वरदान
लेखनप्रकार
गेल्यावेळी घरी गेलो तेव्हा लहान भावाला मोबाईलवर मित्रांशी संवाद साधताना बघून खूप खूप आनंद झाला. तोपर्यंत मित्रांना केवळ एसएमएस करूनच समाधान मानवं लागण्यामूळे खट्टू होणारा तो आणि आता ३जी च्या माध्यमातून मित्रांशी गप्पा मारणारा, तो हाच काय यावर सांगून सुद्धा विश्वास बसला नसता.
आधीच मर्यादीत शब्दसाठा त्यातच भाषेचे पूर्ण ज्ञान नसल्याने होणार्या चूका यामूळे कित्तेक वेळातर मलासूद्धा त्याचे मॅसेजेस कळत नसत. मग तो काय सांगायचा प्रयत्न करतो आहे हे आशयावरून समजावे लागे. आई-बाबांशी मी फोनवर बोलताना तो तीथे उभा राही व केवळ चेहर्याच्या हावभावांवरून काय बोलणं सुरू आहे याचा अंदाज लावी. मॅसेजेस करून करून बोटं दुखायला लागलीत किंवा किपअॅडच खराब झालं की तो चिडायचा पण पर्याय नव्हता.
पण म्हणतात ना की काही जणांना शुल्लक वाटणार्या गोष्टी कित्येकांचे आयुष्य बदलू शकतात. ३जीचे सुद्धा असेच झाले. रोज बाजारात येणार्या नवनविन तंत्रज्ञानांप्रमाणे हेही एक त्यात नवल ते काय? असा विचार करून सुरवातीला मी याकडे दूर्लक्ष केले. उगाच कशाला महागडे चोचले?
यथावकाश महागडं वाटणारं ३जी थोडफार स्वस्त झालं म्हणा किंवा आवक्यात आलं. त्याबरोबरच भावाचा नविन मोबाइल घेऊन देण्यासाठी तगादा लागला. आणि तोही साधा नाही तर ३जी ची सुविधा असलेला व दोन्ही बाजुनी कॅमेरा असणारा. मी त्याला विचारलं 'तू रे काय करणार याचं?' 'माझ्या सगळ्या मित्रांकडे आहेत असेच मोबाइल'-भाऊ 'अरे पण मी बघ किती वर्षांपासून तोच मोबाइल वापरतो आहे'. 'तू घेऊन देणार आहेस का नाही? नाहीतर आईच्या मागे लागतो'. शेवटी नमतं घेऊन मी त्याला हवा असलेला मोबाइल घेउन दिला. नाही म्हटलं तरी मनाचा थोडाफार जळफळाट झालाच आणि त्याला हवं ते घेऊन देणारा मोठा भाऊ असल्याचा हेवा पण वाटला.
पण आता जेव्हा घरी गेलो तेव्हा त्याच्या चेहर्यावरून ओसंडून वाहाणारा आनंद बघून मोबाइलसाठी मोजलेले पैसे म्हणजे अगदीच तुच्छ गोष्ट वाटली. ती एक जाहीरात नाही येत काय 'There are few thing which money can't buy...' अगदी तसलच फिलींग होतं ते.
मी बोलतो आहे माझ्या लहान भावाबद्दल आणि त्याच्या सारख्या कित्तेक मूकबधीर मुलांबद्दल ज्यांना ३जी ने आशेचा भलामोठा किरण दिलेला आहे. आजपर्यंत केवळ इतरांच्या गप्पा 'बघुन' मन मारणारी ही मूलं आता ३जी ची पंख लावून खुशाल स्वछंद भरार्या मारायला शिकत आहेत. आजवर मानवानी शोध लावलेल्या बहुमूल्य आविष्कारांपैकी हा एक या मताचा मी आहे. असे म्हणतात की उपकारकर्त्याचे आभार मानावेत आणि त्याचसाठी हा लेखनप्रपंच. ज्याकोणी या तंत्रज्ञानाचा शोध लावला त्याचं आणि स्वतः तंत्रज्ञानाचं आभार मानावं तेव्हडं कमीच. नाही का?
वाचने
4723
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अप्रतिम... ३जी चा हा खरा
मस्त.. सुंदर लिखाण..
छान अनुभव.. बरं वाटल..
मस्त
मस्त!
वेगळा दृष्टिकोन
व्हॉट अॅन जेम ऑफ अॅन आयडिया
In reply to व्हॉट अॅन जेम ऑफ अॅन आयडिया by ५० फक्त
+१०००००००००० तंत्र ज्ञान असं
मस्त !
सुंदर लिखाण
मस्त लेखन. ३ जी चा हाच खरा
अमृत साहेब , अप्रतिम भारी लेख
अमृत, एक प्रश्न
In reply to अमृत, एक प्रश्न by मिसळपाव
नमस्कार
In reply to नमस्कार by अमृत
पेटली आता!
सुंदर लिखाण.
सुंदर लेख. आणि ३ जीचा हा
सुंदर
In reply to सुंदर by स्मिता.
नमस्कार
ग्रेट!!!
ग्रेट......
भावाच्या डोळ्यातलं समाधान....
मस्त रे भावा ऽऽ!