Skip to main content

मैफिल नववर्षाची

लेखक जयवी यांनी शुक्रवार, 23/03/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आसमंती हा बहर बसंती सरे पानगळ शिशिराची कोकील कंठी सुरु होतसे मैफिल ही नव वर्षाची नवे सूर अन् नवे तराणे नव्या दिशा, उन्मेष नवा नवीन स्वप्ने, नवी भरारी नवी दृष्टी अन् जोश नवा नवसूर्याचे तेज लेऊनी सृष्टी गाई गीत नवे उधळण होता सप्तसुरांची इंद्रधनुवर रंग नवे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा !!
लेखनविषय:

वाचने 2258
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

इतकं लयीत आहे कि वाचताना आपोआप गाणंच झालं... सुरेख ! मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !

नव्या वर्षाच्या शुभेच्छा!

जयवी, कमी शव्दाच्या ओळी घेऊन काव्य करणे भलतेच अवघड . ते धनू आपण चांगलेच पेलले आहे. काव्य हा कमीतकमी शब्दांत जास्त काही सांगून जाणारा म्हणूनच थेट काळजला गवसणी घालणारा. या कवितेत आपली आशा, शुभेच्छा सारे आत कुठेतरी येऊन भि़डले. आता माफी एक कडवे माझे. नवसूर्याचे तेज लेऊनी सृष्टी गाई गीत नवे उधळण होता सप्तसुरांची इंद्रधनुवर रंग नवे नवसूर्याचे तेज लेऊनी सृष्टी गाई गीत नवे, उधळण होता सप्तरंगी ती, अस्मानी ते रंग नवे . ( चैत्रात आकाशात इंद्रधनु येणे अशक्य नाही पण शक्यता कमी यास्तव हा बदलाचा यत्न )

In reply to by प्यारे१

अच्छा........असं पण आहे का...... कमाल आहे !! कोणीतरी एसेमेस पाठवला म्हणजे त्यांना हे आवडलं... ह्यात आनंद मानायला हवा. पण हे कवीच्या नावाशिवाय पाठवणं कसं थांबवायचं... !!!! कॉपीराईट म्हणजे काय करायचं ? अशानं कुठल्याही साईटवर लिहिणंच बंद करावं लागेल.