✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

३
३_१४ विक्षिप्त अदिती यांनी
Fri, 03/09/2012 - 01:59  ·  लेख
लेख
जागतिक महिला दिनाच्या सर्व वाचक स्त्री-पुरुषांना शुभेच्छा. महिला दिनाला साधारण १०० वर्षांचा इतिहास आहे. स्त्रीमुक्तीची चळवळ आणि महिला दिन साजरा करण्याचा संबंध घनिष्ठ आहे. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, निवडणूका लढवण्याचा हक्क मिळावा, समान वेतन, समान वागणूक मिळावी इत्यादी मागण्यांमुळे स्त्री चळवळ सुरू झाली आणि वाढली. बहुसंख्य देशांमधे या मागण्यांबाबत गेल्या शतकात मोठी प्रगती झालेली दिसते. तरीही स्त्री-समानता संपूर्णतः आलेली आहे असे आम्हांस वाटत नाही. मोठ्या प्रमाणावार मुलींनी शिकायला सुरूवात केलेली असली तरीही अजूनही सुशिक्षितांमध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण समसमान नाही. नोकऱ्यांमध्येही अजून उच्चपदावर पुरुष अधिक संख्येने दिसतात. कदाचित असे म्हणता येईल की वीस-तीस वर्षांपूर्वी जे सुशिक्षित झाले त्यांचेच प्रमाण उच्चपदस्थांत अधिक दिसेल. हाच युक्तिवाद थोडाफार एकंदरीत सुशिक्षितांच्या संख्येला लागू होतो. थोडक्यात पंचवीस तीस वर्षांपूर्वी जे खूपच अधिक संख्येने पुरुष शिकले ते व त्यांच्याबरोबर न शिकलेल्या स्त्रिया अजूनही लोकसंख्येमध्ये दिसतात. कदाचित आजची पिढी घेतली तर हे प्रमाण अधिक समसमान दिसेल. महाराष्ट्र हे भारतातले पुरोगामी राज्य. तेव्हा सध्याच्या मराठी पिढीत चित्र वेगळे दिसते का? ते शोधण्यासाठी मराठी इंटरनेट साइटवर असलेल्या स्त्री-पुरुष प्रमाणाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला असे दिसले की मराठी इंटरनेटवर स्त्रिया आणि स्त्री-आयडींचे प्रमाण खूप कमी दिसते. पुराव्यादाखल अलेक्सा.कॉम वरून घेतलेले हे स्टॅटिस्टिक्स पहा. मनोगतावर दिसणारे स्त्री-पुरूषांचे प्रमाण एकूणच इंटरनेटवर दिसणार्‍या प्रमाणासारखेच आहे. मायबोलीवर पुरूषांचे प्रमाण माफक प्रमाणात जास्त (over-represented) आहे. मिसळपाव, उपक्रम आणि मीमराठीवर स्त्रियांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी (greatly under-represented) आहे. ऐसी अक्षरेचे (हा न्यू किड ऑन द ब्लॉक असल्यामुळे) स्टॅट्स उपलब्ध नाही. पण ऐसीवरचे प्रमाण मायबोली किंवा मनोगताप्रमाणे असावे असे वाटते. या स्टॅट्सपैकी मायबोलीच्या स्टॅट्समधे Confidence: medium असं आहे तर इतर स्टॅट्सबद्दल Confidence: low आहे. पण या साईट्सवर पाहिल्यास लॉगिन केलेल्या पुरूषांची संख्या जास्त आणि स्त्रियांची संख्या कमी हे दिसतेच. मराठी इंटरनेट वापरणारे लोक महाराष्ट्र किंवा भारताच्या शहरी भागातले, आणि परदेशात असणारे बहुसंख्येने असणार. या लोकांमधे शिक्षण, समृद्धी, इंटरनेटची उपलब्धता या अडचणी नसाव्यात. तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे? गेल्या काही दिवसांतच पुरुषप्रधान लेखनाबद्दल तक्रारी वेगवेगळ्या साइट्सवर दिसून आल्या. मराठी इंटरनेट साइट्स पुरुषप्रधान मनोवृत्तीच्या आहेत का? ८ मार्चला थोडी का होईना चर्चा घडावी म्हणून घाईघाईत लिहील्यामुळे काही मुद्दे सुटले आहेत. त्यातले काही इथे लिहीते. इंटरनेट-वापरकर्ती घरं सुशिक्षित असतील असं समजून, सांख्यिकदृष्ट्या नेट वापर करणार्‍यांमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण ढोबळमानाने समान असेल अशी माझी अपेक्षा होती. आपलं लिखाण ब्लॉगांपुरतेच मर्यादित ठेवणार्‍यात किंवा मराठीतून, इंटरनेटवर व्यक्त होणार्‍या व्यक्तींमधे स्त्रिया आणि पुरूषांचं प्रमाण थोड्याबहुत फरकाने समान असेल हे एक गृहीतक. (चुकीचं असल्यास का ते वाचायलाही आवडेल.) विचार करण्यासाठी आणि/किंवा इंटरनेटवर किंवा कुठेही व्यक्त होण्यासाठी, विशेषतः राजकीय, सामाजिक, आर्थिक, चर्चा आणि कला या संदर्भात विचार करता स्त्रिया आणि पुरूष मुळात वेगळे नसतात हे ही मागच्याच शतकात पुढे आलेलं आहे. तर स्त्रिया एकूणच कमी प्रमाणात का व्यक्त होतात याबद्दल थोडी चर्चा करणं मला जिव्हाळ्याचे वाटते. विशेषतः हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या एलिट म्हणावा असा गट आहे, जो मराठी इंटरनेटवर वावरतो. सामान्यतः समाजाची मूल्य, दिशा या वर्गातून ठरवली जाते. (पूर्वीही ब्राह्मणांना एलिट समजले जायचे आणि त्यांच्या घरच्या रूढींचे पालन करणे फॅशनेबल समजले जायचे.) त्यामुळे या वर्गाची मतं काय आहे हा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं. 'सुपरमॉम' संस्कृतीने आधीच काही स्त्रियांच्या व्यक्तीमत्त्वाचे नुकसान केलेले आहे; ते अधिक प्रमाणात झिरपू नये असं मला मनापासून वाटतं आणि त्यादृष्टीने मला अशा व्यक्ती ज्या समाजगटांत अधिक प्रमाणात आढळतात त्या लोकांची मतं महत्त्वाची वाटतात. "एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं" हे थोडं जुनंच झालं. त्याच धर्तीवर एक स्त्री घराबाहेरही जे जग आहे त्याबाबतीत जागरूक झाल्यास संपूर्ण कुटुंबात ही जागरूकता येऊ शकते. निदान अशा प्रकारच्या चर्चांमधून काही चुकतं आहे का असा विचार झाला तरी खूप.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
78865 वाचन

💬 प्रतिसाद (166)

प्रतिक्रिया

बिनडोक हा शब्द आवडला नसेल तर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/09/2012 - 11:31 नवीन
बिनडोक हा शब्द आवडला नसेल तर विचारशून्य हा शब्दही मला आवडतो. बिनडोक हा शब्द मी मागे घेण्यासाठी तयार आहे.
उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही.
कोणत्याही गोष्टीचा ताप येणंही मला विचाररहित वाटतं. तुम्ही कर्करोगाबद्दल बोलत आहात. पण स्त्रियांसारखे लांबलचक कुडते घालणं, भारतीय किंवा हवाई प्रिंटचे शर्ट वापरणं, स्त्रियांप्रमाणेच डोक्यावरचे केस वाढवणं आणि चेहेर्‍यावरचे भुवया वगळून बाकीचे केस काढणे (हे स्त्रियांच्या चेहेर्‍याशी साम्य) इ. इ. अनेक गोष्टी माझ्या ओळखीतले अनेक पुरूष करतात. आणि आकर्षकही दिसतात. डोक्यावरचे* केस अगदी पेराएवढे ठेवणार्‍या काही मुली पाहिल्या आहेत, त्याही प्रचंड आकर्षक दिसतात.
सुशोभीकरण, रंगसंगतीची समज यात मुळातच नैसर्गिकरित्या स्त्रियांना मिळणार्‍या वरदानात्मक गोष्टी आहेत.
कधीपासून? जगप्रसिद्ध चित्रकार, मूर्तीकार, कलाकार यांच्यात जेंडर बायस कुठे दिसतो? *काय करणार, इथे एक्सप्लिसिटली सगळे शब्द नाही वापरले तर अनर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

>>*काय करणार, इथे

मराठमोळा
Fri, 03/09/2012 - 16:52 नवीन
>>*काय करणार, इथे एक्सप्लिसिटली सगळे शब्द नाही वापरले तर अनर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते. मलाही फार उफाळुन येत आहे पण पुन्हा नर्थ आणि त्यातून विनोदशून्य अवांतर होण्याचीच भीती वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, >>माझ्या स्वतःच्या

मराठमोळा
Fri, 03/09/2012 - 19:44 नवीन
अदिती, >>माझ्या स्वतःच्या माहितीत उच्चशिक्षित, उच्च्पदस्थ स्त्रिया आहेत ज्यांच्या व्यक्तीमत्वाचे नुकसान परंपरा जपल्याने किंवा पुरुषांनी स्वयंपाक न केल्याने झाले असे त्यांना वाटत नाहीत. जर कुणी सुखी समाधानी असेल तर कोणत्या संस्कृतीला शरण जायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. याला उत्तर नाही दिलेत? डायरेक्ट माझ्या सहीवर हल्ला केलात? >>कधीपासून? जगप्रसिद्ध चित्रकार, मूर्तीकार, कलाकार यांच्यात जेंडर बायस कुठे दिसतो? मग स्वयंपाक, सुशोभीकरण, ई. यात तुम्हाला जेंडर बायस कुठे दिसला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

याला उत्तर नाही दिलेत? ०.

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/10/2012 - 04:49 नवीन
याला उत्तर नाही दिलेत?
०. मुद्दा सोडून बोलण्यात मला फार रस नाही. १. तरीही, मी सांख्यिकी विदाबद्दल बोलते आहे, एकेका माणसाबद्दल नाही. ही सांख्यिकीचा अभ्यास करण्याची पद्धत नाही. २. तुमच्या ओळखीतल्या एकाही मनुष्याला मी अजिबात ओळखत नाही तेव्हा त्यांच्याबद्दल बोलणे इष्ट नाही. ३. लोकांच्या व्यक्तिगत आयुष्यात नाक खुपसायला मला आवडत नाही. ओळखीतले असोत वा अनोळखी. ४. तुम्ही दिलेली माहिती संपूर्ण माहिती आहे असे समजल्यास माझा जो तर्क आहे तो तुम्हाला आवडणार नाही. आणखी स्पष्ट उत्तर हवंय का?
डायरेक्ट माझ्या सहीवर हल्ला केलात?
तुमच्याच भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तो तुम्हाला हल्ला वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. मला कोणी गणित, पदार्थविज्ञान, खगोलशास्त्राच्या भाषेत सांगितलं तर तो हल्ला वाटत नाही. ताप येणं, कर्करोग वगैरे शब्द इतर कोणी वापरू नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते कठीण आहे; इतर कोणी वापरले तर हल्ला होतो असं वाटत असेल तर सही बदला.
मग स्वयंपाक, सुशोभीकरण, ई. यात तुम्हाला जेंडर बायस कुठे दिसला?
ते विधान मृदुला यांचं होतं. मी दुजोरा दिला तो तत्संबंधी धाग्यांमधे अ‍ॅक्टीव्ह सदस्य बहुतांश स्त्रिया असतात; पुरूष सदस्यांचं प्रमाण कमी असतं या निरीक्षणाला. त्यालाच आंजावरचा जेंडर बायस असे नाव दिले. प्रत्यक्षात हे पुरूष घरात काय करतात हे मी पहायला गेले नाही, जाणार नाही. कारण पुन्हा वरचा मुद्दा क्रमांक ३.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

:)

कवितानागेश
Fri, 03/09/2012 - 12:00 नवीन
उद्या जर पुरुषांनी लिपस्टीक, पावडर वापरावी, फ्रॉक घालावे, बाळाला जन्म द्यावा, त्याला पाजावे अशी अपेक्षा केली गेली तर ती रास्त ठरणार नाही. काही गोष्टी नैसर्गिक असतात.> JUNIOR आठवला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

बरं मग?

Nile
Fri, 03/09/2012 - 12:39 नवीन
कृपया "बिनडोक" सारखे शब्द जपून वापरा. आपण आपल्या स्वकीयांचा किंवा कुणाचा अपमान तर करत नाही आहोत याची काळजी घ्यावी.
हे काय नविन? अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि काळजीपूर्वक अपमान करतो. आमचे अनेक स्वकीय बिनडोकच काय अगदी गाढव आहेत. इतरांचा अपमान तर आम्ही अगदी दिलखुलासपणे करतो. अजून काय प्रॉब्लेम असेल तर सांगा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

>>अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि

मराठमोळा
Fri, 03/09/2012 - 16:32 नवीन
>>अहो आम्ही तर जाणूनबूजून आणि काळजीपूर्वक अपमान करतो. आमचे अनेक स्वकीय बिनडोकच काय अगदी गाढव आहेत. इतरांचा अपमान तर आम्ही अगदी दिलखुलासपणे करतो. अजून काय प्रॉब्लेम असेल तर सांगा!!! अवांतर नको, उगाच आयडी/लेख/प्रतिसाद ब्लॉक होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हेहेहे...

Nile
Fri, 03/09/2012 - 20:17 नवीन
तुम्ही तुमच्या स्वकीयांच्या अपमानाची काळजी करा.. आमच्या आयडीच्या बॅन होण्याची चिंता करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

बराचसा नाही थोडासा आहे

चौकटराजा
Fri, 03/09/2012 - 12:24 नवीन
"शरीररचना वगळता स्त्री-पुरूषांत काही फरक नाही" असं काही म्हणण्यासाठी ही वाक्यरचना आवडली नाही. फरक नाही कसा? आहे ना ! पण बराचसा नाही व थोडासा आहे . स्स्त्री पाताळयंत्री लोभी खोटारडी झोपाळू , आळशी, गैरसमजास अनुकूलता या साख्या या बाबतीत पुरुसासारखीच आहे व असते. फक्त स्त्रीच मत्सरी असते यास माझा विरोध आहे. फरक कुठे ? ती नैसर्गिक दृष्ट्या मंद्कामी आहे . तिची वासना फुलण्यासाठी वेळ लागतो. साहजिकच सुन्दर स्त्री गेली तर पुरूष तिच्याकडे वळून बघतो तसे ती करीत नाही.कारण तिची वासना पट्कन पेट घेत नसते. आरशात सारखे पहाणे .मॉचिंग ची आवड अशी दुसरी काही फुटकळ उदाहरणे सध्या पुरेत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रिया आणि पुरूषांचे लैंगिक

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/10/2012 - 03:54 नवीन
स्त्रिया आणि पुरूषांचे लैंगिक वर्तन किंवा कामोत्तेजन याबद्दल चर्चा सुरू केलेली नसताना हा विषय तिथे का गेला हे मला समजलं नाही. माझ्या मते, चर्चेचा विषय स्त्री आणि पुरूष यांचे संस्थळांवर व्यक्त होण्याचे प्रमाण विषम आहे असा आहे. संस्थळांवर व्यक्त होण्यासाठी फक्त खांद्यावरच्या अवयवाचा विचार होतो आणि त्या बाबतीत स्त्री आणि पुरूषांत काहीही फरक नसतो, असं संबंधित विज्ञान सांगतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कारण

चौकटराजा
Sat, 03/10/2012 - 09:43 नवीन
कारण , काम व निर्णयात्मक वर्तणूक यांचा संबध आहे असे मीच नाही तर सिग्मंड फ्राईड ही म्हणतो( तसे वर्‍याच वर्षापूर्वी वाचले आहे). चूक असल्यास सांगावे . नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का? अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरूवात होती. २००१ चा सुमार. शनिवार वाड्या समोर सभा. मी हजर होतो. निरिक्षण- महिलांची संख्या सभेस जास्तीत जास्त २ प्रतिशत. एकूण लोकसंख्येतील हजारी स्त्रिया ९५० धरल्या तर किती कमी पडल्या बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फ्रॉईडची अनेक मतं निखालस चूक

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 01:11 नवीन
फ्रॉईडची अनेक मतं निखालस चूक आहेत हे सिद्ध होऊनही अनेक दशकं उलटून गेली आहेत. सिमॉन दी बोव्व्हारने 'द सेकंड सेक्स'मधे त्या मतांचा अगदी व्यवस्थित समाचार घेतलेला आहे. तेही १९४० च्या दशकाच्या उत्तरार्धात. तेव्हा फ्रॉईड सरसकट सगळीकडे लागू पडतो हे अमान्य. स्त्रियांच्या व्यक्ततेचा आणि संभोग, शरीररचना यांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

बरं बाई !

चौकटराजा
Tue, 03/13/2012 - 09:37 नवीन
बरं बाई ,आपण फ्रॉईड व सेकंड सेक्स ( मीही वाचलेले आहे ४० वर्षापूर्वी) सोडू . माझे दोन प्रश्न आपण बायपास केलेले दिसतात. ते पुन्हा ठेवत आहे .नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का? अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाची सुरूवात होती. २००१ चा सुमार. शनिवार वाड्या समोर सभा. मी हजर होतो. निरिक्षण- महिलांची संख्या सभेस जास्तीत जास्त २ प्रतिशत. एकूण लोकसंख्येतील हजारी स्त्रिया ९५० धरल्या तर किती कमी पडल्या बरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

नाहीतर सार्वजनिक पेपर चे

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 03/13/2012 - 20:26 नवीन
नाहीतर सार्वजनिक पेपर चे ठिकाणी पेपर वाचन हे खांद्याच्या वरचेच काम चालते ना ? मग तिथे ललनांचा वावर कमी का?
सार्वजनिक ठिकाणी अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी वेगळी सोय असते, उदा: सार्वजनिक मुतार्‍या, शौचालये. (यांची अवस्था अतिशय दयनीय असते हा भलताच मुद्दा आहे.) उपनगरीय रेल्वे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमधेही स्त्रियांचे डबे वेगळे असतात. भारतात उपलब्ध असणार्‍या गोष्टी आणि त्यांचा फायदा घेण्यार्‍या लोकांची संख्या यांचं प्रमाणही व्यस्त आहे. सगळीकडे जिथे मारामारी करून गोष्टी मिळवाव्या लागतात तिथे स्त्रिया मागेच रहाणार. पण माझा मुद्दा तो नाहीच्चे. मी उच्चभ्रू लोकांमधलंच प्रमाण पहाते आहे. मराठी उच्चभ्रू वर्गाततरी स्त्रियांचं प्रमाण पुरूषांच्या प्रमाणाच्या बरोबरीने असेल असा समज भारत महासत्ता होण्यातून होत होता. पण तिथेही हे प्रमाण miserable म्हणावं असंच आहे. शिवाय नोकर्‍या, आर्थिक सुबत्ता यांमधून उपलब्धतेचं प्रमाणही उच्चभ्रू, एलीट वर्गासाठी अधिक आहे. आणि तरीही स्त्रिया मागे का असा प्रश्न आहे. अण्णांच्या सभेबद्दलही तेच कारण. मी सर्वसामान्य लोकांबद्दल बोलतच नाहीये. पण त्याच बाबतीत आणखी एक निरिक्षणही नोंदवते. फेसबुकावर माझ्या यादीत साधारण ३५० ते ४०० लोकं तेव्हा होते. पैकी अर्ध्याधिक भारतीय. स्त्री-पुरूष प्रमाण अगदी समान नाही (याचं प्रमुख कारण मी पुरूष डॉमिनेटेड क्षेत्रात शिक्षण आणि नोकरी केली आहे.) पण तरीही मराठी आंजाएवढं वाईटही नाही. आणि तरीही फेसबुकावरून अण्णांना समर्थन देणार्‍या लोकांमधे स्त्री-पुरूष प्रमाण एवढं असमान नव्हतं, साधारण ४०-६० टक्के अशी विभागणी. (आणि या निरिक्षणाशी मिळतंजुळतं निरीक्षण विमे आणि धनंजय बोरगावकर यांनीही याच धाग्यात मांडलेलं आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

व्यक्ततेच्या गुणात्मक

चौकटराजा
Tue, 03/13/2012 - 09:44 नवीन
व्यक्ततेच्या बाबतीत गुणात्मक फरक नसेलही संख्यात्मक आहेच ! कारण अवाजवी संकोच नसत्या बाबतीत हे स्त्री मनाचे वैशिष्टय आहे.त्याचे मर्यादित फायदे व अमाप तोटे स्त्री ला आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

एक साधे कारण आहे.

चिंतामणी
Fri, 03/09/2012 - 09:38 नवीन
स्पष्ट आणि टोकदार मतं असणाऱ्या स्त्रिया कमी आहेत. किंबहुना स्वतःची ठाम मते असणाऱ्या स्त्रिया कमी आहेत.
  • Log in or register to post comments

रिकामचोट

मन१
Fri, 03/09/2012 - 09:48 नवीन
आमच्यासारखे रिकामचोट अधिक संख्येने मराठी जालावर येत जात असतात असा माझा समज आहे. तो खरा असल्यास स्त्रिया रिकामचोट कशा काय नाहित? कशात व्यग्र असाव्यात ह्याबद्दल चर्चा होउ शकते. मूळ चर्चाविषय वैचारिक असल्याने आम्ही फारतर वाचणेच पसंत करु.
  • Log in or register to post comments

???

सोत्रि
Fri, 03/09/2012 - 10:12 नवीन
मुळात स्त्री - पुरुष समानता म्हणजे काय? ही समानता सांख्यिकीच्या आधारे ठरलेली असावी का? लेखात आलेला आणि प्रामुख्याने जाणवणारा मुद्दा हा 'समान संखे'वर आधारित आहे असे मला वाटले. जे मला पटत नाही. सांख्यिकीच्या आधारे जर शिक्षण, नोकरी, उच्चपदे आणि इतर तुलना करायची क्षेत्रे ह्यामध्ये जर "स्त्री = पुरुष" असे सिद्ध झाले तर स्त्री - पुरुष समानता आली असे म्हणता येईल का? हा मुद्दा वैचारिक नसून सामाजिक असावा असे मला वाटते. ह्याचे मूळ आपल्या सामाजिक जडणघडणीवर आधारित आहे. १. आता लेखात म्हटल्याप्रमाणे समानता नाहीयेय तर त्याचे काय फायदे व तोटे ? २. जर समानता (?) झालीच तर त्याचे काय फायदे व तोटे ? ३. जर सांख्यिकीच्या आधारे "स्त्री > पुरुष" असे झाले तर त्याचे काय फायदे व तोटे ? आता इंटरनेटचा मुद्दा: ममो ह्यांनी म्हटल्याप्रमाणे हा मुद्दा समानता आणि स्त्रीमुक्ती ह्यापासून सर्वस्वी भिन्न आहे. इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अ‍ॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईल. बघा म्हणजे, टीव्हीवरच्या रटाळ, टुकार अशा मालिकांचा TRP हा महिलाच ठरवतात कारण त्यांना मिळालेला वेळ त्या असल्या मालिकांमध्येच सत्कारणी लावतात. पण ते टीव्हीचा सहज असलेला अ‍ॅक्सेस ह्यामुळे. हा मुद्दा लेखात ध्यानात घेतलेला नाही. फक्त काही नोकरपेशा आणि उच्चमध्यमवर्गिय महिलांना अभिप्रेत धरून चर्चा सुरू आहे.
तरीही इंटरनेटवर व्यक्त होण्यात स्त्रियांचे प्रमाण कमी का असावे?
ह्यावर ममो ह्यांनी दिलेला प्रतिसाद अतिशय चपखल आहे. - (इंटरनेटवर अभिव्यक्त न होणारी बायको असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

सुंदर

अन्या दातार
Fri, 03/09/2012 - 10:58 नवीन
सडेतोड प्रतिसाद! प्रत्येक मुद्दा पटण्यासारखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 03/09/2012 - 17:23 नवीन
इंटरनेटवर अभिव्यक्त व्हायला मुळात इंटरनेटचा अ‍ॅक्सेस हवा. जसा टीव्ही सरसकट सगळ्या घरांमध्ये पोहोचला आहे तसे इंटरनेट अजूनही घराघरात पोहोचले नाही. तसे जेव्हा होईल तेव्हा महिलांची संख्या लक्षणियरित्या वाढेल असे खात्रीने सांगता येईल
मग फेसबुक वर कशा काय इतक्या संख्येने सांडलेल्या असतात हो या स्त्रिया ??? सबब, गृहीतकात काहीतरी गल्लत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आले का खवचट छिद्र्वान्वेशी

मराठमोळा
Fri, 03/09/2012 - 18:26 नवीन
आले का खवचट छिद्र्वान्वेशी विमे, बाकी मुद्दे सोडून भोके शोधणारे ;) असो, इथे केवळ उच्चपद्स्थ, उच्चशिक्षित, मराठी आंतरजालाची आवड असणार्‍या समाजाच्या बाबतीत चर्चा सुरु आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ममो.......

इरसाल
Fri, 03/09/2012 - 18:32 नवीन
इथे केवळ उच्चपद्स्थ, उच्चशिक्षित, मराठी आंतरजालाची आवड असणार्‍या समाजाच्या बाबतीत चर्चा सुरु आहे हो. ह्या गोळाबेरजेतून स्त्री आय डी घेवून वावरणारे वगळलेले आहेत असे समजुनच ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

अतिशय रोचक निरीक्षण

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/09/2012 - 22:05 नवीन
फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत. वाचक असतात का हे मला माहित नाही. पण या निरीक्षणाचा विचार जरूर व्हावा असं वाटतं. धनंजय बोरगावकर यांनी याच प्रकारचा मुद्दा मांडलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

:O - सुपर अनलाईक

सोत्रि
Fri, 03/09/2012 - 22:40 नवीन
फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत. वाचक असतात का हे मला माहित नाही. पण या निरीक्षणाचा विचार जरूर व्हावा असं वाटतं.
फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? :O फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली. - (फेसबुकवर असणारा पण अभिव्यक्त मसंवर होणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ह्यॅ?

Nile
Fri, 03/09/2012 - 23:12 नवीन
फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच.
ह्यावर अधिक विदा दिल्यास आवडेल. त्यानंतर फेसबुकवर कोणत्याही मराठी संस्थळापेक्षा अधिक वैचारीक आणि विधायक गोष्टी होतात हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझी. एखाद्याच्या फ्रेंड्सलिस्टमध्ये बिनडोक आणि तुंबड्यालावणारेच अधिक असतील तर तो फेसबुकचा दोष नाही. ८०० मिलियन लोकांच्यात तुमच्या आमच्यासारखे सगळेच येतात. मराठी संस्थळावर काय कमी बिनडोक लोक आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

निळुभाऊ, माझा प्रतिसाद ह्या

सोत्रि
Fri, 03/09/2012 - 23:32 नवीन
निळुभाऊ, माझा प्रतिसाद ह्या खालच्या वाक्याला होता.
फेसबुकावरून मराठीत व्यक्त होणारे संस्थळांवर फारसे लिहीताना दिसत नाहीत
प्रत्यक नाण्याला दोन बाजू असतात ह्या न्यायाने फेसबुकवर वैचारीक (?) आणि विधायक गोष्टी होतही असतील. पण फेसबुक हे त्याचे प्रमुख माध्यम खचितच नाही. विधायक गोष्टींसाठी उत्तम 'मार्केटिंग प्लॅटफॉर्म' मात्र आहेच, त्याबद्दल दुमत नाहीयेय. - (फेसबुकावर तुंबड्या लावायला आवडणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

ते वाक्य धरूनही.

Nile
Fri, 03/09/2012 - 23:40 नवीन
माझं म्हणणं एकंदरीतच आहे, मराठी त्यात इन्क्लुडेड आहे. फेसबुकवर मराठीतूनही मराठी संस्थळांच्या तुलनेत होणारी अभिव्यक्ती असण्याची शक्यता नाही असे तुम्हाला वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माझ्या मते

अन्या दातार
Fri, 03/09/2012 - 23:47 नवीन
फेसबुकवर मराठीतूनही मराठी संस्थळांच्या तुलनेत होणारी अभिव्यक्ती असण्याची शक्यता नाही असे तुम्हाला वाटते का?
काही ग्रुप्सवर लोक मराठीतून व्यक्त होतातच, पण त्यात एक प्रकारची क्लिष्टता येते. कोण कोणास उद्देशून बोलतोय, याचा माग काढणे एका मर्यादेनंतर अशक्य होऊन जाते. मसंवर तो प्रकार नाही. तदर्थ अनेक लोक हळूहळू तिथे मते व्यक्त करणे टाळतात (हे माझे निरीक्षण). पर्यायाने अभिव्यक्तिला मर्यादा येतात. लोक आपसूकच रिकाम्या भिंतींना तुंबड्या लावत सुटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बिंगो!

सोत्रि
Fri, 03/09/2012 - 23:57 नवीन
बिंगो! अन्या, धन्यवाद रे मित्रा, एक्झॅक्टली हेच लिहायचे होते. - (अन्याशी सहमत असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तोकडी तुलना

Nile
Sat, 03/10/2012 - 00:12 नवीन
माझं म्हणणं आहे तुमच्या डोक्यात असलेली फेसबुकची जी इमेज आहे (सोकांजींचा पहिला प्रतिसाद) ती चुकीची आहे. तुम्ही संस्थळ जॉईन केलंत की संपूर्ण मटेरीअल तुम्हाला अव्हेलेबल होतं. फेसबुकावर तुम्हाला मटेरीअल शोधावं लागतं. नुस्तं फेसबुकावर असणं उपयोगाचं नाही. कोणाला कोणत्या ग्रुपवर काय सापडतं हे त्याने जॉईन केलेल्या ग्रुपवर अवलंबून आहे. फेसबुकचा कोणतातरी ग्रुप आणि संस्थळ अशी तुलना चूकीची आहे. सोकांजीचा पहिल्या प्रतिसादाला आक्षेप आहे. त्यातील दावा सिद्ध कोणी करणार असेल तर मला रस आहे.ग्रुप्स वगैरे नीटीग्रीटीमध्ये रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि

अन्या दातार
Sat, 03/10/2012 - 09:34 नवीन
फेसबुक हे बिनडोकपणाचे आणि रिकाम्या भिंतीला तुंबड्या लावण्याचे माध्यम आहे. तिथे काय अकलेचे दिवे लागतात हे आपण बघतोच. जिथे Today I'm feeling SAD ह्याला १००० भर लाईक्स असतात तिथले भिंतींवर पिंका टाकणे म्हणजे अभिव्यक्त होणे ? Shock फेसबूक आणि वरती नामोल्लेख केलेली मसं येथे मराठीत अभिव्यक्त होणे हे जर सारखेच आहे असे म्हणत असशील तर मग चर्चाच खुंटली.
हा झाला तुम्ही म्हणत असलेला सोत्रिंचा पहिला प्रतिसाद. यात त्यांनी एखादा स्पेसिफिक ग्रुप व मसं ही तुलना केलेली दिसत नाही. त्यानंतर तुमच्या या प्रतिसादात तुम्ही काही विदा मागितला होता. तसा विदा देणे जरी शक्य नसले तरी धागाकर्तीचे मत सोत्रिंच्या मुद्द्यास पुष्टी देणारे असल्याचे येथे आढळते. फेसबुक व मसं अशी चर्चा चालू नसल्याने खरंतर या उपचर्चेची गरज नव्हती, पण आता तशी झालीच आहे तर आमचे मत मांडून थोडी भर घालतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हे अवांतर आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 03/10/2012 - 05:19 नवीन
विमेंचा मुद्दा, फेसबुक वापरता येतं याचा अर्थ इंटरनेट उपलब्ध आहे, असा आहे. इंटरनेट उपलब्ध असताना फेसबुक का निवडतात आणि संस्थळांवर का येत नाहीत हा मला पडलेला प्रश्न नाही. म्हणूनच मी त्यावर निबंध लिहीलेला नाही. फेसबुक आणि संस्थळांमधे निवड करणार्‍यांमधे जेंडर बायस आहे का? असल्यास का असा प्रश्न आहे. फेसबुक स्त्रियांना अधिक सुरक्षित, आपलंसं वाटतं असं उत्तर असेल का? अवांतरः १. कंटाळा आल्यास फेसबुकावर फुकाचा टेमपास करायला मला आवडतं. २. ऐसी अक्षरेचं फेसबुक फीड माझ्या अकाऊंटवर आहे. तिथे फेसबुकावर अनेक मित्र ऐसी अक्षरेवरचं चांगलं लेखन लाईक करतात, पण त्यांना संस्थळावर येण्याएवढा वेळ नाही, हौस नाही, इच्छा नाही, किंवा इतर काही. असं करण्यार्‍यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असल्यामुळे त्याचा विदा जमवण्यात हशील नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

इंटरनेट / मराठी साइटच्या

नितिन थत्ते
Fri, 03/09/2012 - 10:58 नवीन
इंटरनेट / मराठी साइटच्या वापरकर्त्यांमध्ये सिंगल राहणारे पुरुष (मी, कुंदन ही दोन विवाहित उदाहरणे त्याखेरीज बरेचसे बॅचलर्स) हा मोठा वर्ग असावा. अश्या प्रकारात स्त्रिया जवळजवळ मुळीच नसाव्यात. या वर्गातले पुरुष जवळजवळ (जागे असण्याचा) पूर्णवेळ जालावर पडिक असतात.
  • Log in or register to post comments

बॅचलर हा शब्द

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 03/09/2012 - 11:03 नवीन
बॅचलर हा शब्द स्त्रियांसंदर्भात वापरला जात नाही*, पण स्त्री-पुरूष दोघांच्याही बाबतीत विवाहाचं वय पुढे ढकललं जात आहेच. स्त्रिया मराठीत व्यक्त का होत नाहीत याचं हे कारण काही प्रमाणात पटलं तरीही पुरेसं वाटत नाही. *मी स्वत:चा उल्लेख एकेकाळी स्यूडो बॅचलर असा केला होता तेव्हा मला हे सांगण्यात आले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

पडिक असतात.

कुंदन
Sat, 03/10/2012 - 10:57 नवीन
>>पडिक असतात. म्ह़ण़जे काय.... साला २०० दिर्‍हाम भरतो महिन्याला , वसुल नको करायला ? आँ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

+१

अन्नू
Sat, 03/10/2012 - 10:59 नवीन
आक्शी याजा सकट वसूल कराया पायजे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

एव्हढे करूनही अनेक साईट

निनाद मुक्काम …
Sat, 03/10/2012 - 23:11 नवीन
एव्हढे करूनही अनेक साईट वापण्यास बंदी मग त्या वापण्यासाठी दर सेंकदाला बदलणारा आयपी अड्रेस तेव्हा वसूल हे केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

.

अन्नू
Sat, 03/10/2012 - 22:49 नवीन
या वर्गातले पुरुष जवळजवळ (जागे असण्याचा) पूर्णवेळ जालावर पडिक असतात.
असे का! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

तरीच, गेल्या काही दिवसात ही

कवितानागेश
Fri, 03/09/2012 - 12:34 नवीन
तरीच, गेल्या काही दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली होतीच, की इथे 'मुली' ;) कमी आहेत.कारण जरा कुठे ऑनलाईन आले की सगळ्या 'टग्यां'शीच बोलावे लागते!! :P असो. माझ्या मते काही कारणे, १. मुलीना नेटवर वेळ कमी मिळतो. कारण त्या वर्तमानात रहातात, आणि वर्तमानात 'कृती' करतात. वैचारीक ( थेअरेटिकल) चर्चा करणे अनेकवेळा निरर्थक वाटते. २.असलेल्या वेळात त्या पाककृती वाचतात. :) ३. मूळात स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो, त्यामुळे आपली मते ( काही पक्की मते असली तरिही) ती हिरिरीने मांडावीत अशी गरज वाटत नाही. तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो. ४.आपली स्वतःची मते 'चव्हाट्यावर' मांडणे तितके सुरक्षित वाटत नाही. ५. पुरुष मूळ मुद्द्याला सोडून कधीही अचानक 'लागेल' अशी कॉमेंट टाकू शकतात. त्यामुळे सांभाळून रहावे लागते. ६. स्वतःला व्यक्त करण्यासाठी अजून हजार ठिकाणे असतात. उदा.: मैत्रिणी, बहिणी, आई, मावशी वगरै. त्यांच्याशी बोलणे फोनवर होते, पुन्हा 'नेट' बाद! ७.शिवाय इतर काहीतरी कलाकुसरीचे उद्योग ८०% मुलींना असतातच. त्यात वेळ घालवणे जास्त आनंददायक असते. ८.सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या विषयांबद्दल उदासिनता. आपण बरे आपले घर बरे अशी वृती. ९. मुद्दा ३ चा पुढचा परिणाम. वाद घालणेदेखिल आवडत नाही. त्यामुळे आपले मत एकाच छोट्याश्या वाक्यात मांडण्याकडे कल. १०. मुलींना ( निदान ७०%) बोलायला खूप आवडते! त्यामुळे लिहणे कमी असते. फोनच पुष्कळ वापरला जातो, नेटची गरजच काय? ;)
  • Log in or register to post comments

काही मुद्दे पटले, काही

अन्नू
Fri, 03/09/2012 - 14:21 नवीन
काही मुद्दे पटले, काही डोक्यावरुन गेले तर काही नुसतेच वरुन गेले (उदा.- प्रतिसादाचा आणि तुमच्या वयाचा संबंध आणि यावरुन वयाचा अंदाज! ;) ) हे टग्या म्हणजे नेमके काय वो? म्हन्जी टांगमोड्या, मुडद्या, काळतोंड्या, बोक्या, अशा पुरुषी विशेषणासारखच ते वाटतया म्हणं यीचारलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लिमाउजेट यांच्या बर्‍याच

जेनी...
Fri, 03/09/2012 - 22:15 नवीन
लिमाउजेट यांच्या बर्‍याच मतांशी सहमत . वेळ मिळाल्यावर सविस्तर लिहिन्याचा प्रयत्न करेन . तुर्तास वाचत आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तरीच, गेल्या काही दिवसात ही

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 03/10/2012 - 11:37 नवीन
तरीच, गेल्या काही दिवसात ही गोष्ट माझ्या लक्षात आली होतीच, की इथे 'मुली' कमी आहेत.कारण जरा कुठे ऑनलाईन आले की सगळ्या 'टग्यां'शीच बोलावे लागते!!
आता कळली का आमची व्यथा ??
१. मुलीना नेटवर वेळ कमी मिळतो. कारण त्या वर्तमानात रहातात, आणि वर्तमानात 'कृती' करतात. वैचारीक ( थेअरेटिकल) चर्चा करणे अनेकवेळा निरर्थक वाटते.
ते वर्तमानात राहण्याचे सोडा, पण वैचारिक काहीही आवडत नाही हे मान्य:-)
२.असलेल्या वेळात त्या पाककृती वाचतात.
घ्या. म्हणजे परत चूल आणि मुल चा प्रकार का ??? तरी बरे, इथे आपण बाय चोइस मुद्द्यांबद्दल बोलत आहोत.
३. मूळात स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो, त्यामुळे आपली मते ( काही पक्की मते असली तरिही) ती हिरिरीने मांडावीत अशी गरज वाटत नाही.
कुणाचा स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो ?? सर्व महिलांचा ?? अरे बाप रे. यावर प्रतिवाद करायची माझी कुवत नाही.
तसेही इथल्या कुठल्याही चर्चांमुळे रोजच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नसतो.
हा पलायन वाद झाला. फरक पडताच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदीच काही नाही तर इतरांची मते कळतात त्यातून आपली मते बदलू शकतात. ती क्षितिजे का कायसे म्हणतात ती विस्तारत नाहीत ? मिपा वर मी नसतो तर ओरिगामी शी ओळख झाली नसती, पक्षी निरीक्षण करायला शिवडीला गेलो नसतो.
४.आपली स्वतःची मते 'चव्हाट्यावर' मांडणे तितके सुरक्षित वाटत नाही.
का कोण खाणार आहे ? मते चव्हाट्यावर मांडून कसली असुरक्षितता वाटते बुवा ??
५. पुरुष मूळ मुद्द्याला सोडून कधीही अचानक 'लागेल' अशी कॉमेंट टाकू शकतात. त्यामुळे सांभाळून रहावे लागते.
महिला पण हे चोख प्रकारे करू शकतात. मिपा वर अशा अनेक ताई (माई, अक्का) आहेत की. नवे व्यनितून विचारा. नाही तर उगाच कुणाला तरी "लागेल"
६. स्वतःला व्यक्त करण्यासाठी अजून हजार ठिकाणे असतात. उदा.: मैत्रिणी, बहिणी, आई, मावशी वगरै. त्यांच्याशी बोलणे फोनवर होते, पुन्हा 'नेट' बाद!
म्हणजे त्याच त्याच वर्तुळात फिरणे प्रेफर केले जाते. हम्म्म्म.... रोचक आहे.
७.शिवाय इतर काहीतरी कलाकुसरीचे उद्योग ८०% मुलींना असतातच. त्यात वेळ घालवणे जास्त आनंददायक असते.
असेच काहीसे वर बिचारा ममो म्हणाला तर नॉन अ‍ॅग्रेसिव्ह रीतीने उत्तर आले की.
८.सामाजिक म्हणवल्या जाणार्‍या विषयांबद्दल उदासिनता. आपण बरे आपले घर बरे अशी वृती
ज्जे बात !!!!
९. मुद्दा ३ चा पुढचा परिणाम. वाद घालणेदेखिल आवडत नाही. त्यामुळे आपले मत एकाच छोट्याश्या वाक्यात मांडण्याकडे कल.
महिला आपले मत थोडक्यात मांडतात ??? देवा परमेश्वरा..... वाचव रे बाबा !!!!!
१०. मुलींना ( निदान ७०%) बोलायला खूप आवडते! त्यामुळे लिहणे कमी असते. फोनच पुष्कळ वापरला जातो, नेटची गरजच काय?
मुद्दा ६ चेच उत्तर चला, पुढे बोला..... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

त्याच त्या वर्तुळात म्हणजे

शिल्पा ब
Sat, 03/10/2012 - 11:50 नवीन
त्याच त्या वर्तुळात म्हणजे काय? अर्थातच!! ज्या लोकांवर विश्वास आहे त्यांच्याशीच बोलणार ना? उगाच वाट्टेल त्या लोकांशी का म्हणुन बोलायचं? बाकी चर्चा रोचक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

:)

कवितानागेश
Sat, 03/10/2012 - 19:37 नवीन
आता कळली का आमची व्यथा ??> अरेरे! फार वाइट वाटले हो विमेकाका. ( स्त्रियांचे ऑनलाईन वर्तनदेखिल सहानुभूतीपूर्ण असते) :) ते वर्तमानात राहण्याचे सोडा, पण वैचारिक काहीही आवडत नाही हे मान्य:-)> मुद्दा २ वाचा. येथे कृतीला महत्त्व दिले जाते! घ्या. म्हणजे परत चूल आणि मुल चा प्रकार का ??? तरी बरे, इथे आपण बाय चोइस मुद्द्यांबद्दल बोलत आहोत.> मुद्दा १ वाचा. वर्तमान आयुष्यात याच २ महत्त्वाच्या गोष्टी असतात, ज्यांना सतत तोंड द्यावे लागते. कुणाचा स्वभाव 'अ‍ॅग्रेसिव्ह' नसतो ?? सर्व महिलांचा ?? अरे बाप रे. यावर प्रतिवाद करायची माझी कुवत नाही.> योग्य निर्णय. माणसानी केवळ वादासाठी वाद घालू नयेत. ;) हा पलायन वाद झाला. फरक पडताच नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. अगदीच काही नाही तर इतरांची मते कळतात त्यातून आपली मते बदलू शकतात. ती क्षितिजे का कायसे म्हणतात ती विस्तारत नाहीत ? मिपा वर मी नसतो तर ओरिगामी शी ओळख झाली नसती, पक्षी निरीक्षण करायला शिवडीला गेलो नसतो.> मला नै ना येता आले. :( त्याचे कारण, नवीन मुद्दा १ अ: स्वतःच्या आवडींपेक्षा 'इतर' कामे नेहमीच जास्त महत्त्वाची वाटतात. का कोण खाणार आहे ? मते चव्हाट्यावर मांडून कसली असुरक्षितता वाटते बुवा ??> घरी कळले म्हणजे?? :P महिला पण हे चोख प्रकारे करू शकतात. मिपा वर अशा अनेक ताई (माई, अक्का) आहेत की. नवे व्यनितून विचारा. नाही तर उगाच कुणाला तरी "लागेल"> पुरुषांचा टक्का जास्त आहे, द्व्यर्थी शब्द वापरणयात. आणि बोलले कुणीही तरी 'लागते' बायकांनाच. म्हणजे त्याच त्याच वर्तुळात फिरणे प्रेफर केले जाते. हम्म्म्म.... रोचक आहे.> मुद्दा ४ वाचा. वर्तुळ लहान, सुरक्षितता महान! असेच काहीसे वर बिचारा ममो म्हणाला तर नॉन अ‍ॅग्रेसिव्ह रीतीने उत्तर आले की.> ब्वॉर्र. ज्जे बात !!!!> धन्यवाद. महिला आपले मत थोडक्यात मांडतात ??? देवा परमेश्वरा..... वाचव रे बाबा !!!!!> वरची २ उत्तरे वाचा! ;) चला, पुढे बोला..... > असे प्रत्येक वाक्याला उत्तर देणे म्हणजे झिम्मा खेळल्यासारखे वाटतय! ;) असो. झाला का पुरेसा गुंता? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

मराठी इंटरनेट साइट्सवर

Dhananjay Borgaonkar
Fri, 03/09/2012 - 12:46 नवीन
मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का? प्रत्येकाच्या व्यक्तिगत आवडीचा हा मुद्दा असु शकतो. तुम्ही नमुद केलेल्या सगळ्या संकेत्स्थळामधे कुठेही फक्त पुरुषांना आवडेल असेच लिखाण, धागे असतात जेणेकरुन पुरुषांची संख्या अधिक वाढावी असही काही नाहीये. आज काल बहुतांशी मुल मुली फेसबुक, ट्वीटर अन्य सोशल नेटवर्कींग साईट्स वर असतात (मराठी संकेतस्थळावर नसले तरी). जर का अश्या ठिकाणीसुद्धा स्त्रीवर्गाची संख्या कमी असली असती तर मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अवांतर - आता असं म्हणंण किती योग्य होईल की मराठी संकेत्स्थळावर पुरुष वर्गाची संख्या जास्त आहे म्हणजे पुरुष वर्गाला मराठी बद्दल जास्त आदर आहे आणि स्त्री वर्गाला नाही? असा धागा निघाला तर चुक की बरोबर?
  • Log in or register to post comments

शॉपींगमध्ये जास्त वेळ घालवल्याने

कपिलमुनी
Fri, 03/09/2012 - 13:41 नवीन
हे उत्तर सुचले आहे
  • Log in or register to post comments

मराठी ईंटरनेट साइट युजर हा

बाळ सप्रे
Fri, 03/09/2012 - 14:18 नवीन
मराठी ईंटरनेट साइट युजर हा ग्रुप इतका छोटा आहे , की Enough samples नसल्यामुळे यावरुन काढलेला कुठलाही निष्कर्ष प्रातिनिधिक ठरणार नाही...
  • Log in or register to post comments

शीर्षक बघा: मराठी इंटरनेट

अन्या दातार
Fri, 03/09/2012 - 14:39 नवीन
शीर्षक बघा:
मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?
इंटरनेट साईट युजर हाच ऑब्जेक्ट ऑफ स्टडी आहे मालक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण कमी का?

तर्री
Fri, 03/09/2012 - 14:31 नवीन
संख्या महत्वाची की दर्जा महत्वाचा ? निदान मिपा वर तरी तुलनेने स्त्रियांच्या लेखनाच्या संख्येपेक्षा त्यांचा लेखनाचा दर्जा वरचा आहे. अवांतर: "महाराष्ट्र व्यापारात मागे का? " ह्या चाली वर वाचले.
  • Log in or register to post comments

व्यक्त होणं महत्वाचं..

मस्त कलंदर
Fri, 03/09/2012 - 14:54 नवीन
माझ्या काही वर्षांच्या होस्टेलच्या अनुभवातून, माझ्या व्यवसायामधून आणि आजवर भेटलेल्या स्त्रियांशी बोलण्यावरून अदितीच्या प्रश्नाचं उत्तरे ही असू शकावीत. १. स्त्री असो वा पुरूष, त्यांना स्वतःचं मत आहे की नाही, आणि ते किती ठामपणे मांडता येतं हे महत्वाचं आहे. पिढ्या न पिढ्या शिकलेल्यांच्या पण पुरूषीवर्चस्वाच्या घरांमधून," तुला काय करायचंय, तुमची अक्कल शेवटी चुलीपाशीच चालवायचीय" असं म्हटलेलं ऐकलं आहे. अशा वेळेस फक्त सांगितलेलं ऐकायचं, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत आणि कुणी विचारत नसल्याने मत देखील नसण्याची काही उदाहरणे पाहिली आहेत. किंवा अशा घरातल्या काही स्त्रियांकडून, "विचार केला की त्रास होतो, त्यापेक्षा बिनडोकपणे राहिलेलं बरं पडतं" असंही ऐकलं आहे. अशा स्त्रियांच्या घरी इंटरनेट आलं तरी त्या वाचनमात्र न राहिल्या तरच आश्चर्य वाटेल. याउलट एखादी अशिक्षित स्त्री तिच्या मतांबद्दल, मुद्दयांबाबत ठाम असू शकते आणि ते ती प्रसंगी पटवूनही देऊ शकते. त्यामुळॅ व्यक्त होणं हे फक्त एलिट वर्गापुरतं मर्यादित नसावं. थोडक्यात, त्यामुळे व्यक्त होता येणं हे महत्वाचं आहे. याबाबतीत मला मसरबाईचं उदाहरण आठवतं. २. काही घरांमधलं अतिप्रोटेक्टेड वातावरण. अशा वेळेस मुलांच्या(मुलगा+मुलगी)यांच्या विचारांना कितपत चालना मिळते हा प्रश्न आहे. विचारशून्यता असेल तर व्यक्त कुठून होणार? अर्थात हे आजच्या विद्यार्थीदशेतल्या लोकांमध्ये काही प्रमाणात आढळून येतंय. सध्या आपण ज्यांच्याबद्दल( मराठी आंतरजालावर सक्रीय असणार्‍यांबद्दल) बोलतोय त्यांच्याबाबतीत हे कारण नक्कीच नसावंसं वाटत आहे. ३. टंकाळा असू शकतो. त्यामुळॅ फक्त वाचलं आणि पुढे गेले असंही होतं. वेळॅचा अभावही एक कारण आहेच ४. लीमाऊचा वाद न घालण्याचा मुद्दा थोडासा पुढे नेते. काहींना मुद्देसूद चाललेल्या चर्चा आवडतात, पण मग मुद्दे नाहीत म्हणून समोरचा कसाही वितंडवाद घालू लागला तर ," ठीक आहे, तुझा बैल दूध देतो" असं म्हणून त्या वादात निष्फळ जाणारा वेळ दुसरीकडे स्त्कारणी लावणं सोयीस्कर वाटत असावं. मी स्वतः इथं खूप कमी प्रतिसाद देते, लेखही कमीच लिहिते. माझ्यासाठी तीन आणि चार नंबरची कारण लागू पडतात. आणि हो, इथं प्रतिसादांत कामाच्या वाटणीचा मुद्दा आलाय. आमच्या घरी ती कशी आहे हा मुद्दा नाही. पण माझा नवरा वर्षभरातून एकदा मीच तयारी करून दिलेल्या पाककृतीत स्वत्:ची दोन मिनिटे घालून ती बनवतो आणि लिहायला दहा मिनिटे घालवून इथे पोस्ट करतो. आणि म्हणूनच मला पुस्तकं वाचायला, सिनेमे बघायला आणि इथे लिहायला वेळ मिळतो असं काही महाभागांचं मत आहे. तेव्हा, असो!!!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा