✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पंढरपुर ला पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?

न
निश यांनी
Wed, 03/21/2012 - 15:53  ·  लेख
लेख
अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ? दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत? अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ? असल्यास त्यांची मुर्ति पंढरपूरला का नाही आहे ? तिथे मी खुप जणाना विचारल पण प्रत्येळ वेळी वेगवेगळी ऊत्तर मिळाली. म्हणुन हा धागा काढला आहे. उत्तराची वाट बघतो आहे. अजुन एक : चंद्रभागा नदीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. हे बघुन अतिशय वाईट वाटल. मन काही वेळ खुप उदास झाल होत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
57831 वाचन

💬 प्रतिसाद (71)

प्रतिक्रिया

कॉलीग पंढरपुरचा

चिंतामणी
Wed, 03/21/2012 - 15:57 नवीन
डॉन
  • Log in or register to post comments

तुमच्या लग्नाला किती वर्षं

गवि
Wed, 03/21/2012 - 16:26 नवीन
तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली?
  • Log in or register to post comments

गवि साहेब, तुम्हि तर एतिहासा पासुन

निश
Wed, 03/21/2012 - 16:43 नवीन
गवि साहेब, तुम्हि तर इतिहासा पासुन भविष्य काळा मध्ये विहार करणारे सरस्वतीचा वरदह्स्त असणारे आहात. मग तुम्हाला लग्न होउन किती वर्षं झाली हे माहीत असेलच. असो पण वरील धाग्याच आपल्याला उत्तर माहीत असल्यास जरुर सांगा. आपण जर ह्या देवस्थळांबद्दल लेख माला लिहिलीत तर वाचायला आवडेल मला. तुमचे लेख मस्त असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

निश साहेब

सूड
Wed, 03/21/2012 - 16:46 नवीन
त्यांच्या प्रश्नातच उत्तर आहे, शोधा म्हणजे सापडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

मी काय म्हणतो,

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/21/2012 - 17:00 नवीन
आपण कशाला उगाच लोकाच्या भानगडीत नाक खुपसायचे ?
  • Log in or register to post comments

अगदी बरोबर हो, पण ही तर

५० फक्त
Wed, 03/21/2012 - 17:03 नवीन
अगदी बरोबर हो, पण ही तर देवांची भानगड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हम्म्म

परिकथेतील राजकुमार
Wed, 03/21/2012 - 17:17 नवीन
अगदी बरोबर हो, पण ही तर देवांची भानगड आहे.
अशाच देवाच्या भानगडीत पडून हनुमानाचे काय झाले हे बहूदा धागा लेखक विसरले असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पण म्हणुनच हनुमानाला देवांकडुन अमोघ वर मिळाले हे ही आपण विसरता

निश
Wed, 03/21/2012 - 17:31 नवीन
पण म्हणुनच हनुमाना ला देवांकडुन अमोघ वर मिळाले हे ही आपण विसरता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

अरे तसं नाही हो ते, ते

५० फक्त
Wed, 03/21/2012 - 18:33 नवीन
अरे तसं नाही हो ते, ते ज्यांच्या भानगडीत पडले ती माणसंच होती, हनुमान भानगडीत पडले आणि मग त्यांना देवत्व आलं. पण तरी सुद्धा कुणाच्या भानगडीत पडु नये हे मात्र खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

'देवांची भानगड' ??? अरे काय

गणपा
Wed, 03/21/2012 - 20:41 नवीन
'देवांची भानगड' ??? अरे काय चालवलं काय आहे? आम्ही हिंदु सहिष्णु म्हणुन तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोकं आमच्या देवांबद्दल काय वाट्टेल ते बरगळता. जर धमक असेल तर इतर धर्मियांच्या भावनेला हात लावून दाखवा. (संतप्त) गणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कोणाला लावू?

Nile
गुरुवार, 03/22/2012 - 03:28 नवीन
जर धमक असेल तर इतर धर्मियांच्या भावनेला हात लावून दाखवा.
तुम्ही फक्त कोणता धर्म ते सांगा, आम्ही हात काय पाय लावून दाखवू. (पण मग नंतर आमचे प्रतिसाद उडवू नका म्हणजे झालं!!) (टंकून ग्रस्त)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

गणपा साहेब, देवांची भानगड तर भानगड

निश
गुरुवार, 03/22/2012 - 13:03 नवीन
गणपा साहेब, देवांची भानगड तर भानगड, उलट आपल्या धर्माच हे महत्त्वाच वैशिष्ट आहे की, आपण देवाला सखा, मित्र मानल आहे. धरला पंढरीचा चोर किंवा देव एक पायान लंगडा ही आणि अशी कीत्येक पद, गाणी, गवळण प्रसिध्द आहेत. तस ही देवाला अहो देवा नाही तर अरे देवा म्हणतोच ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

राईच्या ? की राहीच्या?

स्पंदना
Wed, 03/21/2012 - 17:08 नवीन
राईच्या ? की राहीच्या? रुक्मिणीच दुसर नाव राही ना? दुसरी बायको नसावी पांडुरंगाला.
  • Log in or register to post comments

aparna akshay madam, राहीच्या वल्लभा हेच बरोबर असाव बहुतेक

निश
Wed, 03/21/2012 - 17:14 नवीन
aparna akshay madam, राहीच्या वल्लभा हेच बरोबर असाव बहुतेक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

राडा

विनायक प्रभू
Wed, 03/21/2012 - 17:33 नवीन
आयला तिरुपती ला पण असाच काही तरी राडा आहे. परा म्हणतो त्या प्रमाणे आपण कशाला उगाच लोकांच्या फाटक्यात पाय घालावा?
  • Log in or register to post comments

विनायक प्रभु साहेब, अहो देव हे आपलेच असतात

निश
Wed, 03/21/2012 - 17:35 नवीन
विनायक प्रभु साहेब, अहो देव हे आपलेच असतात. देवा सारखा सखा सार्‍या दुनियेत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

सखा

विनायक प्रभू
Wed, 03/21/2012 - 17:41 नवीन
सखा म्हणजे मित्र. आपण आपल्या मित्राच्या पर्सनल गोष्टीमधे लक्ष घालत नाही. परा ला विचारा. इतक्या दिवसात त्याचे कुठल्या बँकेत(सहकारी की नॅशनाइज्ड) खाते आहेत हे पण विचारले नाही.
  • Log in or register to post comments

हॅ हॅ हॅ

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 10:51 नवीन
परा ला विचारा. इतक्या दिवसात त्याचे कुठल्या बँकेत(सहकारी की नॅशनाइज्ड) खाते आहेत हे पण विचारले नाही.
पोस्टात होते फक्त खाते. ते पण मागच्या ठाणे भेटीत भिकेला लागले. ;) बाकी निश तुम्हाला याचे अगदी योग्य उत्तर हवे असेल तर आमच्या तात्याला विचारा. एका फटक्यात तुमच्या सर्व शंकाचे निरसन होऊन जाईल. तात्या म्हणजे तात्या अभ्यंकर, मिसळपावचे संस्थापक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

याच उत्तर विसूभौ

चौकटराजा
Wed, 03/21/2012 - 18:27 नवीन
निश , याचं उत्तर तुम्हाला विसूभाउ बापट देतील, खात्रीने. मग ते तुम्हीच इथे टाका. ते माझे फेसबुक मित्र आहेत. ते सर्च मधे तुम्हाला सापडतील.
  • Log in or register to post comments

चौकटराजा साहेब , विसुभाउ बापट म्हंजे

निश
Wed, 03/21/2012 - 19:06 नवीन
चौकटराजा साहेब , विसुभाउ बापट म्हंजे कूटुंब रंगलय काव्या त मधले ना. अहो कूटुंब रंगलय काव्यात मी एक वेळा नाही तर तब्बल ८ वेळा बघितल आहे मागे. अतिशय मस्त. खुप म्हंजे खुप सुंदर होत कूटुंब रंगलय काव्यात . आपण स्वता तेच नाही आहात ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

चावट कार्टा

चौकटराजा
गुरुवार, 03/22/2012 - 07:09 नवीन
विसूभौ माझ्यापेक्शा विद्वान, उत्साही व गबदुल आहेत. माझे खरे नांव प्रोफाईल वर पहा मग फेसबूक वर जा तिथे मला शोध , त्यात फ्रेंडलिस्ट मधे गोल गोल विसूभौ चा फोटो दिसेल. आता वात्रट पणा पुरे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

चौकटराजा साहेब, नक्की करतो तस आणी धन्यवाद

निश
Wed, 03/21/2012 - 18:42 नवीन
चौकटराजा साहेब, नक्की करतो तस आणी धन्यवाद
  • Log in or register to post comments

मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा

धन्या
Wed, 03/21/2012 - 18:47 नवीन
मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा काहीशी अशी आहे: एके दिवशी राधा श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेली असताना तेथे रुक्मिणी येते. राधेला कृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणीला राग येतो आणि ती द्वारका सोडून पार अगदी दिंडीरवनात (सध्याचे पंढरपूर) येते. श्रीकृष्ण तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठोपाठ येतात. या दिंडीरवनातच पुंडलिक नावाचा एक आधी उनाड असलेला परंतू नंतर चांगला मार्गाला लागलेला तरूण आपल्या झोपडीत आई-वडीलंचे पाय चेपत बसलेला असतो. कुतुहलाने श्रीकृष्ण झोपडीच्या दाराशी येऊन आत डोकावतात. पुंडलिकाला आवाज देतात. पुंडलिकाला आपल्या आई वडीलांच्या सेवेत खंड पडू दयायचा नसतो म्हणून तो आतून एक वीट बाहेर फेकतो, आणि आपली आई-वडीलांची सेवा पुर्ण होईपर्यंत श्रीकृष्णाला त्या विटेवर उभा राहायला सांगतो. ही कथा "युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा" या ओळीस तसेच पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी एकमेकांपासून दुर असण्यास आधारभूत आहे. ते जाऊद्या, आपण श्रीमद्भगवद्पुराण तसेच महाभारत कथा वाचतो, ऐकतो. त्यामध्ये द्वापारयुग संपत असताना आणि कलीयुग सुरु होत असताना यादवांचे आपापसात घनघोर युद्ध होऊन यादव कुळाचा समुळ नाश होतो असे ऐकतो. (यादवी या शब्दाची उत्पत्ती इथेच आहे). अगदी श्रीकृष्णही व्याधाचा बाण अंगठयाला लागून "निजधामाला" जातात. मग जर श्रीकृष्ण निजधामाला जातात हे खरं मानलं तर श्रीकृष्ण दिंडीरवनात रुक्मिणीच्या शोधात दिंडीरवनात येतात आणि पुंडलिक त्यांना इथेच वीटेवर उभे राहायला सांगतो ही कथा दंतकथा आहे. किंवा पंढरपूर आख्यान खरं मानलं तर श्रीमद्भगवद्पुराण तसेच महाभारतामध्ये असलेली श्रीकृष्ण निजधामाला गेले म्हणून जे लिहिलं आहे ते खोटं आहे. कारण एकाच व्यक्तीच्या जीवनाचे दोन वेगवेगळे शेवट असूच शकत नाहीत. बरोबर ना? जाणकारांकडून याबद्दलची मते वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

धन्या साहेब, खरच धन्यवाद तुमचे दिलेल्या माहिती बद्दल

निश
Wed, 03/21/2012 - 18:54 नवीन
धन्या साहेब, खरच धन्यवाद तुमचे दिलेल्या माहिती बद्दल. हिच माहिती आम्हाला तिथल्या एका दुकानदारान दिली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी माझ्या प्रतिसादात दोन

धन्या
Wed, 03/21/2012 - 19:01 नवीन
मी माझ्या प्रतिसादात दोन परस्परविरोधी गोष्टी लिहिल्या आहेत. माझा अंदाज चुकीचा नसेल तर दुकानदाराने तुम्हाला पुंडलिक कथा सांगितली असेल. मी लिहिलेल्या श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्याच्या मुद्दयाचं काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

हो पुंडलिक कथाच सांगितली

निश
Wed, 03/21/2012 - 19:08 नवीन
हो पुंडलिक कथाच सांगितली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

समोरच्या व्यक्तीच्या

धन्या
Wed, 03/21/2012 - 19:13 नवीन
समोरच्या व्यक्तीच्या अडचणीच्या वाटणार्‍या मुद्दयांना फाटयावर कसं मारावं हे तुमच्याकडून शिकावं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निश

अहो तो देव होता (?) ना?

सेरेपी
Wed, 03/21/2012 - 20:19 नवीन
अहो तो देव होता (?) ना? त्याला पॅरलल युनिवर्सेस तयार करणं कठीण होतं का? काय तुम्ही लोक? देवाधर्माच्या गोष्टींवर कुशंका काढता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तस नाहि धन्या साहेब.

निश
गुरुवार, 03/22/2012 - 10:45 नवीन
तस नाहि धन्या साहेब. खर तर तुमच दुसर म्हणणही बरोबर वाटत आहे पण मन साशंक आहे. कारण आपल्या संत जनाना पांडुरंगाने स्वता येउन मदत केल्याचे दाखले वारकरी संप्रदायात आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ग्रेट !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 03/22/2012 - 12:01 नवीन
धन्याशेठ अतिशय माहितीपूर्ण आणि सुरेख प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कारण एकाच व्यक्तीच्या जीवनाचे दोन वेगवेगळे शेवट असूच शकत नाहीत. बरोबर ना?
ह्याच अनुषंगाने गेले कित्येक वर्ष छळत असलेला प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला आहे. तो म्हणजे 'नक्की श्रीकृष्ण किती होते?' माझ्या माहितीप्रमाणे* गोकुळातला एक वेगळा, गीता सांगणारा एक वेगळा, कंसाला मारणारा एक वेगळा इ. इ. ह्यावर देखील जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती. *माहिती आणि ज्ञान ह्यातला फरक समजून घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

विठ्ठला विषयी माहिती हवी तर

पांथस्थ
Wed, 03/21/2012 - 19:17 नवीन
विठ्ठला विषयी माहिती हवी तर दुर्गा भागवतांच्या "पैस" ह्या पुस्तकातील "पंढरीचा विठोबा" हा लेख वाचा. सर्वोत्तम आहे.
  • Log in or register to post comments

ऐस

चिरोटा
Wed, 03/21/2012 - 20:22 नवीन
प्रतिभा रानडे ह्यांच्या 'ऐसपैस गप्पा' ह्या पुस्तकात दुर्गाबाईंनी ह्याचे सविस्तर उत्तर दिले आहे. पुस्तक आता जवळ नाही. केव्हातरी नंतर लिहिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पांथस्थ

विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई )

JAGOMOHANPYARE
गुरुवार, 03/22/2012 - 00:27 नवीन
विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई ) या दोन भिन्न देव देवता होत्या, त्यांच्यात पती पत्नी संबंध नंतर भक्तानी जोडला. संदर्भ-- असुरवेद पुस्तक ( लेखक संजय सोनावणी) http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html
  • Log in or register to post comments

सोनवणींचे उल्लेख नका हो देवू.

प्रचेतस
गुरुवार, 03/22/2012 - 08:32 नवीन
सोनवणींचे उल्लेख नका हो देवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

लॉजीकल एक्सप्लेनेशन !!

अर्धवटराव
Fri, 03/23/2012 - 01:13 नवीन
सोनवणेंनी छान थेअरी मांडली आहे. धन्यवाद. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

माझ्या मते राही आणि रखुमा

प्राजु
गुरुवार, 03/22/2012 - 02:09 नवीन
माझ्या मते राही आणि रखुमा बाई.. या दोन पत्नी होत्या विठ्ठलाच्या. राही रखुमाबाई राणी या सकळा.... अस आहे आरतीत. नक्की माहित नाही. आणि विठ्ठलाच्या भवती अखंड भक्तांचा मेळा असल्याने.. रुक्मिणी चिडली आणि 'तुम्ही बसा तुमच्या भक्तांसोबत..' असे म्हणून दुसरीकडे निघून गेली म्हणून वेगवेगळी मंदीरे आहेत .. अशी गोष्ट लहानपणी आजी सांगायची. खरे खोटे तो विठ्ठलच जाणे. :)
  • Log in or register to post comments

+१ अगदी हेच्च आणि असचं

यकु
गुरुवार, 03/22/2012 - 11:45 नवीन
प्राजुताई, माझी पण आजी हीच गोष्ट सांगायची !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

राही

पैसा
गुरुवार, 03/22/2012 - 11:47 नवीन
हे राधा या शब्दाचं रूप आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

राही रखुमाबाई हे रखुमाई राहते

किचेन
गुरुवार, 03/22/2012 - 15:33 नवीन
राही रखुमाबाई हे रखुमाई राहते या अर्थाने घ्यावं का? मला काय वाटत..पुंडलीकाने वीट फेकली आणि त्यावर पांडुरंग उभे राहिले....रुखामैला वाट बघून आघून कंटाळा आला.शेवटी ती तुम्ही राहा इथे उभे ,मी आलेच थोडी शॉपिंग करून म्हणून बाजारात गेली असेल.आणि नंतर तिला परतण्याच भानच राहील नसेल...मग रुखमाई मंदिर जिथे पूर्वी मार्केट होत अशा ठिकाणी बांधल असेल. देव पांडुरंगा माफ कर. _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/23/2012 - 02:42 नवीन
स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची टिंगल करता ? कसे करवते तुमाच्याने हे ? स्त्री आहात तर स्त्रीच्याच बाजूने बोला. नाही तर तुम्ही डु आयडी असल्याची जाहिरात करतो की नाही ते बघा. प्लस स्पेशल भुतावळ सोडेन तुमच्या खरडवहीत खरडी लिहून लिहून हैराण करायला. मिलियन स्पायडर(मॅन)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

माफी असावी.टिंगल करण्याचा

किचेन
Fri, 03/23/2012 - 13:12 नवीन
माफी असावी.टिंगल करण्याचा आजीबात हेतू नव्हता.साधारण नववीत असताना पहिल्यांदा पंढरपूरला गेले होते.तेव्हा अशी वेगवेगळी मंदिर का हा प्रश्न नाही पडला.पण गेल्या पालाखीपास्न हाच प्रश्न डोक्यात आहे.वेगळी मंदिर का? आमच्या देवघरातही विठोबाची मूर्ती आणि रुखामैची मुती एकत्र नाही.वेगवेगळी आहे. तेव्हापासून माझ्या परिन मी विचार होत.एकदा असंच आम्ही दोघ बाहेर गेलो असताना तुल्शिबागेजवळ एका मित्राची वाट बघत होतो.तेव्हा मी त्याला तू थांब इथे वाट बघत मी आले भाजी घेऊन अस म्हंटल. नंतर घरी गेल्यावर राखुमैच असंच झाल असेल का हा विचार डोक्यात आला. तुम्ही माझ्या दु आयडी असल्याची खुशाल जाहिरात करा.पण फरक पडणार नाहीये.माझ्याशी फोनवर,चेपुवर जे बोललेत त्यांना मला स्पष्टीकरण द्यायची गरज पडणार नाही. परवा सचिन बोलला तसं ' मी त्यांच्याच मताचा विचार करते,ज्यांचा मी आदर करते'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@रुखामैला वाट बघून आघून

अत्रुप्त आत्मा
Sat, 03/24/2012 - 07:48 नवीन
@रुखामैला वाट बघून आघून कंटाळा आला.शेवटी ती तुम्ही राहा इथे उभे ,मी आलेच थोडी शॉपिंग करून म्हणून बाजारात गेली असेल.आणि नंतर तिला परतण्याच भानच राहील नसेल...मग रुखमाई मंदिर जिथे पूर्वी मार्केट होत अशा ठिकाणी बांधल असेल. >>> Image removed. --^--^--^--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

श्रीविठ्ठल : एक महासमन्वय

धन्या
गुरुवार, 03/22/2012 - 09:24 नवीन
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेलं हे ४२३ पानांचं पुस्तक या विषयावरचं उत्तम पुस्तक आहे. श्रीविठ्ठल हा पंढरपूर परिसरातील गवळी आणि धनगर लोकांचा लोकल देव. एकादया छोटया गावात दिसणार्‍या वेतोबा, विरोबा किंवा म्हैसोबासारखाच. याच समाजातील पुढे आलेल्या राजांनी या लोकदेवाचे उदात्तीकरण करुन त्याला विष्णु-कृष्ण रुप दिले. या देवाच्या मंदिराच्या परीसराचा भाग असलेल्या चिंचबनात म्हणजेच दिंडीरवनात असलेल्या लखुबाई या ग्रामदेवतेला काळाच्या ओघात या लोकदेवाचे पत्नीपद मिळाले. पुढे कुणीतरी या देवाच्या आयुष्याला पुंडलिक कथा चिकटवली आणि यादवीमध्ये निजधामाला गेलेल्या श्रीकृष्णाचे इतिहास दोन वेगवेगळे शेवट सांगू लागला. आणि वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तो देव असल्यामुळे या दोन वेगवेगळ्या शेवटांवर प्रश्न विचारण्याची कुणालाच गरज भासली नाही. गेल्या दोनेक वर्षांत झालेल्या वाचनामुळे श्रीविठ्ठलाबद्दल तो काळाच्या ओघात वैष्णवरुप प्राप्त झालेला गवळी आणि धनगर समाजाचं कुलदैवत होता याची खात्री पटली होती. आता प्रश्न असा होता की ज्ञानदेवांसारख्या ज्ञानी, प्रगल्भ आणि समाजमनाची जाण असलेल्या तरुणानेही श्रीविठ्ठलाचं हे वैष्णवरुप स्विकारावं याचं आश्चर्य वाटायचं. अर्थात याचीही उत्तरे पुढे मिळाली. एक म्हणजे श्रीविठ्ठलावर ज्ञानदेवांची असलेली श्रद्धा ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती. किंवा दुसरं कारण हे असू शकतं की तेव्हाच्या समाजाला एका समान धाग्याने बांधण्यासाठी, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी काहीतरी ठाम निमित्त असायला हवं होतं. ( जसं पुढे टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरु करुन केलं.) ते निमित्त ज्ञानदेवांना श्रीविठ्ठलाच्या रुपाने मिळालं. अर्थात विठ्ठलभक्ती ज्ञानदेवांच्याही खुप आधीपासून सुरु होती परंतू तिला "ग्लॅमर" आलं ते ज्ञानदेवांनी केलेल्या तिच्या प्रसारामुळे. ज्ञानदेवांनी ही विठ्ठलभक्तीची इमारत इतक्या मजबूत पायावर उभी केली की आज आठशे वर्षानंतरही अवघा महाराष्ट्र सहा ते आठ लाखांच्या संख्येने आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरात जमा होतो आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय" च्या जयघोषात देहभान विसरुन जातो...
  • Log in or register to post comments

मी वाचलं होतं त्याप्रमाणे

इष्टुर फाकडा
गुरुवार, 03/22/2012 - 15:17 नवीन
मी वाचलं होतं त्याप्रमाणे संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत नाही, जे देवगिरी किल्ल्यावर बहमनी किंवा निजामांच्या सेवेत होते) त्यांनी हा विठ्ठल विजय देवराय कडून भांडून वगैरे परत महाराष्ट्रात आणला होता. कर्नाटकात हम्पी मध्ये विठ्ठलाची मंदिरे सुद्धा आहेत. यावर प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत

प्यारे१
गुरुवार, 03/22/2012 - 15:19 नवीन
संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत नाही, जे देवगिरी किल्ल्यावर बहमनी किंवा निजामांच्या सेवेत होते) >>>जनार्दन स्वामी बहुतेक निजाम शहाच्या चाकरीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

येस

इष्टुर फाकडा
गुरुवार, 03/22/2012 - 15:57 नवीन
बरोबर. धन्यवाद प्यारे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पांडुरंग कांती : निरुपण

गणपा
गुरुवार, 03/22/2012 - 16:09 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

ओहोहो धन्यवाद गणाशेठ ! :)

इष्टुर फाकडा
गुरुवार, 03/22/2012 - 20:34 नवीन
शेवाळकरांचे हे निरुपण माहित न्हवते. सुंदरच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

+१

धन्या
गुरुवार, 03/22/2012 - 21:33 नवीन
धन्यवाद गणपाशेठ. छान आहे निरुपण. परंतू "कानडा विठ्ठलू कर्नाटकू" मधल्या कर्नाटकू या शब्दाची "नाटकं करणारा" अशी फोड ऐकून कपाळावर हात मारुन घेतला. अर्थात त्यात नविन काहीच नाही. एकदा किर्तनाला उभे राहिले की किर्तनकार शब्दांची याहीपेक्षा भयानक मोडतोड करतात हे माहिती आहे. सागरभाऊ, तुमच्या वरील एका प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर या ध्वनीफीतीत मिळाले असेलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

कर्नाटकू या शब्दाची "नाटकं

गणपा
गुरुवार, 03/22/2012 - 21:39 नवीन
कर्नाटकू या शब्दाची "नाटकं करणारा" अशी फोड ऐकून कपाळावर हात मारुन घेतला.
अगदी अगदी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा