सांज साजरी
सखी लाजरी,
आठव बोचरी
रुतली पुन्हा...
पेटलेले रान
उन्हाला तहान
सुन्न वहीचे पान,
मिटले पुन्हा...
दमलेला श्वास
श्रमलेली आस,
अवघडले त्रास
दुर्मुखले पुन्हा...
तू असण्याचे भास
मनाचे खोटे कयास,
निराशेने खास
गाठले पुन्हा...
आशेनेच फसवणे
जगासवे हेलकावणे,
मिळवून गमावणे
घडले पुन्हा...
शुभ्र तेवती वात
काळावरही मात,
एक नवी सुरुवात
भरारले.... पुन्हा!!
-बागेश्री
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1501
वाचनखूण साठवा
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...! झकास...! मला तर ही
छान!
खासच!
कविता आवडली.
दोन दोन शब्द्..छानच.
सगळ्यांचे आभार!! अपर्णा ह्या
वेणूजी , कविता आवडली.
चान चान...!
धन्यवाद!