Skip to main content

मराठि सिनेमा बद्दल मला काय वाटते.

लेखक गोंधळी यांनी मंगळवार, 13/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच मरठी सिनेमांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाले.हे बघुन आनंद झाला. मरठी सिनेमांचे सुवर्ण् युग आले आहे,अशी चर्चा सुरु झाली. पण काहि मोजके अपवाद सोडले तर व्यवसायिक निकषांवर मराठी सिनेमांना म्हणावे तसे यश मिळ्त नाहि असे दिसते. ईतर राज्यां मध्ये प्रादेशिक भाषेतले सिनेमे प्राथमिक स्थानावर असतात.पण महाराष्ट्रात मराठी सिनेमा दुय्यम स्थानावर आहे,हे कोणीही नाकारु शकत नाही. मराठी सिनेमे कलात्मकद्रुष्ट्या उत्क्रुष्ट असतात्,विषय,कलाकार,संगित चांगले असते,पण सिनेमा ग्रुहात गर्दि खेचण्यात मात्र यशस्वि होताना दिसत नाही. मला असे दिसते की,मुळात मराठी सिनेमात व्यवसायिक द्रुष्टिकोनाचा अभाव जाणवतो(अपवाद-मि शिवाजी राजे भोसले बोलतोय-मांजरेकर साहेब). ते एका पारंपारीक चाकोरितले असतात. यंदा कर्तव्य आहे,मातिच्या चुली,निशानी डावा अंगठा,हापुस ईत्यादि हे सर्व सिनेमे उत्क्रुष्ट होते पण बॉक्स ऑफिसवर चालले नाहित. अगदिच निराशाजनक स्थिति आहे असे मी म्हणत नाही . पण मला वाटते की ,मि शिवाजी राजे भोसले बोलतोय,गैर,मुंबई पुणे मुंबई,सनई चौघडे,पछा डलेला,सावरखेड एक गाव यांसारखे किंवा त्याहुन चांगले चित्रपट बनले पाहिजेत.

वाचने 5187
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by JAGOMOHANPYARE

जा.मोहनप्यारे, दुव्याबद्दल आभारी. काल तुळीवर चित्रपट पाहुन घेतला. सस्पेन्स चांगलाच जमवला आहे. मजा आली. थँक्स अगेन. बाकी, मराठी चित्रपटानं आता आपल्या कक्षा रुंदावल्या आहेत. श्वास पासुन पुढे मराठी चित्रपट चांगलेच आलेत. जोगवा, देऊळ, शाळा, गोष्ट छोटी एका..., टींग्या, वळुंनी नवे विषय दिले.... असो.. -दिलीप बिरुटे

In reply to by मोहनराव

प्रामाणिक मत मांडले आहे. कोणालाही दुखावन्याचा हेतु नाही विहिर्,गाभ्रिचा पाउस्,वळु, टिंग्या, देऊळ ..... विषय वेगळे असले तरी एकाच पठडितले वाटतात.

या सबंधी निर्मात्यानीच कारणांची मीमांसा ...पेपरात केलेली आहे. अजूनही महाराष्ट्रात अतिशय अभ्यासू प्रेक्शकांची वानवा आहे. जे आहेत ते नेटवरून पायरेटेड माल मिळवितात. व चित्रपट गृहातच पाहिले पाहिजेत असे बेनहर , टेन कमांडमेंट्स, दे आफटर टूमारो या सारखे चित्रपट मराठीत बनत नाहीत.

In reply to by चौकटराजा

पण सामना, सिंहासन, शेजारी, माणूस, जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, श्यामची आई यासारखे चित्रपट याच मातीत बनतात. भले त्याचे प्रमाण नगण्य असेल पण ते आहेत.

In reply to by प्रचेतस

सामना, सिंहासन, शेजारी, माणूस, जगाच्या पाठीवर, हा माझा मार्ग एकला, लाखाची गोष्ट, श्यामची आई सर्वच चित्रपट एक से एक आहेत ....... नव्यात सरकारनामा,वझिर्,देउळ्,वळु,विहीर्,नटरंग्,बालगंधर्व्,एक होता विदुशक अन लहान्पणी सगळ्यात जास्त आवड्लेला एक डाव भुताचा :)

In reply to by पक पक पक

चित्रपट आवड्णे ठिक आहे रे पण वरील किती चित्रपट खरेच सिनेमाग्रुहात जाउन पहिले(पहावेसे वाटले).....???? मला येथे चित्रपट दर्जा बद्दल बोलायचे नाहि तर प्रेक्शकांचा सिनेमाग्रुहातिल प्रतिसादा बद्दल बोलायचे आहे.

१९७० ते २०१२ पर्यंत ईंग्रजी हिंदी व मराठी मिळून फक्त ४००० . १९३९ च्या क्लार्क गेबल व्ह्व्ह्यन लीच्या " गोन विथ द विंड पासून अलिकडे अवतार पर्यंत प्रभातचे माणूसकूंकू शेजारी, कीचक वध, बेबी शकुंतलाचा चिमणी पाखरं उषा किरण ( माझ्या मामे आजीची बहीण) यांचा कन्यादान, तसेच राजाभाउ परांजपेंचे जवळ जवळ सगळेच. रमेश देवचे सगळे, अशोक सराफ लक्स्या सचिन, महेश सगळे, हिंदीत रामसे , आरके बीआर, मनोज,कन्वर, भप्पी सोनी, सामंता, जे ओमप्रकाश , गोयल, दारासींग रंधवा चे देमार, निशी, चित्रा, कामरान, ए एन अन्सारी, यांचे. अरे हो एक नाव विसरलो नासीर हुसेन, जब्बार पटेल ( सामना सिंहासन, उम्बरठा ई ई ) चंद्रकांत कुलकणी - बिनधास्त काय द्याच बोला , एवढेच काय कच्ची कली टाईप विशालला सकाळी ९ ला पाहिले. मेट्रो, द्वेन्रटीएथ सेम्चुरी,युनिवर्सल, विल्यम वायलर, चॉप्लीन, अल्बर्ट ब्रोकोली, कार्ल फोरमन , अनंत माने, दत्ता धरमाधिकारी, दत्त्ता मायाळू, दिनकर द पाटील, राजा बारगीर, व्ही के नाईक, दता माने, रोनाल्ड् नीम. डेव्हीड लीन, जे ली थॉम्पसन , ई काही निर्माते दिंग्द , आजही लक्षात आहेत.

In reply to by चौकटराजा

आयला, काका, तुम्ही विशालला सकाळी पण जायचात?? :P :P :P गेला हो आता तो जमाना विशाल मल्टिप्लेक्स झाल्यापासून. आता सकाळी ८ पासून पण पिक्चर लागतात पण सगळे स्टँडर्ड. पूर्वीची ती मजा आता नाय राहिली. , ते डिलक्स पण आता बंद झालंय.

In reply to by चौकटराजा

ओ काका मि कोणाला काय म्हणालो नाय बर का , तुम्ही वडीलधारे ,अस अर्वाच्य काही नाही बोलणार तुम्हाला... तुम्ही पण आमच्याच गावचे की हो ,मग विशालला मॉर्निग शो बघायला कधी जायच ;)

बाकि सगळा लेख आणि तुमची मराठी चित्रपटांबद्दलची चिंता ठिक आहे आणि मि देखिल सहमत आहे तुमच्या मतांशी.. पण तुम्ही जी इच्छा व्यक्त केली आहे कि खालील चित्रपटांसारखे चित्रपट बनावे त्याला जाहिर आक्षेप... सनई चौघडे मि शिवाजी राजे भोसले बोलतोय (मी अपवाद असु शकतो ह्या सिनेमाला वाईट गणतोय म्हणुन) पछाडलेला त्यातल्या त्यात "पछाडलेला" तर अगदीच दर्जाहिन चित्रपट आहे.... (तो अभिराम भडकमकर का अभिनय करतो देव जाणे, श्रेयस तळपदेचं नुकतंच 'बॉलीवुड' मधे पदार्पण झालेलं होतं म्हणुन तो अतोनात माज करत होता अख्या चित्रपटात आणि भरत तर अक्षरशः ओकारी आणतो-नेहमीच... त्यात अजुन काय कमी म्हणुन मग लक्ष्याचा 'अतिशययोक्ती' अभिनय, तो हि कमी पडला म्हणुन मग विजय चव्हाण ला हि लावलं कामाला... हे सगळं पाहुन वाटलं महेश कोठारेला च 'पछाडलंय' कोणितरी).... त्यामुळे कृपया अशी काहि अपेक्षा ठेवुन अजुन 'पापि' नका बनु :P बाकि परवाच 'आय-बी-एन लोकमत' वर एका चर्चा सत्रात सांगितलेला मुद्दा पटला (सगळे ह्या वर्षीचे मराठीतिल राष्ट्रीय पुरस्कार विजेते आले होते), त्यांनी सांगितल्या प्रमाणे मराठी निर्मात्यांचा मुळ उद्देश पैसा कमविणे आणि कमित कमी बजेट मधे जास्त फायदा (आर्थिक फक्त) बघणे हा आहे, त्यात बरेच निर्माते हे कर-बचत आणि सरकारी अनुदाना करता सिनेमे बनवतात... शिवाय चांगले पैसे मिळत असतील तर ते लगेच चित्रपटाचे सर्व हक्क टीव्ही चॅनेल्सना देउन टाकतात... आणि अता तर सर्वांनाच (अर्थात हे सरकट विधान नाहि, ह्यालाहि अपवाद आहेत) हे माहित असल्यामुळे लोक सिनेमा कधि टि.व्ही वर येईल ह्याची वाट बघतात... आणि घर बसल्या लोकांना सिनेमे पहायला मिळत असेल तर त्यांनी का जावं चित्रपटगृहात... (लो़कंहि केबल कनेक्शन / डीटीएच साठी पैसे मोजतातच ना) दुसरा मुद्दा हा कि मराठी सिनेमांचे 'प्रमोशन' होतच नाहि, किती तरी मराठी सिनेमे चि.गृहात येऊन जातात वा ते चि.गृहात अल्यावर समजतं असा कुठला सिनेमा अलाय... पण तेच जर निट बॉलीवुड प्रमाणे प्रमोशन केले तर सगळे नाहि पण कमित कमि न जाणार्‍यातले १०% तरी लोक कदाचित जातील सिनेमाला..त्यात मराठी चॅनेल्सच हिंदी सिनेमाचे जास्त प्रमोशन करतात मराठी पेक्षा (अर्थात ते हि धंदा करतात त्यात त्यांचि काहि चुक नाहि, जिथुन पैसा मिळेल त्याला ते प्रमोट करणार ..पण मराठी वाहिन्यांनि मराठी सिनेमांसाठी थोडि सुट द्यायला हवी प्रमोशन / जाहिरातींमधे..) अर्थात ह्याला अपवाद नाहि म्हणता येणार पण झी-मराठी करते बरेच प्रमोशन त्यांच्या स्वतःच्या घरच्या प्रोडक्शनचे सिनेमे येणार असतिल तर- अगदी कंटाळा येई पर्यंत... तिसरा मुद्दा हा कि मराठी सिनेमे मुंबई, पुणे, नाशिक अश्या काहि ठराविक शहरांमधेच प्रदर्शित होतात (बरेच मराठी सिनेमे तर फक्तं पुण्यातच होतात प्रदर्शित) महारष्ट्राच्या इतर भागात ते टिव्ही वर आले कि मगच त्यांना पहायला मिळतात... मग अश्या बाहेरच्या शहरांमधे (गावांमधे तर अजुनच दुरचा मुद्दा आहे) लोकांना क मराठी चित्रपटांबद्दल कसं समजणार व त्यांना कशि जवळीक निर्मान होईल मराठी सिनेमांबद्दल.. अजुनहि बरीच कारणे आहेत, असावित... त्यामुळे मराठी सिनेमे उत्कृष्ट असणे गरजेचे आहेच पण तसेच ते उत्कृष्ट सिनेमे लोकांपर्यंत पोहचवणे वा ते पोहचवण्याचे तंत्रज्ञान ह्या कडे हि लक्ष देणे जरुरी आहे. ह्यातहि निर्मात्यांचा नक्किच जास्त आर्थिक-फायदा होईल पण निर्मात्यांना झटपट फायदा आणि आपल्या भांडवलापेक्षा थोडा जरी फायदा झाला तरी समाधान मिळतं त्यामुळे ते एवढा धिर(पेशन्स) ठेवत नाहित आणि म्हणुन बाकि ह्या गोष्टींना दुय्य्म स्थान देतात आणि मग मराठी सिनेमांना असं दुय्यम स्थान मिळतं असावं....

चाटे आणि प्रमोशन यांचे " गणिती सूत्र" जमलेले असल्याने बिन्धास्त हा चित्रपट गाजला . गाजविला गेला. पण उद्या ७/१२ चा उतारा असा चित्रपट काढला तर चाटे ना की प्रमोशन करता करता झीट येईल.