Skip to main content

बालपण...?

लेखक पक पक पक यांनी सोमवार, 12/03/2012 या दिवशी प्रकाशित केले.
मला सुद्धा एकदा विडंबक व्हायचे आहे अन एकदा तरी त्या 'जिलब्यांच'फडक फाडायच आहे.. कधीही न घाबरता ट ला ट अन म ला म प्रवृत्तीना हलकेच घेत विडंबन पाडायच आहे.. विडंबकाचा खेळ तो खेळून पाहायचा आहे खरच एकदा विडंबक होऊन, सतत जिलब्या टाकणार्‍या हलवायांचा पसारा आवरायचा आहे... परीपक्वता विचारांत नसतेच बिलकुल बालीशपणा मात्र वाढ्तच आहे खरच एकदा विडंबक होउन त्यांना अभ्यास वाढ्वायला लावायच आहे कसलेसे उमासे अन कोणते ते उसासे कचकचीत विड्म्बन टाकुन दाबायचे आहेत अन पिंपळावरच्या भुतांना गाण्गापुरी धाडायचे आहे खरच मलापण विडंबक व्हायच आहे... आर्ध्या सुरमईची शपथ,सकस काव्य निर्मिती साठी मला हे सर्व करायचे आहे ,अन खरच मला विडंबक व्हायचेच आहे
लेखनविषय:

वाचने 1832
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

@करुनी सतत पक पक पक झालात तुम्ही आता नवविडंबक.....>>> मेलो..मेलो...वल्ली आई...आई...आई...आई...काही केल्या हसू थांबत नाही वारलो...वारलो... होणार होणार होणार..पकपक तुंम्ही(ही) विडं-बक होणार आमच्या रेसमधे इरेस पडलात,तर जोरात पुढे जाणार त्यामुळे....असेच सह-भागी होत रहा... आणी नव-कवींना वैकुंठाला नेत रहा... आंम्हीही येऊ लावायला काडी... मिपावर बांधू एक विडं-बकांची माडी माडीवर मिळेल तयार माल खाल्यावर कुणाचिही निघेल साल सोलुन त्यांचं लोणचं घालू ह्या पुढेही हे असचं र्‍हाऊदे चालू... ;-)

अव राहिलेली ती अर्धी सुरमई आमच्यापण पोटात जाणार आहेच की.. [:)] मला आता असे म्हणावे वाटते आहे की, कविंना त्यांच्या विरोधकांपासुन धोका नाहिच पण विडंबनकारांपासुन त्यांनी आता सावध राहिले पाहिजे.. काहि खैर नाय. आणि एक .. आपल्या राज्यात कसे एखादा समाजावर पिक्चर काढायचा असल्यावर , आपल्या थोर राजकरण्यांना तो दाखवावा लागतो आधी. तसे कविंनी आता विडंबन कारांकडुन आदेश घेवुन कविता टाकाव्यात बाबा .. नाहितर कवि लवकरच वीक झालाच म्हणुन समजा

In reply to by गणेशा

अव राहिलेली ती अर्धी सुरमई आमच्यापण पोटात जाणार आहेच की.. ते तुम्हि कमिट्मेंट पाळायला टाळाटाळ करु लागले अस वाट्ल हो ..म्हणुन आठ्वण करुन दिली झाल... ;)

अरे अर्ध्या सुरमईत असलं भारी विडंबन करणार असाल तर एक सुरमई वुइथ सौथ इंडियन मसाला अन १/२ फ्रुट पंच दोन्ही लेयरमध्ये मिळाले तर मग काय कराय कुणास ठाउक ? आता इथल्या कविंनी एक वेगळं संस्थळ उघडु नये म्हणजे मिळवलं.

हो ना मग ! चांगली कविता कशाला लिहिली.? विडंबनच लिहायचं डायरेक्ट ! विटंबन मात्र नको नाहीतर कवि लोकं सरपंचाकडे मालकाकडे, संपादकांकडे तक्राआआआआआआआआआआआआआअर करतील . ( ते एस एस एस सारखं कसं लिहायचं या एडीटर मधे ? ) पुढच्या वेळी " तरूणपण" असा विषय घे अन बी एस ई चे ए ग्रूपचे भाव कॉपी कर ! मस्त विडंबन !

बाआआआआआआआआआआआआआआआआआआप रे!!!!!!! मानलं तुम्हाला.....जिलब्या पाडणार्यांचा तुम्ही फडशा पाडाल हे नक्की. >> पक पक विडंबक.... हे लै भारी होतं.