Skip to main content

केबल कफ कॅप

केबल कफ कॅप

Published on सोमवार, 12/03/2012 प्रकाशित मुखपृष्ठ
चार दिवसांपूर्वी नेटवर सर्फिंग करता करता क्रोशे कामाचा एक सुरेख ब्लॉग दिसला. तो बघतांना एक केबल कफ कॅप दिसली. मनापासून आवडली. ३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली. तिथे एकाच रंगात होती. पण उरलेले रंग वापरुन मल्टीकलर कॅप बनवली. ही त्या ब्लॉगची लिंक. http://crochet-mania.blogspot.com/2012/03/crochet-cable-cuff-cap.html DSC00512" alt="" /> DSC00514" alt="" /> DSC00527" alt="" />
लेखनविषय:

याद्या 7407
प्रतिक्रिया 22

छान झालिये गं. माझ्या आत्तापर्यंत २ ते ३ टोप्या तरी हरवून झाल्यात. तू शेजारीण असतीस तर बरं झालं असतं.;)

In reply to by रेवती

टोपी दिसल्या दिसल्या घालायची तयारी सुरु. ;) असो... इकडे विणकामाच्या सुया कुठे मिळतात ते आता शोधायला हवे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो राजकुमार...... तुमचा जिरेटोप जागेवर आहे ना :) बाकी..... त्या सुया वगैरे तुमची राजकन्या शोधेल की...... ;)

काल बॉग पाहिला > आज टोपी तय्यार. काय स्पीड आहे की चेष्टा. आपले हे असे जिन्नस पाहून आपण म्हणजे अगदीच "हे" आहोत हा कॉम्पप्लेक्ष तयार होतो आहे हो.

In reply to by तर्री

तर्री.......माफ करा...... चुकून "काल" लिहिलं. आता संपादन करता येत नाहीये :( ४ दिवसांपूर्वी बघितला आणि आज टोपी तयार झाली. कृपा करुन गैरसमज करुन घेऊ नका लोक्स.

In reply to by रेवती

रेवती......बदल केल्याबद्दल घन्यवाद :) आणि इंप्रेशनचं म्हणशील तर ....... चुकीचं इंप्रेशन नकोच गं...... खरं सांगून थोडं कमी पडलं तरी चालेल. उगाच भलत्या अपेक्षा वाढल्या तर सांभाळणं मलाच कठीण होईल....... !!

क्लास क्लास..हाय क्लास...रंगसंगती आणी प्रमाणबद्धते करिता ---^--- अवांतर-@३-४ रंगांची थोडी थोडी लोकर उरली होती . मग तीच वापरुन ही कॅप बनवली>>> म्हणुनच ही कॅप इतकी क्लासिक बनली.. यासारखाच माझा पर्वा-चतुर्थीचा अनुभव शेअर करतो... दुपारी २वाजता काम अवरुन घरी जात असताना,अनपेक्षितपणे एकांचा फोन आला,की आज कहिही करुन अभिषेकाला याच...गेलो मग ...जाताना आमच्या फुलांच्या पिशवीत डोकाऊन पाहिले,तर अगदी तुरळक फुलं उरली होती...मनात म्हटलं,,,आज या शिल्लक फुलांमधुन मधुन काय रांगोळी येइल कुणास ठाऊक..? पण पुजा सुरु झाली आणी गंपती बाप्पांसमोर नुसता फुलांचा मोदक काढु म्हणता म्हणता... अचानक माझ्या मनात आलं....आणी काढुन झाला तो हा गंपतीबाप्पाच.. :-) कधी कधी भरपुर फुलं असुनही खेळ रंगत नाही...आणी बर्‍याचदा उरलेली फुलं अशी कमाल घडवुन अणतात.. :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

कसला जबरी दिसतोय गणपती....!! कमाल आहात तुम्ही !!!!!!!!!! हातात जादू आहे हो......!!

टोपी मस्तच! चार दिवसात म्हटलंस तरी माझ्या मते फार लौकर झाली. आणि भटजी, गणपती छान आहे हो!

जयवीताई सुंदरचं टोपी आहे :) तुझे क्रोशाचे काम पाहून मला ही राहवेना..खरचं व्यसन आहे गं :) तू किती सहजपणे करतेस गं आवडले मला :)

वा... किती सुंदर विणलय ! :) कलाकाराचे कलाकारी करणारे हात... :) जाता-जाता :--- हे बरयं इथे मेंढ्यांना टकलु करायचं आणि त्यांच्या लोकरीची टोपी करायची ! ;) बिचार्‍या मेंढ्या ! ;)