Skip to main content

महासंपन्न महाराज्ञी!

लेखक हुप्प्या यांनी गुरुवार, 15/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
देशातील अब्जावधी गरीबांच्या सेवेचे कंकण हाती बांधून देशाकरता सर्वस्व त्याग केलेल्या आपल्या परमलाडक्या महाराज्ञी सोनियांची संपत्ती फक्त पंचेचाळीस हजार कोटी रुपये इतकी असल्याचे वृत्त एका अमेरिकन संकेतस्थळावर आले आहे. जगातील अतीश्रीमंत लोकांत महाराज्ञी चौथ्या क्रमांकावर आहेत हे नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. ह्या क्रमवारीत लवकरच त्यांचा क्रमांक आणखी वरती सरको अशी आकाशातल्या बापाकडे प्रार्थना. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12258052.cms

वाचने 3676
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

जगातील अतीश्रीमंत लोकांत नव्हे जगातील अतीश्रीमंत राजकारण्यांत... ( काळा पैसा बाहेर आला तर कदाचित तेच वाक्य बरोबर सुद्धा ठरू शकेल.. :) )

अहो हुप्प्या सम्राट चालायचंच. त्यांच्या सासूबाई पंतप्रधान होत्या, पतिराज पंतप्रधान होते, आजचा पंतप्रधान त्यांनीच ठरवला आहे. उलट सोनिया आजींनी त्या संस्‍थळावर दावा दाखल केला पाहिजे एवढी कमी संपत्ती दाखवून घराण्याच्या अब्रुचे नुकसान केल्याचा. एका देशाच्या पंतप्रधानांच्या घराण्‍यात एवढी कमी संपत्ती पाहून एक लुंगासुंगा, मराठी संकेतस्‍थळावर टैम्पास प्रतिसाद देणारा भारतीय म्हणून शरम वाटली. आकाशातील बाप करो, आणि ही बातमी खोटी ठरो आणि खरा आकडा समोर येवो.

In reply to by रेवती

अरे होऽऽ! ते राहिले नाही का. पहा बरं, ज्या घराण्यात पंतप्रधान किती झाले तेही जनतेच्या लक्षात राहू शकत नाही एवढं ते घराणं जुनं आहे, त्यांच्या संपत्तीचं माप काय कपाळ करता येणार आहे. संपलं मग इथंच. तिघांनी मिळून किमान दहा दहा हजार कोटींची बचत केलेली असेलच, बाकीचं व्याज धरा झाले ना पंचेचाळीस हजार कोटी. मनमोहन प्राजीनं घराण्यातले नाहीत म्हणून सोनिया आजीच्या घरात काही दिलं नसेल.

In reply to by यकु

१. मोतीलालजी २. नेहरुजी ३. इंदिराजी ४. राजीवजी ५. महाराणी ६. राहुलजी ७. प्रियांकाजी ८. रॉबर्टजी ९. रिहानजी १०. मिरायाजी शेवटचे दोघे केवळ वयाने लहान (कर्तृत्वाने नाही) म्हणून अर्धे धरु एकूण ९ * त्याग = ४५ हजार कोटी म्हणजे भारताला प्रत्येक त्याग पाच हजार कोटी रुपयात मिळाला म्हणायचा! खूप महाग नाही, नाही का?

In reply to by हुप्प्या

त्यागाची किंमत ठरवताय? असं करु नका, महान भारतीय संस्कृती रसातळाला गेली नाही अजून. उलट आपापली हाडं काढून द्यायची तयारी ठेवा ;-) आमचे गांधी पणजोबा, इंदिराआज्जी आणि राजीवकाकांनी दिलीत, ते विसरलात - कृतघ्न कुठचे ;-)

तरी मी विचार करत होतो यावर अजून काकू त धागा कसा नै अला धन्यवाद हुप्प्या जी... तुमच्या या तीनोळी धाग्याबद्दल.. आणि महाराष्ट्र टाईम्स च्या दुर्मिळ लिंक बद्दल

In reply to by स्पा

आपल्या दोनोळी प्रतिसादाबद्दल आणि वैचारिक पिंक टाकल्याबद्दलही!

गांधी कुटुंब "चेयर्मन / चेअर-परसन" असलेल्या त्यांच्या इंडिया आय.एन.सी. चा ताळेबंद आज त्यांचे सी.एफ.ओ. सादर करतील व सी.ई. ओ. संसदेच्या आढ्याकडे पहात बसतील. आपण किडया-मुंगी परमाणे २/३ दिवस वळवळून परत निपचीत पडून राहू या. कसे?

आमचा मराठी गडी होऊ दे पंतप्रधान.. डायरेक पैला लंबर काढेल..

म.टा.चे पत्रकार नेहमीच कळत नकळ्त ईनोद करून जातात.
त्यामुळे या साइटवर काँग्रेसकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काँग्रेस त्या साईटीवर कारवाई कशी करणार?आणि ती पण कायदेशीर? असो .मूळ बातमी येथे सापडली- http://www.businessinsider.com/richest-politicians-in-the-world-2012-2?… त्यांना बातमी कुठून मिळाली- जर्मनीच्या Die Welt ह्या वॄत्तपत्राच्या वर्ल्ड लक्सरी गाईड ह्या विभागातून.

लोकशाही च्या आयचा घो आण्णां ना १०० कोटी हत्तींचे बळ मिळो.

पुढची पिढी तयार होत आहे.. नवे गुण उधळण्यासाठी.. राहुलबाबा आणि प्रियांका बेबी..