वार शुक्रवार, संध्याकाळ्चे ०४:३०-५ वाजले असतील...कॉप्रोरेट ऑफिसच्या ए/सि मधुन बाहेर पडलो आणि पुण्याच्या उकाड्यात एंट्री मारली. खिशातुन मोबाइल काढला आणि भाग्याला फोन केला. लास्ट डायल लिस्ट मध्ये तिचाच नंबर होता. .. दोन-तिन रिंग गेल्या ती कॉल पिक करत नव्हती, म्हणुन कंर्फम करायला मोबाइल स्क्रिन पाहिली... "हो तिलाच लावला आहे फोन, मग का नाही उचलत आहे कॉल?" मी स्वता:शिच बोललो. "हा बोल स्वॅप..." पलिकडुन एकदम ऑर्डरच आली. (झाले कंर्फम बायकोच आहे).
"अग किती वेळ लावलास फोन उचलायला" मी कधी नव्हे ते तिला प्रश्न विचारु शकलो.
"अरे काही नाही पुजा मला तिच्या नविन प्रोजेक्ट बद्दल सांगत होती"
"बरं-बरं, बरं ऐक, मी निघालो आहे आता तु पण पटकन आवर, आणि तुझ्या कंपनिच्या गेट समोर थांब मी पोहोचेन ५ मिनिट्स मध्ये" आज खूप दिवसांनी लवकर निघायला मिळाल्या मुळे मी जाम खुष होतो.
"ओ.के शोनू... मी तयारच आहे...तुझ्या आधी मी तिथे असेन" ती जेवढ्या प्रेमाने बोलली त्याच खात्रीने मी सांगु शकतो की ती आज पण लेट येणार.
"चल ठिक आहे....बघु कोण आधी पोहोचते" असे म्हणुन मी मोबाइल पँटच्या पुढ्च्या खिशात ठेवला आणि पार्किंग कढे निघालो.
मारी बिस्किट, खाकरा, दुध या सर्वांची ( मनातल्या मनात )यादी करत बाईक पर्यंत पोहोचलो... हेलमेट बाईकलाच लावले होते.... बाईकवर बसलो आणि जॅकेट आणि हाताचे मोजे ( हँड ग्लोव्ज -मी बाईक चालवताना घालतोच ) घातले. तेवढ्यात मोबाइल वाजल्या सारखे वाटले म्हणुन एक-दोन सेकंद थांबलो... पण नाही फक्त आभास....
"भ्रूममम-भ्रूममम" हा माझ्या अॅवेंजरचा आवाज.... दोन-तिनदा चांगले रेस केली... हेलमेट चढवले आजु-बाजुला पाहिले आणि टाकला पहिला गिअर.
बाहेर पडलो तर प्रचंड उन... जॅकेट मुळे अजुनच जास्त गरम होत होते...
| लेखनविषय: |
|---|
याद्या
2089
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
?
अगदी
In reply to ? by रणजित चितळे
एव्हढेसे भाग नका टाकू
नक्किच....
:)
In reply to नक्किच.... by चिम् चिम् मामा
हा: .. हा: .. ..
आजच वाचला