Skip to main content

<<ज्योतिष>> आजं म टा (पुणे) मध्ये प्रसिद्ध झाले ला माझा लेख

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 13/03/2012 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
From 2012_03_13" alt="" /> टीप - ही जाहिरात नव्हे.

वाचने 31589
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by जयंत कुलकर्णी

या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही. हा भाबडा आशावाद वाटला. माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची ....... तुमचा तरुण* मित्र** म्हणून सहमत. *डोक्यावरचे सगळे केस जायच्या मार्गावर असले तरी मी स्वतःला तरुण समज्तो. ** मी तुम्हाला मित्र मानतो.

In reply to by जयंत कुलकर्णी

प्रतिसाद आवडला. बाकी वरचे काही अफाट प्रतिसाद वाचून हैराण झालो. अर्थात ज्योतिष हा ज्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे त्यांना ज्योतिषाच्या बाजूने बोलणे भाग आहे. घोड अगर घाससे दोस्ती करेगा तो खाएगा क्या ? हेदेखील खरेच. इथे बरेच व्यावसायिक ज्योतिषी असावेत असे वाटते.

कन्सिट (Conceit) या शब्दाचा अर्थ सोदाहरण समजावून सांगितल्याबद्दल तुमचे आभार!

"वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? "
म्हणजे हे धैर्य ज्योतिषाकडून मिळू शकेल असा अर्थ गृहीत धरतो. अशा वाक्याने ज्योतिष हे "प्लासेबो"सारखे उपयोगी आहे असा अर्थ ध्वनित होतो. म्हणजे याची मर्यादा प्लासेबो इफेक्टइतकीच (गोड किंवा कडू, पण कोणतेही औषधी तत्व नसलेली प्लेन गोळी मानसिक परिणामासाठी / उभारीसाठी देणे.) आहे हे नकळत का होईना, स्पष्ट केल्याबद्दल आनंद वाटला.

साला आपण तर दोन क्वार्टर नंतर जगाचे भविष्य घडवायला तयार असतो. माणसाचे काय घेऊन बसलात ? दोन-चार पेग होत नाहीत तोवर तुमचे ते शनी, राहू, चंद्र वैग्रे असे आमच्या आजूबाजूच्या खुर्च्यांवरती येउन बसायला लागतात. बाकी भविष्यावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे दोघेही कायम हाताला चूना लावून का तयार असतात हे न सुटणारे कोडे आहे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

बहुदा तुमच्या कु ण्डली मध्ये १ ल्या घरात राहु असणार (विपरित विचार येतात़ -ज्यो. शा.) त्यामुळे तुम्हि असे बोलत आहात.

In reply to by गोंधळी

आम्हाला तर वाटले होते आमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात डान्या आणि चौथ्या घरात धम्या वेटोळे मारुन बसला आहे म्हणून. ११/१३ आणि १५ ला अनुक्रमे मकी, अदिती आणि प्रिमो असाव्यात. सप्तम स्थानी नालायक निळ्या असणार. गेला बाजार सोत्रि सध्या वक्री असणार.

In reply to by गणपा

दोन्ही बाजू पटल्या तरी 'बेंबट्या' होणे टाळता येईल असे वाटते. ('असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी' हा खुळचटपणा आहे. 'लाथ मारीन तिथे पाणि काढीन' हा अभिनिवेशही अनाठायी आणि अवास्तव आहे. या दोन्ही गोष्टी सहज अनुभवता येतात. त्यामुळे प्रारब्ध/ नशीब/ नियती आहे हे मान्य करत कर्मस्वातंत्र्याचा सदुपयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा सुवर्णमध्य आहे असे काहींच्या लक्षात येते. हा सुवर्णमध्य साधत असताना ज्योतिष्यशास्त्राचा 'गाईडलाईन'सारखा उपयोग करणारे/ मला अशा गाईडलाईनची फारशी गरज नाही असा निष्कर्ष काढलेले विवेकी लोकही बरेच असतात. कुठलाच अभिनिवेश नसल्याने हे लोक या विषयावर फारसे मतप्रदर्शन करत नाहीत आणि एकांगी मते वाचून फारसे भारावून जात नाहीत/ विचलीत होत नाहीत. त्यांचा बेंबट्या होत नाही. असो.)

In reply to by गणपा

तुला दोन्ही बाजू पटतायत, मला तर शेवटच्या प्रतिसादापर्यंत पोचेपर्यंत मूळ चर्चेचा विषय काय हेच विसरायला होतंय. ;)

स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये.
जयंत कुलकर्णी काकांचे म्हणणे १००% आवडले आणि पटले. :) बाकी काही बाबतीत गणपा म्हणतायत अगदी तेच होत आहे. दोन्ही बाजुचे मुद्दे पटतायत. शेवटी, कोणती गोष्ट कुठपर्यंत खेचायची हे ज्याने त्याने कुवतीनुसार ठरवावे. उठसुट भविष्ये, भाकिते बघून अंदाज बांधून जगणे माणसाला निष्क्रीय आणि विचारहीन बनवते, हे शहाण्याला सांगणे न लगे. :) आणि विज्ञानाच्या अति आहारी जाउन कोणी स्वतः आत्महत्या करुन कुटुंब संपवलेले कुठे वाचण्यात आले नाहीये अजुन...... :)

नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते. एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो. तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते. नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो. नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी झाली. इच्छुकांनी त्यात काय घडले हे समजून व्हायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.

In reply to by धन्या

तु एकटाच का आख्खा धागाच धन्य झाला, अर्थात तुम्हाला कानमंत्र आधीच मिळालेला आहे, त्यामुळे अशाच प्रतिसादाची अपेक्षा होती.

In reply to by शशिकांत ओक

माझा अनुभव येथे देऊ इच्छीतो, मी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीषाची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पट्ट्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पट्ट्यांवर काही तरी कोरलेले मला दिसत होते. त्याने पहीली पट्टी काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली. मी - हो. तो - आईचे नाव अमुक होते. मी - नाही. त्याने ती पट्टी ठेवून दुसरी काढली. तो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले. मी - नाही. त्याते ती पट्टी ठेवून तिसरी काढली. वडीलांचे नाव अमुक आहे. मी - हो. भाऊ सरकारी नोकरीत आहे. मी - हो. बायको अमुक अमुक नावाची आहे. मी - हो. आता तो म्हणाला की पट्टी मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले. तिथल्या तिथे. माझ्या बद्दलचे सगळे आराखडे बरोबर होते. माझे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले. काही गोष्टी आता (६ वर्षाने) कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू. मला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.

In reply to by रणजित चितळे

मी देखिल साधारण २ वर्षांपुर्वी माझा अनुभव इथे लिहिला होता. आणि अत्तादेखिल सांगू शकते, की त्यावेळेस त्यांनी ( नाडीपट्टीवाल्यांनी) 'काही गोष्टी अत्ता सांगता येणार नाहीत', असे सांगून माझेच भले केले होते; फक्त ते मला तेंव्हा कळत नव्हते. मी जाम वैतागले होते.. असो. वैयक्तिक अनुभवांची चर्चा इथे नको. आपले अनुभव आपल्याजवळ ठेवावेत. ज्याला गरज असेल त्यालाच सांगावेत, हा शहाणपणा आता माझ्याकडे आहे.

In reply to by रणजित चितळे

वाचासिद्धी प्राप्त असलेल्या सत्पुरूषांची भाकिते तंतोतंत खरी झाल्याचे काही विलक्षण अनुभव माझ्या काही परिचितांना आणि मलाही आलेले आहेत. (सगळे योगायोग असतात असे म्हणणार्यांशी वाद घालणे/ कुठली आव्हाने वगैरे स्वीकारणे/ संख्याशास्त्रीय पुरावे गोळा करणे इ. मधे स्वारस्य नाही.)

In reply to by रणजित चितळे

तुमच्या सारखाच अनुभव मला १९६६ साली आला आहे. मी पक्का चिकित्सक माणूस आहे. त्याने सांगितलेले भविष्य नव्हते पण जो भूतकाळ त्याने आमचा आम्हाला पट्ट्यावरून सांगितला तुआत १९४६ सालच्या घटनेचा उल्ल्लेख होता . ते कोडे मला अजून उलगडलेले नाही. मी चिकित्सक असूनही इमानदारीत कबूल करतो.

च्यायला ! ज्याला त्याला आपलं दुकान चालायची काळजी.

सोनी टि.वी. किंवा तसल्यास कोठ्ल्यातरी च्यनेलवर निर्मल बाबा का दरबार नावाचा कार्यक्रम असतो . तो कोणी पहाते का ? मी तर त्याचा फॅन आहे. एवढा ऊत्तम " विनोदी रिअ‍ॅलिटी शो " कोणताही नाही.

In reply to by तर्री

म्या पगतू! :) लय धम्माल कारेक्रम हाय. येवडा जगात भारी क्वामेडी कारेक्रम आपन दुसर्या कुडं बगला न्हाई. ;) 'किर्पा' कुडनं कुडनं आन कशी कशी सुरु हुईल आन कशी बंद हुईल त्येजी काय बी ग्यारन्टी नाय! ;) त्वा बनेल कुडनं घ्येटलास? रस्त्यावनं का घ्येटल्यास? शोरुम मदनं घ्ये 'किर्पा आयेगी' त्वा समोशे कवा खाल्लास? घी वाला पंजाबी समोसा घरात बनवून गनपतीला ३०१ वाहा 'किर्पा आयेगी' पुर्‍या कन्च्या त्येलात केल्त्यास? सफोला मदी करु नगंस. 'किर्पा आयेगी' अस्लं भारी भारी निर्मल बाबा सांगत आसतंय. लय आडौतय.

In reply to by प्यारे१

>>>>त्वा बनेल कुडनं घ्येटलास? रस्त्यावनं का घ्येटल्यास? शोरुम मदनं >>>>घ्ये 'किर्पा आयेगी' >>>>त्वा समोशे कवा खाल्लास? घी वाला पंजाबी समोसा घरात बनवून >>>>गनपतीला ३०१ वाहा 'किर्पा आयेगी' >>>>पुर्‍या कन्च्या त्येलात केल्त्यास? सफोला मदी करु नगंस. 'किर्पा >>>>आयेगी' ---- मेलो ! मेलो! मेलो! =)) =)) =)) =)) =))

In reply to by यकु

धीर धरा हो . अशी मरण्याची भीती कशापायी ? किर्पा होनी बाकी है ! प्यारे १ / यश्वतंराव : १-२ सम-विचारी सापडले ...किर्पा झालीच. बाबां वर एक वेगळा धागा काढु या का ?

In reply to by तर्री

जगात चांगले डॉक्टर आहेत तसेच खोट्या पदव्या असणाय्रा डॉक्टरांची ही क्लिनीक आहेत. आता कोणाकडे जायचे, काय बघायचे हे तुम्हीच ठरवा.

In reply to by गोंधळी

जगातले सगळेच जोतिषी, तथाकथीत चांगले व वाईट, हे खोटी पदवी असलेले, व खोट्या शास्त्राचा आधार घेणारे आहेत, असे आमचे आजचे मत आहे.

In reply to by शैलेन्द्र

तुमच्या मताचा मी आदर करतो,पण हे विधान तुम्ही कश्याच्या आधारे केले आहे. या साठी तुम्हि जगभर फिरुन आला आहात काय?

In reply to by गोंधळी

जगात फिरुन यायची गरज काय :) ? मुळात जोतिष किंवा तत्सम शास्त्र हे एखाद्या खेळासारखे आहेत, जिथे नियम, आडाखे, गृहीतक सगळे आपणच ठरवायचे, आणी वेड्यासारख खेळात रहायच. राहु-केतु वाईट, मंगळ अमुक गुणधर्माचा, शुक्र असे परीणाम दाखवणार.. हातावरची अमुक रेषा अशी असेल तर तस होणार..ही सगळी गृहीतक, त्याला शेंडा बुडखा काहीच नाही. कोणत्याही नैसर्गीक शास्त्राच तस नाही, तिथले नियम सनातन असतात, आल्याचा रस चाखल्याने सर्दी झालेल्या एस्कीमोपासुन ते विदर्भातल्या गोंडापर्यंत, सगळ्या मानवांवर सर्वसाधारण सारखा परीणाम होतो. आज एखादा मोलेक्युल औषध म्हणुन बाजारात आणायचा तर चार ते पाच टप्प्यात, हजारो लोकांवर व प्राण्यांवर चाचण्या कराव्या लागतात. त्यातही जे त्या उपचारांना प्रतीसाद देत नाहीत, त्यांनी तो का दीला नाही याचे कारण द्यावे लागते. एखाद्या गोष्टीला शास्त्र म्हणतात तेंव्हा अत्यंत वस्तुनिष्ठपणे त्याची परीक्षा घेतली जाते, अगदी आयुर्वेदातल्या कफ्/पीत्त्/वात या त्रीदोषांचे गृहीतक आता वस्तुनीष्ठ कसोटीवर तपासुन पाहील जातय. आता या शास्त्राचा वापर करणारे काही जण अचुक वापर करतात काही चुका करतात, त्यामुळे ते शास्त्र म्हणुन कोठेही कमी ठरत नाही. ज्या दिवशी जोतीषशास्त्र अशा परीक्षा द्यायला तयार होइल तेंव्हा चांगल्या किंवा वाईट जोतीषाची चांगल्या किंवा वाईट डॉक्टरशी तुलना करता येइल, तोवर ही सगळी कपोल्कल्पीत बनवाबनवी आहे अस मला वाटतं.

माझ्या धाग्यावर "पुन्हा प्रतिसाद देणार नाही" अशी भीष्म-प्रतिज्ञा करणारे परत आलेले बघून खूप गंमत वाटली.

In reply to by युयुत्सु

क्षमा करा ! मला वाटले मी ते त्या धाग्यासंबधीत बोललो होतो. आणि समजा ही प्रतिज्ञा मोडली असे आपण म्हटले तरी जनहितासाठी हरकत नाही. नाहीतरी बर्‍याचजणांना ही सगळी गंमतच वाटते...:-)

In reply to by युयुत्सु

या निमिताने (दुसर्‍याच्या डोळ्यातलें कुसळ दाखवायला) स्वतःच्या धाग्यावर येउन चक्क प्रतिक्रिया दिलीत तुम्ही ..... हे बघून खूप गंमत वाटली.

युयुत्सु आणि ज्योतीष शास्त्राची टिंगल उडवणार्‍या सगळ्यांवरती शनीची वक्र दॄष्टी पडो आणि त्यांना साडेसाती चालू होवो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यांच्या आयुष्यात अनिश्चतता येवो. त्यानंतर ते या दैवी शास्त्राचा आधार घेओत. त्यानंतर शनीच्या दगडावर तेल ओतून ओतून कंगाल झाल्यामुळे, आता साडेसातीपुढे कोण काय करू शकतो असा विचार करून फासाला स्वतःला लटकवून आत्म्हत्या करोत.... चांगला शाप आहे हो ................:-) झालेच तर ते ग्रहांच्यामधे चिरडून मरोत. ..................... ...................

झालेच तर ते ग्रहांच्यामधे चिरडून मरोत.
आपल्या बुद्धीवादी आणि विज्ञाननिष्ठ सदिच्छा पोचल्या...

मी गेल्या वर्षी एका ज्योतिष्याला पत्रिका दाखवली... तुझे सगळे भले होईल बेटा, असे म्हणून त्याने ताईत दिला आणि एका पुस्तकाचा १४ वा अध्याय वाचायला सांगितला.. त्यानंतर पंधरा दिवसातच मला अ‍ॅक्सिडेंत झाला आणि पाय मोडला..

लपे करमाची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली पुशीसनी गेलं कुकू रेखा उघडी पडली देवा, तुझ्याबी घरचा झरा धनाचा अटला धन-रेखाच्या चरहानं तयहात रे फाटला बापा, नाको मारू थापा असो खरया असो खोट्या नही नशीब नशीब तयहाताच्या रेघोटया अरे, नशीब नशीब लागे चक्कर पायाले नशिबाचे नऊ गिरहे ते भी फिरत रह्याले राहो दोन लाल सुखी हेच देवाले मांगनं त्यात आलं रे नशीब काय सांगे पंचागन नको नको रे जोतिषा नको हात माझा पाहू माझं दैव माले कये माझ्या दारी नको येऊ -बहिणाबाई चौधरी

In reply to by JAGOMOHANPYARE

जामोप्या, धन्यवाद! अशिक्षित बहिणाबाई लिहून गेली ते मोठ्या मोठ्या लोकाना आयुष्यभर पढत पंडितगिरी करून कळालं नाही!

In reply to by JAGOMOHANPYARE

क ड क !!!! मला अजून एक शेर आठवला होता. नीट नाही आठवत पण असा काहीसा होता... अपनी हाथोंकी लकीरों पर इतना गुमान ना करो. नसीब तो उनके भी होते है जिनके हाथ नही होते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

पैरोंके बल उसने खुदी कर ली बुलंद.. वर्ना वो बुरी बला जीत जाती.. नसीब उसका अच्छा के हाथ नही थे.. वर्ना किस्मत आजमाते जिंदगी बीत जाती..

In reply to by गवि

लई भारी !!!

धाग्यातील प्रतिसादात लेखातील मुद्यांविषयी कुणीच भाष्य केले नाही. 'विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही' ज्यांना या विधानाची सत्यता पटेल त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्तता पटेल. >> श्रद्धा ही माणसाला जगण्याचे बळ देते हे आम्ही मान्य करतो. दाभोलकर देखील मान्य करतात. ज्योतिष हा देखील श्रद्धेचाच भाग आहे. अनिश्चिततेला तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता वेगळी असते हा नेहमीचा आपला मुद्दा या ठिकाणी थेट मांडला नाही. पण पुढे अप्रत्यक्षरित्या तो मांडलेला दिसतो. पण वैज्ञानिक दृष्टीकोण हा अनिश्चितता पचवायला मदत करतो. तो अंगी बाळगणे तेवढे सोपे नाही हे मात्र मान्य. बुद्धीप्रामाण्यवाद हा एक कठीण वसा आहे असे तर्कतीथ लक्ष्मणशास्त्री सांगत. हल्ली श्रीराम लागू पण तेच सांगतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा म्हणजे भावनांना थाराच देउ नका असे असु शकत नाही. हा बुद्धीवाद शाश्वत समाधानाची हमी प्रयत्नवादी व्यक्तीला देईल, याची खात्री कोणीच देत नाही>> शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा देते काय? खर तर शाश्वत असे काहीच नाही.

शाश्वत समाधानाची हमी श्रद्धा देते काय?
अधिकृत पुरावा मजजवळ नाही. पण श्रद्धेच्या जोरावर मनुष्याने अनेक अविश्वसनीय गोष्टी पार पाडलेल्या दिसतात. असे लोक त्यांच्या श्रद्धास्थानांना याचे श्रेय देतात. (उदा विशिष्ट मूल्यांवरची श्रद्धा) त्यावरून श्रद्धा शाश्वत किंवा दीर्घ समाधान देत असावी.