Skip to main content

गावी जमिन घेण्यापुर्वी आवश्यक गोष्टी ....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 25/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच एक लेख वाचनात आला...अर्थात "मिसळ-पाव" वर... जमिन, घर आणि मनस्ताप.... तो लेख आणि त्याच्यावर आलेल्या प्रितिक्रिया वाचुन, मी पण जमिन घेण्यापुर्वी खालिल गोष्टीन्ची तयारी आधी करावी असे म्हणतो... १. शस्त्र आणि परवाना घेणे .....(आधी शस्त्र आणि मग परवाना घ्यावा म्हण्तो...सध्या तरी वारे असेच वाहत आहे) २. आधी घर बान्धावे आणि मग परवानगी काढावी असा "आदर्श" पहिल्यापासुनच आहे.... ३. रोज दारु पिवुन गावात धुमाकुळ घालावा... ४. नेपाळ मधुन २/३ गुरखे आणावेत....(नुसतेच की सहकुटुम्ब हा प्रश्न बायकोच्या हाती / तोन्डी आहे.....मी सहकुटुम्ब म्हणत आहे..हा मुद्दा काढला तर तिने पाठित गुद्दा घातला आणि माहेरी पळाली) ५. १ भैय्या ,१ बिहारी आणि २/४ तामिळ पैलवान आणुन आणि त्यान्च्या ताब्यात एखादी मारुती किन्वा एखादी रिक्षा देवुन रात्रभर लाउड स्पीकर लावुन १ महिना गावभर फिरवावी....शक्यतो निवडणुकीच्या काळात आणि त्यावेळी गावात जो पक्ष असेल त्याच्या नावाने.... ६. घरात ५/६ डॉबरमन, २/३ अल्सेशीयन, २/३ बॉक्सर आणि २ हत्ती ,२ घोडे,२ उन्ट ठेवावेत...(सध्या ते बिचारे बुध्धिबळच्या मर्यादित जागेतच फिरुन कन्टाळले आहेत्..असे परवा विजीर म्हणत होता..) ७. जमले तर तोफा घरी आणाव्यात असे वाटत आहे...तर बायको "हम" सिनेमा बघितल्या पासुन रणगाडे आणा म्हणुन हट्ट धरुन बसली आहे....तो सिनेमा बघितल्या पासुन तिला रणगाडे हे बाजारात किरकोळ आणि घावुक भावात मिळतात असा समज झाला आहे...मी आपला इन्ग्रजी सिनेमा बघितल्या पासुन एखादे विमानच घ्यावे म्हणतो....सध्या हा वाद युनो कडे गेला आहे....काश्मिर प्रश्न सोडवला की लगेच ते हा प्रश्न सोडवणार आहेत्...त्यामुळे हा प्रश्न(म्हण्जे "रणगाडे" की "विमान" हा प्रश्न्...काश्मीर नाही..) नक्की कधी सुटेल ह्यावर बरेच ज्योतिशी आपले पोट भरत आहेत...बायकोचा हात बराच सढळ असल्याने आणि वाद्-विवादात स्त्रियाच जिन्कतात ह्याला "रामायण" कालापासुन ऐतिहासिक परम्पपरा असल्याने तिच जिन्केल असे वाटते... ८. एखादा "तीर्-कमठा" (तोच तो "रॅम्बो" सिनेमा सारखा) जवळ असावा म्हण्तो... ९. जेम्स बॉन्ड कडुन सोनेरी पिस्तुल, अद्रुश्य कार, स्फोटक पेन आणि क्ष्-किरण वाला चश्मा मागवुन ठेवला आहे...(पैकी क्ष्-किरण वाला चश्मा बायकोने मी "मिसळ्-पावचा" सभासद झाल्यामुळे लपवुन ठेवला आहे...उगिच बाल-मनावर विपरित परिणाम नको असे तिचे प्रामाणिक मत आहे...) १०. मनाला खम्बिर बनवण्यासाठी "जयन्त काकान्चे" दुसर्‍या महायुध्धावरील लेख वाचत आहे.... हा लेख म्हण्जे असाच एक टाइम-पास आहे..हे सगळे माझे मनाचे खेळ असुन काही साम्य जर ह्या देशाबाबत आढळले तर तो निव्वळ योगायोग समजावा....अजुन काही गोष्टी सुचत असल्या तर जरुर सान्गा...टोपली आणि मत पेटी जवळच ठेवली आहे.....

वाचने 4798
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

एवढं सगळं पोसता येत असेल तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाच उभे रहा ना!

In reply to by पैसा

काहीतरीच! रणगाडे, विमानं, जेम्स बाँडकडच्या काय काय वस्तू जर मिळत असतील तर सरळ अमेरिकेच्या अध्यक्षपदाचीच निवडणूक लढवावी ना. ग्रा.पं., पं.स., विधानसभा, लोकसभा वगैरे असल्या किरकोळीत कशाला अडकायचे??

In reply to by अन्या दातार

अमेरिकेची निवडणुक खुप सोपी आहे... त्यापेक्षा ग्रा. प. निवडणुक खुप कठिण आहे.... गरिब मतदार खुप "मोजुन मापुन" मतदान करतात हो !!!!!! असे ऐकुन आहे....

एवढे शक्य आहे तर मग पूर्ण गाव विकत घ्या. त्याचे शिषण "सात-बारा-मती विश्वविध्यालयात" मिळते. को़कणात असलेले "नारायण कॉलेज" ही ह्याच विश्व-विध्यालयात येते. मेधा पाटकर , विश्वंभर चौधरी वगैरे प्रतिगामी मंडळी तुम्हाला विरोध करतील , पण तो प्रसिध्धीचा भाग मानुन गप्प बसा.

एवढे शक्य आहे तर मग पूर्ण गाव विकत घ्या. त्याचे शिषण "सात-बारा-मती विश्वविध्यालयात" मिळते. को़कणात असलेले "नारायण कॉलेज" ही ह्याच विश्व-विध्यालयात येते. मेधा पाटकर , विश्वंभर चौधरी वगैरे प्रतिगामी मंडळी तुम्हाला विरोध करतील , पण तो प्रसिध्धीचा भाग मानुन गप्प बसा.

In reply to by रघु सावंत

"बॉसला आणि बायकोला घाबरणे" हा माझा नोकरीसि ध्द आणि लग्नसि ध्द अधिकार आहे... आणि कोण घाबरत नाही... सगळेच पुरुष घाबरतात्...फक्त आम्ही सरळ कबुल तरी करतो.... ती पण झुरळ आणि उन्दिराला व गेला बाजार बेडुकाला घाबरते....(हे प्राणी निर्माण करुन देवाने फार उपकार केले आहेत हो !!!!! आपल्या पुरुष जातीवर्...केवळ हे प्राणी घरात येवु नयेत आणि आलेच तर त्यान्ना पळवुन लावायला एक हक्काचे माणुस घरात असावा म्हणुनच हिने माझ्याशी लग्न केले असे तिने मला परवा भान्गेच्या नशेत सान्गितले...ती पण आजकाल लेख वाचत असावी..नाहीतर जिला फक्त डोक्यावरचा भान्ग माहित तिला डोके बिघडवणार्‍या भान्गेची महती कशी काय कळली असती?... (इतर भगिन्नीची माफी मागुन्.....ज्या बायका ह्या प्राण्यान्ना घाबरत नाहीत त्या एक तर डॉक्टर होतात किन्वा लग्नच करत नाहीत असा माझा तर्क आहे....त्यामुळे हा तर्क केराच्या टोपलीत टाकावा)

बळंच कर जिलबी !

In reply to by इष्टुर फाकडा

असेच म्हणतो.

In reply to by डावखुरा

अशक्य अशा गोष्टीन पैकी लग्न केलेच आहे घर पण बान्धावे म्हणतो..... तशी पण वर जाण्यापुर्वी "घर घर" लागणारच आहे मग घर--घर असे म्हणत तरी जातो...

सगळं करायच्या आधी मिपा.वर धागा टाका "गावी जमीन घ्यायची कारणे" किंवा असंच काही. म्हंजे लोक भरभरून "गावी जमीन घेण्याची कारणे" यावर प्रतिसाद देतील. त्यात चित्रमय नि रक्ती तपशील (ग्राफिक & ब्लडी डीटेल्स) इतके असतील की तुमची ती बायको गावी जमीन घ्यायच्या प्रस्तावावर व्हेटो टाकेल. मग पुढचे शस्त्रपरवाना ते रणगाडे - मार्गे - दु. महायुद्धावरचे लेख इ.इ. गुंतवणुकीची गरजच राहणार नाही. कसं!?!?! (बाकी सह-गुरख्याचा पर्याय मी माझ्या अखत्यारीत विचारार्थ घेतो हो. धन्यवाद.) जबऱ्योऽऽऽ!

पश्चिम महाराष्ट्रात असाल तर आडनाव बदलून 'पवार' करा अन् एक नंबर प्लेट वर घड्याळाच चिन्ह असलेली पांढरी गाडी घेऊन गावात फिरा ;)

In reply to by मी-सौरभ

त्याच बरोबर मी "यादव" आडनाव लावायचे ठरवत आहे..... म्हणजे मी महाराष्ट्र ते पार हिमाचल प्रदेशात सन्चार करायला मोकळा....

प्रतिसाद चुकून धागा म्हणून पडला का ?