मजल
आम्हाला गझल लिहीता येत नाही - म्हणून गजलेच्या दिशेने आम्ही मारलेली ही मजल)
हे गोड आठवांनो बरसू नकात आता
स्मृतीशेष त्या स्थळांना उकरू नकात आता
भोगून प्राक्तनाचे मी वार तृप्त झालो
विसरून त्या क्षणांना केव्हाच मुक्त झालो
असता असेही काही गलती अमान्य नाही
पुसण्यास जाच आता देईल ती ही ग्वाही
तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची संधी अमोल होती
उमजून सर्वकाही नियती कठोर होती
तुटताच प्रेमधागा जुळण्यास वाव नाही
सांगून रहीम गेला गाठीस भाव नाही
या बुजूर्ग सांगण्याला झालो मी न राजी
धाडून पाहिली मी आमंत्रणे तहाची
शेवटी मानले मी रहिमन तुझेच आता
हे गोड आठवांनो बरसू नकात आता
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3521
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा...! व्वा...! व्वा...!
भोगून प्राक्तनाचे मी वार
या मजलेचं बीज -रहिमन धागा
In reply to भोगून प्राक्तनाचे मी वार by प्रचेतस
सुंदर विवेचन रे येशा.
In reply to या मजलेचं बीज -रहिमन धागा by यकु
यक्कु .....तेरी ये मजाल ????
In reply to या मजलेचं बीज -रहिमन धागा by यकु
यशवंता, लै भारी रे.... ही मजल
लव्हली... मस्त रे
+१
In reply to लव्हली... मस्त रे by गवि
खूपच मस्त येशा!
मस्त जमलीय.
जबरदस्त!!
दिल खुश हो गया.... मस्त
छान जमलीय गजल
या गजलेची मजल झक्कास जमलीये
तो स्वर्ग, स्वर्ग जिंकण्याची
मजल आवडली.
तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय
In reply to मजल आवडली. by पैसा
जितके जास्त प्रेमभंग होतील
In reply to तुझा परत एकदा प्रेमभंग झालाय by यकु
@एक शंका आहे तुझा परत एकदा