✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

रांगोळ्या

प
पैसा यांनी
Sat, 02/18/2012 - 23:07  ·  लेख
लेख
amit हे काय असावं? पोर्ट्रेट? की फोटो? यातलं काही नाही. ही रांगोळी आहे. माझ्या ऑफिसातला एक कलाकार नरेश आणि त्याचा जुळा भाऊ गणेश माणगावकर यांनी काढलेली. नरेश आणि गणेश हे गोव्यातल्या एका लहानशा साखळी नावाच्या गावातले जुळे भाऊ. लहान असताना दोघांनाही चित्रकला आवडायची. मग दिवाळीतली रांगोळी प्रदर्शनं पाहून हे दोघेही रांगोळ्या काढायला लागले. ८वी/९वीत असताना त्यांनी स्वतंत्रपणे शाळेतल्या रांगोळी प्रदर्शनात रांगोळी काढली. ती लोकांना खूप आवडली. मग अशा मोठ्या रांगोळ्या काढणं हा दरवर्षीचा उद्योग झाला. म्हापसा, वास्को इथल्या प्रदर्शनात ते रांगोळ्या काढायला लागले. pic1 pic2 pic3 mandakini shilp sachin hakikat amit1 gabbar kid काही प्रदर्शनातून बक्षीसे मिळत असत तर काहीत फक्त शाबासक्या. मग हळूहळू दोघेही माणगावकर बंधू नोकरीनिमित्त पणजी इथे राहू लागले. कला अकादमीचे सदस्य झाले. जेव्हा आंतर्राष्ट्रीय फिल्म फिस्टिव्हल्सची सुरुवात झाली तेव्हा याना उद्घाटनाच्या ठिकाणी कला अकादमीत रांगोळी काढायला बोलावलं गेलं. उद्घाटकाची छबी रांगोळीतून चितारायची पद्धत या दोघानी सुरू केली. yash ben अनेकदा अशा प्रमु़ख पाहुण्याकडून शाबासकी मिळते, पण नेहमीच सगळं सुरळीत होत नाही. ज्याना रांगोळी काढायची संधी मिळत नाही , त्यांनी प्रमुख पाहुण्याला रांगोळी न दाखवणे, कधी पाहुणे यायच्या आधीच गर्दी झाली, आणि पायानी रांगोळी पुसली गेली अशा सबबी सांगून रांगोळी पुसून टाकणे असेही प्रकार केले, पण नरेश आणि गणेश यानी नाउमेद न होता आपलं काम चालूच ठेवलं. fardeen Vahida या दोघांनी काढलेल्या सुरुवातीच्या रांगोळ्या सुंदर होत्याच, पण नंतर नंतर कमालीचं परफेक्शन येत गेलं. हल्लीच लता दीदी एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या, तेव्हा या दोघांनी काढलेली ही रांगोळी. lata मा. दीनानाथांचं चित्र दीदींना इतकं आवडलं की त्यानी हातात असलेली गुलाबाची फुलं त्या चित्राच्या पायथ्याशी ठेवली. मग आपल्या चांदीच्या घंटेसारख्या मंजूळ स्वरात या दोघांना शाबासकी दिली. lata2 ती रांगोळी कशी आणि केवढी होती याची कल्पना यावी म्हणून हे. lata3 तरी यातले बरेचसे फोटो मोबाईलवर किंवा जुन्या कार्डावरच्या फोटोवरून डिजिटल कॅमेर्‍याने काढलेले आहेत, त्यामुळे या रांगोळ्यांची प्रत्यक्ष कल्पना येणं जरा कठीण आहे. आणखी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. अनिल काकोडकरांची ही रांगोळी. anil आपल्या हातात केवढी जादू आहे याचा अजिबात गर्व नसलेले हे दोघे भाऊ, त्यातला नरेश माझ्या ऑफिसात काम करतो. त्यांच्या या कलाकृती सर्वात आधी प्रत्यक्ष पहायला मिळतात हे मी माझं नशीबच समजते. अमिताभ बच्चन यांच्या एका वाढदिवसाला प्रतीक्षा बंगल्यात एका कॉमन मैत्रिणीने या दोघाना रांगोळी काढण्यासाठी नेलं. तिथे सगळ्यात पहिल्या फोटोतली रांगोळी या दोघांनी काढली. अमिताभ यानी रांगोळीच्या भोवती काही संरक्षण, काच यांची व्यवस्था करून ती रांगोळी जपून ठेवली, ती निदान काही दिवस तरी सुरक्षित राहिली असेल. पण एरवी अत्यंत क्षणभंगूर अशी ही रांगोळीची कला या दोघांना नक्की कोणती प्रेरणा देते देवजाणे!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संस्कृती
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
17815 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

अप्रतिम!! याच्याशिवाय दुसरा

किसन शिंदे
Tue, 02/21/2012 - 17:21 नवीन
अप्रतिम!! याच्याशिवाय दुसरा शब्दच नाही.
  • Log in or register to post comments

अप्रतिम. रांगोळीच्या

शिल्पा ब
गुरुवार, 02/23/2012 - 13:03 नवीन
अप्रतिम. रांगोळीच्या सहाय्याने इतकं भावदर्शन सोपी गोष्ट नाही. सुंदर...
  • Log in or register to post comments

लय भारी!!झक्कास्स्!!!या शिवाय

एक रसिक जीवनयात्री
गुरुवार, 02/23/2012 - 17:31 नवीन
लय भारी!!झक्कास्स्!!!या शिवाय शब्दच नाही...मानगावकर बन्धून्च्या कलेला सलाम व शुभेछा नक्की कलवा,ही विनन्ती.लिहिल्याबद्दल तुम्हास धन्यवाद !
  • Log in or register to post comments

जबरदस्त

श्रीयुत संतोष जोशी
Sat, 02/25/2012 - 08:04 नवीन
आहे. त्यांच्या कलेला सलाम. ठाण्यामधे श्री.त्रिंबक जोशी आहेत ते ही अशीच सुंदर रांगोळी पोर्ट्रेट काढतात.
  • Log in or register to post comments

अशक्य...

चिगो
Sun, 02/26/2012 - 13:44 नवीन
सगळ्याच रांगोळ्या अतिसुंदर आहेत.. पण खजुराहो शिल्प, गब्बर, लतादिदी म्हणजे कहर आहेत... सलाम सलाम.. त्रिवार सलाम.. धन्यवाद पैसाताई..
  • Log in or register to post comments

मानसीचा चित्रकार तो

कान्होबा
Fri, 03/23/2012 - 12:50 नवीन
अप्रतिम .सुंदर. विलोभनीय पैसाताई या कलाकारांबद्दल माहिती दिल्याबद्द्ल मनापासुन धन्यावाद. त्यांचा मोबाईल नंबर आपण देऊ शकाल का?कारण मी सुद्धा २-३ वर्षापासुन रांगोळी काढायला सुरवात केली आहे.अजुन शिकतो आहे.त्याचबरोबर प्रदर्शनातहि काढण्याचा प्रयत्ना करतो. यातील अभिनव,खजुराहो,सचिन, तोफखाना,गब्बर,लहान मुलगा,लतादिदि विषेश आवड्ले.
  • Log in or register to post comments

.

वपाडाव
Fri, 03/23/2012 - 13:33 नवीन
.
  • Log in or register to post comments

.

वपाडाव
Fri, 03/23/2012 - 13:38 नवीन
.
  • Log in or register to post comments

क्षणभंगुर रचनाच.. पण अक्षरशः

सांजसंध्या
Fri, 03/23/2012 - 19:49 नवीन
क्षणभंगुर रचनाच.. पण अक्षरशः जादू आहे . या दोघांच्याही कलेला माझा सा. नमस्कार.. ओरिसात एक असेच कलाकार आहेत ना ? वाळूची शिल्पं बनवणारे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा