स्वप्नाळू राती, सहज एकदा, नदीकिनारी बसले
ओढून घेता, पदर नभाचा, रम्य दॄश्य ते दिसले
चांदणे होते, चमचमणारे, तीरावरी उतरले
पाण्यामध्ये, पोहते तारे, पाहुनिया मी हसले
आकाशीच्या पडद्यावरति, चालत होते, मन कुंचले
चंद्र सोळा चितारलेले, लख्ख दिवे लखलखले
रंगीत संगीत रेषा हलता, जरा जरासे पर हलले
फुलपाखरे, फडफडणारी, स्वप्नचित्र असे दिसले..
हिरवाईत होते, शुभ्र रेशमी, ससे देखणे, गोजिरवाणे
पिठूर चांदणे, माळून येता, शुभ्रतेत मी न्हाले
कुठे एकला, गात होता, चंदन तो .. गंधित गाणे
मधुर सुरांवर, सुगंधित कण, मंद मंदसे दरवळले
पलीकडे, त्या काठावरती, स्वप्नांची एक बाग फुले
बागेमधली, स्वप्नफुले ती, पाहताच मी फुलले
उगाच नाही, सांगत काही, स्वप्नामधे मी दंगले
चितारताना, नभावरी मग, पुन्हा पुन्हा मी रमले
- संध्या
03 Feb 2010
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी सुरूवातीची कविता
आज मला हे नव्याने गवसले
सांजसंध्या़जी, मस्त कविता सुरेख कविता आहे
कविता आवडली. पिठूर चांदणे,
अतिशय हळुवारपणे मनाला गंधित
एखाद्या कवितेला भटजींकडून
In reply to अतिशय हळुवारपणे मनाला गंधित by अत्रुप्त आत्मा
एखाद्या कवितेला भटजींकडून
In reply to एखाद्या कवितेला भटजींकडून by प्रचेतस
बॅरल भरून प्रतिसाद तुम्ही
In reply to एखाद्या कवितेला भटजींकडून by अत्रुप्त आत्मा
बॅरल भरुन वाक्य नव्हे ,बॅरल
In reply to एखाद्या कवितेला भटजींकडून by अत्रुप्त आत्मा
.
कुहू ची आठवण आली
सर्वांचे मनःपूर्वक
आमचं स्वप्नचित्र हरवलं कि...
कसं काय ब्वा हरवलं?
In reply to आमचं स्वप्नचित्र हरवलं कि... by सांजसंध्या
तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध
(No subject)
In reply to तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध by सांजसंध्या
@तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध
In reply to तुमचं दोघांचं तुंबळ युद्ध by सांजसंध्या
.