरुर सान्गा...टोपली आणि मत पेटी जवळच ठेवली आहे.....
वाचने
4798
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
ग्रा.पं.?
In reply to =)) by पैसा
अरे पण 'अमेरिकन अध्यक्ष' या
In reply to ग्रा.पं.? by अन्या दातार
हा...हा..हा...
In reply to ग्रा.पं.? by अन्या दातार
गावच विकत घ्या मग.
गावच विकत घ्या मग.
बायकोला फारच घाबरता कि कायं ?
हो बाबा आपण खुप घाबरतो....
In reply to बायकोला फारच घाबरता कि कायं ? by रघु सावंत
उगाच
+१
In reply to उगाच by इष्टुर फाकडा
असेच म्हणते...
In reply to +१ by मितभाषी
+१ असंच म्हणतो..
In reply to असेच म्हणते... by निवेदिता-ताई
यापैकी काहीच न जमल्यास
जमेल हो!!!!!
In reply to यापैकी काहीच न जमल्यास by डावखुरा
एक राहिलं -
या सगळ्यापेक्षा...
बरोबर आहे....
In reply to या सगळ्यापेक्षा... by मी-सौरभ
??