Skip to main content

ते एक घर...

लेखक निश यांनी शनिवार, 17/03/2012 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
ते एक घर आनंदाने बहरलेल चिमण्या पाखरांच्या किलबिलाटाने गजबजलेल. ते एक घर तारुण्याचा उत्साह भरभरुन वाहणार ते एक घर संपत्ति यश ह्यावर समाजात मान तोलणार. ते एक घर देवावर अगाढ श्रध्दा असणार ते एक घर शिक्षणाला महत्व देणार. ते एक घर आलेल्या प्रत्येकाचि विचारपूस करणार प्रत्येक उत्सवात आनंदाने सामिल होणार. आणि.. तेच ते एक घर त्याच घरातिल एक अडगळिचि खोलि एक फाटका बिछाना एक मोडक कपाट व तिथे राहणार एक म्हातार जोडप. तेच ते एक घर मुलगा चांगला कमविता असताना म्हातार्‍या आई वडिलाना अडगळ समजुन त्या खोलित रवानगि करणार ते च ते एक घर आयुष्य म्हंजे म्हातारपणि भोगावा लागणारा तुरुंगवास अस समजुन त्याना आयुष्य जगायला लावणारे तेच ते एक घर. हो तेच ते एक घर,म्हटल घर तरिहि नरकाहुन नहि नरक. तेच ते एक घर तेच ते एक घर.
लेखनविषय:

वाचने 2710
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

कविता आवडली. पण शुद्धलेखनात लिहिली असती तर मनाला अधिक भावली असती. अनुस्वार आणि वेलांट्या योग्य तिथे हव्यातच. त्याने अधिक वाचनीयता येते.

साहेब, ते तर यायलाच हव मला. जरुर शुद्धलेखनावर पण लक्ष देइन . चुक ति चुकच मग माफी मागायलाच हवी मला. शुद्धलेखन करायचा सराव करीन आता

अरे काल परत एक विडंबन करणार होतास ना माझ्या कालच्या कवितेच.. आपल तस ठरल होत ना. कर कि मस्त विडंबन मला पण वाचायला आवडेल.

In reply to by निश

परत एक हृद्य संवाद, पुन्हा तेच डोळे पाणावणं, पुन्हा तेच रूमाल डोळ्यांना लावणं. वगैरे वगैरे.

In reply to by प्रचेतस

वल्लि साहेब, बहुतेक डोळे आले आहेत अपल्याला, किंवा चष्मा लागला असेल. असो काळजी घ्या स्वताचि......

In reply to by निश

डोळे जन्मापासूनच आलेत हो. सुदैवाने चष्मा अजूनही लागलेला नाही. बाकी आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोतच. बाकी डोळे पाणावणे हे चांगल्या तब्येतीचं लक्षण आहे असे जाणकार म्हणतात.

In reply to by प्रचेतस

@परत एक हृद्य संवाद, पुन्हा तेच डोळे पाणावणं, पुन्हा तेच रूमाल डोळ्यांना लावणं. वगैरे वगैरे.>>> @वल्लि साहेब, बहुतेक डोळे आले आहेत अपल्याला, किंवा चष्मा लागला असेल. असो काळजी घ्या स्वताचि...... आपण दोघे करु मज्जा या वल्ल्याचा उडो (मधल्या मध्ये) फज्जा ;-)

In reply to by निश

@कर कि मस्त विडंबन मला पण वाचायला आवडेल. धन्यु निश.... पण विडंबन ही एक ऊर्मी असते,,, कोल्ड्रींस्कचं झाकण उघडल्यावर...ते फस्सकन बाहेर येतं तसं विडंबन बाहेर यायला हवं...यावेळी ते अर्थातच आलं नाही...म्हणुन केलंही नाही... :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला काय दिवस आलेत. कवी म्हणतोय विडंबन पाड, विडंबक म्हणे उर्मी आली आड.

In reply to by प्रचेतस

च्यायला काय दिवस आलेत. कवी म्हणतोय विडंबन पाड, विडंबक म्हणे उर्मी आली आड. म्हणुनच ... ;) भ****न आले ;)

In reply to by प्रचेतस

@ऊर्मी आली आड>>> दुष्ट दुष्ट दुष्ट ;-) आग लावण्याचा दुष्ट प्रयत्न ;-) अग्या*** :-D

वल्लि साहेब, तस असेल तर चांगलच आहे की. मग तर तुमचे डोळे नेहमिच पाणावलेले राहोत हि देवा कडे मना पासुन विनंति तुमच्या चांगल्या तब्येतीकरिता.

निश तू कशाला आत्म्याला विडंबन पाडायला सांगतोयस ? त्यातलं दुसरं घर आहे ना , ते पहिल्याचं विडंबनच आहे. लई जबर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्राआ कविता !