अहो... हे सर्व ठीक समजले तरी डॉक्टरने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेल्या तपासण्या / परीक्षण यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी / रीप्रोड्युसिबिलिटी , आणि ज्योतिषाने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेला पडताळा यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी /रीप्रोड्युसिबिलिटीयात ढळढळीत फरक वाटत नाही का?
कार्डिओग्रामवर प्रत्यक्ष त्या प्रवासेच्छुक व्यक्तीच्या हृदयाचा आलेख आणि कुठेही पुन्हापुन्हा पडताळून पाहता येणारे क्लिनिकल कोरिलेशन (मराठी शब्द येत नाहीये आत्तातरी) याविरुद्ध.. त्या व्यक्तीपासून लाखो मैल दूरचे आणि त्या व्यक्तीवरचा स्पेसिफिक परिणाम मोजता न येणारे ग्रहतारे वगैरे यात काहीच फरक नाही?
तात्विक दृष्ट्या सगळंच शक्य आहे हो.. पण आयुष्यात जगताना "सारासार" विवेक म्हणून काही ठेवायचाच नाही का? की तांत्रिक वकिली मुद्दे काढत रहायचे?
आँ.. ? मीही तेच म्हणतोय.. पण इथे तुलना दिसली म्हणून म्हटलं...
डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही.
(अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. )
तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.
आपण ज्योतिषशास्त्राचे काही फायदे आहेत हे क्षणभर मान्य करू. ते तसे प्रत्यक्ष नाहीत हे सहज सिद्ध करता येईल. एक उदा. घेऊ. हे शास्त्र (असेल तर) आपल्याला पांगळे बनवते. सारासार विचार करायची क्षमता नष्ट करते. अडचणींवरचे यांचे उपाय भयंकर असतात. ते माणसाला दुर्बल बनवतात. त्याचे उदाहरण आपण वर कोणीतरी दिलेले आपण बघितलेच. माणूस एकच असतो पण वेगवेगळ्या पद्धतींनी ते सांगितले की आपले भविष्य बदलते हे मला न उलगडणारे कोडे आहे.
या शास्त्राचा समाजावर झालेला सगळ्यात घाणेरडा परिणाम आपल्याला पत्रिकेतील मंगळ या ग्रहाने दिसून येतो. या ग्रहाने किती मुलींची लग्ने राहिली हा संशोधनाचा विषय आहे. हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे यावर आता लोक विश्वास ठेवू लागले आहेत आणि शेवटी आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हे त्यांना पटू लागले आहे. या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही.
पत्रिका पाहून जर सैन्य हालचाली करू लागले, बंदूका चालवू लागले तर जे भविष्य सांगतात त्यांच्या पोरीबाळी त्यांच्या घरात राहतील का ?
लोकांच्या काहीवेळा असणार्या मनाच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेण्याचे हे एक धंदेवाईक शास्त्र आहे. तुमच्या खिशातील पैसे अलगद तुमच्याच संमतीने काढून घ्यायचे हे एक अत्यंत प्रगल्भ शास्त्र आहे.
मी स्वतः एकदाही पत्रिका बघितली नाही, माझ्या मुलानेही नाही, व माझ्या मुलीनेही नाही. काहीही बिघडले नाही. जी संकटे आली ती तशीही आलीच असती.
आज जगातील सगळ्यात जास्त अनुयायी असणारा धर्म मुसलमान धर्म आहे. यांच्या धर्मात भविष्य पहायला बंदी आहे. कुठे त्यांचे काय बिघडले ? जगावर राज्य केले ते काय पत्रिका बघून ? उलट आपले राजे मुहूर्त/पत्रिका पाहून सैन्य हालवायचे त्याचा परिणाम आपण बाघितलाच आहे. खरे तर आपल्या सगळ्या शंकराचार्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून हे सगळे थोतांड आहे असे जाहीर करायला पाहिजे.
माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......
@माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची ...>>> अॅक्सेप्ट सर,,आणी संपुर्ण प्रतिसादास पूर्ण अनुमोदन
नाही... यात चांगले आणि वाईट याच्यातला फरक जो जाणतो त्याने वाईट चिंतू नये व वाईट करू नये एवधाच अर्थ निघतो. मी तसे केले तर माझे ही वाईट होईल असा नाही. असे वाटले की भिती आली मग भविष्य/पत्रिका आल्या.....
चिंतणे व करणे यात काही फरक आहे की नाही. समोरून सुंदर स्त्री आली तर मुका घ्यावा असे वाटणे व तो घेणे यात फरक असतो. पाहिल्यात तोटा तसा काहीच नाही. दुसर्यात फायदा इतकाच की ७ सालकी सजा झाल्यावर चिंतना साठी भरपूर वेळ. वाईट करू नये. चिंतण्याने जग चालत
नाही त्याचे कृतीत पर्यावसान व्हावेच लागते. धरणात साठलेले पाणी व वहाते पाणी यात हाच फरक आहे. ईच्छा जर घोडा असती तर भिकार्यांची
त्यावर वस्ती !
म्हणून पहिले चिंतायचे नाही. जर थोबाडीत बसणार असेल तर ते वाईटच. ते चिंतले नाही तर मग दुसर्याचा प्रश्न येत नाही. आपल्या argument मधे contradiction आहे का ? बहुतेक नसेल..
कितीही गप्पा आदर्शाच्या केल्या तरी आपल्या मनाशीच संवाद करावा . आपले काळेपण आपल्याला द्रुग्गोचर होते. आपले मन आपले वैरी.
त्याला वैरी हा शब्द वापरला आहे. आजपर्यंत कधीच वाईट मनात आले नाही असे खरेच आपणा आहोत का ? याचा विचार अत्यंतिक निष्ठेने
करावयास हवा. माणसाच्या स्खलनशीलतेवर खूप संशोधन झाले आहे. "मनाचा शोधाची सुरस कथा " ही माझी आठवण धोका देत नसेल तर
द.पा> खाम्बेटे यानी दीर्घ मालिका लिहिली होती.
श्रीराम लागू म्हणतात " इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीने हे चार पायाचे जनावर आता दोन पायावर चालू लागले आहे "
बाडीस..
आपण आपल्या मनाशी संवाद करणं किंवा त्यालाच "चिंतणं" म्हणू.. हे आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे. तेव्हा अमुक काही "न चिंतणे" ही अशक्य किंवा स्वतःलाच फशीवगंडीव करणारी कल्पना वाटते.
संयम फक्त कृतीबाबत असू शकतो.. मनात काय येईल याबाबत नाही.. आणि नसावा.. किंवा आपल्याला तो पर्याय उपलब्ध नाही.
थोतांड किंवा खोट्या गोष्टी जास्त काळ टीकत नाहीत. खोटेपणा लक्षात येताच लोक स्वतःहुनच अशा गोष्टी नाकारतात.
मेडीकल हे शास्त्र असुनही सर्व डॉक्टरांचे निदान समान येत नाही. हा अनुभव जवळ जवळ प्रत्येकाने घेतलेला असतो. काही बाबतीत डॉक्टर स्वतःच सेकंड ओपिनीयन घ्यायला सांगतात, तरी सुद्धा आपण मेडीकल हे शास्त्र आहे यावर शंका घेत नाही. जास्तीत जास्त चुकीचे निदान करणार्या डॉक्टरला खराब डॉक्टर म्हणुन मोकळे होतो.
पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो.
माणूस १२वी सायन्स नंतर चाचणी परीक्षा पास झाल्यावर ६ वर्षे निश्णात प्राध्यापकांकडे कठीण शीक्षण, प्रात्यक्षीक, रेसीडंसी करुन, युनिव्हरसीटीचे सर्टीफिकेट घेउन मग प्रक्टीस चालु करतात. येवढे असुनही अनेक अर्धशीक्षीत / अशीक्षीत वैदु / बोगस डॉक्टर सर्वत्र आपले दवाखाने टाकुन बसलेले आपण ऐकतो.
ज्योतीषी व्हायला ना अशी काही पात्रता लागत, ना कुणाचे सर्टीफीकेट लागत. अशावेळी १ चांगल्या ज्योतीषामागे १०० अर्धशिक्षीत ज्योतीशी असु शकतात. मग ज्योतीषाला बदनाम व्हायला कीती वेळ लागणार?
सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार?
---------------------------
मी स्वतः ज्योतीषी / ज्योतीषाचा समर्थक वगैरे काही नाही. फक्त एखाद्या गोष्टीला सिद्ध व्हायचा / करायचा अवसर न देता थोतांड म्हणणे चुकीचे आहे.
येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का?
भारता बाहेरही अनेक देशांत / संस्कृतीत ज्योतीष पाहीले / वर्तवले जाते. प्रगत देशातील बर्याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत. आधुनीक शास्त्र / संशोधनात आपल्यापेक्षा २५ ते ५० वर्षे पुढे असलेल्या देशांनीही या पुरातन (सो कॉल्ड) शास्त्रांना अद्याप झिडकारलेले नाही .
पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो.
कोणत्याही एका जोतिष्याने प्रेडिक्शनचे चॅलेंज सिद्ध करून दाखवाले तरी चालेल. आहे का कोणी?
सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार?
=)) =))
मालक जरा झोप वगैरे घेऊन येत जा आधी. युनिवर्सीटीत प्रशिक्षण देण्याकरता "शास्त्राचा" सांगोपांग अभ्यास करावा लागतो म्हणलं. कार्यकारणभाव, मुलभुत तत्वं वगैरे सिद्ध करावी लागतात. आलेत मोठे विज्ञान अन जोतिषाची तुलना करायला.
प्रगत देशातील बर्याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत
कोणत्या युनिवर्सीटीतले कोणते प्रोफेसर आहेत हो हे? युगांडात का सोमालियात?
येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का?
तिच्यायला हे काय नविन? १०-१२ वर्षं अभ्यास केल्यावर काय तपोविद्या मिळते का? काय एकेक तत्तज्ञान असतंय पब्लिकचं!
थोतांड आहे हे कळायला दोन तीन तर्क सुद्धा अनेकदा पुरतात. ते सोडा जोतिषामागचं विज्ञान देऊ तर देत कोणाला. मत ते थोतांड आहे का नाही ते सिद्ध कसं करायचं ते पाहू. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ते शास्त्र आहे हे दाखवावं, कारण जबाबदारी त्यांची आहे.
अभ्यासाची गोष्ट काढली की पळपुटेपणा करणे हे ज्योतीषावर विना अभ्यास पिंका टाकणार्यांचे आणखी एक लक्षण.
फिजीक्समधील स्ट्रींग थीयरी, अॅस्ट्रो फिजीक्समधी ब्लॅकहोल थेअरी २ /३ तर्कात प्रमाण किंवा अप्रमाण करा पाहु.
थोडे गुगलुन पाहीलेत तर युरोप / अमेरीकेतील युनिव्हरसीटीतील अशा शास्त्रांचा अभ्यास करणारी डिपार्टमेंटस मिळतील. पण तुमच्या साठी सोमालिया आणी युगाण्डा पुढारलेले / प्रगत देश असतील तर मग बोलणेच खुंटले.
माझे म्हणणे एवढेच की उगीच कुणाचाही दोन तीन तर्कांचा आधारावर आजवर हाजारों / लाखों लोकांनी या क्षेत्रात गेली कित्येक शतके जे काम केले आहे ते निव्वळ थोतांड आहे असे म्हणणे पटत नाही.
जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल.
आणी धागा कर्त्याने कधी कुठल्या चॅलेंजमधुन माघार घेतली होती या वरुन जास्तीत जास्त त्या व्यक्तीचा पळपुटेपणा किंवा त्याचा कच्चा अभ्यास सिद्ध करता येईल. पण ज्योतीष हे थोतांड आहे हे सिद्ध होत नाही.
@जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल.>>> हो ना..? ही भुमिका तुंम्हाला पटते ना..? मग येथिलच एक सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे(वर/खाली १/२ प्रतिसाद आले आहेत ते..) यांनी आपण म्हणता त्या प्रमाणे अभ्यास करुनच या कथित शास्त्राची निरर्थकता सिद्ध केली आहे... वाचा बर तुंम्ही त्यांच सगळं लेखन...आणी इथेच पुन्हा सांगा बरं... बघु तुंम्हाला तरी हे जमतं का ते..?
http://faljyotishachikitsa.blogspot.in/
त्यांच्या सहितही या लिंक्स आहेतच... इथुन जा किंवा तिथुन जा... फक्त समंजसपणाने वाचा म्हणजे झालं.... :-)
कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......
मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भिति कुनाची पर्वा बी कुनाची
या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही.
हा भाबडा आशावाद वाटला.
माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......
तुमचा तरुण* मित्र** म्हणून सहमत.
*डोक्यावरचे सगळे केस जायच्या मार्गावर असले तरी मी स्वतःला तरुण समज्तो.
** मी तुम्हाला मित्र मानतो.
प्रतिसाद आवडला.
बाकी वरचे काही अफाट प्रतिसाद वाचून हैराण झालो.
अर्थात ज्योतिष हा ज्यांनी व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे त्यांना ज्योतिषाच्या बाजूने बोलणे भाग आहे. घोड अगर घाससे दोस्ती करेगा तो खाएगा क्या ? हेदेखील खरेच.
इथे बरेच व्यावसायिक ज्योतिषी असावेत असे वाटते.
"वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? "
म्हणजे हे धैर्य ज्योतिषाकडून मिळू शकेल असा अर्थ गृहीत धरतो.
अशा वाक्याने ज्योतिष हे "प्लासेबो"सारखे उपयोगी आहे असा अर्थ ध्वनित होतो. म्हणजे याची मर्यादा प्लासेबो इफेक्टइतकीच (गोड किंवा कडू, पण कोणतेही औषधी तत्व नसलेली प्लेन गोळी मानसिक परिणामासाठी / उभारीसाठी देणे.) आहे हे नकळत का होईना, स्पष्ट केल्याबद्दल आनंद वाटला.
साला आपण तर दोन क्वार्टर नंतर जगाचे भविष्य घडवायला तयार असतो. माणसाचे काय घेऊन बसलात ?
दोन-चार पेग होत नाहीत तोवर तुमचे ते शनी, राहू, चंद्र वैग्रे असे आमच्या आजूबाजूच्या खुर्च्यांवरती येउन बसायला लागतात.
बाकी भविष्यावर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारे दोघेही कायम हाताला चूना लावून का तयार असतात हे न सुटणारे कोडे आहे.
आम्हाला तर वाटले होते आमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात डान्या आणि चौथ्या घरात धम्या वेटोळे मारुन बसला आहे म्हणून. ११/१३ आणि १५ ला अनुक्रमे मकी, अदिती आणि प्रिमो असाव्यात. सप्तम स्थानी नालायक निळ्या असणार. गेला बाजार सोत्रि सध्या वक्री असणार.
दोन्ही बाजू पटल्या तरी 'बेंबट्या' होणे टाळता येईल असे वाटते.
('असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी' हा खुळचटपणा आहे. 'लाथ मारीन तिथे पाणि काढीन' हा अभिनिवेशही अनाठायी आणि अवास्तव आहे. या दोन्ही गोष्टी सहज अनुभवता येतात. त्यामुळे प्रारब्ध/ नशीब/ नियती आहे हे मान्य करत कर्मस्वातंत्र्याचा सदुपयोग करण्यासाठी प्रयत्नशील राहणे हा सुवर्णमध्य आहे असे काहींच्या लक्षात येते. हा सुवर्णमध्य साधत असताना ज्योतिष्यशास्त्राचा 'गाईडलाईन'सारखा उपयोग करणारे/ मला अशा गाईडलाईनची फारशी गरज नाही असा निष्कर्ष काढलेले विवेकी लोकही बरेच असतात. कुठलाच अभिनिवेश नसल्याने हे लोक या विषयावर फारसे मतप्रदर्शन करत नाहीत आणि एकांगी मते वाचून फारसे भारावून जात नाहीत/ विचलीत होत नाहीत. त्यांचा बेंबट्या होत नाही. असो.)
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये.
जयंत कुलकर्णी काकांचे म्हणणे १००% आवडले आणि पटले. :)
बाकी काही बाबतीत गणपा म्हणतायत अगदी तेच होत आहे. दोन्ही बाजुचे मुद्दे पटतायत.
शेवटी, कोणती गोष्ट कुठपर्यंत खेचायची हे ज्याने त्याने कुवतीनुसार ठरवावे. उठसुट भविष्ये, भाकिते बघून अंदाज बांधून जगणे माणसाला निष्क्रीय आणि विचारहीन बनवते, हे शहाण्याला सांगणे न लगे. :)
आणि विज्ञानाच्या अति आहारी जाउन कोणी स्वतः आत्महत्या करुन कुटुंब संपवलेले कुठे वाचण्यात आले नाहीये अजुन...... :)
नावडतीचे मीठ अळणी!
‘नावडतीचे मीठ ‘अळणी’ म्हण सहज आठवली...
पुरुषांना एक आवडती तर दुसरी नावडती असे असते. निदान खाण्याच्या बाबतीत तरी. एक आई व दुसरी पत्नी. पैकी कोणीतरी आवडते असेल तर दुसरे नावडते ठरते.
एकीचा स्वैपाक मिळमिळीत तर दुसरीचा चवदार वाटतो. नावडतीने कितीही मनलाऊन पदार्थ बनवला तरी त्यात काहीतरी उणे काढले जाते असे म्हण सुचवते. असो.
तीच गोष्ट अन्य ठिकाणीही लागू होते असे व्यवहारात दिसते. एखाद्या गोष्टीचा तिटकारा निर्माण झाला की त्याला नावे ठेवण्यासाठी मनात कल्पना विस्तार सुरू होतो. नाडी ग्रंथांना असेच नावडतेपण सहन करावे लागते.
नावडतीच्या स्वयंपाकातील मीठासारखा पदार्थ, जो तयार होण्यात नावडतीचा अजिबात संबंध नसतो, तरीही तिला बोल लावायला ते कारण सोईचे जाते म्हणून वापरले जाते. म्हणीत निदान पदार्थाची चव घेऊन म्हटले जाते असे सूचित होते. नाडी ग्रंथाबाबत (नावडतीच्या) कथनांची (चव) अनुभव घ्यायची तसदी न घेता नाडीतील संकल्पनांचे ‘मीठ अळणी’ म्हणून संभावना करताना पाहून ती म्हण अन्य कारणांना देखील कशी चपखल लागू पडते याचा प्रत्यय येतो.
नाडीग्रंथावर एक कार्यशाळा पुणे मुक्कामी झाली. इच्छुकांनी त्यात काय घडले हे समजून व्हायला काय हरकत आहे. निदान नाडीग्रंथांचे मीठ अळणी आहे का नाही याचा अनुभव येईल.
माझा अनुभव येथे देऊ इच्छीतो,
मी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीषाची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पट्ट्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पट्ट्यांवर काही तरी कोरलेले मला दिसत होते.
त्याने पहीली पट्टी काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली.
मी - हो.
तो - आईचे नाव अमुक होते.
मी - नाही.
त्याने ती पट्टी ठेवून दुसरी काढली.
तो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले.
मी - नाही.
त्याते ती पट्टी ठेवून तिसरी काढली.
वडीलांचे नाव अमुक आहे.
मी - हो.
भाऊ सरकारी नोकरीत आहे.
मी - हो.
बायको अमुक अमुक नावाची आहे.
मी - हो.
आता तो म्हणाला की पट्टी मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले. तिथल्या तिथे.
माझ्या बद्दलचे सगळे आराखडे बरोबर होते. माझे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले.
काही गोष्टी आता (६ वर्षाने) कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू.
मला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.
मी देखिल साधारण २ वर्षांपुर्वी माझा अनुभव इथे लिहिला होता.
आणि अत्तादेखिल सांगू शकते, की त्यावेळेस त्यांनी ( नाडीपट्टीवाल्यांनी) 'काही गोष्टी अत्ता सांगता येणार नाहीत', असे सांगून माझेच भले केले होते; फक्त ते मला तेंव्हा कळत नव्हते. मी जाम वैतागले होते..
असो. वैयक्तिक अनुभवांची चर्चा इथे नको.
आपले अनुभव आपल्याजवळ ठेवावेत. ज्याला गरज असेल त्यालाच सांगावेत, हा शहाणपणा आता माझ्याकडे आहे.
वाचासिद्धी प्राप्त असलेल्या सत्पुरूषांची भाकिते तंतोतंत खरी झाल्याचे काही विलक्षण अनुभव माझ्या काही परिचितांना आणि मलाही आलेले आहेत.
(सगळे योगायोग असतात असे म्हणणार्यांशी वाद घालणे/ कुठली आव्हाने वगैरे स्वीकारणे/ संख्याशास्त्रीय पुरावे गोळा करणे इ. मधे स्वारस्य नाही.)
तुमच्या सारखाच अनुभव मला १९६६ साली आला आहे. मी पक्का चिकित्सक माणूस आहे. त्याने सांगितलेले भविष्य नव्हते पण जो भूतकाळ त्याने आमचा आम्हाला पट्ट्यावरून सांगितला तुआत १९४६ सालच्या घटनेचा उल्ल्लेख होता . ते कोडे मला अजून उलगडलेले नाही. मी चिकित्सक असूनही इमानदारीत कबूल करतो.
सोनी टि.वी. किंवा तसल्यास कोठ्ल्यातरी च्यनेलवर निर्मल बाबा का दरबार नावाचा कार्यक्रम असतो . तो कोणी पहाते का ?
मी तर त्याचा फॅन आहे.
एवढा ऊत्तम " विनोदी रिअॅलिटी शो " कोणताही नाही.
प्रतिक्रिया
अहो... हे सर्व ठीक समजले तरी
अॅपल आणी ऑरेंज
आँ.. ? मीही तेच म्हणतोय.. पण
थोतांड....
प्रतिसाद आवडला आणि पटलाही
@माझी तरूण मित्रांना कळकळीची
कुणाचे वाईट
नाही... यात चांगले आणि वाईट
मी जरा दुरुस्त करू का ?
म्हणून पहिले चिंतायचे नाही.
मन वढाय वढाय
+१
थोतांड किंवा खोट्या गोष्टी जास्त काळ टीकत नाहीत
हं?
अभ्यासाची गोष्ट काढली की पळपुटेपणा
!!
या धाग्याच्या लेखकाने अशाच
चॅलेंज नाही हो
@जर कुणी लायक व्यक्तीने
मन सुद्ध तुझं
+१ आणि -१
प्रतिसाद आवडला. बाकी वरचे
धन्यवाद युयुत्सु!
बुडत्याला काडीचा आधार
"वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून
लेखाबद्दल आपले आणि प्रकाश
खी खी खी
.
काय बोल्ता ?
माताय सध्या मिपावरच्या चर्चा
मालक
हम्म
क्या कही! व्वा:
तुमचही म्हणणं पुर्ण पणे पटलं.
!!
स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास
नावडतीचे मीठ अळणी!
धन्य झालो.
तु एकटाच का आख्खा धागाच धन्य
मी अनुभव घेतला आहे
मी अनुभव घेतला आहे
मी देखिल साधारण २
आपला दोन वर्षा
+१
चितळे बाबू !
मला पण नाही समजले
येड्याचा बाजार नुसता!! बाकी
घ्या
तुम्ही मी माराठी वरील
निर्मलबाबा का दर्बार : एक अवांतर.
Pagination