✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 07/28/2008 - 09:53  ·  लेख
लेख

Book traversal links for जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

  • ‹ जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27853 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

ए
एकलव्य Mon, 07/28/2008 - 10:01 नवीन

भाग्यवान आहात

पिडाकाका, असा गुरु लाभायला भाग्य लागते (आणि तुमच्यासारखी तपश्चर्याही). हे सारे आमच्यासाठी येथे जिवंतपणे तुम्ही उभे केल्याने आम्हीही भाग्यवानच. (गुरुप्यासा) एकलव्य
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Wed, 07/30/2008 - 12:27 नवीन

अप्रतिम चित्रण!

वाहवा डा॑बिसराव मजा आणलीत. तिन्ही भाग परत वाचले. एखादी नजर खिळविणारी फिल्म पाहतो आहोत असे वाटले. तुमची शैली एकदम ओघवती आहे. आवडली. धन्य ते गुरू आणि (यशस्वी) विद्यार्थी. भाग्यवान आहात. माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. नतमस्तक (लेक्चरर) प्रसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
ध
धमाल मुलगा गुरुवार, 07/31/2008 - 18:26 नवीन

डॉक्टरांश

डॉक्टरांशी पुर्ण सहमत! असे शिक्षक जर मिळाले तर का नाही मुलांचा अभ्यासाचा दृष्टिकोन बदलणार? आणी महत्वाचं म्हणजे "वर्षभर चोखा, अन् वर्षाअखेरीस ओका" असं न होता आयुष्यभराची बेगमी ठरेल. नतमस्तक (पुर्वाश्रमीचा कॉर्पोरेट ट्रेनर) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
य
यशोधरा Mon, 07/28/2008 - 10:04 नवीन

सहीच!

सहीच! शिष्याचा स्वीकार केला तर गुरुने! :)
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Mon, 07/28/2008 - 10:07 नवीन

झकास!

झकास! मस्त आहे हा अनुभव. असे घासून घेणारे शिक्षक हल्ली खरोखरच दिसत नाही हे पण तितकेच खरे. आपल्याला असे काही लाभले हे तुमचे भाग्य. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 07/28/2008 - 10:21 नवीन

मस्त!

असा गुरु लाभायला भाग्य लागते (आणि तुमच्यासारखी तपश्चर्याही).
हेच म्हणते. मस्त! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 07/28/2008 - 10:22 नवीन

सुंदर !!

सुंदर !! पास-फेल करण्यामागचं कारण सहीच.. आपल्याकडे कधी येणार असं ? जसंच्या तसं उत्तर येण्यापेक्षा विद्यार्थी विचार कसा करतो, जसं तुम्ही म्हणालात ज्ञान ऍप्लाय कसं करतो हे खरंच कौतुकास्पद आहे! खूप आवडला 'जॉर्ज'! तुमची लिहीण्याची हातोटी मस्त आहेचे! त्यात काही वाद नाही.. अजुन असे खूप लेख येऊदेत !! बाकी, समोसा->मि.इंडीया-> माय सन हे रुपांतर आवडलं!! :)
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 07/28/2008 - 10:31 नवीन

सुंदर लेख

जॉर्ज कॉल्डवेल नक्की लक्षात राहील. सुंदर लेख पिडा काका धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 07/28/2008 - 10:45 नवीन

मस्त लेख!

शैलेशराव तुम्ही खूपच सुंदर लिहिता(हे मी सांगायची खरंच काही जरूरी आहे काय?). तिन्ही भाग वाचले . तुमची शैली अतिशय ओघवती आहे आणि प्रसंग वर्णन करण्याची हातोटी विलक्षण आहे. तुमच्या वर्गात मी देखिल बसलो होतो असे वाटण्याइतपत जीवंत वर्णन झालंय(ऑरगॅनिक केमेस्ट्री कशाशी खातात हे देखिल मला माहीत नाही ही गोष्ट अलाहिदा). असेच लिहिते राहा आणि आम्हाला तुमच्या उत्तमोत्तम अनुभवात सामील करून घ्या हीच विनंती. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीमंत दामोदर पंत Mon, 07/28/2008 - 10:52 नवीन

भाग्यवान

भाग्यवान आहात तुम्ही........ असा गुरू मिळायला फार भाग्य लागतं............ खूप नशिबवान आहात...............
  • Log in or register to post comments
ड
डोमकावळा Mon, 07/28/2008 - 10:53 नवीन

जबरदस्त...

पिडा काका... काय अफलातून व्यक्तीमत्व असेल याची फक्त कल्पना करू शकतो..
माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! मी ते कधीच सहन करू शकणार नाही....
खरच, काय प्रामाणिक मत आहे... सोळा आणे पटलं. धन्य तो जॉर्ज.... काका तुमच्या पुढच्या लेखनाची आतुरतेने वाट पहातोय... - डोम...
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 07/28/2008 - 11:05 नवीन

पिडां भाऊ,

पिडां भाऊ, मी हा प्रतिसाद उभा राहून टंकत आहे. आंतरजालावर 'स्टँडींग ओवेशन' बहुधा असेच द्यावे लागेल. तुमचा लेख तर आवडलाच, पण जॉर्ज कॉल्डवेल तर ग्रेटच. जो माणूस खरी ज्ञानसाधना करतो तोच असं काही बोलू शकतो. मला पु.लं. च्या अपूर्वाई मधे उल्लेखलेल्या प्रसंगाची आठवण झाली. युद्धावर निघालेल्या विद्यार्थ्यांना एक वयोवृद्ध प्रोफेसर निरोप देत असतात. तो मुलगा गंमत म्हणून त्यांना विचारतो, "सर, तुम्ही नाही येत लढायला?" तेव्हा ते विचारतात, "तू का जातो आहेस लढायला?" विद्यार्थी उत्तरतो, "मानवतेच्या / संस्कृतीच्या, संरक्षणासाठी, टू प्रोटेक्ट द सिव्हिलायझेशन". त्यावर ते म्हणतात "आय ऍम द सिव्हिलायझेशन, माय सन." पुढे पु.लं. म्हणतात की हे आधुनिक ऋषिच आहेत. पिडां, मला तुमच्या जॉर्ज मधे असाच एक आधुनिक ऋषि दिसतो आहे. =D> =D> =D> =D> =D> बिपिन.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 07/28/2008 - 11:16 नवीन

ऋषीच

प्रभावी रेखाटले आहे व्यक्तिमत्त्व. प्रभावी व्यक्तिमत्त्व रेखाटले आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 11:23 नवीन

एक

एक साठीच्या घरातला, स्वत:च्या विषयातली अंतिम पदवी असलेला, आपल्या व्यवसायाचा चाळीस वर्षांहून जास्त अनुभव असलेला, स्वत:चं केमिस्ट्रीमध्ये संशोधन अनेकवेळेला प्रसिद्ध केलेला हा शास्त्रज्ञ, हा प्रकांडपंडित, हा ज्ञानाचा हिमालय, मला सांगत होता की अजून मी प्रोफेसर झालेलो नाही. नतमस्तक! डांबिसा, केवळ अप्रतीम व्यक्तिचित्र. जियो.....! आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 07/28/2008 - 11:26 नवीन

तपस्या!

तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे." +++१ बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! माझ्यामध्ये अजून तरी प्रोफेसिंगची, प्रयोग करण्याची जरूर न भासता माझी मतं अचूकतेने जाहीर करण्याची क्षमता आली नाहीये. जेंव्हा ती क्षमता येईल तेंव्हा मी जरूर स्वतःला प्रोफेसर म्हणवून घेईन. पण तोपर्यंत स्वतःला तसं म्हणवुन घेणं ही मी माझ्या प्रोफेशनल प्राईडशी केलेली प्रतारणा ठरेल!! ह्याला तपस्या म्हणायचं नाही तर काय म्हणायचं! बाकी, समोसा->मि.इंडीया-> माय सन हे रुपांतर आवडलं!! स्वाती
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 07/28/2008 - 12:09 नवीन

सुरेख

व्यक्तिचित्र, अतिशय आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
व
विष्णुसूत Mon, 07/28/2008 - 12:12 नवीन

ग्रेट..

दोन दिवस वाट पहात होतो ह्या भागाची !! ग्रेट...
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 07/28/2008 - 12:28 नवीन

अप्रतिम....

वाचताना तोच टोन कायम राखण्यात यशस्वी ठरलात काका ! जबराट. लै भारी ... (पुण्यात तरी) शिक्षणाच बाजारूपण वाढत चाल्लय आणि हे शिक्षक काय ट्युबा पेटवतात हे सांगणे न लगे !! (कचोरीच्या शोधातला समोसा) कुबड्या खवीस
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Mon, 07/28/2008 - 12:46 नवीन

निशब्द

तिन्हि भाग वाचुन प्रतिक्रिया द्यायला काहि शब्द्च नाहित. इतके सुन्दर वर्णन.  अशि माणसे  परत परत भेटत नाहित सलाम त्याना.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 07/28/2008 - 12:56 नवीन

वा!

डांबिसशेठ, सुंदर व्यक्तीचित्र.. आवडले.. (वाचक) केशवसुमार स्वगतः ह्या मानस शिष्याला शिकवायला आता असा अरडाओरडा करावा लागणार की काय? #o
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 07/28/2008 - 23:07 नवीन

हेच म्हणते..

मस्त आहे व्यक्तीचित्र एकदम. आपल्या या गुरूसमोर आम्ही नतमस्तक. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
भ
भडकमकर मास्तर Mon, 07/28/2008 - 13:51 नवीन

बट आय कॅन

बट आय कॅन नॉट प्रोफेस ऑन केमेस्ट्री,.......यट! कॉल्डवेल बाबा भन्नाट आहे.... मला पण अगदी त्याच्या पाया पडावेसे वाटले... असे शिक्षक मिळायला नशीब लागते.... बेस्ट.... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Mon, 07/28/2008 - 14:23 नवीन

सुरेख

तिनही भाग सलग वाचले. अप्रतिम लेखन. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 07/28/2008 - 15:00 नवीन

नितांतसुंदर शेवट

>>"यू इमोशनल इंडियन्स!!!" मी अश्या प्रकारे व्यक्त केलेला आदर कसा स्वीकारावा हे न कळून तो गुरगुरला, >>"नाऊ गो! गेट आउट ऑफ माय ऑफिस, समोसा!! टेक युवर करीयर सिरियसली!!! द होल वर्ल्ड इज वेटिंग फॉर यू!! मेक मी प्राऊड, माय सन!!!" अत्यंत सुरेख शेवट केलाय, जॉर्ज मनात येउन बसला अगदी.
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 07/28/2008 - 15:02 नवीन

अहाहा...

"तुम्ही वर्गात जे शिकलांत त्याचा वापर करून, एप्लीकेशन करून हा पेपर सोडवायचा तुमचा प्रयत्न किती सफल होतोय ते मला बघायचं होतं. उद्या तुम्ही बाहेरच्या जगात जाल तेंव्हा तुम्हाला आपापल्या क्षेत्रामध्ये या ज्ञानाचा वापर करून प्रश्न सोडवावे लागतील. नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे."
कधी कळेल (किंवा पटेल) हे इथल्या लो़कांना? अजूनही (कित्येकदा कालबाह्य) पुस्तकी शिक्षणावरच भार..त्यातून आपल्या 'टिपीकल' परिक्षा म्हणजे अजून एक मुर्ख प्रकार...जाऊ दे! आम्ही पी.जी. साठी C-DAC पुणे मधे असतांना एक वेगळा 'मास्तर' मिळाला होता...स्वतः IITan होता, पण तसा एकदम माणसालेला....फ्रेंडली. तसा शिकवल नाहिच फार त्याने काही.....भरपूर गप्पा मारायचा...फॉन्ट मधे मॅक किती सरस आहे...टी. टी. फ. चे टाइप्स...मायक्रोसॉफ्टच्या चोर्‍या आणि असेच बरेच काही. त्यामुळे बाकी गोष्टी लॅब मधेच करून शिकाव्या लागत...दिवसाला १४ तासांचे अधिकृत वेळापत्रक...पण त्यात काम कधीच पुर्ण व्हायचे नाही....मग रात्री-बेरात्री असेच काम करत बसायचो. त्या मास्तरने लॅब पेपर मात्र असाच अफलातून दिला....शिकवलेले कसे वापरता येईल ते तपासणारा....शिवाय त्यात मी काय बघणार ह्याचेही थोडे तपशील...थोडा ठोबळ सांगाडा....१०-१२ ओळींचा एक साध्या इंग्लिशमधला परिच्छेद हा आमचा प्रोग्रॅमिंगचा पेपर....फाटली होती चांगलीच...बरेच निघून (> ९०%) गेले....आम्ही थोडे झगडत राहीलो. खूप उत्सुकता होती काय होईल म्हणून...मला बघायचे होते मला काय आणि कशा प्रतिक्रिया मिळाल्या....पण शेवटी बाकी मुलांच्या सांगण्यावरून ती परिक्षाच रद्द झाली...आणि मग नंतर आम्ही एक नेहमीसारखा पेपर दिला..... पिडा-काका, अपून तो एकदम फॅन हो गया....गावित मास्तर असो किंवा जॉर्ज कॉल्डवेल, तुम्ही गुरुंच्या बाबतीत एकदम लकीच हा, नाहितर आम्ही! :) धोंडॉपंतांना विचारले पाहिजे काय योग असतात कुंडलीत! :)) मनिष अवांतर - स्वतःचे कसले योग घेऊन बसलायस लेका, 'शिष्य' चांगला नको का मुळात? ;)
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 07/28/2008 - 17:08 नवीन

सरस

व्यक्तिचित्र. आवडले. व्यक्तिमत्त्व पुढे येऊन उभं राहिलं. परफेक्ट फ्लेश आऊट. क्रमशः प्रकार मात्र रुचला नाही. आस्वादात खंड येतो. हे टाळता येईल का?
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 07/28/2008 - 17:47 नवीन

खुप सह्ह्ही.

पिडा काका, लेखाचा शेवट नितांत सुंदर केला आहे. मनात घर करून राहतात जॉर्ज आणि त्याची शैली तर केवळ अप्रतिम. विद्यार्थ्याना असेच गुरू भेटले पाहिजेत आणी अशाच परिक्षा हव्यात ज्यातुन कल्पनेला वाव मिळेल. :)
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Mon, 07/28/2008 - 19:24 नवीन

व्यक्तिचि

व्यक्तिचित्र, अतिशय आवडले. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Mon, 07/28/2008 - 20:48 नवीन

आंतरजालावर 'स्टँडींग ओवेशन' बहुधा असेच द्यावे लागेल.

बिपीनजीं प्रमाणे, आपलेही स्टँडींग ओवेशन, डांबीसरावांना आणी त्यांच्या महान गुरूंना! आमच्या देशात असे शिक्षक आणी अशी शिक्षण व्यवस्था कधी येणार? जाता जाता फार पूर्वी वाचलेली अशीच एक गोष्ट (अर्थात अमेरिकन विद्यापीठातली) आठवली: एका प्रकांडपंडित विद्यार्थीनीने फिलॉसॉफीचा पेपर कोराच दिला. आपल्या गुरुंना तीने सांगीतले की, आज काही लिहावेसेच वाटत नाही. तरिहि त्या गुरुने तीला उत्तम गुणांनी पास केले. भारतात हे घडणे अशक्य. आमची शिक्षण व्यवस्था स्वतंत्र विचारबुद्धीला वाव देत नाही. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 07/28/2008 - 22:44 नवीन

एका

एका प्रकांडपंडित विद्यार्थीनीने फिलॉसॉफीचा पेपर कोराच दिला. आपल्या गुरुंना तीने सांगीतले की, आज काही लिहावेसेच वाटत नाही. तरिहि त्या गुरुने तीला उत्तम गुणांनी पास केले. आयला! हे तर लै भारी! हीदेखील एक फिलॉसॉफीच म्हणावी काय? :) की ती विद्यार्थीनी दिसायला लै भारी होती अन् तिच्या गुरुचा तिच्यावर जीव जडला होता? कशावरून ही फिलॉसोफी शक्य नाही? :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
स
संजय अभ्यंकर Tue, 07/29/2008 - 00:05 नवीन

की ती विद्यार्थीनी दिसायला लै भारी होती ....

(स्वगतः हिंदुस्थानात शक्य आहे... प्रा. डॉ. बिरुटेसरांना विचरले पाहिजे) असे काही त्या गोष्टित दिले नव्हते. ही तत्ववेत्ती फार प्रसिद्ध आहे. च्यायला तिचे नांव तोंडावर काही येत नाही (तिचे नांव गेर्त्रुड असे काहिसे.., आडनांव काही आठवत नाही) संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2008 - 22:51 नवीन

शिक्षणाची प्रचंड हेळसांड

(की ती विद्यार्थीनी दिसायला लै भारी होती .... स्वगतः हिंदुस्थानात शक्य आहे... प्रा. डॉ. बिरुटेसरांना विचरले पाहिजे) खरं म्हणजे काय शक्य नाही,अनेक उदाहरणं सांगता येतील. पण नाचक्की माझ्या व्यवसायाची, शिक्षण व्यवस्थेची होईल म्हणुन थांबतो !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
ध
धनंजय Tue, 07/29/2008 - 23:17 नवीन

गर्ट्रूड स्टाईन

तिच्याबद्दल ही कथा मला पूर्वी माहीत नव्हती. गूगलून काढली. (पण ती त्या प्राध्यापक जेम्स यांची "स्टार" विद्यार्थिनी होती. त्यामुळे परीक्षेत उत्तम मार्क आदल्या परीक्षांच्या/चर्चांच्या जोरावर दिले होते.) (कॉलेजनंतर गर्ट्रूड स्टाईन हिचे ऍलिस बी टोक्लास या बाईशी प्रेमसंबंध जुळले ते आयुष्यभरासाठी. बहुतेक कॉलेजमध्येही प्राध्यापक जेम्स यांच्याशी केवळ अभ्यासपूर्णच नाते असावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय अभ्यंकर
झ
झकासराव Mon, 07/28/2008 - 20:53 नवीन

वा! अफाटच

वा! अफाटच आहे की जॉर्ज :) अवांतर : आम्हाला अप्लाइड मेकॅनिक्सला किंचित जॉर्ज होता. फक्त भारतीय. नाव बी डी देशपांडे. भन्नाट मास्तर होता. पोराना अर्थातच आवडत नसे. कधीच कौतुक करत नसे कोणाचच. मी माझ्या वर्गात त्या विषयात टोपर आलो होतो. म्हणुन माझा एका मित्राने त्या सराना माझे मार्क सांगितले तर त्यानी अरे आमची एक चुक झाली रे, ह्यावर्षी पेपर तपासायला मी नव्हतो अस एक सेकंद देखील वेळ न लावता सांगितल होत. वर चॅलेन्ज दीलं होत की ह्यावर्षी मी स्ट्रेन्थ ऑफ मटेरिअल शिकवणार आहे आणि तु असेच मार्क पाडुन दाखव :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Mon, 07/28/2008 - 23:54 नवीन

आमच्या देशपांडे सरांचे भाऊ

असतील. ती ही अशीच वल्ली होती. स्ट्रेंथ ऑफ मटेरीयल साठी एकदा खुल्या पुस्तकांची चाचणी घेतली होती. बरीच आधी कल्पना दिली होती. तुम्हाला काय पुस्तक वापरायचे, कोणत्या नोट्स घ्यायच्यात त्या घेऊन बसा पण कोणी कोणाशी बोलू नका. रीझल्ट - ८० पैकी १० पोरे पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
अ
अभिज्ञ Mon, 07/28/2008 - 23:46 नवीन

अप्रतिम

डांबिसकाका, व्यक्तीचित्र अफ़लातून जमले आहे. लिखाणाची शैली सुरेखच. अजुन लेख येउ द्यात. अभिनंदन अभिज्ञ
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 07/29/2008 - 00:22 नवीन

भन्नाट व्यक्तिचित्र पिडाकाका!

जॉर्जऋषींच्या आश्रमातली आपली ज्ञानसाधना परिपूर्ण झालेली वाचून धन्य झालो! :) (स्वगत - सोमरसाची दीक्षा पिडाकाकांनी ह्या ऋषींकडूनच घेतली की काय? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 07/29/2008 - 00:43 नवीन

अति सुंदर

नुसतं शिकण्याला महत्त्व नाही, त्या ज्ञानाच्या ऍप्लीकेशनला महत्त्व आहे. वा ! धन्य तो गुरू आणि धन्य तो शिष्य ! जियो डांबिसकाका ! आम्ही पार्ट टाईम शिक्षकी एकेकाळी केलेली असल्याने आम्हाला ह्या विषयांत खूप आवड आहे. (असे, त्याविषयी पुन्हा कधीतरी.) तुमचा मास्तर आम्हाला खूपच आवडला. - सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवराव Tue, 07/29/2008 - 01:22 नवीन

अप्रतिम - - - -!

केवळ अप्रतिम ! तुमची लिहीण्याची शैली , लेखाचा विषय , कथा नायकाचे स्वभाव वैशिष्ट्य - - - सर्व अप्रतिम. आमच्याकडे १२ वी ला शिकवीणारे सुद्धा स्वतःला 'प्रोफेसर ' म्ह्टले जावे अशा अपेक्षेत असतात. लेखा बद्दल अभिनंदन !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 07/29/2008 - 04:17 नवीन

सर्वच भाग

सर्वच भाग सुंदर आहेत काकाश्री.. मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Tue, 07/29/2008 - 04:25 नवीन

उत्तम लेख !

आताच दुसरा नि तिसरा भाग एकदम वाचले. खूप आवडले नि अंतर्मुख करणारे वाटले... आगे बढो , समोसा ! :-)
  • Log in or register to post comments
प
पल्लवी Tue, 07/29/2008 - 22:29 नवीन

सही :)

काका, मला खरंतर टंकायचा भारी कंटाळा.. खूप काही आवडलं तरी ते मनातच राहतं.. पण आज रहावलं नाही.. तुमचा लेख अप्रतीम झाला आहे.. अ-मे-झिं-ग !!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/29/2008 - 22:47 नवीन

वा !!!

डांबिसराव, गुरुजी आवडले आणि त्या गुरुजींचा शिष्यही !!! अप्रतिम व्यक्तिचित्र !!! अवांतर : नुसती पीएच.डी पदवी मिळाल्यावर नावासमोर प्रा.डॉ. लावून मिरवणारे कुठे आणि प्रोफेसर असूनही जॉर्ज म्हणवून घेणारा प्रा. कुठे !!!
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Wed, 07/30/2008 - 00:40 नवीन

व्यक्तिचित्र

आवडले!
  • Log in or register to post comments
स
साती Wed, 07/30/2008 - 12:38 नवीन

दोन्ही!

जॉर्ज आणि त्यांच्या विद्यार्थ्याची लेखनशैली, दोन्ही आवडले. साती
  • Log in or register to post comments
स
सुवर्णमयी गुरुवार, 07/31/2008 - 03:12 नवीन

अतिशय सुंदर

व्यक्तीचित्र अतिशय आवडले. लेखन आणि शैली दोन्ही प्रभावी. शुभेच्छा
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 07/31/2008 - 08:35 नवीन

सर्व भाग

सर्व भाग आत्ताच वाचून काढले. एकदम भारी लिखाण!!! http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/31/2008 - 18:52 नवीन

शिक्षकच राष्ट्र घडवतात ...

आपलेही स्टँडींग ओवेशन, डांबीसरावांना आणी त्यांच्या महान गुरूंना! असा हा जॉर्ज म्हणजे जणु एक आधुनिक ऋषिच ... डांबिसकाकांचा "जॉर्ज" एकदम अत्युत्तम म्हणावा असा . वाचताना मी जणु त्यात हरवुन गेलो होतो व जणु त्या क्लासचा एक भाग झालो होतो. कधीकधी वाटायचं की आत्ता हा माणुस आपल्यावर ओरडेल ... डांबिसकाकांच्या शैलीला सलाम ... असे शिक्षकच हे उत्तम विद्यार्थी व पर्यायाने राष्ट्र घडवतात ... लेख वाचुन पुर्ण झाल्यावर मला पण ते पुलंचे "आय ऍम द सिव्हिलायझेशन, माय सन." आठवले. शिरीष कणेकर पण याचा नेहमी उल्लेख करतात ... अवांतर : यावरुन मला आमचे १२ चे भौतीकशास्त्राचे "अभ्यंकर [ याला पर्याय नाही, ] मास्तर " आठवले. त्यांनी क्लासच्या पहिल्याच दिवशी फळ्यावर " हे माझे फळ्यावरचे पहिले आणि शेवटचे वाक्य " असा मजकुर लिहला होता. पण त्यानंतर त्यांनी जे फिजीक्स शिकवले त्याला तोड नाही ... त्याच्या प्रयत्नांमुळेच मी त्या विषयात ९९ मार्क घेऊ शकलो ... त्यांचे बोलणेही असेच फटकळ व सडेतोड. माझी किती वेळा इज्जत काढली याची मोजदोज नाही ... पण काय सांगु , तो माणुस म्हणजे ग्रेटच ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 04/05/2013 - 09:43 नवीन

जबर्दस्त

पुन्हा कधी पिडांकाका लिहीतिल तो सुदिन. केव्हा लिहीताय मग ?
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 04/09/2013 - 15:11 नवीन

भारतात चांगले प्रोफेसर

भारतात चांगले प्रोफेसर असल्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा