धीर धरा हो . अशी मरण्याची भीती कशापायी ? किर्पा होनी बाकी है !
प्यारे १ / यश्वतंराव : १-२ सम-विचारी सापडले ...किर्पा झालीच.
बाबां वर एक वेगळा धागा काढु या का ?
जगात फिरुन यायची गरज काय :) ?
मुळात जोतिष किंवा तत्सम शास्त्र हे एखाद्या खेळासारखे आहेत, जिथे नियम, आडाखे, गृहीतक सगळे आपणच ठरवायचे, आणी वेड्यासारख खेळात रहायच. राहु-केतु वाईट, मंगळ अमुक गुणधर्माचा, शुक्र असे परीणाम दाखवणार.. हातावरची अमुक रेषा अशी असेल तर तस होणार..ही सगळी गृहीतक, त्याला शेंडा बुडखा काहीच नाही.
कोणत्याही नैसर्गीक शास्त्राच तस नाही, तिथले नियम सनातन असतात, आल्याचा रस चाखल्याने सर्दी झालेल्या एस्कीमोपासुन ते विदर्भातल्या गोंडापर्यंत, सगळ्या मानवांवर सर्वसाधारण सारखा परीणाम होतो. आज एखादा मोलेक्युल औषध म्हणुन बाजारात आणायचा तर चार ते पाच टप्प्यात, हजारो लोकांवर व प्राण्यांवर चाचण्या कराव्या लागतात. त्यातही जे त्या उपचारांना प्रतीसाद देत नाहीत, त्यांनी तो का दीला नाही याचे कारण द्यावे लागते. एखाद्या गोष्टीला शास्त्र म्हणतात तेंव्हा अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्याची परीक्षा घेतली जाते, अगदी आयुर्वेदातल्या कफ्/पीत्त्/वात या त्रीदोषांचे गृहीतक आता वस्तुनीष्ठ कसोटीवर तपासुन पाहील जातय.
आता या शास्त्राचा वापर करणारे काही जण अचुक वापर करतात काही चुका करतात, त्यामुळे ते शास्त्र म्हणुन कोठेही कमी ठरत नाही.
ज्या दिवशी जोतीषशास्त्र अशा परीक्षा द्यायला तयार होइल तेंव्हा चांगल्या किंवा वाईट जोतीषाची चांगल्या किंवा वाईट डॉक्टरशी तुलना करता येइल, तोवर ही सगळी कपोल्कल्पीत बनवाबनवी आहे अस मला वाटतं.
क्षमा करा ! मला वाटले मी ते त्या धाग्यासंबधीत बोललो होतो. आणि समजा ही प्रतिज्ञा मोडली असे आपण म्हटले तरी जनहितासाठी हरकत नाही. नाहीतरी बर्याचजणांना ही सगळी गंमतच वाटते...:-)
त्यांच्या आयुष्यात अनिश्चतता येवो. त्यानंतर ते या दैवी शास्त्राचा आधार घेओत. त्यानंतर शनीच्या दगडावर तेल ओतून ओतून कंगाल झाल्यामुळे, आता साडेसातीपुढे कोण काय करू शकतो असा विचार करून फासाला स्वतःला लटकवून आत्म्हत्या करोत.... चांगला शाप आहे हो ................:-)
झालेच तर ते ग्रहांच्यामधे चिरडून मरोत.
.....................
...................
मी गेल्या वर्षी एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली... तुझे सगळे भले होईल बेटा, असे म्हणून त्याने ताईत दिला आणि एका पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. त्यानंतर पंधरा दिवसातच मला अॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..
लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुशीसनी गेलं कुकू
रेखा उघडी पडली
देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा अटला
धन-रेखाच्या चरहानं
तयहात रे फाटला
बापा, नाको मारू थापा
असो खरया असो खोट्या
नही नशीब नशीब
तयहाताच्या रेघोटया
अरे, नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिरहे
ते भी फिरत रह्याले
राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगनं
त्यात आलं रे नशीब
काय सांगे पंचागन
नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहू
माझं दैव माले कये
माझ्या दारी नको येऊ
-बहिणाबाई चौधरी
क ड क !!!!
मला अजून एक शेर आठवला होता. नीट नाही आठवत पण असा काहीसा होता...
अपनी हाथोंकी लकीरों पर इतना गुमान ना करो.
नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नही होते.
धाग्यातील प्रतिसादात लेखातील मुद्यांविषयी कुणीच भाष्य केले नाही.
<<'विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही' ज्यांना या विधानाची सत्यता पटेल त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्तता पटेल. >>
श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देते हे आम्ही मान्य करतो. दाभोलकर देखील मान्य करतात. ज्योतिष हा देखील श्रद्धेचाच भाग आहे. अनिश्चिततेला तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते हा नेहमीचा आपला मुद्दा या ठिकाणी थेट मांडला नाही. पण पुढे अप्रत्यक्षरित्या तो मांडलेला दिसतो. पण वैज्ञानिक दृष्टीकोण हा अनिश्चितता पचवायला मदत करतो. तो अंगी बाळगणे तेवढे सोपे नाही हे मात्र मान्य. बुद्धीप्रामाण्यवाद हा एक कठीण वसा आहे असे तर्कतीथ लक्ष्मणशास्त्री सांगत. हल्ली श्रीराम लागू पण तेच सांगतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा म्हणजे भावनांना थाराच देउ नका असे असु शकत नाही.
<< हा बुद्धीवाद शाश्वत समाधानाची हमी प्रयत्नवादी व्यक्तीला देईल, याची खात्री कोणीच देत नाही>>
शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा देते काय? खर तर शाश्वत असे काहीच नाही.
अधिकृत पुरावा मजजवळ नाही. पण श्रद्धेच्या जोरावर मनुष्याने अनेक अविश्वसनीय गोष्टी पार पाडलेल्या दिसतात. असे लोक त्यांच्या श्रद्धास्थानांना याचे श्रेय देतात. (उदा विशिष्ट मूल्यांवरची श्रद्धा) त्यावरून श्रद्धा शाश्वत किंवा दीर्घ समाधान देत असावी.
प्रतिक्रिया
म्या पगतू! लय धम्माल
>>>>त्वा बनेल कुडनं घ्येटलास?
यशवंत राव..
.
जगातले सगळेच जोतिषी, तथाकथीत
तुमच्या मताचा मी आदर करतो,पण
जगात फिरुन यायची गरज काय ?
माझ्या धाग्यावर "पुन्हा
क्षमा करा ! मला वाटले मी ते
+१
या निमिताने (दुसर्याच्या
हम्म्म
त्यांच्या आयुष्यात अनिश्चतता
झालेच तर ते ग्रहांच्यामधे
मी फक्त भोंदूगिरीच्या विरूद्ध
मी गेल्या वर्षी एका
लपे करमाची रेखा माझ्या
धन्यवाद!
क ड क !!!! मला अजून एक शेर
...
लई भारी !!!
धन्यवाद...
प्रतिसाद
शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा
आजच्या म.टा त दाभोळ्करांच
Pagination