कोण येथे गुरुवर्य ?
खितपत पडले शौर्य
अहिंसेचे पुतळे मानतो
मौनात दडले क्रौर्य
झाकोळला स्पष्ट अंधार
मुखवट्यात गळले धैर्य
स्त्रीत्वाची ताकद जाणतो
खुऱाड्यात लुटले कौमार्य
घुंगूरपाण्यात डुबले नेत्र
कळले कोणास सूरगांभिर्य
दगडात ईश्वर जाणतो
देवत्व शोधतो सूर्य
भावनांचा गच्च बाजार
मनात हरवले माधुर्य
वैराग्यात निरपेक्षता मानतो
अहंकारातून घडते कार्य
---- शब्दमेघ
(कविता पुन:प्रकाशित, नविन काव्य सुचत नसल्याने फक्त कविता वाचताना आपलीही एखादी कविता आता असावी या भावनेमुळे पुन्हा येथे कविता देत आहे. गोड माणुन घ्यावी.)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2140
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोण येथे कविवर्य
___/\___ वल्ली, विडंबन खुपच
In reply to कोण येथे कविवर्य by प्रचेतस
कोण येथे कविवर्य? गळाठून गेले
In reply to कोण येथे कविवर्य by प्रचेतस
कालच्या ऊरलेल्या भाताला फोडणी.
नविन लिखानास प्रेरणा देणार
In reply to कालच्या ऊरलेल्या भाताला फोडणी. by तर्री
गणेशा मस्त रे , खरच खुप खुप
छान आहे कविता, विडंबन आता