चुकवू नये अशी - कहानी
अर्णब बाग्चीने तो जिथे राहतोय असं सांगितलेलं असतं ते गेस्टहाऊस. एकदम बकाल. एका अरुंद गल्लीच्या शेवटी असलेलं. गेस्टहाऊसचा मालक म्हणतो अर्णब बाग्ची नावाचा माणूस कधी तिथे राहिलाच नाही. विद्या मात्र नवर्याने सांगितलेल्या गेस्टहाऊसच्या आतल्या खाणाखुणा बरोबर सांगते. अर्णब बाग्ची तिथे राहायला नव्हता यावर व्यवस्थापक ठाम .सगळेच गोंधळलेले. विद्या आपल्या नवर्याच्याच खोलीत म्हणजे रूम नंबर १५ मध्ये राहायचा निर्णय घेते.
दुसर्या दिवशी विद्या नॅशनल डेटा सेंटरमध्ये जाऊन तिथल्या एचआर मॅनेजरला - अॅग्नेस डिमेलोला - भेटते. अर्णब बाग्ची नावाचा कोणीही इसम तिथे कामाला नव्हता हे सांगून अॅग्नेस विद्याला धक्का देते. विद्या तिला परोपरीने सांगायचा प्रयत्न करते. अॅग्नेस ठाम. विद्या तिला फोटो दाखवते. तरीही अॅग्नेस आपल्या म्हणण्यावर ठाम. विद्या निराशेने तिथून बाहेर पडते.
राणा तिला भेटून सांगतो की त्यांनी तिने सांगितलेल्या तारखांचे सगळे इमिग्रेशन रेकॉर्डस तपासले पण अर्णब बाग्ची नावाचा कोणीही माणूस त्या दिवशी इंग्लंडहून निघाला नाही आणि भारतातही आला नाही. अर्णब बाग्ची नावाचा माणूस मुळात अस्तित्वात आहे की नाही इथवर शंका व्यक्त केली जाते.
ती राणाला घेऊन अर्णब ज्या गावात शिकला त्या ठाकूरपुकुरलाही घेऊन जाते. तिथल्या शाळेतही अर्णब बाग्ची नावाचा कोणीही विद्यार्थी सापडत नाही. त्याच्या काकांच्या पत्यावर राहणार्या जोडप्याने अर्णब बाग्ची हे नाव ऐकलेलेच नसते. पुढे काय होते? विद्याला तिचा नवरा मिळतो का? अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही? ती एकटी या सगळ्याला कशी तोंड देते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ही 'कहानी' प्रत्यक्ष पडद्यावर पाहून मिळवणे हेच श्रेयस्कर. सुजोय घोष आणि कुशल गाडा यांनी निर्मिलेला आणि सुजोय घोष यांनी दिग्दर्शित केलेला कहानी हा चित्रपट दोन-अडीच तास प्रेक्षकाला खुर्चीत खिळवून ठेवतो आणि संपल्यावरही तास-दोन तास त्याबद्दल विचार करण्यास भाग पाडतो. कथा, पटकथा, छायाचित्रण आणि दिग्दर्शन या सर्वच बाबतीत चित्रपट अत्यंत उच्च दर्जा गाठतो आणि एक सुंदर चित्रपट पाहिल्याचे सुख नक्कीच मिळवून देतो. कोणत्याही प्रकारचा भडक हिंसाचार, हायटेक गॅजेट्स, गाड्यांचा पाठलाग किंवा गाड्या स्फोटाने उडणे वगैरे सवंग प्रकार नसूनही आणि संपूर्ण भारतीय वातावरणातला असूनही 'थ्रिल' म्हणजे काय याचे प्रत्यंतर हा चित्रपट देतो. कोलकोता शहरातली गर्दी, दुर्गापूजेचा माहौल आणि एकंदरीतच बंगाली संस्कृती याचा खुबीने वापर करून पटकथाकार, छायाचित्रकार आणि दिग्दर्शकाने या चित्रपटात अप्रतिम रंग भरले आहेत. चित्रपटाची पात्रनिवडही अगदी चपखल आहे. विद्या बालन सोडल्यास कोणीही खूप प्रसिद्ध म्हणता येईल असा कलाकार नाही पण सगळ्यांनी आपापली कामे चोख केली आहेत. विद्या बागचीचे मध्यवर्ती पात्र अर्थातच विद्या बालनने निभावले आहे आणि ती विद्या बालन आहे हे प्रेक्षक विसरून जाईल इतक्या सहजतेने आणि चपखलपणे तिने अभिनय केला आहे. चित्रपटाच्या उत्कर्षबिंदूला बदलणारे स्वरुपही तिने उत्कृष्टपणे आणि विश्वसनीयरीत्या दाखवले आहे. अर्थात हा चित्रपट विद्या बालनचा म्हणून ओळखला गेला तरी पटकथा आणि दिग्दर्शनाचा हात त्यात नक्कीच जास्त आहे. बॉलीवूडमध्ये बनलेल्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या उत्कृष्ट थ्रिलर्समध्ये कहानीचा समावेश केला जाईल हे नक्की.
अर्णब बाग्ची अस्तित्वातच असतो की नाही?या एका सूचक वाक्याने एकदम वेगळेच तर्क सुरु झाले.. अन्य वाचकांना विनंती : कृपया शक्यतो कोणीही इथे स्पॉईलर्स टाकू नयेत :(
In reply to छान परीक्षण by पैसा
In reply to छान परिक्षण. बघायलाच हवा हा by रेवती
In reply to बघत बसलोय... by चेतनकुलकर्णी_85
In reply to आवडलेला दिसत नाहीये. नाही by गणपा
In reply to वासरात लंगडी गाय शहाणी ह्या by अनामिक
वासरात लंगडी गाय शहाणी ह्या न्यायाने सिनेमा चांगला आहेका ब्वॉ? आणि शेवट बघून चिडचिड का होते? अतिशय समर्थपणे पेललेला शेवट आहे. - ('कहानी' जस्ट बघून आलेला) सोकाजी
In reply to विद्या बालनला (किंवा by यकु
In reply to +११११११ by चेतनकुलकर्णी_85
In reply to +११११११ by चेतनकुलकर्णी_85
In reply to विद्या बालनला (किंवा by यकु
In reply to यशवंत साहेब by रणजित चितळे
असे गलिच्छ काय आहे त्या सिनेमात कळले नाही. मन भ्रष्ट होईल असेही काही नाही त्याच्यात. एक चांगली मिस्ट्री थ्रिलर आहे झाले. मिस्ट्री थ्रिलर सरळ सात्विक जिवनात होऊ शकत नाहीत. सरळ सात्विक जिवन स्वतःसाठी छान असते पण दुस-यांसाठी रटाळ होऊ शकते - त्यावर पिक्चर तर मुळीच होऊ शकणार नाही.पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! पण तरीही 'प्रेग्नंट' शब्द वापरणार नाही) सिनेमाभर अवघडत नवर्याला शोधत फिरवली जाते आहे .. ही कल्पना आहे नाही का? .. मला ती कल्पना म्हणूनही भुक्कड वाटते.. तिच्या प्रेग्नंन्सीमध्ये (किंवा त्या अवघडलेल्या पोटामध्येच) थ्रील किंवा क्लायमॅक्स असेल तर गोष्ट वेगळी होती.. मुळात विद्या बालनची पोस्टर्स पाहूनच नको वाटलं. पण ननिंचं हे परिक्षण, सोकाजींच्या ब्लॉगवरचं आजचं परिक्षण, आणि सगळ्यांची वाहवाही पाहून मन बदलतं आहे. मी सात्विक नाही.
In reply to असे गलिच्छ काय आहे त्या by यकु
In reply to असे गलिच्छ काय आहे त्या by यकु
पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! पण तरीही 'प्रेग्नंट' शब्द वापरणार नाही) सिनेमाभर अवघडत नवर्याला शोधत फिरवली जाते आहे .. ही कल्पना आहे नाही का? .. मला ती कल्पना म्हणूनही भुक्कड वाटते.. तिच्या प्रेग्नंन्सीमध्ये (किंवा त्या अवघडलेल्या पोटामध्येच) थ्रील किंवा क्लायमॅक्स असेल तर गोष्ट वेगळी होती..कळालं नाही बुवा... म्हणजे गरोदर बाइ नवर्याला शोधतेय ह्यात गैर, भुक्कड इ. इ. काय आहे नक्की? तुम्ही बहुदा हे लिहिताना बघितला नसावा चित्रपट, कारण त्या शिवाय असं बोलला नसतात.. जे दाखवलय त्यला व्यवस्थित कारण पण दिलय... पण तसंही मला त्यात गैर असं काही वाटलं नाही...
In reply to पोट आलेली बाई (सो क्रूड वर्ड! by पिलीयन रायडर
In reply to कळालं नाही? मग सांगू by यकु
In reply to डर्टीपिक्चर नंतर विद्याबालनने by अन्नू
विद्याबालनच्या अभिनयाने जिवंत झालेले नॉट व्विद्या दॅटस व व 'विद्या' या पात्राला पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पाहावा.यातलं "नॉट व्विद्या दॅटस"" म्हणजे काय? :)
In reply to . by गोंधळी
In reply to हे घ्या by सोत्रि
In reply to ननिंनी 'भांजी मार ली' by सोत्रि
In reply to ननिंनी 'भांजी मार ली' by सोत्रि
In reply to एकंदर माझ्या मते कहानी या by अन्नू
आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य कथेला चालविण्यासाठी येथे वापरलेला आहे. त्यामुळेच ती पोलिसांची दिशाभूल करुन त्यांना आपल्या बाजुने वळवण्यास यशस्वी होते.हम्म. इथल्याच पोलीस स्टेशनमध्ये आली होती म्हणे तक्रार कशी दाखल करतात ते दाखवा, मला तक्रार दाखल करायचीय म्हणत. पोलिसांनी दिली काढून - अशी खोटी तक्रार दाखल करता येत नाही म्हणून.
तिला अशा अवस्थेत फिरवण्याबद्दल म्हणाल तर पोलिसांच्या बाबतीत अपराधी लोकांना पकडण्यासाठी कोणतीच दया माया बाळगली जात नाही.या वाक्यावरुन पोलिसांचा विद्यावरच वहिम असतो असं वाटतं. मग हे थ्रीलर कसं?
In reply to आता प्रेग्नंसी हा विषयच मुख्य by यकु
हम्म. इथल्याच पोलीस स्टेशनमध्ये आली होती म्हणे तक्रार कशी दाखल करतात ते दाखवा, मला तक्रार दाखल करायचीय म्हणत. पोलिसांनी दिली काढून - अशी खोटी तक्रार दाखल करता येत नाही म्हणून.ती सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेलेली होती! पण माझे म्हणणे ते नाही, पोलिसांनी तिचा प्रेग्नंसी हा विक पॉईंट पकडून तिच्या नवर्याला जो त्यांच्या मते एक आतंकवादीपैकी होता त्याला पकडण्यासाठी तिला बळीचा बकरा करावा ही तिचीच इछा असते व ती सफलही होते.
पोलिसांचा विद्यावरच वहिम असतो असं वाटतंअपराध्यांना पकडण्यासाठी त्यांचा विकपॉईंट म्हणजे त्याचे आप्त आणि फॅमिली मेंबर यांना टार्गेट करणे हे काही इथल्या पोलिसांना नवीन नाही. काहींना सहनशक्तीपेक्षा जास्त त्रासही दिला जातो, कारण एकच ते बघून तरी तो अपराधी समोर यावा!
In reply to हम्म. इथल्याच पोलीस by अन्नू
In reply to गवि काकांनी दिलेला सल्ला by गणामास्तर
In reply to +१ by सोत्रि
In reply to हो मान्य. मला हा सिनेमा आवडू by रेवती
In reply to गवि काकांनी दिलेला सल्ला by गणामास्तर
गवि काकांनी दिलेला सल्ला पाळावा हि नम्र इनंती.इनंती मान्य हाये!
आपल्याला जरी सिनेमा आवडला नसेल तरीही कृपया कथेसंदर्भात काही लिहीणे टाळावे१०१% अनुमोदन :)
In reply to ओक्के ! by परिकथेतील राजकुमार
बाकी कोणी निर्माता दिग्दर्शक माझ्यासारख्या मिपाकरांना घेऊन 'अकलेचे तारे' असा चित्रपट का काढत नाही ?काढील हो, काढील कुणीतरी.. आपल्या अकलेकडे लक्ष जायची वेळ आहे फक्त ती आपल्याला अशी एवढ्या कद्रूपणे दाखवत सुटावे लागते मग कसं होणार
- हल्ली "वेगळ्या" चित्रपटाला "चांगला" चित्रपट म्हणण्याची फॅशन आलेली दिसतेय :)
- शेवट बघून प्रचंड चीड-चीड झाली , आधे-मध्ये पण काही गोष्टी इतक्या अतर्क्य आहेत
- विद्या बालन ने वेळोवेळी केलेल हॉकिंग केल ते साफ बन्डल वाटल
- राणा ची भूमिका चांगली वाटली पण खानने अभिनयाच्या नावाखाली आरडा-ओरडा केलाय त्याची शरीर-यष्टी सुध्दा अगदी याता-तथा वाटली
- दुसरा कुठलाही चित्रपट सध्या(रिलीज झालेल्यात) कहाणी एवढा ही चांगला नाही
- विद्या बालन भयंकर आवडत असेल तर (पण डार्टी पिक्चर नंतर त्यातल काहीही इथे मिळणार नाही)
- काहीच्या काही शेवट
- डोक घरी ठेवून जाता येत नसेल तर मुळीच जौ नका
In reply to चित्रपट बघून पार गंडला by माझीही शॅम्पेन
•डोक घरी ठेवून जाता येत नसेल तर मुळीच जौ नकातुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी ठेवून) गेला होता का? :-D अनेकांची झालेली चिडचिड पाहून वाईट वाटले म्हणून शेवटी पश्चातबुद्धीने ढुस्क्लेमर टाकत आहोत. डिस्क्लेमरः हे परीक्षण वाचून आपले मत बनवू नये. आपापले डोके घेऊन जायचे की ठेवून जायचे ते ज्याचे त्याने ठरवावे. काही लोक आपले डोके घेऊन गेले तरी कदाचित उपयोग होणार नाही. ते डोक्यात काय आहे त्यावर अवलंबून आहे. प्रेग्नंट बाईचा वापर करणार्या चित्रपटाला विकृत समजणार्यांसाठी: चित्रपट अत्यंत विकृत आहे. तुमची वेगळी अशी खास चिडचिड होईल. डिस्क्लेमर संपला. ज्यांना चित्रपट समजला आणि आवडला त्यांचे एक संध्याकाळ आनंदात गेल्याबद्दल अभिनंदन!
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
In reply to काय राव ननि, एरव्ही आम्ही by यकु
In reply to काय राव ननि, एरव्ही आम्ही by यकु
In reply to यकु by नगरीनिरंजन
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
In reply to •डोक घरी ठेवून जाता येत नसेल by नगरीनिरंजन
तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी ठेवून) गेला होता का?अर्थातच घेऊन गेलो होतो म्हणून तर एवढ्या चुका दिसल्या , कितीतरी प्रसंग सदोष वाटले अरे बाबा पहिल्याच दिवशी चित्रपट पहिला आणि नंतर हे परीक्षण पण मुद्दामन काही दिवासने प्रतिक्रिया टाकली , सुरुवातीलाच प्रतिकूल प्रतिक्रिया नाही दिली.. शेवट चार्ली'ज एन्जल सारखा करण्याचा मोह टाळला असता तर बर्या पैकी परिणाम साधता आला असता :) असो गरोदर बाई-कडून माझ्या कुठल्याही भलत्या सालत्या अपेक्षा नाहीत .. बाकी तुमच चालू द्या
In reply to तुम्ही तसेच (म्हणजे डोके घरी by माझीही शॅम्पेन
शेवट चार्ली'ज एन्जल सारखा करण्याचा मोह टाळला असता तरआवरा... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: - (हसून हसून फुटलेला) सोकाजी
सुंदर परीक्षण